Students can find the best Marathi Balbharati Class 8 Solutions and Chapter 21 Question Answer संतवाणी for exam preparation.
Std 8 Marathi Balbharati Chapter 21 Question Answer संतवाणी
Maharashtra Board Solutions Class 8 Marathi Balbharati Chapter 21 संतवाणी
संतवाणी Question Answer
(अ)
प्रश्न १.
आकृती पूर्ण करा.
उत्तर:
१. शब्दांच्या माध्यमातून अनमोल उपदेश करून लोकांचे जीवन सुधारता येते
२. समाजप्रबोधनासाठी शब्दांचा शस्त्राप्रमाणे जाणीवपूर्वक वापर करता येतो
प्रश्न २.
सूचनेनुसार सोडवा.
(अ) ‘धन’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर:
अ. तुकाराम महाराजांच्या मते, ‘शब्दरूपी रत्ने’ म्हणजे काय आहे ?
ब. संत तुकाराम लोकांना शब्द काय म्हणून वाटणार आहेत?
(आ) संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात; कारण….
उत्तर:
शब्द हे त्यांच्यासाठी देव आहेत.
प्रश्न ३.
खालील संकल्पना स्पष्ट करा.
(अ) शब्दांचीच रत्ने
उत्तर:
संतांकडे हिरेमोती अशी रत्ने, संपत्ती नसते; परंतु त्यांच्याकडे शब्दरूपी अनमोल रत्ने असतात. त्यांच्या शब्दांना रत्नांचे मूल्य प्राप्त झालेले असते; कारण ते शब्दांच्या माध्यमातून मौल्यवान विचार व्यक्त करतात, समाजप्रबोधन घडवतात. म्हणून संत तुकाराम महाराज शब्दांना रत्ले म्हणतात.
(आ) शब्दांचीच शस्त्रे
उत्तरः
शस्त्रे म्हणजेच हत्यारे होय. संत समाजातील वाईट चालीरीती, अंधश्रद्धा, अज्ञान अशा गोष्टींचा विरोध करण्यासाठी, समाजप्रबोधनासाठी शब्दांचा शस्त्रांप्रमाणे वापर करतात. लोकांना सन्मार्गावर नेण्यासाठी संतांना जाणीवपूर्वक परखड शब्दांचा वापर करावा लागतो. म्हणूनच संत तुकाराम महाराज शब्दांना शस्त्रे म्हणतात.
प्रश्न ४.
शब्द हे संत तुकाराम महाराजांचे सर्वस्व आहे, या अर्थाची कवितेतील ओळ शोधा.
उत्तरः
शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन ।
प्रश्न ५.
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
(अ) ‘शब्द वाटूं धन जनलोकां’ या ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर:
संत तुकाराम महाराजांनी ‘आम्हां घरी धन’ या अभंगात शब्दांचे महत्त्व विविध उदाहरणे देऊन पटवून दिले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘आमच्याकडे शब्दरूपी रत्नांचे धन आहे. तेच आमच्या जीवनाचे सर्वस्व आहेत. समाजात प्रबोधन घडवण्यासाठी लोकांना सन्मार्ग दाखवण्यासाठी आम्ही शब्दांचे धन समाजात वाटतो, असा अर्थ कवी येथे व्यक्त करतो. म्हणजेच, शब्दांच्या माध्यमातून अनमोल असा उपदेश करून संत लोकांचे जीवन सुधारतात, हे येथे स्पष्ट होते.
(आ) संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव का व कसा करतात, ते तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर:
संत तुकाराम महाराजांनी ‘आम्हां घरी धन’ या अभंगात शब्दांचे महत्त्व स्पष्ट केले आहे. संतांनी शब्दांच्या मदतीने समाजप्रबोधनाचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. संतांना अनेक लोकांपर्यंत आपले अनमोल विचार, उपदेश पोहोचवण्यास शब्द उपयोगी पडले. म्हणूनच, संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘आमच्या घरी शब्दरूपी रत्ने आहेत. हेच आमचे धन आहे. शब्द हेच आमच्या जीवनाचे सर्वस्व असून आम्ही समाजातील लोकांना धन म्हणून शब्दच वाटतो. शब्दांच्या माध्यमातून आम्ही लोकांना अनमोल उपदेश करतो, त्यामुळे त्यांचे जीवन सुधारते. कधी परखड, तर कधी प्रेमळ शब्द वापरून आम्ही समाजाला नवी दृष्टी देतो. या शब्दांमध्ये आम्हांला साक्षात् ईश्वराचे दर्शन घडते. म्हणूनच आम्ही या शब्दांचा गौरव करतो, सन्मान करतो, त्यांची पूजा करतो.’
