Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट

Students can find the best Marathi Balbharati Class 8 Solutions and Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट for exam preparation.

Std 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट

Maharashtra Board Solutions Class 8 Marathi Balbharati Chapter 7 अण्णा भाऊंची भेट

अण्णा भाऊंची भेट Question Answer

प्रश्न १.
नातेसंबंध लिहा.

(अ) विठ्ठल उमप – भिकाजी तुपसौंदर
उत्तर:
मित्र – मित्र

(आ) जयवंता बाय – अण्णा भाऊ साठे
उत्तर:
पत्नी आणि पती

(इ) अण्णा भाऊ – गॉर्की
उत्तर:
शिष्य – गुरू

प्रश्न २.
आकृत्या पूर्ण करा

(अ)
Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट 15
उत्तरः
१. साडेचार फूट उंचीची काळीसावळी मूर्ती
२. प्रेमळ
३. निगर्वी
४. कलेचे भक्त
५. साधी राहणी असणारे
६. प्रतिभावंत
७. निर्लोभी
८. लिखाणावर नितांत प्रेम करणारे
९. दीनदुबळ्यांचे दुःख जाणणारे
१०. निःस्वार्थी
११. आपलेपणा जपणारे
१२. उगवत्या कलाकारांना प्रोत्साहन देणारे
(टीप: विदयार्थ्यांनी कोणतेही चार विशेष लिहावेत.)

(आ)
Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट 14
उत्तर:
१. झोपडीत उपाशी पोटानं जगणे
२. पावसाळ्यात झोपडं गळतं तेव्हा त्या पाण्याखाली चकी, भगुलं, परात लावणे
३. थंडीच्या महिन्यात दीनदुबळ्यांचे थंडीत कुडकुडत बसणे
४. दुःखाला झेलत जगणारी माणसं त्यांची पालं त्यांच्या हाणामाऱ्या

[“अण्णा, मॉस्कोमध्ये ……….
………. ते मानधन नको.”]

Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट

प्रश्न ३.
एका शब्दात उत्तरे लिहून चौकट पूर्ण करा.

(अ) अण्णा भाऊ साठे यांचे राहण्याचे ठिकाण _________
उत्तर:
चिरागनगर

(आ) विठ्ठल उमप हे पेशाने हे होते _________
उत्तर:
शाहीर

(इ) अण्णांच्या कादंबऱ्या अनुवादित झाले ते शहर _________
उत्तर:
मॉस्को

प्रश्न ४.
उत्तरे लिहा.

(अ) अण्णा भाऊंच्या राहणीमानाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
उत्तर:
लोकशाहीर म्हणून सर्वपरिचित असलेले अण्णा भाऊ साठे यांची राहणी अत्यंत साधी होती. जाण्यासाठी चांगला रस्ताही नसलेल्या अत्यंत लहानशा ‘चिरागनगरात’ अण्णा एका लहानशा झोपडीत राहत. साधा गंजीफ्राक घातलेल्या अण्णांच्या झोपडीत अठरा विश्वे दारिद्र्य नांदताना दिसते.

मोडकी बाज, मोडके टेबल, तुटकी खुर्ची, एका दांडीला धागा बांधलेला तुटका चश्मा, घरात पाणी गळून साठलेलं डबकं, चूल, एक तांब्या, जरमनचं ताट, एक डेचकी, वलानीला एक बऱ्यापैकी सदरा आणि हँगरला लटकवलेला लेंगा एवढीच काय ती अण्णांची संपत्ती होती. मॉस्कोच्या बँकेत अमाप पैसा असूनही आपल्या लेखनावर प्रेम असणाऱ्या अण्णांनी झोपडीत, गरिबीचे वास्तव झेलत राहणे पसंत केले. थाटामाटाचा मोह नसलेल्या केवळ आपले लेखन जगू पाहणाऱ्या अण्णा भाऊंचे राहणीमान त्यांच्या लेखनाशी प्रामाणिक होते.

(आ) अण्णा भाऊंसाठी असलेल्या सुदिनाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
अण्णा भाऊ साठे या लोकशाहिरांना शाहीर विठ्ठल उमप यांची गाणी फार आवडली होती. आकाशवाणीवरील त्यांचे कार्यक्रम ऐकून त्यांच्या बुलंद, पहाडी आवाजाने जणू अण्णा भाऊंना मोहून टाकले होते. शिवाय, इतरांकडून विठ्ठल उमप यांच्या वागणुकीविषयी, वर्तनाविषयी त्यांना माहिती मिळाली होती. त्यांच्या आवाजातील गोडवा अण्णांनी चाखला होता. त्यांच्या भेटीशिवाय त्यांना राहवत नव्हते. अशावेळी विठ्ठल उमपांची घडलेली भेट हा अण्णा भाऊंना सुदिनच वाटतो.

