Class 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन

Students can find the best Marathi Balbharati Class 8 Solutions and Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन for exam preparation.

Std 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन

Maharashtra Board Solutions Class 8 Marathi Balbharati Chapter 8 धाडसी कॅप्टन राधिका मेनन

धाडसी कॅप्टन राधिका मेनन Question Answer

प्रश्न २.
चौकटी पूर्ण करा.

(अ) राधिका मेनन यांचे बालपण ज्या गावात गेले ते गाव → □
उत्तर:
कोदुनगर

(आ) पदवी प्राप्त झाल्यानंतर राधिका मेनन यांनी केलेला कोर्स → □
उत्तर:
रेडिओ कोर्स

(इ) मर्चंट नेव्हीच्या ज्या जहाजाची कमान राधिका मेनन यांनी सांभाळली ते जहाज → □
उत्तर:
संपूर्ण स्वराज्य

(ई) राधिका यांच्या पतीचा पेशा → □
उत्तर:
नेव्हीमधील एक रेडिओ ऑफिसर

प्रश्न २.
कारणे लिहा

(अ) राधिका मेनन यांना अनंत सागरी सफरीला जावंसं वाटायचं; कारण…
उत्तर:
‘त्यांच मोकळ्या वेळेत नेहमी सागरकिनारी भटकणं, फिरणं व्हायचं. उसळणाऱ्या नखरेल लाटा नेहमी त्यांना आकर्षित करत असत.

(आ) त्यांच्या आईवडिलांचा नौसेनेत जाण्यास विरोध होता; कारण…
उत्तर:
त्यांना वाटत होतं, की ही जोखमीची नोकरी आहे आणि आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्यांचा सामना करू शकणार नाही.

(इ) बचावकार्य करणाऱ्या टीमला मच्छिमारांपर्यंत पोहोचण्यास अडथळे आले; कारण…
उत्तर:
वादळाचा जोर प्रचंड मोठा होता. समुद्रीलाटांनी रौद्र रूप धारण केले होते आणि मोसमाचा अवतार खतरनाक बनला होता. त्यावेळी ९ मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या व वारा ७० समुद्री मैल वेगाने वाहत होता.

Class 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन

प्रश्न ३.
आकृती पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन 5
उत्तर:
१. धाडस
२. काहीतरी करून दाखवण्याची हिंमत
३. ठाम निर्धार
४. उत्तुंग इच्छाशक्ती

प्रश्न ४.
मच्छिमारांना वाचवण्यासाठी कॅप्टन राधिका व त्यांचे सहकारी यांनी केलेल्या कृतीचा ओघतक्ता तयार करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन 12
उत्तर:
१. पाच मिनिटांत जहाजातले लोक बचावकार्यासाठी सज्ज झाले.
२. जहाजातले कर्मचारी जहाज घेऊन मच्छिमारांच्या नावेपर्यंत पोहोचण्याचा निकराचा प्रयत्न करत होते.
३. दुसरा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर हार न पत्करता राधिका यांनी आपल्या सहकाऱ्यांना बचावासाठी पुढे जाण्याचा आदेश दिला.

प्रश्न  ५.
स्वमत लिहा.

(अ) कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छिमारांना वाचवल्याचा प्रसंग थोडक्यात तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
२२ जून २०१५ रोजी समुद्रात मोठे वादळ आले होते. या वादळात सात मच्छिमारांची एक नाव लाटांच्या गर्तेत सापडली होती. वादळाने भयानक रूप घेतले होते. त्याच वेळी जवळच असलेल्या कॅप्टन राधिका यांच्या जहाजावर या संकटाचा संदेश आला. कॅप्टन राधिका व त्यांच्या टीमने एका क्षणाचाही विलंब न करता बचावकार्यास प्रारंभ केला. वादळाचा जोर जास्त असल्याने त्यांना नावेपर्यंत पोहोचणे शक्य होत नव्हते. लाटांनी रौद्र रूप धारण केले होते. आपल्या मदतीसाठी जहाज जवळ

येण्याचा प्रयत्न करत आहे हे मच्छिमारांना कळले होते. जगण्यासाठी प्रत्येक जण जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होता; मात्र वादळाच्या तीव्र प्रवाहामुळे जहाजातील कर्मचाऱ्यांचे पहिले दोन प्रयत्न फसले. सगळ्यांना वाटले, की आता सर्व काही संपले आहे; मात्र राधिका यांनी आपल्या टीमचे मनोधैर्य तुटू दिले नाही. त्यांनी परिस्थितीसमोर हार न पत्करता आपल्या टीमला तिसऱ्यांदा पुढे जाण्याचा आदेश दिला.