(इ) ‘शब्दांचे सामर्थ्य अफाट असते’, या विधानाबाबत तुमचा अनुभव लिहा.
उत्तर:
विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्याचे प्रभावी साधन म्हणजे ‘शब्द’ होय. राग, लोभ, वात्सल्य अशा सर्व भावना शब्द प्रभावी पद्धतीने व्यक्त करतात. शब्दांमुळे माणसे जोडली जातात, तर शब्दांमुळेच माणसे तुटतातदेखील! कधीकधी एखादयाने रागाने बोललेले, आपल्या मनाला लागलेले शब्द आपण सहज विसरत नाही. शब्दांचे घाव एवढे तीव्र असतात, की जन्मभर ते भरून निघत नाहीत. म्हणूनच शब्दांचा वापर काळजीपूर्वक करावा असे सांगितले जाते.
संतांचे, थोरांचे सुविचार त्यांची वचने आजही आपल्याला प्रेरित व प्रोत्साहित करतात, हे शब्दांचेच सामर्थ्य आहे. नकारात्मक विचारांनी उदास बसलेल्या माणसाला प्रेमाचे, सकारात्मकतेचे दोन शब्दही उभारी देऊन जातात. जगण्याची दिशा दाखवतात. शब्द आपला गुरु आपले मित्र बनतात. खरेच, शब्दांचे सामर्थ्य अफाट असते.
(आ)
प्रश्न १.
चौकटी पूर्ण करा.
उत्तर:
१. नेहमी संतांची आठवण राहावी व त्यांची संगत मिळावी
२. खरा भक्तिमार्ग
प्रश्न २.
सूचनेनुसार करा.
i. अभंगात आलेला परमेश्वर या अर्थाचा दुसरा शब्द लिहा.
उत्तर:
देव, नारायण
ii. ‘संत’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर:
संत सावता महाराजांना कोणाची सतत आठवण राहावी असे वाटते?
(टीप: विद्यार्थी ‘संत’ हे उत्तर येईल अशा प्रकारचे इतरही प्रश्न तयार करू शकतात.)
iii. संत सावता महाराजांना कोणाची संगत हवी?
उत्तर:
संत सावता महाराजांना संतांची संगत हवी आहे.
प्रश्न ३.
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
१. संत सावता महाराजांचे मागणे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
‘मागणें तें आम्हा…’ या अभंगात संत सावता महाराज ‘संतांची आठवण मनात नेहमी राहू दे’ असे मागणे परमेश्वराकडे मागत आहेत.
संत हे ईश्वराचे खरे भक्त असतात. ते सामान्य लोकांना खरा भक्तिमार्ग दाखवतात. त्यांची दिशाभूल करत नाहीत. म्हणूनच, खरा भक्त व खरा भक्तिमार्ग जाणून घेण्यासाठी सतत संतांचा सहवास लाभावा, त्यांच्या भेटीची कृपा व्हावी, संतांची नेहमी आठवण राहावी, हेच मागणे संत सावता महाराज परमेश्वराकडे मागत आहेत.
२. संत सावता महाराज संतांचा सहवास लाभण्याची मागणी का करतात ते स्पष्ट करा.
उत्तर:
‘मागणें ते आम्हा…’ या अभंगात संत सावता महाराज ‘संतांची आठवण मनात नेहमी राहू दे’ असे मागणे परमेश्वराकडे मागत आहेत.
संत हेच परमेश्वराचे पूर्ण आणि खरे भक्त आहेत. तेच आपल्याला खरा भक्तिमार्ग दाखवतात. म्हणूनच, ‘खरी भक्ती करण्यासाठी आम्हांला संतांचा सतत सहवास लाभावा.’ अशी मागणी संत सावता महाराज परमेश्वराजवळ करतात.
३. ‘सर्वच भक्त संतांना परमेश्वर रूप समजतात’ हा विचार अभंगाच्या आधारे पटवून दया.
उत्तर:
‘मागणें तें आम्हा…’ या अभंगात संत सावता महाराज ‘संतांची आठवण मनात नेहमी राहू दे’ असे मागणे परमेश्वराकडे मागत आहेत.