(इ) पाठाच्या आधारे विठ्ठल उमप यांचे शब्दचित्र रेखाटा.
उत्तर:
शाहीर म्हणून नुकत्याच नावारूपाला येणाऱ्या विठ्ठल उमपांचे दर्शन या पाठातून घडते. एका नवोदित कलाकाराने त्याच्या कलेच्या क्षेत्रातील दिग्गजाची घेतलेली भेट, त्यांच्यात निर्माण झालेले ऋणानुबंध म्हणजे हा पाठ होय. अण्णा भाऊंच्या एका निरोपावरून त्यांना भेटायला एका लहानशा गावात जाणारे विठ्ठल उमप आपल्या लोकशाहिरांच्या भेटीकरिता उत्सुक असल्याचे जाणवते. या भेटीप्रति असलेली तळमळ येथे दिसून येते. विठ्ठल उमप यांच्यातील प्रतिभावंत लेखक, गायक अण्णांसारख्या महान कलावंतास भावलेला दिसतो. यातूनच विठ्ठल उमप यांची महानता सिद्ध होते.

पाठात दिसून येणारे विठ्ठल उमप अण्णा भाऊ साठेंचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी सतत जागरूक असलेले दिसतात. अण्णांच्या साध्या सरळ वागण्याचे, त्यांच्या नि:स्वार्थी वृत्तीचे त्यांना नेहमी आश्चर्य वाटत असे. विठ्ठल उमप हे सर्वसामान्य माणसांप्रमाणे स्वप्नाळू वृत्तीचे, सुलभ आयुष्य जगू पाहणारे कलावंत असल्याचे जाणवते. आपल्याकडील पैशांचा ऑपल्या सुखसोईंकरिता वापर करावा असा साधासरळ हिशोब ते करत. समोरच्या व्यक्तिसोबत पटकन मिसळणारे, मोठ्यांचा मान राखणारे, पटकन लळा लावणारे, विनम्र भाव असणारे विठ्ठल उमप आपल्याला या पाठातून गवसतात.

(ई) प्रस्तुत पाठात विठ्ठल उमप यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचित्र वाचून तुमच्या मनात अण्णांविषयी कोणते विचार आले, ते लिहा.
उत्तर:
प्रस्तुत पाठात विठ्ठल उमप यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचित्र वाचून एका महान साहित्यिकाचा जवळून परिचय झाल्याची जाणीव होते. अण्णा केवळ एक महान साहित्यिकच होते असे नाही, तर ते माणसाला जाणणारे, दीनदुबळ्यांच्या दु:खाची जाणीव असणारे, अत्यंत साधेपणाने जगणारे, गोरगरिबांविषयी व्यापक सहानुभूती बाळगणारे महान कलावंत होते.

अमाप पैसा असूनही, सुखासिन जीवन जगता येणे शक्य असूनही अत्यंत गरिबीत जीवन कंठणारे अण्णा म्हणजे आपल्या पेशाला वाहून घेतलेली व्यक्ती असल्याचे जाणवते. जगप्रसिद्ध लेखक असूनही लेखनाच्या क्षेत्रात नव्याने पदार्पण करणाऱ्या, उगवत्या कलाकारांना प्रोत्साहन देण्याची, त्यांना आपलेसे करून घेण्याची त्यांची वृत्ती दिसून येते. आपल्या लेखनाला वाहून घेतलेली प्रतिभावंत व्यक्ती आपले आयुष्य कसे जगत होती, आपल्या पेशावर किती प्रेम करत होती, याची कल्पना या पाठातून आपल्याला येते. या पाठातून विठ्ठल उमप यांनी अण्णा भाऊंच्या लेखनामागील पार्श्वभूमी, प्रेरणा आणि त्यांच्या जीवनाचे वास्तव मांडून अण्णा भाऊंचे एक अपरिचित रूप आपल्याला दाखवले आहे.

खेळूया शब्दांशी

१. खालील वाक्यांत विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.

