Class 7 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer स्वप्नं विकणारा माणूस

Students can find the best Marathi Balbharati Class 7 Solutions and Chapter 2 Question Answer स्वप्नं विकणारा माणूस for exam preparation.

Std 7 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer स्वप्नं विकणारा माणूस

Maharashtra Board Solutions Class 7 Marathi Balbharati Chapter 2 स्वप्नं विकणारा माणूस

स्वप्नं विकणारा माणूस Question Answer

प्रश्न १.
तुमचे मत स्पष्ट करा.

(अ) गावात येणाऱ्या माणसाला गावकरी ‘सपनविक्या’ म्हणतात.
उत्तर:
लेखकाच्या लहानपणी त्यांच्या गावी कोण्या एका गावाकडून एक माणूस सुकामेवा विकण्यासाठी येत असे. त्याने घोड्यावरून अनेक प्रदेशांचा प्रवास केला होता. भिन्न-भिन्न संस्कृतींची व स्वभावांची माणसे पाहिली होती.

तिथल्या संस्कृतींची, रितीरिवाजांची माहिती, गमतीजमती तो लोकांना रंगवून सांगत असे. त्यांच्या तोंडून ही रोचक माहिती ऐक लोकांनाही आवडत असे. त्याचे आकर्षक बोलणे ऐकताना लोकांना एका वेगळ्याच विश्वात गेल्याचा अनुभव मिळत असे.

ते मनाने त्या प्रदेशात फिरून येत. त्याचे मनोहारी बोलणे ऐकताना लोकांना आपल्या दुःखाचा विसर पडत असे. स्वप्नांत धुंद होऊन ते त्याच्या किश्श्यांचा आनंद घेत. त्याचे बोलणे ऐकताना जणू काही आपण स्वप्नातच आहोत असा संभ्रम होत असे. कधी गावाबाहेरचे जग न अनुभवलेले गावकरी वेगवेगळ्या प्रांतांतील माहिती ऐकताना गुंग होत असत. त्यांच्या मनात उत्साह निर्माण होत असे. त्याचे गोड बोलणे लोकांच्या डोळ्यांत स्वप्न उतरवून जात असे.

अशाप्रकारे, प्रत्यक्ष न पाहिलेल्या स्वप्नमय दुनियेची सफर घडवणाऱ्या त्या माणसाला गावकरी ‘सपनविक्या’ म्हणू लागले.

(आ) स्वप्नं विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश.
उत्तर:
लेखकाच्या गावात सुकामेवा विकण्यासाठी एक माणूस येत असे. केवळ सुकामेवा विकून निघून न जाता हा माणूस
त्याने पाहिलेले विविध प्रांत, तिथले रितीरिवाज, संस्कृती यांचे सुरेख वर्णन करून गावकऱ्यांना त्या प्रांताचे हुबेहूब दर्शन घडवत असे. त्याचे बोलणे ऐकताना गावकरी कल्पनारम्य जगात फिरून येत असत.

या माणसाचे रोचक बोलणे गावकऱ्यांना फार आवडत असे. त्या माणसाचा सुकामेवा विकणे हा एकमेव उद्देश नव्हता, तर आपले अनुभव, आपल्याजवळचे ज्ञान, इतरांना सांगावे व दुसऱ्यांना आनंद दयावा असा व्यापक हेतू त्यामागे होता. लोकांच्या आयुष्यात उत्साह भरणारा, त्यांना त्यांच्या दुःखाचा काही काळापुरता विसर पडायला लावणारा जगाची ओळख करून देणारा, जणू काही आपले स्वप्न लोकांच्या डोळ्यांत उतरवणारा सपनविक्या लोकसेवेच्या हेतूने गावात येत असे.

Class 7 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer स्वप्नं विकणारा माणूस

प्रश्न २.
स्वप्नं विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे दोन-दोन वाक्यांत वर्णन करा.
Class 7 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer स्वप्नं विकणारा माणूस 8
उत्तर:

  1. त्याचा पेहरावः स्वप्न विकणारा माणूस तलम रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुडता व डोक्याला लाल- पांढरा फेटा असा पेहराव करत असे. गव्हाळ रंगाचा, झुबकेदार मिश्या असलेला हा धिप्पाड माणूस डोळ्यांवर चश्मा, पायांत चामडी बूट घालत असे.
  2. त्याचे बोलणे: त्याचे बोलणे अत्यंत आकर्षक आणि स्वप्नमय दुनियेची धुंद सफर घडवणारे होते. त्याचे बोलणे ऐकताना लोक भारावून जात, तल्लीन होत, त्यांचे विचारचक्र थांबे. प्रवासात अनुभवलेले विश्व तो आपल्या बोलण्यातून लोकांपुढे उभे करत असे.
  3. त्यांचे स्वप्नः आपले अनुभव, आपल्याजवळचे ज्ञान इतरांना दयावे आणि इतरांना आनंद दयावा हे सपनविक्याचे स्वप्न होते, म्हणून तो सुकामेवा विकण्याच्या निमित्ताने लोकांना ज्ञान व माहिती देऊन लोकसेवा करत होता.

