Maharashtra Board SSC Class 10 Marathi Sample Paper Set 2 with Answers Solutions Pdf Download.
Maharashtra Board Class 10 Marathi Model Paper Set 2 with Answers
Time : 3 Hours
Max. Marks : 80
कृतिपत्रिकेसाठी सूचना
(1) सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
(2) आकृत्या पेननेच काढाव्यात.
(3) उपयोजित लेखनातील कृतींसाठी (सूचना निवेदन) आकृतीची आवश्यकता नाही. तसेच या कृती लिहून घेऊ नयेत.
(4) स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे.
विभाग 1 : गदा (१८ गुण)
पठित गदय
प्रश्न 1.
(अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. कोण ते लिहा.
(i) आवाज काढून पिल्लांना मार्ग दाखवणारी – …………………
(ii) घसरून पाण्यांत धपकन पडणारे – …………………
वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरे नर वाघ, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूंचा धोका होताच. त्यामुळे तिला ही खबरदारी घेणं आवश्यकच होतं. वाघांच्या लहान पिल्लांन इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो. त्यामुळे वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. आता ही रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजून वर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडे झेपावली होती. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बांबूमधून मला वाघीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती; पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. त्यांतील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली; पण तिथून घसरल्यानं ते धपकन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीनं मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली; पण पिल्लांना त्याच्याशी काहीच देणं-घेणं नव्हतं. त्यांचा आईच्याभोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला.
साधारणतः कुत्रापेक्षा लहान आकाराची ही पाच महिन्यांची पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात, तशीच ही खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनं हळूच ‘ऑsas’ असा आवाज केला. हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. हिनं जंगलात कुठेतरी नक्कीच एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असावी, पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिल्लापर्यंत आणणं शक्य नसतं. त्यामुळं पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारकडं घेऊन जात होती. या चार पिल्लांसोबतच स्वत:चं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती न कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. त्या कलेत ही चांगली पारंगत होती.
2. कृती पूर्ण करा.

3. स्वमत
उताऱ्याच्या आधारे वाघिणीने घेतलेली पिल्लांची काळजी याबाबत तुम्हाला दिसून आलेले मुद्दे सांगा.
![]()
(आ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. का ते लिहा.
(i) भावे सर फक्त भौतिकशास्त्राचे शिक्षक चनव्हते, कारण………….
(ii) माशेलकरांना जीवनात भरपूर यश व कीर्ती मिळाली, कारण………….
याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले. ते आम्हाला भौतिकशास्त्र शिकवत, विज्ञानातील हा विषय शिकविताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही तर त्या विषयाची गोडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान शिकवलं.
एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखविला. साहाय्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे त्यांनी दाखवलं आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, “माशेलकर, तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल.” एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं.
आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान मला भावे सरांच्या या शिकवणुकीतून गवसलं. त्यांना मी कसा विसरू शकेन? भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर, श्री मालेगाववाला या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन केलं, संस्कार केले. आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला. जगण्याचे भान दिले. आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे, प्रचंड दारिद्र्याचा सामना करतानाचे क्षण न क्षण आठवतात आणि त्याच वेळी माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे ‘माझे संस्कार केंद्र’ डोळ्यांसमोर उभे राहते, मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो.
2. आकृती पूर्ण करा.

3. स्वमत
लेखकांना शैक्षणिक जीवनात मोलाचे साहाय्य करणाऱ्या व्यक्तींबद्दलचे मत स्पष्ट करा.
(इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. योग्य जोड्या लाखा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट | 
| (i) हिरा | विद्वान | 
| (ii) शिल्पकार | श्रोतृगण | 
| (iii) विषयतज्ज्ञ | खाण | 
| (iv) भाषण | प्रबुद्ध | 
| (v) प्रौट | शिल्पकला | 
मनुष्याच्या अंगी कोणताही गुण असला तरी परिश्रमाखेरीज व अभ्यासाखेरीज त्याचे तेज कधीही पडावयाचे नाही. खाणीतून नुकताच खणून काढलेला हिरा जसा मुळात तेजस्वी नसून शिल्पकारांच्या संस्कार प्रयोगांची त्याला खास अपेक्षा असते त्याचप्रमाणे गुणीजनांच्या अंगी असणारी कलाही शिक्षणाखेरीज पूर्वत्वाने कधी प्रकट होत नसते. असो, तर वक्तृत्व हे जरी मनुष्याच्या अंगी जन्मसिद्धच असले पाहिजे, तरी ते तसे कोणाचे ठायी असतानाही विद्वत्तेखेरीज ते पूर्ण शोभा कधीही द्यावयाचे नाही. विद्वान व रसिक लोकांना तुष्ट करून त्यांची मते आपल्या भाषणाने ज्यास कळवावयाची असतील त्याने भाषाशुद्धता, अर्थसंगती, सुंदर व प्रौढ विचार मोठमोठ्या नामांकित काव्यांचे, नाटकांचे व इतिहासाचेही ज्ञान संपादन करून त्याच्याशी त्याने सतत परिचय केला पाहिजे. याखेरीज इतर अनेक विषयांची माहिती त्याला असली तर चांगलीच कारण दृष्टान्त वगैरे देण्यास व भाषणास वैचित्र्य व मनोरंजकता आणण्यास ती फार उपयोगी पडते. आणखी एक प्रभावी साधन म्हणजे अनुकरण. कोणताही गुण साध्य करून घेण्यास अनुकरणासारखा दुसरा उत्तम मार्ग नाही.
2. एका शब्दात उत्तरे लिहा.
(i) गुणीजनांच्या अंगी असणारी कलेला अपेक्षा असते – ………….
(ii) खाणीतून निघणारे – ………….
उत्तर:
(अ) 1. (i) वाघिण
(ii) वाघिणीचे पिल्ले
2.

3. वाघिण शिकाराला गेली तरी पिल्लांना दाट झुडपात लपवून ठेवत होती. कारण रानकुत्री, बिबळा, नर वाघ हे प्राणी या पिल्लांना खाऊन टाकतात. तसेच वाघिण दूर कोठेही गेली तर परत पिल्लांच्या जवळ येते. ती थकून गेली तरी पिल्लांनी अंगावर कितीही दंगा केला तरी त्यांना कांही करत नाही. उलट ती त्या पिल्लांना मायेने चाटत असते. जसजशी पिल्ले मोठे होतात तसतशी ती त्यांना घेऊनच सर्वत्र हिंडत असते. इतर हिंस्र प्राण्यापासून ही एकटी वाघिण आपल्या सर्व पिल्लांच रक्षण करत असते.
(आ) 1. (i) विषयाव्यतिरिक्त त्यांनी माशेलकरांना जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान पण शिकवलं.
(ii) शालेय जीवनात त्यांना आपल्या आई व शिक्षकांकडून व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन व संस्कार मिळाले.
2.

3. लेखकांना हायस्कूलमध्ये असताना भावे सर भेटले. नंतर पुढील शैक्षणिक जीवनात श्री. जोशी सर. श्री. शिर्के सर, श्री. मालेगाववाला सर असे प्रमुख काही शिक्षक भेटले. अन्य काही शिक्षक होतेच, पण लेखकांनी या शिक्षकांच्याबद्दल आपले विशेष मत व्यक्त केले आहे. या शिक्षकांनी त्यांना उत्तम मागदर्शन केले, चांगले संस्कार दिले. संघर्षासाठी आत्मविश्वास निर्माण केला आणि जगण्याचे भान मिळवून या शिदोरीवर त्यांनी आपले जीवन सर्व दृष्टीने यथार्थ करून दाखविले आणि जगामध्ये ते एका अत्युच्च शिखरावर पोहोचले.