१. जुई रेहाना जॉर्ज सहलीला निघाले
२. अबब केवढा हा साप
३. आई म्हणाली सर्वांनी अभ्यासाला बसा
४. आपला सामना किती वाजता आहे
५. उदया किंवा परवा मी गावी जाईन
उत्तर:
१. जुई, रेहाना, जॉर्ज सहलीला निघाले.
२. अबब! केवढा हा साप !
३. आई म्हणाली, “सर्वांनी अभ्यासाला बसा.”
४. आपला सामना किती वाजता आहे ?
५. उदया किंवा परवा मी गावी जाईन.

शोध घेऊया.

*१. मॅक्झिम गॉर्की यांच्याविषयी आंतरजालाच्या साहाय्याने माहिती मिळवा.

उपक्रम

१. अण्णा भाऊ साठे यांची ‘स्मशानातील सोनं’ ही कथा मिळवा व या कथेचे वर्गात प्रकट वाचन करा.
(टीप: वरील उपक्रम विद्यार्थ्यांनी स्वतः करावा.)

Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट

आपण समजून घेऊया

(१) कर्मणी प्रयोग

• खालील वाक्ये वाचा. निरीक्षण करा व कृती पूर्ण करा.

(अ)

(१) तुषारने आंबा खाल्ला.
(२) स्वातीने आंबा खाल्ला.
(३) मुलांनी आंबा खाल्ला.
(४) मुलींनी आंबा खाल्ला.
कृती – कर्त्याचे लिंग, वचन बदलल्यानंतर क्रियापद बदलते का? _________
उत्तर:
नाही.

(आ)

(१) तुषारने आंबे खाल्ले.
(२) स्वातीने चिंच खाल्ली.
(३) मुलांनी चिंचा खाल्ल्या.
(४) मुलींनी टरबूज खाल्ले.
कृती – कर्माचे लिंग, वचन बदलल्यानंतर क्रियापद बदलते का? _______
उत्तर:
होय.

जेव्हा वाक्यांत कर्माच्या लिंग, वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते, तेव्हा त्यास ‘कर्मणी प्रयोग’ असे म्हणतात.
Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट 16

(३) भावे प्रयोग

• खालील वाक्ये वाचा. निरीक्षण करा व कृती पूर्ण करा.

(१) शिक्षकाने विदयार्थ्याला शिकवले.
(२) शिक्षिकेने विदयार्थ्यांना शिकवले.
(३) त्यांनी विदयार्थ्यांना शिकवले.
(४) मी विद्यार्थिनीला शिकवले.

कृती –
(१) वरील वाक्यांतील क्रियापदात बदल आढळतो का? ______
(२) कर्ता आणि कर्म यांचे लिंग व वचन प्रत्येक वाक्यात बदलले आहे का? _______
उत्तर:
(१) नाही.
(२) होय.

जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीयपुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा त्यास ‘भावे प्रयोग’ असे म्हणतात.

Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट 17

• पुढील वाक्यांतील प्रयोग ओळखा.

(१) त्याने मागे वळून बघितले.
(२) विज्ञानाने माणसाला दृष्टी दिली.
(३) तो नेहमी नवे संकल्प करतो.
उत्तर:
(१) भावे प्रयोग
(२) भावे प्रयोग
(३) कर्तरी प्रयोग

• कर्तरी, कर्मणी व भावे या प्रयोगांची प्रत्येकी पाच-पाच वाक्ये तयार करा.
उत्तर:
i. कर्तरी प्रयोगः

अ. राम आंबा खातो.
ब. ते नाचतात.
क. ती खाऊ घेऊन आली.
ड. जुई रोप लावते.
इ. नेहा किंचाळली.

ii. कर्मणी प्रयोगः

अ. नेहाने चित्र काढले.
ब. त्यांनी गाणी म्हटली.
क. त्याने पेन्सिल हरवली.
ड. तिने ससा पाळला होता.
इ. सैनिकांनी गोळी झाडली.

iii. भावे प्रयोगः

अ. मुलाने बैलास मारले.
ब. पालकांनी बालकांना समजावले.
क. त्याने घरी जावे.
ड. आज लवकर उजाडले.
इ. तिने मला जेऊ घातले.

Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट

वाचा.

• खालील उतारा वाचा. त्याचा तुम्हांला समजलेला अर्थ सारांश रूपाने पुन्हा लिहा.

आपल्यासारख्या सामान्यांना शब्दांवाचूनचे संवाद भावणारही नाहीत, की परवडणारही नाहीत. आपल्याला कठीण, साधे, सरळ, वक्र कसे का होईना; पण बोलणे आणि ठणठणीत बोलणेच हवे असते आणि या बोलण्याचे किती अनंत प्रकार असतात. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशी म्हण आहे. त्या चालीवर ‘माणसे तितकी बोलणी’ अशी म्हण बनवायला हरकत नाही. ‘मोकळा संवाद’ असे आपण म्हणतो ; पण समाजात वावरताना या तथाकथित मोकळ्या संवादावर कशी आणि किती बंधने पडत असतात ते पाहिले म्हणजे गंमत वाटते.

