Students can find the best Marathi Balbharati Class 8 Solutions and Chapter 9 Question Answer विद्याप्रशंसा (कविता) for exam preparation.
Std 8 Marathi Balbharati Chapter 9 Question Answer विद्याप्रशंसा (कविता)
Maharashtra Board Solutions Class 8 Marathi Balbharati Chapter 9 विद्याप्रशंसा (कविता)
विद्याप्रशंसा (कविता) Question Answer
प्रश्न १.
खालील आकृत्या पूर्ण करा.
(अ)
उत्तर:
१. जगात श्रेष्ठत्व मिळते.
२. असाध्य ते साध्य होते.
३. हितकर सखा लाभतो.
४. संकटसमयी उपाय सुचवणारा, उपदेश करणारा गुरू लाभतो.
५. सर्व इच्छा पूर्ण होतात, इच्छित फळ मिळते.
६. दुःखाचे निवारण होऊन सुखप्राप्ती होते.
(टीप: विदयार्थ्यांनी वरीलपैकी कोणतीही चार उत्तरे लिहावीत.)
(आ)
उत्तर:
१. मनुष्याला श्रेष्ठत्व देणारी
२. असाध्य ते साध्य करणारी
३. देऊन किंवा भोगूनही सदैव वाढणारी
४. हितकारक असणारी
५. गुरुप्रमाणे उपदेश करणारी
६. संकटसमयी उपाय सुचवणारी
७. इच्छित फळ देऊन मनोरथ पुरवणारी
८. सुख देणारी, दुःख दूर करणारी
(टीप: विदयार्थ्यांनी वरीलपैकी कोणतीही दोन उत्तरे लिहावीत.)
प्रश्न २.
तुलना करा.
उत्तर:
क्र. | धन | विदया |
१. | इतरांना दिल्याने कमी होते. | इतरांना दिल्याने वाढते. |
२. | स्वतः उपभोग घेतल्याने संपते. | स्वत: उपभोग घेतल्यानेही संपत नाही. |
प्रश्न ३.
खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
नानाविध रत्नांची, कनकांची असति भूषणें फार;
परि विदयासम एकहि शोभादायक नसे अलंकार.
उत्तरः
‘विदयाप्रशंसा’ या कवितेत कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी विदयेची थोरवी सांगितली आहे.
कवी म्हणतो, ‘जगात वेगवेगळ्या प्रकारच्या मौल्यवान रत्नांचे, सोन्याचे दागिने खूप असतील; परंतु विदयेएवढा मौल्यवान आणि शोभिवंत अलंकार दुसरा कोणताही नाही.’ आपले खरे सौंदर्य विदयेमुळे खुलते. .शिवाय, रत्नांच्या किंवा सोन्याच्या दागिन्यांची चोरी होऊ शकते. विदयारूपी अलंकाराची चोरी होत नाही. देवाणघेवाण केल्याने त्याची शोभा वाढत जाते. म्हणूनच, विदयेसमान दुसरा कोणताच शोभादायक अलंकार नाही असे कवी येथे स्पष्ट करतात.
प्रश्न ४.
‘विद्या’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः
या जगात शोभादायक / सर्वोत्तम अलंकार कोणता?
(टीप: विद्यार्थी ‘विद्या’ हे उत्तर येईल अशा प्रकारचे इतरही प्रश्न तयार करू शकतात. )
प्रश्न ५.
कवीने वर्णन केलेले विदयेचे महत्त्व.
उत्तरः
‘विदयाप्रशंसा’ या कवितेत कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी विदयेची थोरवी स्पष्ट केली आहे.