शिक्षकांसाठी : विदयार्थ्यांकडून ही कथा प्रसंगानुसार वाचून घ्यावी, तसेच या कथेचे सादरीकरण करून घ्यावे. वर्तमानपत्रे, मासिके यांमध्ये आलेल्या विविध कथांचा संग्रह करून घ्यावा. त्या कथांचे विदयार्थ्यांकडून समजपूर्वक प्रकट वाचन करून घ्यावे.

प्रश्न ३.
खालील आकृत्या पूर्ण करा.

(अ)
Class 7 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer स्वप्नं विकणारा माणूस 9
उत्तर:
१. ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही.
२. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करते, ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते.
३. तीव्र संवेदनशील मन असलेली माणसे आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाट्टेल ते करतात.
४. सर्वसामान्यांपेक्षा वेगळे कार्य करून स्वतः आदर्श बनतात किंवा इतरांना आदर्श बनवतात.
५. स्वप्नांअभावी मनुष्य अधांतरी तरंगत राहतो.

(आ)
Class 7 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer स्वप्नं विकणारा माणूस 10
उत्तर:
१. माणसाला स्वप्नं बघता आली पाहिजेत.
२. स्वप्नपूर्तीसाठी विचार केला पाहिजे.
३. स्वप्ने तुच्छ असतात.
४. भलती – सलती स्वप्ने न पाहणेच योग्य.

(इ)
Class 7 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer स्वप्नं विकणारा माणूस 11
उत्तर:
१. काजू
२. बदाम
३. किसमिस
४. वेलदोडे
५. सुपारी
६. खारीक
७. खोबरे

(ई)
Class 7 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer स्वप्नं विकणारा माणूस 12
उत्तर:
१. लोकांमध्ये उत्साह निर्माण होत असे.
२. जगाची ओळख झाल्यासारखे वाटत असे.
३. आयुष्यातील दुःखाचा विसर पडत असे.

Class 7 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer स्वप्नं विकणारा माणूस

प्रश्न ४.
स्वप्नं विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडेपर्यंतच्या घटनांचा ओघतक्ता तयार करा.
Class 7 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer स्वप्नं विकणारा माणूस 13
उत्तर:
Class 7 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer स्वप्नं विकणारा माणूस 7

प्रश्न २.
कल्पना करा व लिहा.
स्वप्नं विकणारा माणूस तुम्हांला भेटला आहे व त्याच्याशी तुमचा संवाद झाला आहे.
Class 7 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer स्वप्नं विकणारा माणूस 14
झोपेत असताना आपणांस स्वप्नं का पडत असतील, याबाबत विचार करा. घरातील मोठ्या व्यक्तींशी किंवा मित्रांबरोबर याविषयी चर्चा करा.
उत्तर:
मी: नमस्कार काका, तुमचे उदात्त स्वप्न आणि त्यापाठचा तुमचा शुद्ध हेतू वाचून मला तुमच्याविषयी आदर निर्माण झाला आहे. हे असे आगळेवेगळे लोकसेवेचे व्रत तुम्ही कसे बरं निवडले?
सपनविक्याः धन्यवाद, मुली. पण, माझे स्वप्न अगदी साधेसरळ होते – आपल्याजवळ असणारे ज्ञान, माहिती इतरांना वाटून टाकण्याचे! तेच मी केले. ‘जे जे आपणांसि ठावे । ते इतरांना दयावे ।’ या हेतूनेच मी गावकऱ्यांना भेटत गेलो, त्यांच्याशी बोललो, सुखं दुःखं वाटून घेतली.
मी: तुम्ही देशोदेशीच्या गोष्टी फार छान सांगता. डोळ्यांसमोर जिवंत करता म्हणे!
सपनविक्याः अगं, मी फक्त प्रवासात पाहिलेल्या, अनुभवलेल्या सुंदर सुंदर गोष्टी, घटना, स्थळांचे वर्णन करतो इतकंच! मला लहानपणापासूनच गोष्टी ऐकवण्यात रस आहे, म्हणून जमलं हे !
मी: ‘सपनविक्या’ या तुमच्या नावाविषयी तुम्हांला काय वाटते?
सपनविक्या: लोक प्रेमाने देतात नाव एखादयाला! मला लोकांनी दिलेले सपनविक्या हे नाव फारच आवडते. स्वप्न विकण्याचे भाग्य मला या नावामुळेच मिळाले.
मी: तुमच्याप्रमाणे आम्हांलाही आमची स्वप्ने पूर्ण करता यावीत यासाठी काय सांगाल ?
सपनविक्याः सध्याची पिढी सुशिक्षित आहे, हुशार आहे. त्यांना मी एवढेच सांगेन, की तुमच्या शिक्षणाचा, ज्ञानाचा फायदा समाजाला व्हावा, असे जीवन जगा. यातून तुम्हांलाही खूप आनंद मिळेल व इतरांनाही. पैसा सर्वच मिळवतात, पण माणसांचं प्रेम, आपुलकी मिळवायला शिकायला हवे. आणि स्वप्ने पाहायलाच हवीत; पण पूर्णही करायला हवीत.
मी: धन्यवाद काका. नक्कीच आम्ही स्वप्नपूर्तीकरता प्रयत्न करू.
सपनविक्याः शुभं भवतु ।