संत हे ईश्वराचे पूर्ण आणि खरे भक्त असतात. ते खऱ्या अर्थाने सामान्यांना भक्तिचा मार्ग दाखवतात. संतांचे संपूर्ण आयुष्यच ईश्वर भक्तिमध्ये व समाजाच्या कल्याणाकरिता खर्च होते. ते सन्मार्गावर चालत असतात. त्यांची शिकवण सर्वसामान्य माणसाला उत्तम जीवन जगण्यासाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरत आली आहे. त्यामुळे सर्वच भक्तांना संत जवळचे वाटतात.
संतांनी ईश्वरासोबतच माणसावर प्रेम करण्याची शिकवण दिली. मानवाचा सर्वांगीण विकास करणारे संतांचे हे मौलिक विचार सर्वांना नेहमी प्रेरणादायी ठरले आहेत. म्हणूनच आदर्शाच्या परमोच्च अवस्थेपर्यंत पोहोचलेले सर्व संत भक्तांना ईश्वराचेच चालते बोलते रूप असल्यासारखे वाटतात.
उपक्रम : खालील संतांची माहिती मिळवा आणि दिलेल्या मुद्द्यांनुसार लिहा.
(टीप: ‘उपक्रम’ मधील कृतीच्या उत्तराकरिता शेजारील Q. R. Code स्कॅन करावा.)
Class 8 Marathi Balbharati Chapter 21 संतवाणी Question Answer
(अ)
संकलित मूल्यमापन
कृती १ आकलन
१. खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
संत तुकाराम महाराज शब्दांचे धन कोणाला वाटतात?
उत्तर:
संत तुकाराम महाराज शब्दांचे धन समाजातील लोकांना वाटतात.
कृती २ सरळ अर्थ
१. ‘तुका म्हणे पहा शब्दचि हा देव ।
शब्देचि गौरव पूजा करूं।।’ या ओळींचा सरळ अर्थ लिहा.
उत्तर:
संत तुकाराम महाराज म्हणतात, शब्द हे आमच्यांसाठी साक्षात् देव आहेत. म्हणूनच या शब्दांचा आम्ही सन्मान करून त्यांची मनोभावे पूजा करतो.
मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी कृती
१. खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
i. प्रस्तुत कवितेच्या कवी/ कवयित्रीचे नाव लिहा.
उत्तर:
कवी – संत तुकाराम
ii. प्रस्तुत कवितेचा विषय लिहा.
उत्तरः
शब्दांचे महत्त्व हा अभंगाचा विषय आहे.
iii. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा.
(अ) गौरव
(ब) जीव
(क) धन
(ड) शस्त्र
उत्तर:
(अ) सन्मान
(क) संपत्ती
(ब) प्राण
(ड) हत्यार
iv. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा.
उत्तरः
शब्दांचे महत्त्व समजून घेऊन त्यांचा गौरव करावा हा संदेश या अभंगातून देण्यात आला आहे.
v. प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्टचे लिहा.
उत्तर:
६-६-६-४ अशा अक्षरांचे चरण असलेला हा अभंग आहे. शब्दांचे महत्त्व अतिशय कमी शब्दांत मांडून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची ताकद या शब्दांत आहे.
vi. प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा.
उत्तर:
शब्दांची रत्ने, धन यांचा उपयोग करूनच समाजातील लोकांना उपदेश करण्याचे प्रबोधन करण्याचे कार्य केले जाते हा विचार या अभंगात मांडला आहे.
vii. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा.
आम्हां घरी धन शब्दांचीच रत्लें।
शब्दांचीच शस्त्रे यत्न करु
उत्तर:
आमच्याकडे शब्दरूपी रत्ने आहेत तिच आमची संपत्ती आहे. याच शब्दांचा शस्त्र म्हणून वापर करून आम्ही समाज प्रबोधन करू.
viii. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा.
उत्तर:
शब्दांचे महत्त्व अत्यंत कमी शब्दांत व सोप्या भाषेत या अभंगात स्पष्ट केले आहे. शब्दांचे महत्त्व खरोखरच मनावर बिंबवण्यात कवी यशस्वी झाले आहेत. म्हणून, मला हा अभंग खूप आवडला.