विदयेमुळे संपूर्ण जगामध्ये साऱ्या सजीवांत मनुष्याला श्रेष्ठत्व प्राप्त झाले आहे. विदयेच्या जोरावर या जगात कोणतीच गोष्ट असाध्य, अशक्य नाही. विदया हे एकमेव असे धन आहे, जे इतरांना दिल्याने किंवा त्याचा वापर केल्याने वाढत जाते, कधी कमी होत नाही. विविध रत्नांचे, धातूंचे दागिने यांच्यापेक्षाही शोभादायक व खरे सौंदर्य बहाल करणारा दागिना म्हणजे विदया आहे. विदयाप्राप्त व्यक्ती साऱ्या जगात उठून दिसते. विदयेसारखा खरा मित्र नाही, जो सदैव आपल्याला साथ देतो व आपल्याला कशाचीही कमतरता भासणार नाही याची काळजी घेतो.
गुरुप्रमाणेच विदयादेखील आपल्याला योग्य मागदर्शन करते, संकटातून बाहेर पडण्यासाठी योग्य उपाय सुचवते. एखादया कल्पवृक्षाप्रमाणे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते. विदयादेवी आपल्याला सर्व सुख देते आणि आपली सर्व दुःख दूर करते. योग्य मार्ग दाखवते. अशाप्रकारे, आपले जीवन सुखी, समृद्ध आणि यशस्वी करण्यासाठी विद्यादेवीचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच, आपण सर्वांनी विदयादेवीला प्राप्त व प्रसन्न करण्यासाठी तिची मनापासून आराधना केली पाहिजे म्हणजेच ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहिले पाहिजे असे कवीला यातून स्पष्ट करायचे आहे.
प्रश्न ५.
‘त्या विदयादेवीतें अनन्यभावें सदा भजा भारी’, या ओळीचा सरळ अर्थ.
उत्तर:
विदया आपल्याला सर्व प्रकारची सुखं देते आणि आपली सर्व दुःख दूर सारते. मानवाला सर्व गोष्टी प्राप्त करून देणाऱ्या या विदयादेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिची मनोभावे आराधना करा असे कवी येथे सांगत आहे.
(अ) खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा.
१. मोठेपण
२. नेहमी
३. अलंकार
४. मनातील इच्छा
उत्तर:
१. श्रेष्ठत्व
२. सदैव, सदा
३. भूषणे
४. मनोरथ
(आ). खालील शब्दांचे प्रत्येकी पाच समानार्थी शब्द लिहा.
१. मित्र
२. सोने
उत्तर:
१. सखा, सवंगडी, सोबती, स्नेही, दोस्त.
२. कनक, सुवर्ण, कांचन, हेम, हिरण्य.
Class 8 Marathi Balbharati Chapter 9 विद्याप्रशंसा (कविता) Question Answer
कृती १ – आकलन
प्रश्न १.
खालील आकृत्या पूर्ण करा.
i.
उत्तर:
१. नानाविध रत्ने
२. कनक (सोने)
प्रश्न २.
खालील चौकटी पूर्ण करा.
- हिच्या साथीने जगात असाध्य काहीच नाही → □
- देऊन किंवा भोगूनही सदैव वाढणारे → □
- विदयादेवीला असे भजावे → □
- साऱ्या भुवनातील हितकर सखा → □
उत्तर:
- विदया
- विदयाधन
- अनन्यभावाने
- विदया
[विदयेनेंच मनुष्या ……….
……….. सदा भजा भारी.]
कृती २ – आकलन
प्रश्न १.
एका वाक्यात उत्तर लिहा.
कोणत्या व्यक्तीला काहीच उणे नसते ?
उत्तर:
ज्या व्यक्तीला विदया अनुकूल असते, तिला काहीच उणे नसते.
कृती ३ – सरळ अर्थ
प्रश्न १.
‘देउनि किंवा भोगुनि उणें न होतां सदैव वाढतसे
ऐसें एकच विदया- धन, अद्भुत गुण न हा दुज्यांत वसे.’
या ओळींचा सरळ अर्थ स्पष्ट करो.