लाटा, वारा यांचे थैमान सुरूच होते; पण संपूर्ण टीमने हिंमत न हारता प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांना यशही मिळाले. पायलट शिडीद्वारे सातही मच्छिमारांना सहीसलामत जहाजात घेण्यात आले. अशाप्रकारे, जीवाची बाजी लावून कॅप्टन राधिकांच्या टीमने मच्छिमारांना वाचवले.

(आ) धाडस आणि हिंमत असली, की कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे पादाधारे स्पष्ट करा.
उत्तर:
जीवनात मोठमोठी संकटे आली तरीही धाडसाने त्यांना सामोरे जाण्याची हिंमत अंगी असेल, तर त्या संकटांवर सहज मात करता येते. आपण प्रत्येक जण वेगवेगळी स्वप्नं पाहतो; मात्र ती पूर्ण करणे सर्वांनाच शक्य होत नाही. ज्या व्यक्तींमध्ये काहीतरी करण्याची हिंमत असते त्याच व्यक्ती त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकतात. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे राधिका मेनन होय. समुद्रावरील प्रेमापोटी तिने मर्चंट नेव्हीमध्ये जाण्याचे स्वप्न पाहिले; मात्र एक नाजूक मुलगी जोखमीची नोकरी कशी सांभाळू शकेल अशा भीतीने आईवडिलांनी तिला विरोध केला; पण प्रचंड हिंमत असलेली, धाडसाने भरलेली राधिका डगमगली नाही.

तिने आपल्या आईवडिलांना त्यासाठी राजी केले. एवढ्यावरच न थांबता तिने पदवी मिळवल्यानंतर रेडिओ कोर्स पूर्ण केला. ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ मध्ये प्रशिक्षक रेडिओ ऑफिसरची नोकरी मिळवली आणि समुद्री जहाजात काम करण्याचे स्वप्न तिने हिमतीने पूर्ण केले.

एवढ्यावरच न थांबता तिने प्रयत्न सुरू ठेवले आणि समुद्री जहाजाची कमान सांभाळण्याचे स्वप्नही तिने प्रत्यक्षात आणले. आपल्या कौटुंबिक आणि नोकरीच्या जबाबदाऱ्या मोठ्या हिमतीने तिने पार पाडल्या. आपल्या घरापासून, मुलापासून दीर्घकाळ लांब राहण्याच्या परिस्थितीला ती धाडसाने सामोरी गेली.

आपल्या हिमतीच्या बळावर सात मच्छिमारांचा भर वादळात जीव वाचवून तिने ‘ॲवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी’ हा पुरस्कार मिळवणारी पहिली महिला अधिकारी असण्याचा मान मिळवला. अशाप्रकारे, धाडस आणि हिमतीच्या बळावर तिने अशक्य वाटणारे स्वप्न पूर्ण करून दाखवले.

(इ) मोठेपणी तुम्हांला कोण व्हावेसे वाटते आणि का, थोडक्यात लिहा.
उत्तर:
मोठेपणी मला शिक्षक व्हावे असे वाटते. शिक्षकी पेशा असा आहे, की जेथे ज्ञानदानाचे पवित्र काम होते. या पेशात व्यक्ती शिकवता शिकवता स्वत: ही शिकत असते. हा पेशा व्यक्तीस अधिक प्रगल्भ, अधिक ज्ञानी, अधिक संवेदनशील बनवतो. माझी आई शिक्षिका आहे.

तिचा या पेशाबाबतचा ओढा, तिचे समर्पण, तिचे विदयार्थ्यांमध्ये मिसळणे, त्यांना समजून घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी झटणे या गोष्टी मला लहानपणापासून आकर्षित करतात. या पेशात कधीही तोचतोचपणा नसतो. दरदिवस नवे अनुभव घेऊन येतो. शिक्षक हा अनेक पिढ्यांना आकार देणारा मूर्तिकार असतो असे मला वाटते. म्हणूनच, मला मोठे होऊन शिक्षक बनावेसे वाटते.

माझे वाचन

• ‘कोलंबसचे गर्वगीत’ ही कुसुमाग्रज यांची कविता मिळवून वाचा व शिक्षकांकडून समजून घ्या.

खेळूया शब्दांशी.

• खालील वाक्यांतील वाक्प्रचार ओळखा व त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा.

