Class 7 Marathi Balbharati Chapter 16 Question Answer कोळीण

Students can find the best Marathi Balbharati Class 7 Solutions and Chapter 16 Question Answer कोळीण for exam preparation.

Std 7 Marathi Balbharati Chapter 16 Question Answer कोळीण

Maharashtra Board Solutions Class 7 Marathi Balbharati Chapter 16 कोळीण

कोळीण Question Answer

प्रश्न १.
खालील आकृती पूर्ण करा.
Class 7 Marathi Balbharati Chapter 16 Question Answer कोळीण 9
उत्तर:
१. साधनसामग्री घेऊन डोंगरमाथ्यावर सायंकाळी गेले.
२. कोळिणीच्या घरट्याजवळील दगडावर बसले.
३. पावसामुळे आलेला वातावरणातील गारठा सहन करत बसले.
४. डझनभर कोळिणीची घरटी असलेली ढेकळे जमा केली.
५. प्रयोगशाळेत आणून त्यावर योग्य प्रकाशयोजना केली.
६. कोळिणीला सोबग पकडून खाऊ घातले.
७. विविध आकाराचे शतपाद कोळिणीला खाऊ घातले.

प्रश्न २.
असे का घडले ते लिहा.
(टीप: खालील प्रत्येक उत्तराच्या सुरुवातीस ही प्रस्तावना लिहिता येईल.
प्रस्तावना: पक्षी व वन्यजीव संशोधक, लेखक मारुती चितमपल्ली यांच्या ‘कोळीण’ या पाठात त्यांनी कोळिणीचे केलेले निरीक्षण चित्तवेधक शब्दांत वर्णन केले आहे.)

(अ) लेखक डोंगरावरच्या जमिनीचे निरीक्षण करू लागले.
उत्तर:
वनाधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या मारुती चितमपल्ली यांनी अनेक ठिकाणचे जंगल पिंजून काढले आहे, तसेच पक्षी- वन्य जीवनविषयक माहिती मिळवण्याची त्यांना विशेष आवड असल्याने ते डोंगर-दऱ्यांमध्ये जात असत. यावेळी त्यांना कोळीण आपले सावज कसे पकडते? तिच्या घरट्याची रचना कशी असते? या प्रश्नांची उत्तरे शोधायची होती.. डोंगरमाथ्यावर कोळिणीचे घरटे असेल अशी त्यांना खात्री होती, त्यामुळे ते डोंगरावरच्या जमिनीचे बारकाईने निरीक्षण करत होते.

(आ) लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला.
उत्तर:
रात्रीच्या अंधारात जेव्हा कोळीण कार्यरत असते त्यावेळचे छायाचित्र लेखकांस घ्यायचे होते. त्यासाठी सर्व तयारीनिशी लेखक कोळिणीच्या घरट्याशेजारी असलेल्या दगडावर बसलेले होते. त्यांचे चित्त त्या घरट्याच्या अवतीभवती इतके एकाग्र झाले होते, की वसंत ऋतुतील अंगाला बोचणाऱ्या गारठ्याचेही त्यांना भान नव्हते. लेखक त्यांच्या पायानजीकच्या कोळिणीच्या जगात गुंग झाल्याने बाहेरच्या जगाचा त्यांना विसर पडला.

(इ) लेखकांनी कोळिणीच्या घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले.
उत्तर:
तासाभराच्या शोधानंतर लेखकांस कोळिणीचे घरटे दिसले. अचूकतेने बांधलेले हे घरटे आतून नेमके कसे असते, याची लेखकांस तीव्र उत्सुकता होती. त्यासाठी लेखकांनी घरट्याच्या जवळ असलेल्या चाकूचे पाते दाराच्या फटीमध्ये घुसवले. आत असलेल्या कोळिणीने ते चाकूचे पाते विलक्षण ताकदीने ओढून घेतल्याने पाते वाकले. दार उघडू नये अशी कोळिणीची इच्छा होती. लेखकासही रात्री सर्व साधनसामग्रीसह कोळिणीचे छायाचित्र घेण्यास यायचे होते, त्यामुळे तिला अधिक घाबरवणे लेखकांस अयोग्य वाटल्याने त्यांनी कोळिणीच्या घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले.