उत्तर:
जगामध्ये विदया हे एकमेव असे अमूल्य धन आहे, जे दुसऱ्याला दिल्याने किंवा उपभोग घेतल्याने जराही कमी होत नाही, उलट नेहमी वाढतच जाते. हा अद्भुत गुण इतर कोणत्याही गोष्टींत नाही, असे कवी येथे म्हणतो.
कृती ४ – काव्यसौंदर्य
प्रश्न १.
‘विदयेनेंच मनुष्या आलें श्रेष्ठत्व ह्या जगामाजीं;
न दिसे एकहि वस्तू विदयेनेंही असाध्य आहे जी.’ या ओळींतील भाव स्पष्ट करा.
उत्तर:
‘विदयाप्रशंसा’ या कवितेत कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी विदयेची थोरवी सांगितली आहे.
या जगात विदयेमुळेच मानवाला मोठेपणा, श्रेष्ठत्व प्राप्त झाले आहे. विदयेच्या जोरावरच मानवाने विविध क्षेत्रांत प्रगती साधली आहे. विदयेनेही न मिळणारी अशी कोणतीच गोष्ट या जगामध्ये अस्तित्वात नाही. म्हणजेच, आपल्याकडे जर विदया, ज्ञान असेल, तर या जगामध्ये कोणतीही गोष्ट आपण मिळवू शकतो. हेच कवीला यातून स्पष्ट करायचे आहे.
प्रश्न २.
‘या साऱ्या भुवनीं हित कर विदयेसारखा सखा नाहीं; अनुकूळ ती जयाला नित्य तयाला उणें नसे कांही’, या काव्यपंक्तींतील भाव स्पष्ट करा.
उत्तर:
‘विदयाप्रशंसा’ या कवितेत कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी विदयेची थोरवी सांगितली आहे.
मानवाला कधीही, कोणत्याही प्रसंगात साथ देणारा, साहाय्य करणारा मित्र म्हणजे विदया आहे. ती नेहमीच आपले हित, कल्याण साधते. म्हणून कवी म्हणतो, की ‘साऱ्या विश्वात विद्येसारखा आपला हित पाहणारा ‘खरा’ मित्र नाही. ज्याला विद्या प्राप्त होते, त्याला आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही.’ यश प्राप्त करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी विदयाच मार्ग दाखवते. विदयेसारख्या खऱ्या मित्राची गरज कवी येथे व्यक्त करतो.
मुट्ट्यांच्या आधारे कवितेसंबंधी कृती
प्रश्न १.
खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
i. प्रस्तुत कवितेच्या कवी / कवयित्रीचे नाव लिहा.
उत्तर:
कृष्णशास्त्री चिपळूणकर
ii. प्रस्तुत कवितेचा विषय लिहा.
उत्तर:
विदयेचे म्हणजेच ज्ञानाचे माणसाच्या आयुष्यातील महत्त्व हा कवितेचा विषय आहे.
iii. प्रस्तुत ‘कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा.
(अ) अद्भुत
(ब) अलंकार
(क) मनोरथ
(ड) सदैव
उत्तर:
(अ) अलौकिक
(ब) दागिना
(क) हेतू
(ड) नेहमी
iv. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा.
उत्तर:
विद्यादेवीची मनोभावे भक्ती करावी व विदयासंपन्न व्हावे हा संदेश या कवितेतून आपल्याला मिळतो.
v. प्रस्तुत ‘कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर:
संस्कृतप्रचुर शब्दांचा वापर असलेली ही यमकप्रधान रचना आहे. विदयेचे महत्त्व विशद करण्यासाठी प्रत्येक चरणात विदयेची ठळक वैशिष्ट्ये अधोरेखित केली आहेत. कवितेची एकूण सहा चरणात रचना असून प्रत्येक चरण हे एखादया सुविचारासारखे आहे.
vi. प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा.
उत्तर:
विदया ही माणसाला सुख मिळवण्यासाठी व दुःख दूर करण्यासाठी आवश्यक आहे. या विदयेची भक्ती करून तिची मनोभावे पूजा करा.
vii. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा.