काव्यपंक्तींचे रसग्रहण
१. पुढील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
तुका म्हणे पाहा ।
शब्दचि हा देव ।
उत्तर:
संत तुकाराम आपल्या अभंगांद्वारे शब्दांचे महत्त्व पटवून देतात. शब्दांना रत्नांची उपमा देताना ते मौल्यवान असल्याचे त्यांनी म्हटले आहे त्याचबरोबर शब्द शस्त्रांप्रमाणे असून संत त्याचा उपयोग जनजागृतीसाठी करू शकतात असा विचार या अभंगातून मांडला आहे.
शब्दांचे महत्त्व सांगताना संत तुकाराम म्हणतात, की शब्द हेच आमचे जीवनसर्वस्व आहे. तेच आमचे धन आणि शस्त्रे आहेत. शब्दांना देवत्व देऊन त्यांची पूजा करावी आणि त्यांचा उपयोग जन-कल्याणासाठी करावा असे संत तुकाराम यातून विशद करतात.
अभंग या छंदात ही काव्यरचना केली आहे. ६-६-६-४ अशा अक्षरांचे चरण असलेला हा अभंग आहे. शब्दांची महती खूप कमी शब्दांत वाचकांपर्यंत ठामपणे पोहोचवण्यात हा अभंग यशस्वी ठरतो.
भाषाभ्यास विभाग
अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती
१. खालील वाक्यांचे प्रकार ओळखून लिहा.
(प्रश्नार्थी / विधानार्थी / आज्ञार्थी / उद्गारार्थी)
- आमच्या घरी धन कोणते?
- शब्दच देव आहे.
- बापरे! किती जोरदार भांडण झालं एका शब्दाने!
- शब्दांचीच साधना करा.
उत्तर:
- प्रश्नार्थी वाक्य
- विधानार्थी वाक्य
- उद्गारार्थी वाक्य
- आज्ञार्थी वाक्य
२. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखून लिहा.
- मितालीने चपाती भाजी खाल्ली.
- साधनाने हात धुतले.
- विवेक चित्रपट पाहतो.
- चिंगीने बोक्याला पकडले.
- चिंटू हसू लागला.
उत्तर:
- कर्मणी प्रयोग
- कर्मणी प्रयोग
- कर्तरी प्रयोग
- भावे प्रयोग
- कर्तरी प्रयोग
३. प्रस्तुत कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधून लिहा.
उत्तरः
- जीवन – धन
- देव – गौरव
४. खालील वाक्यांतील उपमेयं, उपमान, साम्यवाचक शब्द, समान धर्म आणि अलंकार ओळखा.
i. राजा भरत सिंहाप्रमाणे शूर होता.
ii. विखारी शब्द म्हणजे शस्वच जणू!
उत्तर:
साम्यवाचक
समान
उपमेय उपमान
अलंकार
शब्द
धर्म
राजा भरत
सिंह प्रमाणे शौर्य उपमा
विखारी शब्द शस्त्र जणू
हिंसा उत्प्रेक्षा
५. खालील सामासिक शब्दांच्या विग्रहांवरून तो सामासिक शब्द ओळखून लिहा.
- लोकांत मान्य
- शब्द हेच धन
- प्रत्येक गल्लीत
- तीन लोचने (डोळे) असणारा असा तो (शंकर)
- मीठ, भाकरी वगैरे खाद्यपदार्थ
उत्तर:
- लोकमान्य
- शब्दधन
- गल्लोगल्ली
- त्रिलोचन
- मीठभाकरी
६. खालील लक्षणांवरून वृत्त ओळखून लिहा.
- या वृत्ताचे ‘त-भ-ज-ज-ग-ग’ असे गण पडतात.
- या वृत्ताचे य-य-य-य’ असे गण पडतात.
- या वृत्ताचे ‘न-न-म-य-य’ असे गण पडतात.
उत्तर:
- वसंततिलका वृत्त
- भुजंगप्रयात वृत्त
- मालिनी वृत्त
आ. भाषिक घटकांवर आधारित कृती
१. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
- धन
- देव
- जीव
- गौरव
उत्तर:
- संपत्ती, वैभव
- सुर, परमेश्वर, भगवंत
- प्राण
- सन्मान
२. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
- जीवन ×
- हिंसा ×
- देव ×
- निंदा ×
उत्तर:
- मृत्यू
- अहिंसा
- दानव
- स्तुती
३. शब्दांनंतर ‘ईव’ प्रत्यय लावून नवीन शब्द तयार करा.