मित्रमंडळींशी गप्पा मारताना आपण खूप मुक्त, मोकळे असतो अशी आपली समजूत असते; पण ती खरी असते का? आपणाला एकमेकांचे अनेक गुणदोष, एकमेकांच्या जीवनातले बरेवाईट तपशील ठाऊक असतात; त्यामुळे तिथे कधी मोकळ्या गप्पा होत असल्या, तरी अनेकदा नात्यातल्या जवळिकीमुळेच कधीकधी एक चमत्कारिक अवघडलेपणही अनुभवाला येते. एकमेकांची मते, आग्रह, दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. वृत्तीतल्या हळव्या जागा, स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असल्यामुळे बोलताना त्यांना कुठे धक्का लागणार नाही, समोरच्या व्यक्तीचं मन दुखावले जाणार नाही, याची सतत काळजी घ्यावी लागते.

Class 8 Marathi Balbharati Chapter 7 अण्णा भाऊंची भेट Question Answer

परिच्छेद १

कृती १ – आकलन

१. आकृत्या पूर्ण करा.

i.
Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट 5
उत्तर:
१. खाचखळग्यांची
२. ओबडधोबड
३. सदान्कदा चिखलापाण्यात लोळत पडलेली

ii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट 6
उत्तर:
१. साडेचार फूट उंच
२. काळीसावळी मूर्ती

२. चौकटी पूर्ण करा.

  1. लेखक व अण्णा भाऊ साठे यांच्या भेटीचे ठिकाण → □
  2. अण्णांची मालकीण → □
  3. घामेजलेल्या अंगानेच बाहेर आलेले → □

उत्तर:

  1. चिरागनगर
  2. जयवंता बाय
  3. अण्णा भाऊ साठे

३. एका शब्दात उत्तरे लिहून चौकट पूर्ण करा.

i. आकाशवाणीवरील कार्यक्रम गाजवणारे □
उत्तर:
लेखक / शाहीर विठ्ठल उमप

ii. लेखकांना ‘दुरूनच घर दाखवणारा □
उत्तर:
चहावाला

[माझे आकाशवाणीवरील ………
……… अंगानंच बाहेर आली.]

कृती २ आकलन

१. ‘बाळवती’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः
पत्ता सांगणारी बाई दारात वळानीला काय सुकत घालत होती?

३. कारणे लिहा.

i. लेखकाला अत्यानंद झाला; कारण…
उत्तर:
अण्णा भाऊ साठेंनी लेखकाचे आकाशवाणीवरील कार्यक्रम ऐकून लेखकाच्या मित्राकडे त्यांना भेटायला येण्याचा निरोप पाठवला.

ii. लेखकाला पत्ता सांगणाऱ्या बाईने त्यांना कडेकडेने जाण्याचा सल्ला दिला; कारण…
उत्तर:
लेखक जात असलेल्या चिरागनगरात जाणारी वाट सदान्कदा चिखलपाण्यामध्ये लोळत पडलेली असते.

Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट

कृती ३ – स्वमत/अभिव्यक्ती

१. अण्णा भाऊ साठे यांना भेटायचे म्हणून लेखकांना जसा आनंद झाला तसा आनंद तुम्ही अनुभवला आहे का?
उत्तरः
लहानपणापासूनच मला क्रिकेटची खूप आवड आहे. रोज न चुकता त्याचा सरावही मी करतो आणि इतर कामांतूनही थोडा वेळ जरी मिळाला तरी मी क्रिकेटचा सराव करू लागतो. काही दिवसांपूर्वी दिवाळीच्या सुट्टीत रात्री उशिरा मी आणि माझे काही मित्र रस्त्यावर क्रिकेट खेळत होतो. रात्री माणसं आणि वाहनं नसल्यात जमा असल्याने मोकळा रस्ता आमच्यासाठी क्रिकेटचे मैदानच बनतो. उत्तम ठरतो. आमचा खेळ रंगात आलेला असतानाच अचानक एक गाडी येऊन जवळच थांबली.