(इ) 1.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट | 
| (i) हिरा | खाण | 
| (ii) शिल्पकार | शिल्पकला | 
| (iii) विषयतज्ज्ञ | विद्वान | 
| (iv) भाषण | श्रोतृगण | 
| (v) प्रौट | प्रबुद्ध | 
2. (i) शिक्षणाची
(ii) हिरा
विभाग 2 : पद्य (१६ गुण)
प्रश्न 2.
(अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. चौकटी पूर्णकरा.
(i) दोन दिवसवाट पाहण्यात गेले; तर दोन गेले – ____________
(ii) भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी झाली – ____________
| दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली; भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले कधी मान उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखात गेले.  | 
2. आकृती पूर्ण करा.

3. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा.
(i) गहाण
(ii) डोईवर
(iii) झोतभट्टी
(iv) धुंद
4. काव्या सौंदर्य:
‘दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलों”
![]()
(आ) खालील दोन कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवाः
| मुद्दे | ‘औक्षण’ किंवा ‘स्वप्न करू साकार’ | |
| (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | ||
| (ii) प्रस्तुत कवितेचा विषय | ||
| (iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘तुझ्या शौर्या पुढे। त्याची केवढीशी शान॥  | 
‘घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।’ | 
| (iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | ||
| (v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) औक्षण (ii) आसव (iii) तोफ (iv) दीन  | 
(i) शुभंकर (ii) उज्जवल (iii) विभव (iv) अमुचा  | 
उत्तर:
(अ) 1. (i) दुःखात
(ii) बरबाद
2.

3. (i) तारण ठेवलेली वस्तू
(ii) डोकेवर
(iii) अग्नीच्या मोठी ज्वालाची भट्टी
(iv) उन्मत
4. वरील ओळ नारायण सुर्वे यांनी लिहिलेल्या ‘दोन दिवस’ या कवितेतील आहे.
या कवितेत कष्टकरी, कामगारांच्या जीवनात कायम वास्तव्यास असलेल्या दुःखाचे वर्णन कवीने केले आहे.
कवी म्हणतात, मी कष्ट करताना कधी स्वतःचा विचार केला नाही; कायम जगाचाच विचार करत कष्ट करत राहिला. या दुःखातही मी सुखाची वाट पाहण्यात आयुष्य खर्च केले. हे करत असताना मी धीर सोडला नाही. अनुभवातून मी खूप काही शिकलो. आयुष्यात कसे ठामपणे उभे राहायचे हे मला समजले.
‘दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे’ या ओळीतून कवीला असे सांगायचे आहे की, कितीही संकटे आली तरी खचून न जाता धीराने सामोरे जाऊन खंबीरपणे जीवन जगावे. जीवनात सुख-दुःख हे येतच असते. पण आपण न डगमगता येईल त्या परिस्थितीत आनंदाने जगावे असे सांगितले आहे.
(आ)
| मुद्दे | ‘औक्षण’ किंवा ‘स्वप्न करू साकार’ | |
| (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | कवियत्री इंदिरा संत | कवी किशोर पाठक | 
| (ii) प्रस्तुत कवितेचा विषय | देशसेवा हीच ईश्वरसेवा सैनिकांचा कौतुक. | देशाचे उज्जवल भविष्याचे स्वप्ने एकजुटता, श्रमप्रतिष्ठा व एकात्मताने रेखाटले आहे. | 
| (iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | हे सैनिका, तुझ्या शौर्यगाथे पुढे तुझ्यावर उधळण्यासाठी आमच्या मुठीत दौलत नाही, आमचा जीव तुझ्या शानपुढे अगदीच लहान व क्षुल्लक आहे. | नव्या युगाचे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक धर्मपंथाचे घराघरांतून जन्मलेले प्रत्येक बालक म्हणजे तेजाचा नवीन अवतार आहे. आपली एकजुटता कायम राहावी. | 
| (iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | आवडली, कारण ‘देश हा देव असे माझा’ असे मानणाऱ्या सैनिकांबद्दल माझ्या मनात खूप आदराची भावना आहे. ते सीमेचे रक्षण करतात तेव्हाच देश निष्काळजीपूर्वक चालत राहतो. | आवडली, कारण कवीने एकजुटता, एकात्मताव श्रमशक्तीचे महत्त्व कवितेत प्रस्तुत केले आहे. आपल्या भारतदेशाचे उज्जवल स्वप्न यावरच टिकले आहे. | 
| (v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) औक्षण— ओवाळणे (ii) आसव – निचरून काढलेला द्रव (iii) तोफ – उल्हाटयंत्र (iv) दीन गरीब  | 
(i) शुभंकर – आशीर्वाद देणारा (ii) उज्ज्वल – संपन्न (iii) विभव वैभव समृद्धी (iv) अमुचा – आमचा  | 
विभाग 3 : स्थूलवाचन (०६ गुण)
प्रश्न 3.
खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.
1. मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हाला वाटते?
2. तुम्हाला समजलेली ‘जाता अस्ताला ‘ या कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
3. व्युत्पत्ती कोश कसा पाहावा ते स्पष्ट करा.
उत्तर:
1. लेखक डॉ. अनिल काकोडकर हे बार्कमध्ये इंजिनिअर म्हणून हजर झाले. त्या वेळी त्यांच्यावर मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. हे करत असताना त्यांच्या असे लक्षात आले की मेटलायझिंग प्रक्रियेवर काम होत नाही. यामागील कारणे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा ती पुढीलप्रमाणे दिसून आली.
(i) सर्व प्रकारची यंत्रसामग्री असूनही ती कोणी वापरत नाही.
(ii) इंजिनिअरला वेल्डर व फोरमन यांची गरज भासते.
यावर त्यांनी असे संशोधन केले की, इंजिनिअरने कोणाचीही मदत न घेता आधी सर्व कामे स्वतः करावीत. स्वतः सर्व कामे करता आली तर त्याला मदतनीस मिळतील आणि ती योग्यप्रकारे काम करतील. ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीनुसार जर बागले तर दुसऱ्यांना सांगणे योग्य ठरते. या सर्वांचा अभाव असल्यामुळे मेटलायझिंग प्रक्रियेवर कामे होत नाहीत.
2. ‘जाता अस्ताला ‘ या रवींद्रनाथ टागोरांच्या बंगाली कवितेचे रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केले आहे. या कवितेत सूर्य व पणती यांचे तेजाची प्रतीके या रूपात वर्णन केले आहे.
सूर्य नित्यनेमाने रोज उगवतो. पृथ्वीला आपल्या तेजाने प्रकाशित करण्याचे काम तो सदैव करत असतो. सूर्याच्या प्रखर तेजाने सर्व पृथ्वी न्हाऊन निघत असते. पण हाच सूर्य जेव्हा संध्याकाळी मावळत असतो तेव्हा त्याच्या मनात पृथ्वीची चिंता लागून राहिलेली असते की मी अस्ताला गेल्यावर तिची काळजी कोण घेईल ? अंधारात बुडणाऱ्या पृथ्वीला कोण प्रकाश देईल? असा विचार मनात येताच सूर्याचे डोळे पाणावतात. या त्याच्या पाणावलेल्या डोळ्याच्या वर्णनावरून सूर्याचे पृथ्वीवर असलेले प्रेम, आईची ममता, गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी व्यक्त केली आहे. एखाद्या आईला जशी आपल्या बाळाची काळजी वाटावी त्याप्रमाणे सूर्याला पृथ्वीची काळजी या कवितेतून आपल्याला दिसून येते.
3. आपण खूपसे शब्द पाहतो. ऐकतो पण एखाद्या शब्दाबद्दल आपल्या मनात कुतूहल निर्माण होते आणि त्यासाठी आपण शब्दकोश पाहतो. उदाहरण, दिवाळी हा शब्द.
‘दिवाळी’ या शब्दाची व्युत्पत्ती पाहताना तो मूळ संस्कृत शब्द दीपावलीपासून आला. त्याचे मराठीत ‘दिवाळी’ असे रूप झाले.