उत्तर:
रेखीव, जाणीव, घोटीव आखीव, आटीव, कोरीव, पाळीव इत्यादी.
४. खालील शब्दांचे अनेक अर्थ लिहा.
i. पण
ii. अंक
iii. ऋण
iv. घट
उत्तर:
i. पण – अ. एक उभयान्वयी अव्यय
वाक्यः ती शाळेत गेली; पण शाळा बंद होती.
ब. प्रण, निर्धार, निश्चय
वाक्य: मी रोज एक पान वाचल्याशिवाय झोपणारच नाही,
असा शिवने पण घेतला.
ii. अंक अ. संख्या
वाक्य: दोन हा अंक फळ्यावर लिही, राजू.
ब. मांडी
वाक्य: वनदेवीच्या अंकावर सारी फुले निजली.
iii. ऋण – अ. वजाबाकीचे चिन्ह
वाक्यः दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन येतो.
ब. कर्ज, उपकार
वाक्यः माता व मातृभूमीचे ऋण कधीच फिटू शकत नाही.
iv. घट – अ. झीज कमी
वाक्यः शाळेच्या विदयार्थीसंख्येत बरीच घट झाली होती.
ब. मडके
वाक्य: राधेने पाण्याचा घट खाली उतरवला.
५. लेखननियमांनुसार अचूक शब्द ओळखून लिहा.
- अस्तीत्व / अस्तित्त्व / अस्तित्व / अस्तीत्त्व
- प्रापंचीक / प्रापचिक / प्रांपंचीक / प्रापंचिक
- सर्वस्व / र्सवस्व / सस्वर्व / सर्वव्स
- जाणिवपुर्वक / जाणीवपुर्वक / जाणीवपूर्वक / जाणिवपूर्वक
उत्तर:
- अस्तित्व
- प्रापंचिक
- सर्वस्व
- जाणीवपूर्वक
६. खालील विरामचिन्हांचा वापर करून वाक्ये तयार करा.
उत्तर:
i. तो मुलगा – जो सर्वात उंच आहे – त्याने क्रिकेटमध्ये आपल्या शाळेचे नाव उंचावले.
ii. विद्यार्थी भांडारात सर्व वस्तू आल्या आहेत.
iii. वर्गात हजर असलेल्या विदयार्थ्यांची एकूण संख्या: ७०
iv. तो उठला; कारण एका वृद्ध महिलेला बसण्यासाठी जागा नव्हती.
(आ)
संकलित मूल्यमापन
कृती १- आकलन
१. आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
१. संत हे पूर्ण आणि खरे भक्त असतात.
२. संत इतरांना खरा भक्तिमार्ग दाखवतात.
कृती २ आकलन
कृती ३ – सरळ अर्थ
१. मागणें तें आम्हां नाहीं हो कोणासी ।
आठवावें संतासी हेचि खरें । या ओळींचा सरळ अर्थ लिहा.
उत्तर:
संत सावता महाराज म्हणतात, “हे परमेश्वरा, आम्हांला कोणाजवळ काहीच मागणे मागायचे नाही. आम्हांला नेहमी संतांची आठवण राहावी हीच खरी आमच्या मनातील इच्छा आहे. ”
कृती ४ – काव्यसौंदर्य
१. पूर्ण भक्त आम्हां ते भक्ती दाविती ।
घडावी संगती तयाशींच या ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर:
‘मागणें तें आम्हां… या अभंगात संत सावता महाराज ‘संतांची आठवण मनात नेहमी राहू दे असे मागणे परमेश्वराकडे मागत आहेत.
संत स्वतः पूर्ण भक्त असतात. ते सामान्य लोकांना खऱ्या अर्थाने भक्तीचा मार्ग दाखवतात. त्यांच्या सहवासात राहून आम्हांला आमचा उद्धार करता यावा यासाठी आम्हांला संतांचा सहवास सतत लाभू दे, अशी इच्छा येथे कवी व्यक्त करत आहे.
मुद्दयांच्या आधारे कवितेसंबंधी कृती
१. खालील मुद्दयांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
i. प्रस्तुत कवितेच्या कवी / कवयित्रीचे नाव लिहा.
उत्तर:
कवी – संत सावता माळी
ii. प्रस्तुत कवितेचा विषय लिहा.