खेळूया शब्दांशी

(अ) पांर-झाडाच्या बुंध्याजवळ बसण्यासाठी सभोवताली बांधलेला ओटा, पार पलीकडे. असे ‘पार’ या शब्दाचे दोन अर्थ होतात. लक्षात ठेवा-संदर्भानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात. खालील शब्दांचे प्रत्येकी दोन अर्थ लिहा.

(अ) हार
(आ) कर
(इ) वात
उत्तर:
(अ) हार – पराजय
हार – गळ्यात घालण्याची फुलांची माळ
(आ) कर – हात
कर – करण्याची क्रिया
(इ) वात – एक विकार
वात – वायू
वात – कापसाची वात

(आ) खालील दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
Class 7 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer स्वप्नं विकणारा माणूस 15
उत्तर:
(i – ब),
(ii – क),
(iii – अ),
(iv – इ),
(v – ड)

(इ) खाली दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्ये तयार करा.

(अ) कुतूहल
(आ) संभ्रम
(इ) ढब
(ई) आतुरतेने
उत्तर:
(अ) नवीन पाठ्यपुस्तकांविषयी विदयार्थ्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले.
(आ) अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना सुरुवातीला संभ्रमाचे वातावरण निर्माण होते.
(इ) राजेशच्या बोलण्याची ढब निराळी आहे.
(ई) परीक्षा संपताच विदयार्थी फिरायला जाण्याची आतुरतेने वाट पाहत असतात.

Class 7 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer स्वप्नं विकणारा माणूस

उपक्रम / प्रकल्प

१. ‘या बालांनो या रे या’ हे गीत मिळवा व परिपाठात सादर करा.

२. तुमच्या गावात / परिसरात येणाऱ्या अशा काही व्यक्ती आहेत, ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असता. उदा. फुगेवाला, आइस्क्रीमवाला. अशा एखादया व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
(हे उपक्रम विदयार्थ्यांनी स्वतः करावेत.)

खेळ खेळूया

Class 7 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer स्वप्नं विकणारा माणूस 16
उत्तर:

म – मालेगाव ख – खटाव क – कोल्हापूर
वाशिंद वडगाव रावळगाव
दापोली वडूज वाशी
लातूर जिंतूर शहापूर

आपण समजून घेऊया.

• खालील वाक्ये वाचा.
मी शाळा जातो.
मी शाळेत जातो.
ही दोन वाक्ये तुम्ही वाचलीत. यांपैकी पहिले वाक्य चुकीचे आहे आणि दुसरे वाक्य बरोबर आहे. या दोन्ही वाक्यांमध्ये काय फरक आहे ? पहिल्या वाक्यात ‘शाळा’ हा शब्द आहे. दुसऱ्या वाक्यात ‘शाळा’ या शब्दाला ‘-त’ हा प्रत्यय लागला आहे.

• खालील वाक्ये वाचा.
(१) राम मित्राशी बोलतो.
(२) रेश्मा पालीला घाबरते.
(३) कल्पना दुकानात जाते.
या वाक्यांमध्ये,
नाम + प्रत्यय
मित्र + – शी
पाल + -ला
दुकान + -त

मित्र, पाल, दुकान या नामांना अनुक्रमे -शी, -ला, -त हे प्रत्यय जोडलेले आहेत. प्रत्यय लागण्यापूर्वी या शब्दांमध्ये काही बदल झाले आहेत. उदा., मित्र ~ मित्रा, पाल ~ पाली-, दुकान ~ दुकाना- शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी होणाऱ्या या बदलाला शब्दाचे सामान्यरूप म्हणतात. शब्दाच्या मूळ रूपाला सरळरूप म्हणतात. उदा., ‘दुकान’ हे सरळरूप आणि दुकाना- हे सामान्यरूप.