(१) युद्धप्रसंगी सैनिक जिवाची बाजी लावून लढत असतो.
उत्तर:
जीवाची बाजी लावणे – घोडखिंडीत शत्रूला रोखण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी जीवाची बाजी लावली.

(२) मच्छीमार मदतीसाठी जिवाच्या आकांताने ओरडत होते.
उत्तर:
जीवाच्या आकांताने ओरडणे – पुरम्च्या पाण्यात एका लहानग्याला वाहून जाताना पाहून लीना जीवाच्या आकांताने ओरडली.

उपक्रम

*१. खाली दिलेल्या क्षेत्रांतील पहिली भारतीय महिला कोण याचा शोध घ्या व त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवा.

(अ) पहिली पायलट
(आ) पहिली अंतराळवीर
(इ) पहिली रेल्वेचालक
(ई) पहिली शिक्षिका
(उ) पहिली डॉक्टर

Class 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन

आपण समजून घेऊया.

खालील वाक्ये वाचा.
(१) सूर्य उदय झाला.
(२) आम्ही विद्या अर्थी आहोत.

अधोरेखित शब्द आपण असे लिहितो का ? तर नाही. आपण नेहमी ‘सूर्योदय’, ‘विदयार्थी’ असे लिहितो आणि बोलतोसुद्धा. अशा प्रकारचे शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकांमध्ये मिसळून एक वर्ण तयार होतो. वर्णांच्या अशा एकत्र येण्याच्या प्रकाराला ‘संधी’ असे म्हणतात. ‘संधी’ म्हणजे सांधणे, जोडणे होय. संधीचे एकूण तीन प्रकार आहेत.
(१) स्वरसंधी
(२) व्यंजनसंधी
(३) विसर्गसंधी

या तीनही संधीप्रकारांविषयीची माहिती आपण समजून घेऊया. त्यासाठी खालील तक्त्याचा अभ्यास करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन 15

१. खालील जोडशब्दांचा संधिविग्रह करून तक्ता पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन 16
उत्तरः

संधी संधिविग्रह
सुरेश सुर + ईश
निसर्गोपचार निसर्ग + उपचार
भाग्योदय भाग्य + उदय
राजर्षी राज + ऋषी

२. खालील तक्ता पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन 17
उत्तर:

संधिविग्रह संधी
महा + ईश महेश
राम + ईश्वर रामेश्वर
धारा + उष्ण धारोष्ण
सह + अनुभूती सहानुभूती
लाभ + अर्थी लाभार्थी

जाहिरात लेखन

विदयार्थ्यांनो, मागील इयत्तांमध्ये तुम्हांला ‘जाहिरात’ या घटकाची ओळख झालेली आहे. विविध वस्तू अथवा सेवा या चांगल्या कशा आहेत, हे जाहिरातींद्वारे पटवून दिलेले असते.

जाहिरात म्हणजे ‘जाहीर करणे होय. इंग्रजीत ‘जाहिरात’ या शब्दासाठी ‘Advertisement’ हा शब्द वापरला जातो. जाहिरातीचा मुख्य उद्देश वस्तू किंवा सेवांकडे ग्राहकांचे लक्ष वेधून घेणे व त्यांची मागणी निर्माण करणे असा असतो. त्याचबरोबर शासन व काही समाजसेवी संस्था यांच्यातर्फे समाजप्रबोधनासाठी व जनहिताय काही जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. जाहिरात ही एक कला आहे. तुम्ही अनेक जाहिरातींचे वाचन, निरीक्षण व श्रवणही असता. त्यांचे तुम्हांला आकलन होणे, हे आजच्या काळातील आवश्यक कौशल्य आहे.

जाहिरातीच्या श्रवण व वाचनाने जाहिरातीतील उत्पादनाबद्दल / सेवेबद्दल माहिती मिळणे व विक्रेता म्हणून इतरांच्या मनात त्याबद्दल कुतूहल, आकर्षण निर्माण करणे ही दोन्ही कौशल्ये आत्मसात करणे, हा जाहिरात या घटकाच्या अभ्यासाचा मूळ हेतू आहे.

• या पाठाखालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन 18
(टीप : या कृतीच्या उत्तराकरिता उपयोजित लेखन विभागातील जाहिरातलेखन पाहावे.)

(अ) उत्तरे लिहा.

(१) जाहिरातीचा विषय-
(२) जाहिरात देणारे (जाहिरातदार) –
(३) वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक-
(४) जाहिरात कोणासाठी आहे?

Class 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन

(आ) वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यांत कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा, असे तुम्हांला वाटते ?