(ई) कोळिणीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही.
उत्तर:
कोळीण ही कीटकभक्षी असते. घरट्याच्या आसपास येणाऱ्या कीटकास ती बिळात ओढून खाते. घरटे सोडून जाणे म्हणजे कोळिणीचा मृत्यू अटळ असतो, कारण निसर्गनियमानुसार लहान कीटकांस मोठे कीटक अन् मोठ्या कीटकांना पक्षी किंवा अन्य प्राणी खातात. हा धोका कोळिणीलाही असतो. कोळिणीच्या घरट्याची रचनाही अत्यंत अचूक असते. घरट्याचे दार घट्ट असते, ते बाहेरून उघडता येणे शक्य नसते. कोळीण स्वत: ही तिच्या माघारी बंद झालेले दार उघडू शकत नाही, त्यामुळे कोळिणीला बिळाचे संरक्षण सोडता येत नाही.

प्रश्न ३.
खालील घटनांचे परिणाम लिहा.
Class 7 Marathi Balbharati Chapter 16 Question Answer कोळीण 10
उत्तर:

घटना परिणाम
(अ) लेखकांनी चाकूच्या पात्याचं टोक कोळिणीच्या घरट्याच्या दाराला लावलं. दार उघडले मात्र कोळिणीने विलक्षण ताकदीने चाकूचे पाते आत ओढून वाकवले.
(आ) पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला. जमीन थोडी ओलसर झाली.
(इ) कोळिणीच्या माघारी दार बंद होणे. घरट्याचे दार बंद झाल्यास ते कोळिणीस उघडणे अशक्य होते, त्यामुळे ती स्वत:च्याच घरट्यास पारखी होते व बाहेरच्या जगात तिची शिकार होऊ शकते.
(ई) कोळिणीला सोबगच्या पावलांचा आवाज आला. सोबगला पकडण्यासाठी कोळिणीची चुळबुळ सुरू झाली.

प्रश्न ४.
आकृतीत दिलेल्या मुद्दयांच्या आधारे उत्तर लिहा.
Class 7 Marathi Balbharati Chapter 16 Question Answer कोळीण 11
उत्तर:
Class 7 Marathi Balbharati Chapter 16 Question Answer कोळीण 3

प्रश्न ५.
तुम्हांला पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या घरांची नावे माहीत आहेत. ती खालील चौकटींत लिहा.
Class 7 Marathi Balbharati Chapter 16 Question Answer कोळीण 12
उत्तर:
Class 7 Marathi Balbharati Chapter 16 Question Answer कोळीण 7

खेळूया शब्दांशी

प्रश्न ५.
खालील वाक्प्रचारांच्या अर्थातील योग्य अर्थ शोधून लिहा.
Class 7 Marathi Balbharati Chapter 16 Question Answer कोळीण 13
उत्तर:
i.
Class 7 Marathi Balbharati Chapter 16 Question Answer कोळीण 4
वाट बघणे

ii.
Class 7 Marathi Balbharati Chapter 16 Question Answer कोळीण 5
वंचित होणे

iii.
Class 7 Marathi Balbharati Chapter 16 Question Answer कोळीण 6
शिकार होणे

आपण समजून घेऊया

(५) केवलवाक्य
(अ) ती रोज सकाळी लवकर उठते.
(आ) तो कसोटी सामन्यात खेळतो.

ही केवलवाक्ये आहेत. केवलवाक्यात एकच विधान असते, त्यामुळे एक उद्देश्य व एकच विधेय असते. केवलवाक्य हे विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी किंवा नकारार्थी यांतील कोणत्याही प्रकारचे असू शकते.

(६) मिश्रवाक्य
(अ) जेव्हा मनात येईल, तेव्हा मी गावाला जाईन.
(आ) पावसाळा आला, की आकाशात काळे ढग जमतात व पाऊस पडू लागतो.