नामांना किंवा सर्वनामांना लागणारे प्रत्यय अनेक प्रकारचे असतात. -ला, -त, – ने, -शी, -चा, -ची, -चे इत्यादी.

लक्षात ठेवा : काही वेळा शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या रूपात बदल झालेला दिसत नाही. उदा., खिडकी, खोली यासारखी ईकारान्त स्त्रीलिंगी नामे.

• आता एक मजेदार खेळ खेळूया.
शब्दाचे सामान्यरूप न करता काही वाक्ये तयार करा. ती मोठ्याने वाचा. नंतर सामान्यरूपासह ती पुन्हा तयार करा. लिहिताना एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, की सामान्यरूपातला शब्द आणि त्याचे प्रत्यय जोडूनच लिहायचे असतात.
उदा., रवी ने पाल ला मारले. ✗
रवीने पालीला मारले. ✓

घोडा, माळ, पाल, घर, दुकान ही सामान्यनामे आहेत; पण अंजली, सुजाता, राजीव ही विशेषनामे आहेत. विशेषनामांना प्रत्यय लावताना त्यांचे सामान्यरूप होत नाही. उदा., अंजलीला, सुजाताला, राजीवला.

बोलींमध्ये आणि जुन्या मराठीत विशेषनामांची सामान्यरूपे दिसतात. आज ती कमी होत चालली आहेत. पौराणिक पात्रांची नावे मात्र सामान्यरूपात लिहितात. रामाने, दशरथाने सीतेने, कृष्णाने इत्यादी; पण हीच नावे आताच्या जगातल्या माणसांची असतील, तर सहसा सामान्यरूप होत नाही हे शिक्षकांनी विदयार्थ्यांना समजावून सांगावे.

* आडनावांचे सामान्यरूप होते. उदा., गायकवाडांना, सान्यांना, जोगळेकरांना वगैरे; पण लिहिताना शक्यतो सामान्यरूप न वापरता ‘गायकवाड यांना’, ‘साने यांना’ असे लिहितात.
* गावांच्या, राज्यांच्या नावांचेही सामान्यरूप होते. उदा., गोवा – गोव्याला, बडोदा – बडोदयाला, पुणे- पुण्याला.
ईकारान्त व अकारान्त ग्रामनामे बऱ्याचदा बदलत नाहीत, हे शिक्षकांनी विदयार्थ्यांना लक्षात आणून दयावे.

Class 7 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer स्वप्नं विकणारा माणूस

• खालील वाक्ये वाचा.

(१) ही माझी नवी छोटी शाळा.
या वाक्यात ‘ही’, ‘माझी’, ‘नवी’, ‘छोटी’ हे सारे शब्द ‘शाळा’ या नामाची विशेषणे आहेत.
आता हे वाक्य वाचा.
(२) ह्या माझ्या नव्या छोट्या शाळेत क्रीडांगणसुद्धा आहे.
तुमच्या लक्षात आले का, ‘शाळा’ या नामाला प्रत्यय लागल्यावर ‘ही’, ‘माझी’, ‘नवी’, ‘छोटी’ ह्या विशेषणांचे रूपसुद्धा बदलले. ते शब्द ‘ह्या, ‘माझ्या’ ‘नव्या’, ‘छोट्या’ असे बदलले. याला विशेषणाचे सामान्यरूप म्हणतात. जेव्हा नामाचे सामान्यरूप होते तेव्हा विशेषणांचेपण सामान्यरूप होते; पण त्यांना कुठलाही वेगळा प्रत्यय लागत नाही.

• आता तुम्ही या उदाहरणाप्रमाणे खालील तक्ता पूर्ण करा.
Class 7 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer स्वप्नं विकणारा माणूस 17
तुमच्या हेही लक्षात आले असेल, की नाम पुल्लिंगी असो, स्त्रीलिंगी असो वा नपुंसकलिंगी, एकवचनात असो की अनेकवचनात, त्याच्या विशेषणांचे सामान्यरूप फक्त ‘या’ लागून होते.
आहे ना गंमत !