व्युत्पत्तिकोशात त्या शब्दापुढे कंसात जात, लिंग व तो शब्द इतर भाषांमध्ये कसा आहे याचे लघुरूप दिलेले असते. या लघुरूपांचा अर्थ समजून घेतला असता आपणाला व्युत्पत्तिकोश पाहणे सोपे जाते, जसे. पु. म्हणजे पुल्लिंगी ली स्त्रीलिंगी, नपुं नपुंसकलिंगी असे प्रथम असते. दिवाळी हा शब्द स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे त्याचापुढील कंसात प्रथम ‘स्त्री’ अशा शब्द येईल. त्यानंतर भाषेसाठीचे लघुरूप पुढीलप्रमाणे सं संस्कृत, हि हिंदी, गु गुजराथी याप्रमाणे इतर भाषांचीही लघुरूपे असतात. त्या-त्या शब्दासाठी त्या भाषेचे लघुरूप वापरलेले असते.
प्रमाणे वर्णाक्षर, हस्व-दीर्घ, आकार उकार, जोडाक्षर यानुसार क्रमागत शब्दरचना केलेली असते.
या सर्वांची ओळख करून व्युत्पत्तिकोश पाहिल्यास आपणाला त्यात कोणतीच अडचण येणार नाही आणि शब्दांची व्युत्पत्ती पाहण्याचा आनंदही उपभोगता येईल.
विभाग 4 : भाषाभ्यास (१६ गुण)
प्रश्न 4.
(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती.
1. खालील वाक्यांचा प्रकार ओलखा.
(i) निवळयांच्या निरीक्षणाची संधी का घालावली?
(ii) वाघाची लहान पिल्ले सुरक्षित नव्हती.
2. कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा.
(i) शी! किती घाण आहे की! विधानार्थी वाक्य तयार करा.
(ii) नियमितपणे शाळेत जावे, आज्ञार्थी वाक्य तयार करा.
3. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा (कोणतेही दोन):
(i) शरमिंदे
(ii) अधीर होणे
(iii) अंगावर काटा येणे.
![]()
(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:
1. शब्दसंपत्ती
(i) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
(i) बृष्टी – ____________
(ii) सही – ____________
(ii) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
(i) संतुष्ट × ____________
(ii) देशी × ____________
(iii) खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
पूर्वी कधी न पाहिलेले – ____________
(iv) वचन बदला.
(i) भाषा – ____________
(ii) मित्र – ____________
2. लेखननियमांनुसार लेखन:
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.
(i) लोक आता दिवाळिच्या तयारिला लागले होते.
(ii) तारे फूलले, रात्र खुद माली.
3. विरामचिन्हे:
वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
(i) “तुम्हांला शाल दिली तर चालेल काय”
(ii) या शाली घेऊन घेऊन आता मी ‘शालीन’ बनू लागलो आहे.
उत्तर:
(अ) 1. (i) प्रश्नार्थी
(ii) नकारार्थी
2. (i) विधानार्थी वाक्य – तिथे खूप घाण आहे.
(ii) विधानार्थी वाक्य – नियमितपणे शाळेत जा.
3. (i) लॉजेने गोरेमोरे होणे वरमणे
वाक्य आपल्या एका चुकीमुळे संघाला हार पत्करावी लागली, त्यामुळे विक्रम शरमिंदा झाला.
(ii) उतावळे होणे.
वाक्य : सुट्टी लागताच विनय कोकणात जाण्याकरता अधीर झाला.
(iii) भीतीने शहारून उठणे, खूप घाबरणे.
वाक्य : रत्नाकर मतकरींच्या गूढकथा वाचून अंगावर काटा येतो.
(आ) 1. (i) (i) वर्षाव
(ii) स्वाक्षरी
(ii) (i) असंतुष्ट
(ii) परदेशी
(iii) अपूर्वी
(iv) (i) भाषा
(ii) मित्र
2. (i) लोक आता दिवाळीच्या तयारीला लागले होते.