उत्तर:
संतांचा सहवास हा अभंगाचा विषय आहे.
iii. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा.
(अ) कृपा
(ब) जाणा
(क) मागणे
(ड) संगती
उत्तर:
(अ) दया
(ब) जाणून घ्या
(क) इच्छा
(ड) साथ
iv. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा.
उत्तर:
संतांच्या सहवासाने आपल्या इच्छा पूर्ण होतात म्हणून त्यांच्या संगतीने राहावे हा संदेश या अभंगातून देण्यात आला आहे.
v. प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर:
६-६-६-४ अशी अक्षर रचना असलेला हा अभंग आहे. अल्पाक्षरी रचनेतून भक्ताची संतांचा सहवास मिळविण्याची आत इच्छा यातून व्यक्त झाली आहे. याची शब्दरचना मनाला भिडणारी आहे.
vi. प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार-
उत्तर:
परमेश्वराकडेही संतांचा सहवास लाभावा असे मागणे भक्त मागत आहे कारण त्यामुळे आपल्या जीवनाचे सार्थक होते हा विचार या अभंगात मांडला आहे.
vii. प्रस्तुत कवितेतील पुढील ओळींचा सरळ अर्:
पूर्ण भक्त आम्हां ते भक्तीदाविती
घडावी संगती तयाशीच
उत्तर:
संत हेच परमेश्वराचे पूर्ण आणि खरे भक्त आहेत. तेच आपल्याला खरा भक्तिमार्ग दाखवतात म्हणून खरी भक्ती करण्यासाठी आम्हांला सतत संतांचा सहवास लाभावा.
viii. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा.
उत्तरः
संतांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व स्पष्ट करताना कवी त्यांना योग्य भक्तिमार्ग दाखवणारे म्हणतात. संताचा सहवास किती महत्त्वपूर्ण आहे हे अत्यंत कमी शब्दांत यथार्थपणे या अभंगात मांडले आहे म्हणून मला हा अभंग खूप आवडला.
काव्यपंक्तींचे रसग्रहण
१. पुढील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
सावता म्हणे कृपा करी नारायणा ।
देव तोचि जाणा असे मग ।।
उत्तर:
संत सावता माळी यांनी या अभंगातून संतांचा सहवास कसा मोलाचा आहे हे स्पष्ट केले आहे. संतांच्या भेटीची इच्छा व त्यासाठी देवावे केलेली विनवणी याची आर्तता या अभंगातून आपल्याला जाणवते.
संत सावतामाळी म्हणतात संत हेच परमेश्वराचे रुप असून ते खरे भक्त आहेत ते भक्तांना योग्य भक्तिमार्ग दाखवतात. संत सावतामाळी परमेश्वराकडे मागणे मागतात की देव स्वरुप असलेल्या संतांचा सहवास मला मिळू दे.
अभंग या छंदात ही काव्यरचना करण्यात आली आहे. ६५ ६-६-४ अशा अक्षरांचे चरण असलेला हा अभंग आहे. पहिल्या तीन चरणात सहा अक्षरे व शेवटच्या चरणात ४ अक्षरे असा हा बांध आहे. भक्ताच्या हृदयातून निघालेल्या संत सहवासाचा कळवळा आणि भेटीची तीव्र इच्छा या अभंगातून मनाला भिडणाऱ्या शब्दांत व्यक्त होते.
भाषाभ्यास विभाग
अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती
१. खालील शब्दांचे विभक्ती प्रत्यय मूळ शब्द, सामान्यरूप ओळखून लिहा.
- कोणाशी
- संतांना
- अमृताहून
- फुलांनो
- भक्ताचा
उत्तर:
२. खालील वाक्यांतील काळ ओळखून लिहा.
- आम्ही एका वाटेने जात होतो.
- नीलू दरवर्षी कार्यक्रमांत सहभागी होत असे.
- अर्जुन सरावासाठी गेला असेल.
- रेखाची माहिती भरून झाली आहे.
- चिंतामणी सुंदर शिल्प घडवेल.
उत्तर:
- अपूर्ण भूतकाळ
- रीती भूतकाळ
- पूर्ण भविष्यकाळ
- पूर्ण वर्तमानकाळ-
- साधा भविष्यकाळ
३. खालील शब्दांचा संधिविग्रह करा.