• अधोरेखित शब्दांविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.
Class 7 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer स्वप्नं विकणारा माणूस 18
उत्तर:

वाक्ये सरळरूप सामान्य रूप प्रत्यय
१. रमेशचा भाऊ शाळेत गेला. रमेश, शाळा रमेश, शाळे चा, त
२. बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले. बँक, शेतकरी बँके, शेतकऱ्या ने, ला
३. सुट्टीत तो मित्रांशी खेळतो. सुट्टी, मित्र सुट्टी, मित्रां त, शी
४. मंडईत फळांच्या गाड्या आहेत. मंडई, फळे मंडई, फळां त, च्या

Class 7 Marathi Balbharati Chapter 2 स्वप्नं विकणारा माणूस Question Answer

संकलित मूल्यमापन

पाठाधारित प्रश्नोत्तरे

प्रश्न १.
कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.

  1. लेखकाच्या मते, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो ……. नाही ! (हुशार, माणूसच झोपाळू)
    सपनविक्या गावच्या ……… पारावर थांबायचा. (पिंपळाच्या वडाच्या, नारळाच्या)
  2. लोक त्या घोडेवाल्या माणसाला ………. च म्हणू लागले. (बडबड्या, सपनविक्या, सपनसांग्या)
  3. सपनविक्याच्या मुलाचे …….. शिक्षण पूर्ण झाले होते. (अभियांत्रिकी, पदवीपर्यंतचे, वैदयकीय)

उत्तर:

  1. माणूसच
  2. पिंपळाच्या
  3. सपनविक्या
  4. वैदयकीय

प्रश्न २.
विधान सत्य की असत्य ते लिहा.

  1. स्वप्न विकणारा माणूस उंटावर बसून येत होता.
  2. स्वप्न विकणारा माणूस गावात सुकामेवा विकत असे.
  3. लोकांना ‘सपनविक्या’ च्या गोष्टी ऐकताना कंटाळा येत असे.
  4. सपनविक्याचा मुलगा शिक्षक होता.

उत्तर:

  1. असत्य
  2. सत्य
  3. असत्य
  4. असत्य

प्रश्न ३.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.

i. “कोण रे बाबा तू? कुठून आलास ?”
उत्तर:
वरील वाक्य वृद्ध तात्या सपनविक्याच्या मुलाला उद्देशून म्हणाले.

ii. “बाबांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे.”
उत्तर:
वरील वाक्य सपनविक्याचा मुलगा गावकऱ्यांना उद्देशून म्हणाला.

Class 7 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer स्वप्नं विकणारा माणूस

प्रश्न ४.
कोण ते लिहा.

  1. गावात सुकामेवा विकायला येणारा
  2. गावातील सगळ्यांत वृद्ध व्यक्ती
  3. गावोगावी जाऊन वृद्ध, आजारी लोकांची सेवा करण्याचे स्वप्न सत्यात उतरवणारा
  4. सपनविक्याच्या किश्श्यांमध्ये स्वतःला विसरून जाणारे

उत्तर:

  1. सपनविक्या
  2. तात्या
  3. सपनविक्याचा मुलगा
  4. गावातील लोकं

प्रश्न ५.
गटात न बसणारा शब्द लिहा.

  1. धोतर, चामडी बूट, मिशी, शर्ट
  2. पिंपळ, वेलदोडे, खारीक, किसमिस

उत्तर:

  1. शर्ट
  2. पिंपळ

प्रश्न ६.
तुमचे मत स्पष्ट करा.
(टीप: खालील प्रत्येक उत्तराच्या सुरुवातीस ही प्रस्तावना लिहिता येऊ शकते.
प्रस्तावनाः ‘स्वप्नं विकणारा माणूस’ या लेखक अशोक कोतवाल यांच्या पाठात लोकांची सेवा करणाऱ्या सपनविक्या व त्याच्या मुलाचे वर्णन केले आहे.)

प्रश्न ७.
थोडक्यात उत्तरे लिहा.

i. स्वप्न बघण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते, असे लेखकाने का म्हटले असावे ?
उत्तर:
लेखकाच्या मते, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. मानवाला समृद्ध करणारे स्वप्न बघण्यासाठी संवेदनशील मनाची आवश्यकता असे, कारण असे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानव अथक प्रयत्न करतो. अशी स्वप्नपूर्ती करणारी व्यक्ती ही स्वतःला इतरांपेक्षा भिन्न ठरवत असते. इतरांसाठी आदर्श बनून किंवा इतरांना आदर्श मानून ती जीवन जगत असते.

याउलट, संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसे अधांतरी आयुष्य जगत असतात. त्यांच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टींचा ध्यास नसतो वा धडपड नसते. अशी ही ध्यासहीन स्वप्नाळू वृत्ती घातक असते.