(इ) तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये.
Class 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन 19

Class 8 Marathi Balbharati Chapter 9 धाडसी कॅप्टन राधिका मेनन Question Answer

परिच्छेद १

कृती १ – आकलन

१. चौकटी पूर्ण करा.

  1. राधिका मेनन यांनी कोचीमधील या कॉलेजमध्ये रेडिओ कोर्ससाठी प्रवेश घेतला → □
  2. प्रशिक्षणादरम्यान राधिका यांना याची माहिती झाली → □

उत्तर:

  1. ऑल इंडिया मरीन कॉलेज
  2. समुद्री जहाजातली संवादप्रणाली

[राधिका या केरळच्या ………………
……………… स्वप्न पूर्ण झाले.]

कृती २ – आकलन

१. चुकीचे विधान शोधा.

अ. मोकळ्या वेळेत राधिका यांचं नेहमी सागरकिनारी भटकणं, फिरणं व्हायचं.
ब. जहाजात काम करायला राधिका फारच उत्सुक होत्या.
क. राधिका यांनी वायुसेनेत जाण्याचे निश्चित केले.
ड. राधिका यांचे समुद्री जहाजात काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
उत्तर:
राधिका यांनी वायुसेनेत जाण्याचे निश्चित केले.

२. हे केव्हा घडले ते लिहा.
राधिका यांचे समुद्री जहाजात काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले, जेव्हा…
उत्तर:
राधिका यांना ‘ऑल इंडिया मरीन कॉलेज’ मधील रेडिओ प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ मध्ये प्रशिक्षक रेडिओ ऑफिसरची नोकरी मिळाली.

Class 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन

परिच्छेद २

कृती १ – आकलन

१. आकृती पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन 6
उत्तर:
१. कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना
२. नोकरीची जबाबदारी सांभाळताना

२. चौकटी पूर्ण करा.

  1. देशातल्या पहिल्या मर्चंट नेव्ही कॅप्टन → □
  2. राधिका यांच्यासाठीची सगळ्यांत कठीण गोष्ट → □
  3. राधिकाच्या रोमांचकारी प्रवासात साथ देणारे → □

उत्तर:

  1. राधिका मेनन
  2. मुलाचा सांभाळ
  3. तिच्या घरचे

३. परिच्छेदात दिलेल्या राधिकाच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे दर्शवणारा ओघतक्ता पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन 7
उत्तर:
१. मास्टर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला
२. ‘संपूर्ण स्वराज्य’ या जहाजाची कमान सांभाळली

[नियमानुसार समुद्री क्षेत्रात ………….
…………… मोठी साथ दिली.]

कृती २ आकलन

१. योग्य जोड्या जुळवा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन 8
उत्तर:
(i – क),
(ii – ब)

२. हे केव्हा घडले ते लिहा.

i. राधिका यांनी मास्टर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला, जेव्हा…
उत्तर:
त्यांनी २०१० साली नियमानुसार समुद्री क्षेत्रात निर्धारित वेळेत काम केले.

ii. राधिका यांच्या अडचणी वाढल्या, जेव्हा…
उत्तरः
त्या आई बनल्या.

३. का ते काह

i. घरापासून लांब रहावं लागत असूनही राधिका खूश होत्या; कारण…
उत्तर:
रोमांचकारी प्रवास करणं हे त्यांच्या आवडीचं काम होतं.

ii. राधिका यांच्या नवऱ्याला त्यांच्या जबाबदारीची माहिती होती; कारण…
उत्तर:
ते नेव्हीमधील एक रेडिओ ऑफिसर असून राधिका व ते एकाच व्यवसायात होते.

कृती ३ – स्वमत/अभिव्यक्ती

१. ‘आजची स्त्री सर्व आव्हाने पेलणारी आहे’ याविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर:
पूर्वी चूल आणि मूल एवढ्यापुरतेच मर्यादित असलेले स्त्रियांचे जीवन आता व्यापक बनलेले दिसते. असे एकही क्षेत्र नाही जेथे स्त्रियांनी आपल्या यशाची छाप उमटवली नाही. ही स्त्री कुटुंबाची जबाबदारी तर समर्थपणे उचलतेच शिवाय तितक्याच सक्षमपणे ती नोकरी, व्यवसायाची जबाबदारीही पार पाडते. तारेवरची कसरत करत ती कौटुंबिक व व्यावसायिक जीवनातील समतोल साधते. कोणत्याही क्षेत्रात स्त्री म्हणून ती मागे राहत नाही. उलट दोन्ही आघाड्या सांभाळून ती संसाराचा व व्यवसायाचा गाडा हाकते. पुरुषांच्या खांदयाला खांदा लावून ती सारी आव्हाने लिलया पेलते. आजची स्त्री ही अगाध सामर्थ्याचे रूप आहे हे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

परिच्छेद ३

कृती १ – आकलन

१. आकृती पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन 9
उत्तर:
१. २२ जून २०१५
२. ओडिशाच्या गोपाळपूर किनाऱ्यापासून अडीच किलोमीटर लांब समुद्रात

२. चौकटी पूर्ण करा.