ही मिश्रवाक्ये आहेत. मिश्र वाक्यांत दोन किंवा अधिक वाक्ये असतात, जी एकमेकांवर अवलंबून असतात. अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे वाक्य ‘मुख्य वाक्य’ असते, तर मुख्य वाक्यावर अवलंबून असणारे वाक्य गौणवाक्य असते.
उदा., वरील वाक्यांत ‘मी गावाला जाईन’ व ‘पावसाळा आला’ ही दोन मुख्य वाक्ये आहेत. कधीकधी एका मुख्य वाक्यावर एक किंवा अधिक गौणवाक्ये अवलंबून असतात. ही गौणवाक्ये उभयान्वयी अव्ययाने एकमेकांना जोडलेली असतात.

(७) संयुक्तवाक्य

(अ) मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते.
(आ) मिहिर खो खो किंवा लंगडी या खेळात भाग घेईल.

ही संयुक्तवाक्ये आहेत. संयुक्तवाक्यात दोन वाक्ये असतात. ती दोन वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात; पण ती स्वतंत्र असतात, म्हणजे ती दोन केवलवाक्ये असतात. अर्थाच्या दृष्टीने ती एकमेकांवर अवलंबून नसतात. ते एक जोडवाक्य असते.

Class 7 Marathi Balbharati Chapter 16 कोळीण Question Answer

संकलित मूल्यमापन

प्रश्न १.
असे का घडले ते लिहा

i. एका कोळिणीने आपल्या घरट्याचा त्याग केला.
उत्तर:
कोळीण कशा पद्धतीने आपल्या खादयावर झडप घेते याचे लेखकांस चित्रण करायचे होते. त्यासाठी ते डझनभर कोळिणी घरट्यासह आपल्या प्रयोगशाळेत घेऊन आले. त्यातल्या काहींनी बिळातच स्वत:ला कोंडून घेतले. एका कोळिणीने मात्र घरट्याचाच त्याग केला, कारण चित्रणासाठी आवश्यक असलेल्या प्रकाशाच्या झोतात राहण्यापेक्षा बाहेरच्या धोकादायक जगात जगणे तिला अधिक सुसह्य वाटले. बाहेर हिरवे कुरण असेल असे तिला वाटले व त्याच्या शोधात ती घरट्याबाहेर पडली; पण काही आठवड्यांनी तिचा सुकून मृत्यू झाला.

प्रश्न २.
थोडक्यात उत्तरे लिहा.

i. डोंगरमाथ्यावरील कोळिणीने सोबगचा फडशा कशा पद्धतीने पाडला ?
उत्तर:
लेखक वसंतऋतूतील थंड वातावरणात रात्रीच्या अंधारात कोळिणीच्या शिकारी रूपाचे दर्शन घेण्यासाठी ताटकळत बसले होते. तेवढ्यात एक सोबग वेड्यावाकड्या चालीने मृत्यूच्या वाटेवर चालत आले. त्यांच्या पावलांचा कंप जसा जवळ जाणवू लागला तशी घरट्यातील कोळीण सावध झाली. सोबग कोळिणीच्या घरट्याच्या दाराजवळ येताच आतील कोळीण काळ्या राक्षसिणीसारखी जमिनीतून वर आली. घरट्याचे दार उघडले; अन् अंगावर घोंगडी टाकून एखादयाचे

अपहरण करावे त्याप्रमाणे तिने आपल्या काळ्या केसाळ पायांनी सोबगला घट्ट आवळले. एका क्षणात ती सोबगला घेऊन आतल्या अंधाऱ्या जगतात निघून गेली. आत जाताच घरट्याचे दार घट्ट बंद झाले.
अशाप्रकारे, शिकारी अन् शिकार यांच्यातल्या त्या जीवन-मृत्यूचे नाट्य रोमहर्षक शब्दांत लेखकांनी वर्णन केले आहे.

ii. छायाचित्र काढण्यासाठी आणलेल्या डझनभर कोळिणींचा लेखकांस कसा अनुभव आला?
उत्तर:
डोंगरमाथ्यावर सोबग-कोळीण यांच्यातील झटापट स्वतः अनुभवल्यानंतर त्याचे चित्रण करून इतरांनाही अनुभवता यावे ही लेखकांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी कोळिणीची घरटी असलेल्या जमिनीची एक डझनभर ढेकळं स्टुडिओत आणली. रंगीत फिल्मने चित्रण करता यावे यासाठी त्या घरट्यांवर रात्रंदिवस प्रकाशझोत टाकला; परंतु कीटकांच्या जगातही व्यक्तीव्यक्तीनुसार प्रकृतीबदल लेखकांस दिसून आला. मेंदूची कसलीही यंत्रणा नसलेल्या कोळिणींच्या व्यक्तिमत्त्वात भेद दिसून आले.