म्हणून, आयुष्याला योग्य वळण देण्यासाठी व समृद्ध होण्यासाठी माणसाने स्वप्नं पाहावीत. अशी उदात्त स्वप्नं साकार करण्यासाठी / प्रत्यक्षात आणण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते असे लेखक सांगतात.

ii. मुलांना सपनविक्याविषयी आकर्षण का वाटत असे?
उत्तर:
लेखकाच्या लहानपणी एक माणूस घोड्यावर बसून गावात सुकामेवा विकायला येत असे. त्याच्या घोड्याचा ‘टबडक् टबडक्’ आवाज येताच लहान मुले त्याच्या दिशेने धावत जात असत, कारण लहान मुलांना घोड्याविषयी आकर्षण वाटत असे. तसेच, या घोड्यासोबत असणाऱ्या त्या माणसाचा पेहराव, त्याच्या मखमली कापडातील गाठोड्यात असलेल्या वस्तू, तो सांगत असलेले किस्से हे सारेच मुलांना आकर्षित करणारे असे.

तो माणूस गावकऱ्यांना आपण पाहिलेले समृद्ध विश्व, विविध प्रांत, तेथील संस्कृती व रितीरिवाजांचे वर्णन रंगवून सांगत असे. त्याच्या या गप्पा ऐकताना सारेजण तल्लीन होत असत. जणू काही स्वप्नमय विश्वात रममाण होत. बऱ्याच वेळाने हा स्वप्न विकणारा माणूस त्याच्या मखमली कापडातील गाठोड्यात असलेला सुकामेवा काढून विकत असे. काही वेळा, तर तो गाठोड्यातील खाऊ लहान मुलांना देत असे. त्यामुळे लहान मुले त्याच्यावर खूश होत असत.
अशाप्रकारे, गावात येणाऱ्या सपनविक्याचे व त्यांच्या प्रत्येक कृतीचे मुलांना आकर्षण वाटत होते.

iii. सपनविक्याचे गावात न येणे गावकऱ्यांच्या मनाला चटका लावत होते.
उत्तर:
लेखकाच्या गावात नियमित येणारा सपनविक्या अचानकच यायचा बंद झाला. त्याचे न येणे लहान-थोर सर्वांनाच मनोमन खटकत होते, कारण त्याच्या येण्यामुळे व त्याच्या गप्पांमुळे गावकऱ्यांना काही क्षण का होईना आपल्या दु:खांचा विसर पडत असे. त्याचे बोलणे ऐकताना त्यांना स्वप्नमय विश्वाचे दर्शन घडत असे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण होत असे.

कष्टमय जीवनात थोडेतरी विरंगुळ्याचे क्षण त्यांना मिळत. अंगात, तरतरी जाणवत असे. गोड बोलून तो जणू गावकऱ्यांच्या डोळ्यांत त्याचेच स्वप्न उतरवून जात असे. हे सारे गावकऱ्यांना हवेहवेसे होते. सपनविक्या जरी गावात येत नव्हता तरी त्याची आठवण गावकऱ्यांना येत होती.

अशाप्रकारे, गावाबाहेरच्या जगाची ओळख करून देणाऱ्या व मनाला प्रफुल्लित करणाऱ्या सपनविक्याचे गावात न येणे गावकऱ्यांच्या मनाला चटका लावत होते.

iv. सपनविक्याचे गावात येणे का बंद झाले?
उत्तर:
वेगवेगळ्या प्रांतांची सफर करणारा सपनविक्या गावोगावी जाऊन सुकामेवा विकत असे. सुक्यामेव्याचे गाठोडे घेऊन, घोड्यावर बसून ऐटीत त्याचा प्रवास चालत असे. सुकामेवा विकणे या एकमेव उद्देशाने तो गावोगावी प्रवास करत नव्हता, तर गावकऱ्यांना काही आनंदाचे क्षणही देत होता. अचानक या सपनविक्याला गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला. या आजारामुळे त्याला गावोगावी प्रवास करणे अशक्य झाले, म्हणून त्याचे गावात येणे बंद झाले होते.

v. सपनविक्याचे स्वप्न त्याच्या मुलाने कशा पद्धतीने पूर्ण केले?
उत्तरः
सुकामेवा विकण्याच्या निमित्ताने सपनविक्या गावातल्या लोकांना एकत्र जमवून आपण प्रवासादरम्यान अनुभवलेले समृद्ध अनुभवविश्व रंगवून सांगत असे. आपल्याजवळ असलेले ज्ञान, अनुभव इतरांना देणे, दुसऱ्यांना आनंद देणे हे त्याचे स्वप्न होते. त्याच्या बोलण्यातून गावकऱ्यांनाही उत्साह येई, जगाची ओळख झाल्यासारखी वाटे आणि दुःखांचा विसर पडत असे.