‘या परि सकल सुखें जी देई, दुःखें समस्त जी वारी, त्या विद्यादेवीतें अनन्यभावें सदा भजा भारी
उत्तर:
अशाप्रकारे, तुम्हांला परिपूर्ण सुख देणारी आणि सर्व दुःखांचे निवारण करणाऱ्या विद्यादेवीची मनापासून आराधना करायला हवी.
viii. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा.
उत्तर:
विदयेचे महत्त्व पटवून देताना कवीने अतिशय समर्पक शब्दांद्वारे विदयेची ठळक वैशिष्ट्ये या कवितेत मांडली आहेत. ज्ञानाचे महत्त्व समजावताना ज्ञान माणसासाठी कसे उपयुक्त व जीवन समृद्ध करणारे आहे यासाठी सुयोग्य उदाहरणे दिली आहेत. आपले दुःख, दारिद्र्य, संकटे नष्ट करण्यासाठी विदयेची मनोभावे पूजा करावी हा कवीचा उपदेश खरोखरच सकारात्मक मार्ग दाखवतो. म्हणून, मला ही कविता खूप आवडली.
काव्यपंक्तींचे रसग्रहण
प्रश्न १.
पुढील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
i. ‘गुरुपरि’ उपदेश करी, संकट समयी उपाय ही सुचवी, चितित फळ देऊनियां कल्पतरूपरि मनोरथा पुरवी.
उत्तर:
कवि कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी ‘विदयाप्रशंसा’ या कवितेत विदयेचे महत्त्व स्पष्ट केले आहे. विदयादेवीची मनोभावे भक्ती केल्याने विदयासंपन्न होता येते असा संदेश या कवितेतून कवीने दिला आहे. गुरुच्या उपदेशाप्रमाणे विदया आपल्याला उपदेश करते असे म्हटले आहे.
आपल्या जीवनात गुरूंचे स्थान खूप महत्त्वाचे असते. गुरु नेहमीच आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात. कठीण प्रसंगात उपाय सुचवतात. त्यांच्याप्रमाणे विदयादेखील आपल्याला नेहमीच योग्य उपदेश करते. आपल्याला संकटकाळात योग्य उपाय सुचवते व संकटातून सहीसलामत बाहेर पडण्यास मदत करते. तसेच, विदया कल्पवृक्षाप्रमाणे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते. इच्छिलेल्या सर्व गोष्टी प्राप्त करून देते.
संस्कृत प्रचुर भाषेच्या वापरामुळे या ओळींना एक गंभीरता प्राप्त झाली आहे. यामुळे, या चरणाला एका सुवचनाचा दर्जा मिळाला आहे. यमकप्रधान चरणांची रचना असून कवीने निवेदनात्मक शैलीचा वापर केला आहे. विदयेला गुरुचा, कल्पतरूची उपमा देऊन कवीने उपमा अलंकार साधला आहे.
भाषाभ्यास विभाग
अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती
प्रश्न १.
खालील शब्दांच्या जाती ओळखून लिहा.
- मनुष्य
- एक
- भोगुनि
- सदैव
- त्या
- किंवा
उत्तर:
- नाम
- विशेषण
- क्रियापद
- क्रियाविशेषण अव्यय
- सर्वनाम
- उभयान्वयी अव्यय
प्रश्न २.
खालील शब्दांचे मूळ शब्द, सामान्यरूप, विभक्ती प्रत्यय ओळखून लिहा.
i. विदयेने
ii. दुज्यांत
iii. रत्नांची
iv. एकही
उत्तर:
क्र. | शब्द | मूळ शब्द | सामान्यरूप | विभक्ती प्रत्यय |
i. | विदयेने | विदया | विदये | ने |
ii. | दुज्यांत | दुजे | दुज्यां | त |
iii. | रत्नांची | रत्ने | रत्नां | ची |
iv. | एकही | एक | एक | ही |
प्रश्न ३.