गाडीतून चक्क सचिन तेंडुलकर उतरला. आम्ही सगळे अवाक् होऊन पाहत होतो. आम्हांला भानावर आणत तो आमच्यासोबत क्रिकेट खेळला. माझी फलंदाजी पाहून माझे कौतुकही केले. क्रिकेटच्या जगतातील या महान खेळाडूची भेट घडणे तिही अशाप्रकारे…माझ्यासाठी स्वप्नवत होते. भक्ताची आपल्या परमेश्वराशी भेट व्हावी असा हा क्षण होता. त्या क्षणाचा आनंद मी उभ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही.

परिच्छेद २

कृती १ – आकलन

१. आकृती पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट 7
उत्तर:
१. झोपडी
२. मोडकी बाज
३. मळकी गंजीफ्राक

२. चौकटी पूर्ण करा.

  1. अण्णा भाऊंना प्रथमच पाहणारे → □
  2. अण्णांनी लेखकाला बसायला देऊ केलेली → □
  3. अण्णा भाऊंची व लेखकाची पहिली भेट झाली ते साल → □
  4. परिच्छेदात उल्लेखलेले थोर साहित्यिक → □

उत्तर:

  1. शाहीर विठ्ठल उमप
  2. मोडकी बाज
  3. १९६३ वा ६४
  4. अण्णा भाऊ साठे

३. खालील कृतींचा घटनाक्रम लिहा.

  1. अण्णांनी लेखकांना मोडक्या बाजावर बसायला सांगितले.
  2. अण्णांनी लेखकांना चहावाल्याच्या हॉटेलात चहा दिला.
  3. अण्णांनी लेखकांना त्यांच्या झोपडीत नेले.
  4. अण्णांनी लेखकाचे कौतुक केले.

उत्तर:

  1. अण्णांनी लेखकांना त्यांच्या झोपडीत नेले.
  2. अण्णांनी लेखकांना मोडक्या बाजावर बसायला सांगितले.
  3. अण्णांनी लेखकांना चहावाल्याच्या हॉटेलात चहा दिला.
  4. अण्णांनी लेखकाचे कौतुक केले.

[अण्णा भाऊंना मी ………..
……….. त्यांच्या प्रेमात पडलो.]

कृती २ – आकलन

१. केव्हा घडले ते लिहा.
लेखक धन्य झाले, जेव्हा……
उत्तर:
लेखकाला अण्णा भाऊ साठे यांचे दर्शन घडले.

२. का ते लिहा.
विठ्ठल उमप पहिल्याच भेटीत अण्णा भाऊ साठे यांच्या प्रेमात पडले; कारण…
उत्तर:
अण्णा भाऊ साठे यांसारख्या मोठ्या शाहिराने विठ्ठल उमप यांच्यासारख्या नवोदित कलाकारास जवळ केलं. जणू काही फार वर्षांची त्यांची ओळख असावी, अशाच पद्धतीने ते त्यांच्याशी बोलले, वागले.

कृती ३ – स्वमत / अभिव्यक्ती

१. ‘तुमच्या आयुष्यातील सुदिन’ या विषयी तुमच्या आठवणी मांडा.
उत्तर:
लहानपणापासूनच मला लिखाणाची आवड होती. कविता करण्याचा, त्यातून माझे मनातील विचार मांडण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असे. शाळेतील विविध कार्यक्रमांमध्ये माझ्या कवितांचे वाचन ठरलेलेच असायचे. माझ्या कविता वर्तमानपत्रात, मासिकांत छापून याव्यात यासाठी मी सतत प्रयत्नात असायचो.

अनेक कविता मी यासाठी लिहिल्या, त्या पाठवल्याही; पण वर्तमानपत्रात, मासिकात मात्र कविता छापून येत नव्हत्या. मी प्रयत्न सोडले नाहीत. अखेरीस एक दिवस एका मासिकातर्फे मला एक पार्सल मिळाले. त्यात मासिकाची एक प्रत, मानधन आणि अभिनंदनाचे पत्र होते. त्या मासिकात माझी कविता छापून आली होती. ती त्यांना प्रचंड आवडली होती. त्याबद्दल माझे कौतुक केले होते. ते पत्र वाचून माझे डोळे आनंदाने भरून आले होते. हाच तो माझ्या आयुष्यातला सुदिन कधीही न विसरता येणारा.