आपल्याजवळील ज्ञान इतरांच्या आनंदासाठी, सुखासाठी वापरण्याचा उदात्त हेतू सपनविक्याप्रमाणेच त्याच्या मुलानेही मनाशी बाळगला आणि वैदयकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांप्रमाणेच लोकसेवेचे व्रत घेऊन सपनविक्याच्या मुलाने गावोगावच्या वृद्ध, आजारी लोकांची सेवा करण्याचे ठरवले. अशाप्रकारे, त्याने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.

भाषाभ्यास व व्याकरण

प्रश्न १.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

  1. समृद्ध =
  2. ध्यास
  3. कुतूहल =
  4. पाय =
  5. ऐट =
  6. डोके =
  7. मती =
  8. आनंद =
  9. डोळे =
  10. ढब =

उत्तर:

  1. संपन्न
  2. ध्येय
  3. उत्सुकता, जिज्ञासा
  4. पद, चरण
  5. मिजास, तोरा
  6. मस्तक, शीर
  7. बुद्धी
  8. हर्ष, मोद
  9. नयन, नेत्र, लोचन
  10. शैली

प्रश्न २.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. श्रेष्ठ ×
  2. स्वहित ×
  3. तीव्र ×
  4. संवेदनशील ×
  5. सैलसर ×
  6. खूश ×
  7. बडबड्या ×
  8. वृद्ध ×
  9. आजारी ×
  10. आठवण ×

उत्तर:

  1. कनिष्ठ
  2. परहित
  3. सौम्य
  4. असंवेदनशील
  5. घट्ट
  6. नाखूश
  7. शांत, मितभाषी
  8. तरुण
  9. तंदुरुस्त
  10. विस्मरण

Class 7 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer स्वप्नं विकणारा माणूस

प्रश्न ३.
खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द तो / ती / ते लिंग
i. सपनविक्या तो सपनविक्या पुल्लिंग
ii. सुपारी ती सुपारी स्त्रीलिंग
iii. घोडा तो घोडा पुल्लिंग
iv. स्वप्न ते स्वप्न नपुंसकलिंग

प्रश्न ४.
खालील शब्द वचन बदलून लिहा.

  1. मिशी
  2. डोंगरदऱ्या
  3. माणूस
  4. कुडता
  5. अनुभव
  6. गाठोडी

उत्तर:

  1. मिश्या
  2. डोंगरदरी
  3. माणसे
  4. कुडते
  5. अनुभव
  6. गाठोडे

प्रश्न ५.
रिकाम्या जागी कंसातील योग्य वाक्प्रचार घालून वाक्य पूर्ण करा.
(घासाघीस केली, टकामका पाहू लागले, भरभरून बोलतो, तुच्छ लेखू नये)

  1. कधीही कोणाला ……………….
  2. गावात नवीन आलेल्या परदेशी तरुणाकडे सर्वजण ………..
  3. हेमंत आपल्या गुरुजनांविषयी अगदी …………
  4. भाजीमंडईत ‘ताजी हिरवीगार भाजी विकत घेताना मंजूने ……….

उत्तरः

  1. तुच्छ लेखू नये.
  2. टकामका पाहू लागले.
  3. भरभरून बोलतो.
  4. घासाघीस केली.

प्रश्न ६.
पांर-झाडाच्या बुंध्याजवळ बसण्यासाठी सभोवताली बांधलेला ओटा, पार पलीकडे. असे ‘पार’ या शब्दाचे दोन अर्थ होतात. लक्षात ठेवा-संदर्भानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात. खालील शब्दांचे प्रत्येकी दोन अर्थ लिहा.

i. सर
ii. गुरु
उत्तर:
i. सर – पावसाची धार
सर – गळ्यात घालावयाचा दागिना

ii. गुरु – एक ग्रह
गुरु – महान शिक्षक
गुरु – मोठा

प्रश्न ८.
खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तरः

ही माझी नवी छोटी शाळा हया माझ्या नव्या छोट्या शाळेत
हे माझे नवे छोटे पुस्तक हया माझ्या नव्या छोट्या पुस्तकात
हा माझा नवा छोटा पंखा हया माझ्या नव्या छोटया पंख्याला
ही माझी नवी छोटी पुस्तके हया माझ्या नव्या छोट्या पुस्तकांमध्ये