(ii) तारे फुलले, रात्र छुदं झाली.
3. (i) “तुम्हांला शाल दिली तर चालेल काय?”
(ii) “या शाली घेऊन घेऊन आता मी ‘शालीन’ बनू लागलो आहे.’
विभाग 5 : उपयोजित लेखन (२४ गुण)
प्रश्न 5.
(अ) खालील कृती सोडवा:
1. पत्रलेखन:
खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.

किंवा
2. सारांशलेखन:
विभाग-1 : गद्य (इ) [प्रश्न क्रमांक १ (इ)] मधील अपठित गदय उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा:
(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा
1. जाहिरातलेखन:
खालील मुद्दयांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करा.
![]()
2. बातमीलेखन:
खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.
![]()
3. कथालेखन:
| खालील अपूर्ण कथा वाचा. तुमचा विचार व कल्पकतेने ती कथा पूर्ण करा. (दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची आवश्यकता नाही) दिवस कधी मावळला ते कळलेच नाही त्या दिवशी! पाहुण्यांनी घर भरून गेलं होतं. आजीच्या वयाला 75 वर्षे पूर्ण होत होती. सर्वजण या निमित्ताने एकत्र आलेले पाहून आजी तृप्त झाली होती. एकमेकांशी रक्ताने व मनाने जोडलेल्या तीन पिढचा एकत्र जमल्या होत्या. दिवसभरच्या कार्यक्रमानंतर संध्याकाळी हास्यविनोदात, मनमोकळेपणाने गप्पांत सारे जण दंग होते आणि अगदी अचानक या गप्पांत एक अनोळखी आवाज ऐकू आला. ‘जिजी…. मी आलो ग!’ खूप वर्षांनी आजीने हा आवाज ऐकला आणि ……………. ………………………………………………………………… ………………………………………………………………… ………………………………………………………………… …………………………………………………………………  | 
(इ) लेखनकौशल्य:
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा (शब्दमर्यादा १०० ते १२० शब्द)
1. प्रसंगलेखन:
खालील मुद्दयांच्या आधारे दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी एक आठवडाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा:

2. दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:

3. वैचारिक:
‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
जगी सर्वसुखी असा कोण-सुख आणि दुःख हे नाण्याच्या दोन बाजू-दुःख नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।
उत्तर:
(अ) 1. अरविंद सावंत,
सहल प्रमुख,
विद्या मंदिर, सांगली.
दिनांक : 8 अक्टूबर, 20xx.
प्रति,
मा. व्यवस्थापक,
आँध वस्तुसंग्रहालय,
औंध, जि. सातारा.
विषय वस्तुसंग्रहालय पाहाण्यास परवानगी मिळण्याबाबत.
महोदय
स. न. वि. वि.
मी सांगली येथील विद्या मंदिर या हायस्कूलमध्ये शिक्षक आहे. सहल प्रमुख या नात्याने आम्ही दरवर्षी मुलांना विविध ठिकाणी घेऊन जात असतो.
काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये आपले वस्तुसंग्रहालय 5 ते 15 अक्टूबर, 2018, सकाळी 10 ते सायं 5 वाजेपर्यंत पाहण्यास खुले केले आहे हे वाचून आम्हाला समाधान झाले. जुन्या पुराण्या वस्तूंचे आपण खूप काळजीपूर्वक जतन केले आहे. तसेच आपल्या वस्तुसंग्रहालयाचा नावलौकिक, सगळीकडे परिचित आहेच. तेव्हा तुमच्या वस्तुसंग्रहालयातील विविध व दुर्मीळ वस्तूंचे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खूप चांगले ज्ञान मिळेल. तेव्हा संग्रहालय पाहण्यास परवानगी मिळावी. आमच्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांची संख्या पस्तीस आहे.
कळावे,
आपला कृपाभिलाषी,
अ, ब, स
अरविंद सावंत,
सहल प्रमुख, विद्या मंदिर, सांगली.