  1. राधिका यांना रेडिओवर सूचना देणारे → □
  2. जीवनाची शेवटची लढाई लढणारे → □
  3. मासेमाऱ्यांना वाचवण्यासाठी निकराचा प्रयत्न करणारे → □

उत्तर:

  1. जहाजातले अधिकारी
  2. नावेतील मासेमार
  3. राधिका यांच्या जहाजातले कर्मचारी

[२२ जून, २०१५ ……….
………… प्रयत्नदेखील वाया गेला.]

कृती २ – आकलन

१. योग्य विधान शोधा.

अ. राधिका ‘स्वराज्य सेना’ जहाजावर तैनात होत्या.
ब. समुद्रात परदेशी नाव लाटांच्या गर्तेत सापडली होती.
क. पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला.
ड. दुसरा प्रयत्न यशस्वी ठरला.
उत्तर:
दुसरा प्रयत्न यशस्वी ठरला.

Class 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन

२. परिणाम लिहा.

i. समुद्रात जोरांचे वादळ सुटले.
परिणाम: समुद्री लाटांनी रौद्र रूप धारण केले, मोसमाचा अवतार खतरनाक बनला आणि मासेमाऱ्यांची नाव लाटांच्या गर्तेत सापडली.

ii. अधिकाऱ्याने समुद्रात नाव फसल्याची सूचना राधिका यांना दिली.
परिणाम: राधिका यांनी दुर्बिणीने समोर नजर टाकली. नाव बुडण्याच्या अवस्थेत आहे हे लक्षात येताच एक क्षणही वाया न घालवता त्यांनी सुटकेच्या मोहिमेला सुरुवात केली.

iii. वादळाचा जोर मोठा होता.
परिणाम: त्यामुळे, बचावकार्य करणाऱ्यांना बुडणाऱ्या नावेपर्यंत जाता येत नव्हते.

३. कारण लिहा.
मच्छिमारांना वाचवण्याचा दुसरा प्रयत्नदेखील वाया गेला; कारण…
उत्तर:
वादळाच्या जोरामुळे मच्छिमार जितके पुढे येण्याचा प्रयत्न करत होते, तितक्याच वेगाने ते मागे ढकलले जात होते.

कृती ३ – स्वमत / अभिव्यक्ती

१. प्रस्तुत परिच्छेदातून राधिका यांचे कोणते गुण निदर्शनास येतात? तुमचे मत लिहा.
उत्तर:
प्रस्तुत परिच्छेद हा राधिका यांच्यातील गुणविशेष अधोरेखित करणारा आहे. या परिच्छेदातून राधिका यांचा कार्यतत्परता हा गुण दिसून येतो. मासेमाऱ्यांची नाव बुडत असल्याचे लक्षात येताच तातडीने त्यांच्या सुटकेची मोहिम हाती घेणे हे त्यांच्या कार्यतत्परतेचे उदाहरण आहे. त्यांचे प्रसंगावधान या परिच्छेदातून स्पष्ट होते. वादळाचा जोर वाढत असताना, बोट बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशा स्थितीत एकही क्षण विलंब न करता त्यांनी बचावकार्य सुरू केले.

यातून त्यांचे प्रसंगावधान दिसून येते. याशिवाय, एवढ्या मोठ्या वादळात, लाटांनी रौद्र रूप धारण केलेले असताना स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता इतरांना वाचवण्याचा केलेला प्रयत्न राधिका यांच्यातील माणुसकीचे, कर्तव्यनिष्ठेचे व धाडसाचे दर्शन घडवतो. परिस्थिती अधिकाधिक बिकट होत असतानाही सातत्याने प्रयत्नशील राहणे हा गुणही येथे दिसून येतो. अपयशाने न खचता पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे यातून त्यांचा आशावाद, त्यांची हिंमत दिसून येते. या परिच्छेदात कणखर वृत्तीच्या, कोणत्याही संकटांना न घाबरणाऱ्या, निडर अशा राधिका दिसून येतात.