खालील वाक्यांचे प्रकार ओळखून लिहा.
(प्रश्नार्थी / विधानार्थी / आज्ञार्थी / उद्गारार्थी)
- विदयेमुळे मनुष्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते.
- जगी सर्वसुखी असा कोण आहे?
- शी! किती कचरा केलाय हा!
- रघू, मला गरमागरम काढा दे.
- तुला खायला काय आवडते?
उत्तर:
- विधानार्थी वाक्य
- प्रश्नार्थी वाक्य
- उद्गारार्थी वाक्य
- आज्ञार्थी वाक्य
- प्रश्नार्थी वाक्य
प्रश्न ४.
खालील वाक्यांतील काळ ओळखून लिहा.
- विद्या विनयाने शोभते.
- मी रोज वाचन करत जाईन.
- मी गोष्टी वाचत होते.
- ती लिहीत आहे.
- सावलीचे नाचून झाले.
उत्तर:
- साधा वर्तमानकाळ
- रीती भविष्यकाळ
- अपूर्ण भूतकाळ
- अपूर्ण वर्तमानकाळ
- पूर्ण भूतकाळ
प्रश्न ५.
खालील वाक्यांतील प्रयोग ओळखून लिहा.
- रोशनी हसली.
- रोहनने मासे पकडले.
- पार्थने मांजराला दूध दिले.
- दिपालीने रांगोळी काढली.
- नीरव वाद्य वाजवत होता.
उत्तर:
- कर्तरी प्रयोग
- कर्मणी प्रयोग
- भावे प्रयोग
- कर्मणी प्रयोग
- कर्तरी प्रयोग
प्रश्न ६.
खालील शब्दांचे संधिविग्रह करा.
- चिदानंद
- सज्जन
- कवीश्वर
- विदयामृत
- गुणेश
उत्तर:
- चित् + आनंद
- सत् + जन
- कवि + ईश्वर
- विद्या + अमृत
- गुण + ईश
प्रश्न ७.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
i. मनोरथ पुरवणे
ii. उणे नसणे
उत्तरः
i. मनोरथ पुरवणे – इच्छा पूर्ण करणे.
वाक्यःखूप तपश्चर्या केल्यानंतर नारायणाने ध्रुवाचे मनोरथ पुरवले.
ii. उणे नसणे – कमतरता/कमी नसणे.
वाक्य: स्मृतीच्या सर्व सोईसुविधांनी युक्त अशा घरात काहीही उणे नव्हते.
आ. भाषिक घटकांवर आधारित कृती
प्रश्न १.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
- श्रेष्ठत्व ×
- असाध्य ×
- गुण ×
- सखा ×
- सुख ×
उत्तर:
- कनिष्ठत्व
- साध्य
- अवगुण, दुर्गुण
- शत्रू
- दुःख
प्रश्न २.
शब्दांच्या आधी ‘अव’ हा शब्द लावून नवीन शब्द तयार करा.
उत्तरः
अवकृपा, अवमान, अवगुण, अवनत, अवतरण इत्यादी.
प्रश्न ३.
खालील शब्दसमूहांबदद्ल एक शब्द लिहा.
- पायापासून डोक्यापर्यंत –
- वर्षातून एकदा प्रकाशित होणारे
- खूप दानधर्म करणारा
- केलेले उपकार न जाणणारा
- ज्यास कोणीही शत्रू नाही असा
उत्तर:
- आपादमस्तक
- वार्षिक
- दानशूर
- कृतघ्न
- अजातशत्रू
प्रश्न ४.
खालील वाक्यांमध्ये योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा.
- गुलाबी लाल पिवळा जांभळा निळा यांपैकी कोणता रंग तुम्हांला आवडतो
- वा फार छान झालाय हलवा
- मी भाकरी खाल्ली
- मला क्रिकेट हा खेळ आवडतो
उत्तर:
- गुलाबी, लाल, पिवळा, जांभळा, निळा यांपैकी कोणता रंग तुम्हांला आवडतो?