काहींनी स्वतःला घरट्यातच बंद करून घेतले. अन्न पुरवठ्याच्या अन्य कोणत्याही पद्धतीचा स्वीकार केला नाही. घरट्याच्या आतच समाधी घेतली. काहीजणी क्वचितच जगण्यापुरते खात. एका कोळिणीने तर हिरव्या कुरणाच्या शोधात घरट्याचा त्याग केला. काही आठवड्यांनी ती कोपऱ्यात मृतावस्थेत लेखकांस दिसली. सतत प्रकाशाच्या जगण्यापेक्षा मृत्यूचा स्वीकार केलेला बरा असा विचार तिने केला असावा असे लेखकांस वाटले.

अशाप्रकारे, डझनभर आणलेल्या कोळिणीपैकी केवळ एकीनेच लेखकांच्या चित्रणासाठी साथ दिली.

iii. कोळीण व शतपादाची लढाई कशी रंगली ?
उत्तरः
लेखकांस कोळिणीचे बारकाईने निरीक्षण करायचे होते. त्यासाठी ते अनेक शक्कल लढवत होते. छोट्या आकाराचे सावज कोळीण सहज फस्त करी. कोळिणीला शिकार करणे अवघड जावे यासाठी लेखकाने आकाराने मोठ्या शतपादाची निवड केली. शतपादाला सहजासहजी पकडणे कोळिणीला शक्य होत नव्हते. मोठ्या शतपादाने मोठ्या जिकरीने कोळिणीशी लढाई केली.

एकदा तर त्याने कोळिणीला घरट्याबाहेरच खेचले. तिचा तोलही गेला. शतपाद तिच्याभोवती वेटोळे घालण्याचा प्रयत्न करत होता; पण काही क्षणांतच त्याचे शंभर पाय हवेत वळवळले अन् त्याच क्षणी संधी साधून कोळिणीने शतपादाला विळखा घातला आणि ती त्याला घेऊन घरट्यात निघून गेली.

अशाप्रकारे, चित्तथरारक नाट्यानंतर कोळिणीने आपल्या विलक्षण ताकदीने शतपादावर विजय मिळवला.

भाषाभ्यास आणि व्याकरण

प्रश्न १.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

  1. रात्र =
  2. स्तब्ध =
  3. दगड
  4. गवत =
  5. सावज =
  6. नटी =

उत्तरः

  1. निशा, रजनी
  2. स्थिर
  3. पाषाण
  4. तृण
  5. शिकार, भक्ष्य
  6. अभिनेत्री

प्रश्न २.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. घट्ट ×
  2. अस्वस्थ ×
  3. अंधार ×
  4. जमा ×
  5. जिंकणे ×

उत्तरः

  1. सैल
  2. स्वस्थ
  3. प्रकाश, उजेड
  4. खर्च
  5. हरणे

प्रश्न ३.
खालील शब्दांचे लिंग बदला.

  1. कोळी
  2. नर
  3. नट
  4. राक्षस

उत्तर:

  1. कोळीण
  2. मादी
  3. नटी
  4. राक्षसीण

प्रश्न ४.
खालील शब्दांचे वचन बदला.

  1. फांदी
  2. लढाई
  3. कांडी

उत्तर:

  1. फांदया
  2. लढाया
  3. कांड्या

प्रश्न ६.
पाठात ‘नि:सत्त्व’ शब्द आला आहे. ‘निः’ उपसर्ग जोडून आणखी शब्द तयार करा.
उत्तर:

  1. निःस्वार्थ
  2. निःसारण
  3. निःशुल्क
  4. निःशब्द
  5. निःसंदेह

प्रश्न ७.
हे शब्द असेच लिहा.
लक्षपूर्वक, पार्श्वभूमी, कोळीण, कोळिणीच्या, एकाग्रचित्त, दृश्यासारखं, संमिश्र, कर्कश, स्तब्ध, कुरूप, दृष्टिआड, आश्चर्यचकित, क्षुद्र, बुद्धिशून्य, निःसत्त्व, रोमहर्षक, क्षणैक, श्रमपूर्वक, छिद्र.