परिच्छेद ४

कृती १ — आकलन

१. आकृती पूर्ण करा.

i.
Class 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन 10
उत्तर:
१. समुद्रात नऊ मीटरच्या उंचच उंच लाटा उसळत होत्या
२. वारा ७० समुद्री मैल वेगाने वाहत होता
३. मच्छिमारांना वाचवण्याचे दोन प्रयत्नही फसले होते

ii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन 11
उत्तर:
१. ज्या वेळी आम्ही जहाजावर असतो त्या वेळी आम्ही महिला आहोत, की पुरुष याचा विचार करत नाही
२. समोर कठीण लक्ष्य असेल, तर हिंमत आपोआपच येते
३. हे सगळे आमच्या टीमच्या धाडसामुळे शक्य झाले.

२. चौकटी पूर्ण करा.

  1. मच्छिमारांना याच्या मदतीने नावेतून जहाजात घेण्यात आले → □
  2. सहीसलामत वाचलेल्या मच्छिमारांची संख्या → □
  3. राधिका यांच्या साहसी अभियानासाठी पुरस्कार देणारी संस्था → □
  4. राधिका मेनन यांना मिळालेला पुरस्कार → □

उत्तर:

  1. पायलट शिडीच्या
  2. सात
  3. आंतरराष्ट्रीय मेरीटाईम संस्था
  4. ॲवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी

३. कोण ते लिहा.

  1. वादळातून बचावलेली एक व्यक्ती.
  2. ‘ॲवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी’ हा पुरस्कार मिळवणाऱ्या मर्चंट नेव्हीच्या पहिल्या महिला अधिकारी –

उत्तर:

  1. पेरला चिन्नाराव
  2. राधिका मेनन

[सगळ्यांना वाटलं, की …………
………… धाडसामुळे शक्य झाले. ]

कृती २ – आकलन

१. हे केव्हा घडेल ते लिहा.
आपल्यामध्ये हिंमत आपोआप येईल जेव्हा,…
उत्तर:
आपल्यासमोर कठीण लक्ष्य उभे राहील.

२. का ते लिहा.

i. पेरला चिन्नाराव याच्या पत्नीने राधिका यांचे आभार मानले; कारण….
उत्तर:
पेरला चिन्नाराव अनेक दिवसांपासून घरी आले नसल्याने त्यांची नाव बुडून ते जिवंत राहिले नसावेत असे त्यांना वाटत होते; मात्र राधिका मॅडमनी त्यांचा जीव वाचवला हौता.

ii. राधिका मेनन यांना ‘ॲवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी’ हा पुरस्कार देण्यात आला; कारण…
उत्तर:
त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून सात मच्छिमारांना बुडण्यापासून वाचवले होते. त्यांच्या या साहसी अभियानाचा गौरव म्हणून त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले गेले.

कृती ३ – स्वमत / अभिव्यक्ती

१. ‘समोर कठीण लक्ष्य असेल, तर हिंमत आपोआप येते’ या विधानाविषयी तुमचे मत सोदाहरण लिहा.
उत्तर:
मानवी मनामध्ये प्रचंड ताकद असते. कोणतीही अशक्य वाटणारी गोष्टही तो आपल्या इच्छाशक्तीने, आपल्यातील हिमतीने सहज पूर्ण करू शकतो. एखादे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवले, की तेथे पोहोचण्याचा आपण प्राणपणाने प्रयत्न करतो. हे लक्ष्य जेवढे अवघड असेल तेवढे प्रयत्न आपण करू लागतो. ही मानवी प्रवृत्तीच आहे. त्यामुळे, समोर जेवढे कठीण लक्ष्य उभे राहते तेवढीच ते पूर्ण करण्याची हिंमतही आपल्यामध्ये आपोआप येत जाते.

याची प्रचीती हा कोरोनाचा काळ देऊन गेला. कोरोनाच्या काळात सारी वाहतूक व्यवस्था बंद असतानाही केवळ आपले कुटुंब गावी सुखरूप राहील ही आशा मनात ठेवून शेकडो किलोमीटर अंतर पायी चालत जाणारे नोकरवर्ग हे याच हिमतीचे उदाहरण आहे. मानवी मनाची ही शक्तीच त्याला कठीण लक्ष्यावरही मात करण्याची हिंमत देते.

भाषाभ्यास विभाग

अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती

१. खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा व लिहा.