- गंगौघ
- षण्मास
- उच्छेद
- अंतरात्मा
- प्रातः काल
उत्तर:
- गंगा + ओघ
- षट् + मास
- उत् + छेद
- अंतर् + आत्मा
- प्रातः काल
४. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
उत्तर:
- कोणासी संतासी
- दाविती संगती
- नारायणा जाणा
५. खालील वाक्यांतील अलंकार ओळखून लिहा.
- गोपनारी हिरकणी गडा गेली दूध घालाया परत झणि निघाली.
- कलकल कलहंसे फार केला सुटाया।
फडफड निजपक्षी दाविले की उड़ाया। - तुझे हात असे भासतात, जणू वाऱ्यावर नाचतात.
- असेल तेथे वाहत दुधासारखी नदी
उत्तर:
- यमक
- अनुप्रास, यमक
- उत्प्रेक्षा, यमक
- उपमा
६. खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा.
- अनिष्ट
- गैरहजर
- गुणहीन
- त्रिदल
- नाक
उत्तर:
- नाही इष्ट ते
- हजेरीशिवाय
- गुणाने हीन
- तीन दलांचा समूह
- नाही अक (दुःख) ज्यात तो (स्वर्ग)
७. खालील ओळींतील वृत्त ओळखा.
i. पीतां मकरंद उदरंभर बंभराचें
जें होय मंदिरहि सुंदर इंदिरेचें
जे पद्म तेथिल सहस्र-दळा घरीं ते।
प्रत्यक्ष सूर्यकिरणांस विसाववीतें ।।
उत्तर:
वसंततिलका वृत्त
ii. नृपतिस मणिबंधी ट्रोचिंता होय चंचू
उत्तर:
मालिनी वृत्त
iii. मना वासना चूकवीं येरझारा।
मना कामना सांडि रे द्रव्यदारा
मना यातना थोर हे गर्भवासी ।
मना सज्जना भेटवीं राघवासीं।।
उत्तर:
भुजंगप्रयात वृत्त
आ. भाषिक घटकांवर आधारित कृती
१. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
- आठवण
- संत
- खरे
- संगती
- नारायण
- कृपा
उत्तर:
- स्मरण, स्मृती
- सज्जन
- सत्य
- सोबत, साथ
- विष्णू, पद्मनाथ
- करुणा, दया
२. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
- कृपा ×
- सज्जन ×
- खरे ×
- आठवण ×
उत्तर:
- अवकृपा
- दुर्जन
- खोटे
- विस्मरण
३. शब्दांनंतर ‘नामा’ प्रत्यय लावून नवीन शब्द तयार करा.
उत्तर:
हुकूमनामा, पंचनामा, जाहिरनामा, करारनामा, माफीनामा इत्यादी.
४. खालील शब्दसमूहांबद्दल एक शब्द लिहा.
- वनात निवास करणारे-
- झाडांची पाने गळून जाण्याचा मोसम –
- ध्यान लावून बसलेले-
- सतत चालत गेल्यामुळे रानात तयार होणारी वाट –
- बालांपासून वृद्धांपर्यंत –
उत्तर:
- वनवासी
- पानगळ
- ध्यानस्थ
- पायवाट
- आबालवृद्ध
५. लेखननियमांनुसार अचूक शब्द ओळखून लिहा.
- आवश्कार / आविष्कार / अविश्कार / आवीष्कार
- परमतत्व / परमतत्त्व / परमतत्त्व / परंतत्त्वं
- भक्तीभाव / भक्तिबाव / भत्किभाव / भक्तिभाव
- प्रसिद्ध / प्रसीद्ध / प्रसीद / प्रसिद्द
उत्तर:
- आविष्कार
- परमतत्त्व
- भक्तिभाव
- प्रसिद्ध
६. खालील वाक्यांत विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा.
- मला गुलाबजाम सुतरफेणी लाडू बंगाली मिठाई असे सर्व गोड पदार्थ आवडतात
- तुला वाढदिवसाला काय भेटवस्तू घेऊ
- ललिता सुनिताला म्हणाली चल भांडी घासून घेऊया
- सुरेख सर्व भांडीकुंडी अगदी घासूनपुसून लख्ख केली आहेस
- नटसम्राट ही श्रेष्ठ कलाकृती आहे
उत्तर:
- मला गुलाबजाम, सुतरफेणी, लाडू, बंगाली मिठाई असे सर्व गोड पदार्थ आवडतात.
- तुला वाढदिवसाला काय भेटवस्तू घेऊ?