परिच्छेद ३

कृती १ आकलन

१. आकृत्या पूर्ण करा.

i.
Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट 8
उत्तर:
१. मोडकं टेबल
२. तुटकी खुर्ची
३. एका दांडीला धागा बांधलेला तुटका चष्मा

ii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट 9
उत्तर:
१. मोडके टेबल, तुटकी खुर्ची
२. घराच्या आतल्या बाजूला असलेलं, पाणी साचलेलं छोटं डबकं
३. चुलीजवळ एक तांब्या, एक जरमनचं ताट आणि एक डेचकी एवढाच संसार
४. वलानीला बऱ्यापैकी एक सदरा आणि हँगरला लोंबकळणारा एक लेंगा

Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट

iii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट 10
उत्तर:
१. ऐंशी पाने असलेली
२. कुठलेही वाक्य वा कुठलीही ओळ न खोडलेली

२. एका शब्दात उत्तरे लिहून चौकट पूर्ण करा.

  1. चुलीजवळ गालाला हात लावून विचारमग्न बसलेल्या □
  2. अण्णांच्या घरात यांचा पुतळा होता □
  3. विठ्ठल उमप यांच्यासमोर अण्णा भाऊंना मिळालेले कथेचे मानधन □

उत्तर:

  1. साठे वहिनी
  2. गॉर्कीचा
  3. ट्रान्झिस्टर

[अण्णांचा निरोप ………….
………. अण्णा “होय” म्हणाले.]

कृती २ – आकलन

१. नातेसंबंध लिहा.

i. अण्णा भाऊ साठे वहिनी
उत्तर:
पती-पत्नी

२. ‘रशिया’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर:
अण्णा भाऊ साठे यांचे विठ्ठल उमप यांना सोबत घेऊन कोठे जाण्याचे स्वप्न होते ?

३. परिणाम लिहा.
लेखक चिरागनगरात गेले नाहीत.
परिणामः तर अण्णा त्यांच्यावर प्रेमाने रागवत. त्यांना लेखकावाचून करमत नसे.

४. का ते लिहा.
अण्णांच्या समोरचा पुतळा गॉर्कीचाच असावा असा विश्वास लेखकाला होता; कारण…
उत्तरः
लेखकाने अनेकांकडून ऐकले होते, की अण्णा गॉर्कीला गुरू मानत आणि तेच अण्णांचे आदर्श होते.

कृती ३ – स्वमत / अभिव्यक्ती

१. ‘अण्णांच्या ऐंशी पानी वहीत कुठलंही वाक्य वा कुठलीही ओळ खोडलेली नव्हती’ या वाक्यातून तुम्हांला काय लक्षात येते ?
उत्तरः
अण्णांच्या ऐंशी पानी वहीत कुठलंही वाक्य वा कुठलीही ओळ खोडलेली नव्हती या वाक्यातून त्यांच्या प्रतिभेची आपणांस कल्पना येते. एकदा लिहिले, पानावर उतरले ते अजरामर झाले अशी अगाध प्रतिभा अण्णांच्या अंगी असलेली दिसून येते. आपल्या विचारांवरील, शब्दांवरील त्यांची पकड यातून स्पष्ट दिसते.

भाषेवर प्रभुत्व असल्याखेरीज हे शक्य होणार नाही. जे मनात आहे, जे विचारांत आहे ते जसेच्या तसे कागदावर उतरवणे ही कला आहे आणि त्यात एकही खाडाखोड न दिसणे ही त्या कलेतील अण्णांची प्रगल्भता आहे. ही गोष्ट त्या कलेवरील त्यांचे प्रभुत्व स्पष्ट करणारी आहे. यातून त्यांच्यातील महान कलाकाराचे दर्शन आपल्याला घडते.

परिच्छेद ४

कृती १ – आकलन

१. आकृत्या पूर्ण करा.

i.
Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट 11
उत्तर:
१. आलिशान बंगला बांधावा
२. बंगल्यात डायनिंग टेबल, कोच, बेडरूम, पुस्तकांची कपाटं इत्यादी थाटामाटाचं करावं
३. लिहायला सुरेख टेबल, त्यावर टेबललॅम्प, लेखण्या असा सरंजाम असावा

ii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट 12
उत्तर:
१. बंगला
२. मोटर
३. बागबगीचा
४. रुबाबदार कपडे
५. लिखाण करण्यासाठी वेगळी खोली
६. खोलीत फुलदाणी
७. टेबल
८. आरामखुर्ची

Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट

iii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट 13
उत्तर:
१. बंगल्यात त्यांना एक अक्षरही सुचणार नव्हतं
२. बंगल्यात ओढूनताणून काल्पनिक लिखाण झालं असतं
३. वास्तवानं ओतप्रोत भरलेल्या दुबळ्या जगाचं सत्य साहित्य बंगल्यात बसून लिहिता येणार नव्हतं

कृती २ – आकलन

१. ‘मॉस्कोतील’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः
अण्णांच्या कादंबऱ्यांच्या अनुवादांचे अमाप असे मानधन कुठल्या बँकेत आहे?