  1. मोकळ्या वेळेत त्यांचं नेहमी सागरकिनारी भटकणं व्हायचं.
  2. राधिकाच्या या रोमांचकारी प्रवासात घरच्यांनी मोठी साथ दिली.
  3. ते जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होते; पण यश मिळत नव्हते.
  4. अरेरे! नाव बुडाली.
  5. घरावर फार मोठं संकट कोसळलं.

उत्तर:

  1. मोकळ्या – विशेषण,
    नेहमी – क्रियाविशेषण अव्यय,
    भटकणं – क्रियापद
  2. राधिका – नाम, रोमांचकारी – विशेषण, प्रवास – नाम
  3. ते – सर्वनाम, पण – उभयान्वयी अव्यय
  4. अरेरे! – केवलप्रयोगी अव्यय
  5. घरावर – शब्दयोगी अव्यय

२. खालील वाक्यांचे प्रकार ओळखून लिहा.
(प्रश्नार्थी / आज्ञार्थी / उद्गारार्थी / विधानार्थी)

  1. आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्यांचा सामना कसा करेल?
  2. ही जोखमीची नोकरी आहे.
  3. राधिका म्हणाल्या, “पुढे जा.
  4. काय अचाट साहस दाखवले राधिका यांनी!

उत्तर:

  1. प्रश्नार्थी वाक्य
  2. विधानार्थी वाक्य
  3. आज्ञार्थी वाक्य
  4. उद्गारार्थी वाक्य

३. खालील वाक्यांतील काळ ओळखून लिहा.

  1. त्यांना ‘संपूर्ण स्वराज्य’ या जहाजाची कमान सांभाळायला दिली गेली.
  2. त्यांना दीर्घकाळ घरापासून लांब राहावं लागत असे.
  3. जहाजातले कर्मचारी निकराचा प्रयत्न करत होते.
  4. टीमच्या धाडसामुळे हे सर्व शक्य होईल.
  5. राधिका मेनन यांना मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

उत्तर:

  1. पूर्ण भूतकाळ
  2. रीती भूतकाळ
  3. अपूर्ण भूतकाळ
  4. साधा भविष्यकाळ
  5. पूर्ण वर्तमानकाळ

Class 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन

४. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखून लिहा.

  1. राधिका समुद्रावर भटकायला जाते.
  2. तिने दुर्बिणीने पाहिले.
  3. नाव समुद्रात बुडाली.
  4. त्यांनी मोहिम यशस्वी केली.

उत्तर:

  1. कर्तरी प्रयोग
  2. भावे प्रयोग
  3. कर्तरी प्रयोग
  4. कर्मणी प्रयोग

५. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

  1. सामना करणे
  2. राजी करणे
  3. सज्ज होणे
  4. निर्धारित करणे
  5. आशा धूसर हो
  6. निकराचा प्रयत्न करणे
  7. हिंमत न हरणे
  8. सहीसलामत वाचणे
  9. तैनात असणे

उत्तर:

  1. सामना करणे – संकटांना सामोरे जाणे.
    वाक्य:मधू ने जंगलातून बाहेर येण्यासाठी सर्व संकटांचा सामना केला.
  2. राजी करणे – मान्य करायला भाग पाडणे.
    वाक्य: काझीरंगा अभयारण्याच्या शैक्षणिक सहलीला मला पाठवण्यासाठी मी आई-बाबांना राजी केले.
  3. सज्ज होणे – तयार होणे.
    वाक्यःआम्ही किल्ले सरसगड पायी चढण्यासाठी सज्ज झालो.
  4. निर्धारित करणे – निश्चित करणे.
    वाक्यः टाळेबंदीच्या काळात शाळेने प्रत्येक इयत्तेचा ठरावीक अभ्यासक्रम निर्धारित केला.
  5. आशा धूसर होणे – आशा कमी होत जाणे.
    वाक्य:अमर वाईट मित्रांच्या नादी लागल्यामुळे त्याच्या सुधारण्याची आशा धूसर होत गेली.
  6. निकराचा प्रयत्न करणे – खूप शर्थीचे / कसोशीने प्रयत्न करणे.
    वाक्य: शिवने परीक्षेत अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होण्यासाठी सतत अभ्यास करून निकराचे प्रयत्न केले.
  7. हिंमत न हरणे – धाडसाने परिस्थितीला सामोरे जाणे, मनात आशा जागृत ठेवणे.
    वाक्यःएकामागोमाग एक संकटे आली तरीही रवी हिंमत हरला नाही.
  8. सहीसलामत वाचणे – सुखरूप वाचणे.
    वाक्य: एका भयानक वादळवाऱ्यात सापडूनही निलेश सहीसलामत वाचला.
  9. तैनात असणे – नेमणुकीवर असणे.
    वाक्य: वाघा सीमेवर अचानक अधिकचे भारतीय सैनिक तैनात करण्यात आले.