किंवा
दिनांक : 5 अक्टूबर,20xx.
प्रिय मित्र,
सचिन यांस,
स. न. वि. वि.
पत्रास कारण की, बरेच दिवस झाले, तुझा-माझा काहीच पत्रव्यवहार झालेला नाही. त्यामुळे काहीच हकीकत कळली नाही, तेव्हा तू कसा आहेस?
आता विशेष म्हणजे आमच्या जवळच असलेले औंध येथील वस्तुसंग्रहालय 5 ते 15 अक्टूबर, 2018, सकाळी 10 ते सायं 5 वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुले केले आहे. तेव्हा आपण ते बघून यावे असे वाटते. शाळेत असताना सहलीतून आपण ते पाहिले त्यानंतर आता बऱ्याच दिवसात तिकडे गेलो नाही आणि पूर्वीचे विशेष आता आठवत नाही. तेव्हा तू इकडे ये म्हणजे आपणास मिळून जाता येईल. वाट पाहत आहे.
तुझ्या घरी मानाप्रमाणे माझा नमस्कार सांग.
कळावे, तुझा मित्र,
अरविंद सावंत,
![]()
2. मनुष्याच्या अंगी असलेल्या गुणांना व त्यांच्या कलेला पारखी ठेवण्यासाठी शिक्षणाची व परिश्रमाची नितांत आवश्यकता असते. विद्वानाच्या विद्वत्तेखाली असणाऱ्या गुणांना व त्याचबरोबर त्यांच्यात असलेल्या कलांना व त्याचबरोबर त्यांच्यात असलेल्या कलांना व वक्तृत्वाला जर इतर माणसांनी अनुकरण केला तर हा उत्तम मार्ग ठरेल. मा० या अनुकरणात त्याने भाषाशुद्धता, अर्थसंगती, सुंदर व प्रौढ विचारांची काळजी घेतली पाहिजे त्याशिवाय अनेक विषयांची माहिती प्राप्त करण्यासाठी सतत अध्ययनाची व शिक्षणाची आवड ठेवणे आवश्यक आहे.
(आ) 1.

2. सातारा ता. २२ जुलै (वार्ताहर) सध्या आपल्या परिसरामध्ये पावसाची अतिवृष्टी सुरू असल्यामुळे धरणक्षेत्रात अति पाऊस पडत आहे. पाण्याच्या साठ्यामध्ये लक्षणीय वाढ होत आहे. पावसाचा जोर असाच चालू राहिला तर पाणी धोक्याची पातळी ओलांडेल. म्हणून सध्या कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. तेव्हा दक्षतेचा उपाय म्हणून नदीकाठच्या लोकांनी सावध राहावे असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. तरी लोकांनी जास्त पाण्यामध्ये जाऊ नये आणि सावधानता बाळगावी.
3. क्षणाचाही विलंब न करता आजीने ओळखले. ‘हा तर बिट्टू।’
‘बिट्टू’ आजींच्या जिवलग मैत्रिणीचा मुलगा. शांता अधिकारीचा मुलगा आदित्य उर्फ बिट्टू. बिट्टूबद्दल आजी नेहमीच आम्हाला गप्पांत सांगायची. बिट्टू लहानपणापासूनच हुशार व चुणचुणीत पहिल्या भेटीत सगळ्यांना आपलसं करणारा. बोलका, हसतमुख ! सर्वांचा लाडका.
आनंद वाटणाऱ्या अधिकाऱ्याच्या घरावर अचानक एकापाठोपाठ दीन संकटं ओढवली. बिट्टू दहावीत शिकत असताना त्याच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. तर या धक्क्याने पाठोपाठ आईही गेली. बिट्टूच्या डोक्यावरील मायेचे छत्र काळाने ओवून नेले. बिट्टू दिशाहीन झाला होता. पण या सान्यात बिट्टूला आजीचा मीठा आधार वाटत होता. आजीनेही त्याला पोटाशी धरले.