२. हे केव्हा घडेल ते लिहा.
लेखकाच्या मते अण्णा भाऊ साठे यांचे लिखाण सरस होईल जेव्हा…
उत्तर:
त्यांना लिहायला सुरेख टेबल, त्यावर टेबललॅम्प आणि लिहायला उत्तम लेखण्या असा सरंजाम मिळेल.

३. कारणे लिहा.

i. अण्णा भाऊ साठे यांना झोपड्यात राहणे पसंत होते; कारण…
उत्तर:
झोपड्यात दीनदलितांची दुःखं त्यांना अनुभवायला मिळत. गोरगरिबांची पोडतिडकीची भाषा, त्यांचे जीवनमान, तिथली वास्तवता झोपडीत राहूनच त्यांना लिहिता येणे शक्य होते.

ii. अण्णा भाऊ साठे यांना मानधन नकोसे वाटत असे; कारण…
उत्तरः
त्या संपत्तीने मी बिघडून जाईन, गरिबीला विसरून जाईन, सत्य लिखाणाला पारखा होईन असे त्यांना वाटत असे.

कृती ३ – स्वमत / अभिव्यक्ती

१. प्रस्तुत उताऱ्यातून अण्णा भाऊ साठे यांच्यातील हाडाचा लेखक प्रत्ययास येतो, याविषयी तुमचे मत लिहा.
उत्तरः
अण्णा भाऊ साठे हे अजरामर साहित्यिक असून त्यांच्या साहित्याचे गोडवे अख्ख्या जगभरात गायले जातात. मॉस्कोसारख्या शहरातील बँकेत अमाप मानधन असूनही झोपडीत जीवन कंठणाऱ्या अण्णा भाऊ साठेंचे झोपडीत राहण्यामागील कारण जाणले असता त्यांच्यातील हाडाच्या लेखकाचा आपल्याला परिचय होतो.

सुखविलास आपल्याला आपल्या लेखनापासून दूर नेतील, आपण दीनदुबळ्यांचे वास्तव सत्य बंगल्यात बसून लिहू शकणार नाही. अशी भीती त्यांना वाटत असे. या भीतीपोटी अत्यंत साधं जगणं त्यांनी पत्करलं. त्यांचे लिखाण कल्पनेची पुटं चढवलेलं नव्हतं. ते वास्तव चित्रित करणारं होतं. त्यांचे लेखन म्हणजे त्यांच्या भोवतालच्या विश्वात त्यांना येणारे अनुभवच होते. अमाप पैसा असून त्याचा उपभोग न घेता केवळ आपल्या लेखनाला प्राधान्य देणारे अण्णा भाऊ साठे खरोखरीच हाडाचे लेखक होते हे निश्चित.

भाषाभ्यास विभाग

अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती

१. खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा व लिहा.

  1. माझ्यासारखीच काळीसावळी मूर्ती बाहेर आली.
  2. अण्णांनी मला मोडक्या बाजेवर बसायला सांगितलं.
  3. तुमच्या बुलंद पहाडी आवाजाने मला मोहून टाकलं.
  4. आज आपल्या दर्शनानं मी धन्य झालो.
  5. हळूहळू आमचा घरोबा वाढला.

उत्तर:

  1. सारखीच शब्दयोगी अव्यय, काळीसावळी विशेषण, बाहेर – क्रियाविशेषण अव्यय
  2. मला – सर्वनाम, बाज – नाम
  3. बुलंद – विशेषण, मोहून – क्रियापद
  4. आज – क्रियाविशेषण अव्यय, आपल्या – सर्वनाम
  5. हळूहळू – क्रियाविशेषण अव्यय, घरोबा – नाम

२. खालील संधिविग्रहांवरून संधी ओळखा.