आ. भाषिक घटकांवर आधारित कृती

१. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

  1. समुद्र
  2. निर्धार
  3. उत्सुकता
  4. नाव
  5. प्रयत्न
  6. धाडस
  7. इच्छा
  8. महिला

उत्तर:

  1. सागर, रत्नाकर
  2. निश्चय
  3. उत्कंठा, कुतूहल
  4. होडी, नौका
  5. प्रयास
  6. साहस, धैर्य
  7. आकांक्षा, मनीषा
  8.  नारी, स्त्री

२. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. शक्य ×
  2. यशस्वी ×
  3. धाडसी ×
  4. उत्सुक ×
  5. आवड ×
  6. दीर्घकाळ ×

उत्तर:

  1. अशक्य
  2. अयशस्वी
  3. भित्रा
  4. अनुत्सुक
  5. नावड
  6. अल्पकाळ

३. खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

  1. या लाटांना पाहूनच त्यांना प्रेरणा मिळाली.
  2. त्यांना जबाबदारीची माहिती होतीच.
  3. आई बनल्यावर त्यांच्या अडचणी वाढल्या.
  4. समुद्रात नाव फसली.
  5. पायलट शिडी लावून मच्छिमारांना वाचवले गेले.

उत्तर:

  1. या लाटेला पाहूनच त्यांना प्रेरणा मिळाली.
  2. त्यांना जबाबदाऱ्यांची माहिती होतीच.
  3. आई बनल्यावर त्यांची अडचण वाढली.
  4. समुद्रात नावा फसल्या.
  5. पायलट शिड्या लावून मच्छिमारांना वाचवले गेले.

४. लेखननियमांनुसार अचूक शब्द ओळखून लिहा.

  1. उत्तुंग / उत्तुंग / उद्तुंग / उत्तुंग
  2. उत्सूक / उस्तुक / उत्सुक / उत्सुक
  3. रोद्र / रौद्र / रौद्र / रौदर
  4. तक्ताळ / तत्काळ / तत्त्काळ / तत्काल

उत्तर:

  1. उत्तुंग
  2. उत्सुक
  3. रौद्र
  4.  तत्काळ

५. खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

  1. मोकळ्या वेळेत त्यांचं नेहमी सागरकिनारी भटकणं फिरणं व्हायचं
  2. शेवटी त्यांचं हे आवडीचं काम होतं ना
  3. राधिका त्यावेळी संपूर्ण स्वराज्य जहाजावर तैनात होत्या
  4. मच्छिमारांना वाचवण्यासाठी आमचे दोन प्रयत्न फसले होते पण आम्ही हिंमत हरलो नाही

उत्तर:

  1. मोकळ्या वेळेत त्यांचं नेहमी सागरकिनारी भटकणं, फिरणं व्हायचं.
  2. शेवटी त्यांचं हे आवडीचं काम होतं ना!
  3. राधिका त्यावेळी ‘संपूर्ण स्वराज्य’ जहाजावर तैनात होत्या.
  4. मच्छिमारांना वाचवण्यासाठी आमचे दोन प्रयत्न फसले होते; पण आम्ही हिंमत हरलो नाही.

Class 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन

धाडसी कॅप्टन राधिका मेनन पाठाची पार्श्वभूमी

प्रस्तुत पाठातून भारतीय मर्चंट नेव्हीच्या पहिल्या कॅप्टनचा मान भूषवणाऱ्या व इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशनच्या ‘ॲवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी’ हा पुरस्कार मिळवणाऱ्या जगातील पहिल्या महिला ठरलेल्या कॅप्टन राधिका मेनन यांच्या शौर्याचा परिचय करून दिला आहे. बंगालच्या उपसागरात वादळात सापडलेल्या सात मच्छिमारांना राधिका मेनन यांनी जीवाची बाजी लावून वाचवले होते. त्या प्रसंगाचे वर्णन या पाठात करण्यात आले आहे.

धाडसी कॅप्टन राधिका मेनन शब्दार्थ

Class 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन 1
Class 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन 2

धाडसी कॅप्टन राधिका मेनन वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

Class 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन 3

धाडसी कॅप्टन राधिका मेनन टिपा

Class 8 Marathi Balbharati Chapter 8 Question Answer धाडसी कॅप्टन राधिका मेनन 4

Leave a Comment