- वा फार छान झालाय हलवा !
- मी भाकरी खाल्ली.
- मला ‘क्रिकेट’ हा खेळ आवडतो.
विद्याप्रशंसा (कविता) कवितेचा आशय
‘विदयाप्रशंसा’ या कवितेत कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी विदयेचे महत्त्व स्पष्ट केले आहे. विदया ही एकमेव अशी गोष्ट आहे, जी दिल्याने किंवा खर्च केल्याने कमी न होता वाढते. विदया हा मानवाला शोभा देणारा सर्वांत सुंदर दागिना आहे. विदयेसारखा खरा मित्र या जगात शोधूनही सापडणार नाही. ती उत्तम गुरू आहे. ती आपल्याला संकटाच्या वेळी योग्य मार्ग दाखवते, दु:खाचे निवारण करण्यास मदत करते. अशा या विद्यादेवीची मनोभावे भक्ती करा, असा सल्ला कवी येथे देत आहे.
विद्याप्रशंसा (कविता) कवितेचा भावार्थ
विदयेची थोरवी सांगताना कवी म्हणतो,
‘विदयेनेंच…………… आहे जी. ।। १ ।।
या जगात विदयेमुळेच मानवाला मोठेपणा, श्रेष्ठत्व प्राप्त झाले आहे. विदयेनेही न मिळणारी अशी कोणतीच गोष्ट या जगामध्ये अस्तित्वात नाही. म्हणजेच, आपल्याकडे जर विदया, ज्ञान असेल, तर या जगामध्ये कोणतीही गोष्ट आपण मिळवू शकतो.
‘देउनि किंवा भोगुनि…………….दुज्यांत वसे. ।। २ ।।’
जगामध्ये विदया हे एकमेव असे अमूल्य धन आहे, जे दुसऱ्याला दिल्याने किंवा उपभोग घेतल्याने जराही कमी होत नाही, उलट नेहमी वाढतच जाते. हा अद्भुत गुण इतर कोणत्याही गोष्टींत नाही.
‘नानाविध………….. अलंकार. ।। ३ ।।’
जगात वेगवेगळ्या प्रकारच्या मौल्यवान रत्नांचे, सोन्याचे दागिने खूप असतील; परंतु विदयेएवढा मौल्यवान आणि शोभिवंत अलंकार दुसरा कोणताही नाही.
‘या साऱ्या………….. नसें काही. ।। ४ ।।’
या साऱ्या विश्वात विदयेइतका, आपले भले करणारा दुसरा खरा मित्र नाही. ज्याच्याकडे विदया आहे, त्याला या जगात कशाचीही कमतरता भासणार नाही. (विदयेसोबत मैत्री करणे हे नेहमीच आपल्यासाठी हितकारक आहे.
‘गुरुपरि………….. मनोरथा पुरवी ।। ५ ।।’
विदया आपल्याला गुरुप्रमाणे योग्य तो उपदेश करते. संकटाच्या वेळी त्यातून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करते. विदया एखादया कल्पवृक्षाप्रमाणे आपल्याला इच्छिलेले फळ देते, आपल्या इच्छा पूर्ण करते.
‘यापरि……. भजा भारी. ।। ६ ।।’
अशाप्रकारे, जी विदया तुम्हांला सर्व सुखे मिळवून देते आणि तुमच्या सर्व दुःखांचे निवारण करते, तिची तुम्ही मनापासून आराधना करा.
विद्याप्रशंसा (कविता) शब्दार्थ
विद्याप्रशंसा (कविता) वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
उणे नसणे | कमतरता/कमी नसणे. |
मनोरथ पुरवणे. | इच्छा पूर्ण करणे. |
विद्याप्रशंसा (कविता) टीप
कल्पतरू | इच्छिलेली वस्तू देणारा काल्पनिक वृक्ष. |