- ललिता सुनिताला म्हणाली, “चल, भांडी घासून घेऊया. “
- सुरेख ! सर्व भांडीकुंडी अगदी घासूनपुसून लख्ख केली आहेस!
- ‘नटसम्राट’ ही श्रेष्ठ कलाकृती आहे.
(अ)
संतवाणी अभंगाचा आशय
प्रस्तुत अभंग ‘सकलसंतगाथा खंड दुसरा: श्रीतुकाराममहाराजांची अभंगगाथा अभंग क्रमांक १६२७ ‘ मधून घेण्यात आला आहे. या अभंगात संत तुकारामांनी शब्दांचे महत्त्व विविध उदाहरणे देऊन पटवून दिले आहे.
संतवाणी अभंगाचा भावार्थ
संत तुकाराम महाराज म्हणतात,
‘आम्हां घरी ………………. यत्न करू ।। १ ।।’
आमच्याकडे अनमोल शब्दरूपी रत्ने आहेत. तेच आमचे धन आहे. आमच्या शब्दांना रत्नांचे मूल्य प्राप्त झाले आहे. समाजाचे प्रबोधन करण्यासाठी आमची मते पटवून देण्यासाठी आम्ही या शब्दरूपी शस्त्रांचा जाणीवपूर्वक वापर करतो.
‘शब्दचि आमुच्या …………………. जनलोकां ।। २ ।।’
शब्द हेच आमच्या जीवनाचे सर्वस्व आहे. शब्द हेच आमचे धन असल्याने आम्ही समाजातील लोकांना धन म्हणून मौल्यवान शब्दच वाटतो. म्हणजेच आम्ही शब्दांच्या माध्यमातून ‘लोकांना ‘अमूल्य असा उपदेश करतो.
‘तुका म्हणे ………………… पूजा करूं ।।३।।’
हा तुका म्हणतो, शब्द हे आमच्यासाठी साक्षात् देव आहेत. म्हणूनच, या शब्दांचा आम्ही सन्मान करून त्यांची मनोभावे पूजा करतो.
संतवाणी शब्दार्थ
गौरव | सन्मान |
जनलोक | समाजातील लोक |
जीव | प्राण |
जीवन | आयुष्य, अस्तित्व |
धन | द्रव्य, संपत्ती |
यत्न | प्रयत्न |
शस्त्र | हत्यार, आयुध |
(आ)
संतवाणी अभंगाचा आशय
संत सावतामाळी यांचा प्रस्तुत अभंग ‘सकलसंतगाथा खंड पहिला संत सावता माळी अभंगगाथा अभंग क्र. ७’ मधून घेण्यात आला आहे. या अभंगात संत सावता महाराज ‘संतांची आठवण मनात नेहमी राहू दे’ असे मागणे परमेश्वराकडे मागत आहेत.
संतवाणी अभंगाचा भावार्थ
संत सावता महाराज म्हणतात,
‘मागणें तें ……………. हेंचि खरें ।।१।।’
हे परमेश्वरा, “आम्हांला कोणाकडे काहीच मागणे मागायचे नाही. आम्हांला नेहमी संतांची आठवण राहावी. (त्यांनी दिलेली शिकवण आमच्या कायम स्मरणात राहावी) हीच खरी आमच्या मनातील इच्छा आहे. ‘
‘पूर्ण भक्त …………….. तयाशींच ।। २ ।।’
संत हेच परमेश्वराचे पूर्ण आणि खरे भक्त आहेत. तेच आपल्याला खरा भक्तिमार्ग दाखवतात. म्हणूनच खरी भक्ती करण्यासाठी आम्हांला संतांचा सतत सहवास लाभावा.
‘सावता म्हणे ………………… असे मग ।। ३ ।।’
सावता म्हणतो, हे परमेश्वरा! तू आमच्यावर कृपा कर आणि आम्हांला संतांची भेट घडव; कारण संत हेच आमच्यासाठी चालते, बोलते ईश्वर आहेत.
संतवाणी शब्दार्थ
कृपा | दया, करुणा, उपकार |
घडावी | घडून यावी, मिळावी |
जाणा | जाणून घ्या |
तयाशींच | त्यांच्याशी |
तोचि | तोच |
दाविती | दाखवतात |
मागणें | एखाद्या गोष्टीची इच्छा करणे |
संगती | साथ, सोबत |