मुक्तोत्तरी प्रश्न

प्रश्न १.
प्राणी जगातील अन्नसाखळीचे महत्त्व तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तर:
‘अन्न’ ही सर्व सजीवांच्या प्राथमिक गरजांपैकी एक गरज आहे. अन्न मिळवण्यासाठी सर्व सजीव धडपड करत असतात. प्राण्यांमध्ये काही प्राणी तृणभक्षी, तर काही मांसभक्षी असतात. तृणभक्षी प्राणी अन्नासाठी वनस्पतींवर अवलंबून असतात, तर मांसभक्षी प्राणी छोट्या प्राण्यांवर किंवा तृणभक्षींवर अवलंबून असतात. एकंदरीत जगण्यासाठी अन्नसाखळीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अन्न मिळवणे आणि दुसऱ्याचे अन्न होणे ही प्रक्रिया परिसंस्थेत सतत चालू राहिली तरच हे निसर्गचक्र सुरळीत चालेल असे म्हणावयास हरकत नाही.

आकारिक मूल्यमापन

मौखिक कार्य

प्रश्न १.
तुम्ही कधी कीटकांचे निरीक्षण केले आहे का? असल्यास तुमच्या शब्दांत सांगा.
प्रश्न २.
कीटकांचे प्रकार सांगा.

लेखी कार्य

प्रश्न २.
मुंगी या कीटकाविषयी खालील मुद्दयांच्या आधारे माहिती लिहा.
Class 7 Marathi Balbharati Chapter 16 Question Answer कोळीण 8
उत्तर:
मुंगी हा अतिशय लहान आकाराचा कीटक आहे. मुंग्या दोन प्रकारच्या असतात, लाल व काळ्या. मुंगीला सहा पाय असतात. डोक्यावर दोन अँटेना असतात. दोन डोळे आणि छाती व पोट असते.
मुंगी स्वसंरक्षणासाठी करकचून चावा घेते हे सर्वज्ञात आहेच. मुंगीचा हा चावा इतका वेदनादायी असण्याचे कारण म्हणजे ती फॉरमिक ॲसिड उडवते. हे अॅसिड आपल्यासाठी फार हानिकारक मानले जाते.
मुंग्या समूहाने राहतात. त्या मातीच्या वारुळात निवास करतात.

उपक्रम / प्रकल्प

प्रश्न १.
कोळी या कीटकाच्या अन्य काही प्रकारांची माहिती मिळवून त्यांच्या छायाचित्रांचे संकलन करा.
(हा उपक्रम विद्यार्थ्यांनी स्वतः करावा.)

कोळीण पाठाचा परिचयः

पक्षी व वन्यजीव संशोधक, लेखक मारुती चितमपल्ली यांच्या ‘कोळीण’ या पाठात त्यांनी कोळिणीबद्दलचे आपले निरीक्षण नोंदवले आहे. कोळीण आपले सावज कसे पकडते, आपल्या घराचे दार बंद होऊ नये, आपण असुरक्षित होऊ नये, यासाठी कोणती काळजी घेते याचे चित्तवेधक व रोमहर्षक असे वर्णन लेखकाने केले आहे.

कोळीण कोळीण शब्दार्थ

Class 7 Marathi Balbharati Chapter 16 Question Answer कोळीण 1

कोळीण वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

खिळून राहणे. आपली जागा न सोडणे.
ढिलाई दिरंगाई, बेजबाबदारपणा
दबा धरणे. मुळीच न हलणे.
पढवणे. शिकवणे.
पारखा होणे. वंचित होणे.
पारध होणे. शिकार होणे.
प्रतीक्षा करणे. वाट बघणे.
विल्हेवाट लावणे. नष्ट करणे.
वेटोळं विळखा
सुगावा लागणे. समजणे.

Leave a Comment