  1. सत् + चरित्र
  2. षट् + रिपू
  3. आयु: + वेद
  4. गण + ईश + उत्सव
  5. प्रश्न + उत्तर
  6. भाषा + अंतर

उत्तर:

  1. सच्चरित्र
  2. षड्रिपू
  3. आयुर्वेद
  4. गणेशोत्सव
  5. प्रश्नोत्तर
  6. भाषांतर

३. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

  1. अत्यानंद होणे
  2. वाट तुडव
  3. मोहून टाकणे
  4. धन्य होणे
  5. गट्टी जमणे
  6. जवळ करणे
  7. विचारमग्न असणे
  8. घरोबा वाढणे

उत्तरः

  1. अत्यानंद होणे – खूप आनंद होणे.
    वाक्य:बऱ्याच दिवसांनी मावशी घरी येताच मला अत्यानंद झाला.
  2. वाट तुडवणे – रस्ता पार करणे.
    वाक्य:रानोमाळ वाट तुडवत मी डोंगराच्या माथ्यावर पोहोचलो.
  3. मोहून टाकणे – आकर्षित करणे.
    वाक्य: सुमेधाच्या सुंदर हस्ताक्षराने मला मोहून टाकले.
  4. धन्य होणे – कृतकृत्य होणे.
    वाक्य:भगवान श्रीकृष्णाचे गीतागायन ऐकून अर्जुन धन्य झाला.
  5. गट्टी जमणे – मैत्री होणे.
    वाक्यःशाळेच्या स्नेहसंमेलनामुळे माझी व रीनाची छान गट्टी जमली.
  6. जवळ करणे – आपला मानणे.
    वाक्य: मीनाने मीरा नावाच्या एका गरीब, अनाथ मुलीला अगदी आपलेपणाने, कायमचे जवळ केले.
  7. विचारमग्न असणे – विचारांत गुंग असणे.
    वाक्य: लॉकडाऊनच्या काळात घर कसे चालवायचे या काळजीने नंदा सतत विचारमग्न असायची.
  8. घरोबा वाढणे – आपुलकी, जिव्हाळा वाढणे. वाक्यःस्वभाव, आवडीनिवडी सारख्याच असल्याने हळूहळू सदा आणि मधूचा घरोबा वाढला.

आ. भाषिक घटकांवर आधारित कृती

१. खालील शब्दांचे प्रत्येकी चार समानार्थी शब्द लिहा.

  1. घर
  2. पाणी
  3. तोंड

उत्तर:

  1. गृह, सदन, आलय, निवास
  2. जल, नीर, उदक, तोय, पय
  3. वदन, मुख, आनन, चेहरा

Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट

२. खालील शब्दांचे वचन बदला.

  1. वही
  2. माणूस
  3. झोपड्या
  4. ओळख
  5. डबके
  6. लाकडे
  7. फुलदाणी
  8. मोटार

उत्तर:

  1. वया
  2. माणसे
  3. झोपडी
  4. ओळखी
  5. डबकी
  6. लाकूड
  7. फुलदाण्या
  8. मोटारी

३. खालील शब्दसमूहांबदद्ल एक शब्द लिहा.

  1. दुपारच्या जेवणानंतरची लहानशी झोप –
  2. दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा –
  3. जिचा पती मरण पावला आहे अशी स्त्री-
  4. मोजके असे बोलणारा –
  5. नाणी पाडण्याची जागा –

उत्तर:

  1. वामकुक्षी
  2. मनकवडा
  3. विधवा
  4. मितभाषी
  5. टाकसाळ

वाचा.

*१. या पाठातील ‘वाचा’ अंतर्गत येणारा उतारा वाचा. त्याचा तुम्हांला समजलेला अर्थ सारांश रूपाने लिहा.
(टीप: वरील कृतीच्या उत्तराकरिता उपयोजित लेखन विभागातील सारांशलेखन पाहावे.)

अण्णा भाऊंची भेट पाठाची पार्श्वभूमी

प्रस्तुत पाठात विठ्ठल उमप या महान शाहिराने अण्णा भाऊ साठे या महान लोकशाहिराचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे. लेखन क्षेत्रात मोलाचे काम करणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांच्या झंझावाती व्यक्तिमत्त्वाचा शोध या पाठातून घेण्यात आला आहे. सुखासिन जीवनाचा त्याग करून दीनदुबळ्यांच्या जीवनाचे वास्तव अनुभवून ते आपल्या लेखनातून मांडणाऱ्या, त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहणाऱ्या, उगवत्या कलाकारांना प्रेरणा देणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांच्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाचा परिचय आपल्याला या पाठातून होतो.

अण्णा भाऊंची भेट शब्दार्थ

Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट 1
Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट 2

Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट

अण्णा भाऊंची भेट वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट 3

अण्णा भाऊंची भेट टिपा

Class 8 Marathi Balbharati Chapter 7 Question Answer अण्णा भाऊंची भेट 4

Leave a Comment