मुक्तोत्तरी प्रश्न

१. स्वप्न सत्यात उतरवता येते का? तुम्हांला काय वाटते?
उत्तर:
हो, नक्कीच स्वप्न सत्यात उतरवता येते; पण त्यासाठी कठोर परिश्रम, जिद्द व सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड असणे आवश्यक आहे. या गोष्टी सोबत असतील, तर मनाने घेतलेला ध्यास, पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आपण झपाटून प्रयत्न करू शकतो. एखादी गोष्ट मिळवण्याकरता झिजू शकतो. याबरोबरच स्वतःला सतत प्रेरित करण्यासाठी, खचून न जाता मनाला पुन्हा उभारी देण्यासाठी थोर महनीय व्यक्तींची उदाहरणे नजरेसमोर हवीत. अशा प्रेरणादायी व्यक्तींच्या जीवनाचा आदर्श ठेवला, तर आपले ध्येयही त्यांच्यासारखे उच्च, उदात्त होईल व आपणही त्यांच्याप्रमाणे स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करू शकू असे मला वाटते.

आकारिक मूल्यमापन

मौखिक कार्य

प्रश्न १.
तुम्हांला पडलेले सुंदर स्वप्न कोणते? त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल?
प्रश्न २.
आपले स्वप्न सत्यात उतरवून लोकसेवा करणाऱ्या व्यक्तींची नावे सांगा.

लेखी कार्य

प्रश्न १.
तुम्ही चांगले धावपटू आहात. शाळेच्या क्रीडासंमेलनात धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवायचे, हे तुमचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण होण्याकरता तुम्ही कोणते प्रयत्न कराल ? (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. २)
उत्तर:
शाळेच्या क्रीडासंमेलनात धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मी कठोर मेहनत घेईन. रोज सकाळी शाळा भरण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर क्रीडांगणाला कमीत कमीत पाच ते दहा प्रदक्षिणा घालेन. जलद धावण्यासाठी

वेळेचे नियोजन करून धावण्याचा जास्तीत जास्त सराव करेन. धावताना श्वासोच्छ्वास करण्याचे सोपे तंत्र शिकून घेईन. जेणेकरून धाप लागणार नाही. योग्य आहार, पुरेशी झोप, व्यायाम व वेळेवर अभ्यास या गोष्टींकडे लक्ष पुरवेन. धावण्याच्या तंत्रात आवश्यक तेथे बदल करेन. वेळोवेळी क्रीडाशिक्षकांचा सल्ला घेऊन धावण्यात सुधारणा करेन. अनवाणी पायांनी व बूट घालून अशा दोन्ही प्रकारे धावण्याचा सराव करेन.

प्रश्न १.
चर्चा करूया.
झोपेत असताना आपणांस स्वप्नं का पडत असतील, याबाबत विचार करा. घरातील मोठ्या व्यक्तींशी किंवा मित्रांबरोबर याविषयी चर्चा करा.
(टीप : खालील मुद्दट्ट्यांच्या आधारे चर्चा करता येईल.)
‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’- मनातील सुप्त इच्छा, भावना यांचेच रूप स्वप्नात दिसणे – स्वप्नांचे प्रकार आनंदी, भयानक, विचित्र – मनाच्या विविध अवस्था

Class 7 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer स्वप्नं विकणारा माणूस

स्वप्नं विकणारा माणूस पाठाचा परिचय:

‘स्वप्न विकणारा माणूस’ हा पाठ लेखक अशोक कोतवाल यांनी लिहिला आहे. प्रस्तुत पाठात वेगवेगळे प्रदेश फिरलेल्या, गावागावांत जाऊन सुकामेवा विकणाऱ्या, लोकांना वेगवेगळ्या ठिकाणचे किस्से, गमतीजमती सांगून सुखावणाऱ्या सपनविक्याचे वर्णन आले आहे. या सपनविक्याचे ‘इतरांना सुखी करण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या, लोकांची सेवा करण्याचा वारसा पुढे चालवणाऱ्या त्याच्या मुलाचेही वर्णन यात केले गेले आहे.

स्वप्नं विकणारा माणूस शब्दार्थ

Class 7 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer स्वप्नं विकणारा माणूस 1

स्वप्नं विकणारा माणूस वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

Class 7 Marathi Balbharati Chapter 2 Question Answer स्वप्नं विकणारा माणूस 2

स्वप्नं विकणारा माणूस टीप

पार वड, पिंपळ इत्यादी मोठ्या डेरेदार वृक्षांच्या सभोवताली बसण्यासाठी घातलेला ओटा, कट्टा.

Leave a Comment