ऐन दहावीच्या परीक्षेवेळी एवढे मोठे संकट आले. बिट्टूने आजीच्या आधाराने हिम्मत एकवटली व परीक्षेला समोरा गेला. पुढे तो आपल्या मावशीकडे राहू लागला. कितीही संकटे आली तरी बिट्टूने शिक्षणाची कास कधीच सोडली नाही. आजीला बिट्टू आवर्जून पत्र लिहायचा; खुशाली कळवायचा. हळूहळू कामाच्या व्यापात पत्र रोडावली. आजीला मात्र बिट्टू सतत आठवायचा. त्याची शिक्षणाची तळमळ, मेहनत, डोलचातली चमक आजी नेहमी आम्हाला सांगायची. बिट्टू आता विदेशात एका बड्या कंपनीत इलेक्ट्रानिक्स इंजिनीअर म्हणून मोठ्या पदावर नोकरी करतो. तिथेच तो स्थायिक झाला आहे. शिक्षणाच्या जोरावर आज त्याने स्वतःची वेगळी प्रतिमा विदेशातही निर्माण केली. आज बिट्टू बऱ्याच वर्षानी आपल्या आजीला भेटला तेव्हा डोळ्यातल्या आसवांतून जणू कृतज्ञता व्यक्त करीत होता. आजीने त्याला मायेने जवळ घेतले. “मनाने जोडलेली मायेची नाती आयुष्यभर सोबत राहतात.” आजीच्या या वचनाचा अनुभव आम्ही प्रत्यक्षात घेत होतो. बघता बघता आजी आणि बिट्टू गप्पांत बुडून गेले. माइयां मनात मात्र एकंच आवाज घुमत राहिला. ‘जिजी…. मी आलो ग !’
(इ) 1. दिवाळीच्या सुट्टीत एक आठवडासाठी आपल्या गावी जाणे
नोकरी धंदऱ्यामुळे पुणेकरी झालो : तिथली गर्दी, धावधाव, सामाजिक विरक्ती असे काही रोजची दिनचर्या झालेली आहे. त्यामुळे कुठेही निघायचं विचार केलं तर डोक्याला ताण येतो. त्यातही जर आपले खेडेगावाकडे जाण्याचा विचार केला तर मुलं खेड्यात जायला सरळ नकार देतात. कारण शहरी सोय तिथे नाही. शहरात राहिलेले मुलांना गावाचा ओढा नसतो. त्यांना खेडेगाव
म्हणजे बेकवर्ड क्षेत्र वाटतो या उलट जेव्हा माझे आई बाबा खेड यातून पुण्याला येतात, इथलं दृश्य पाहून ते लवकरच परत जाण्याची घाई करतात. शहर त्यांना मुळीच आवडत नाही. माझ्या अत: करणात बरेच दिवसापासून एक प्रबळ इच्छा आहे की म्हातारपण, शेवटचे दिवस आपल्याच मातीत घालायचे. शेती पाहिली तर आनंदवाटेल. ज्या मातीने आपल्याला शिकवून सवरून मोठं केलं, सबळ बनवलं, त्यामातीचे कर्ज याच नात्याने चुकवता येईल. म्हणून गावाचं राहतं घर कायमचं मेंटेन करून एकदम सुंदर ठेवलं आहे. नातेवाईकही तिथेच जवळपास असल्यामुळे त्यांनाही भेटण्याची तीव्र इच्छा असते.
यंदा आपण दिवाळीच्या सुट्टीमध्ये नातेवाईकांना भेटण्यासाठी आपल्या खेडेगावी जाऊ या अशी घरात सल्ला केली. मुलं पुन्हा तयार नाही झाले, पण त्यांच्यासमोर गावाचे निसर्गसौंदर्याचे वर्णन केल्यावर त्यांची त्याला पाहण्याची इच्छा जगली. दिवाळीची सुट्टी लागण्याच्या दिवशी आम्ही सपरिवार दुपारी आपल्या वाहनाने खाण्यापिण्याचे सोय करून आपल्या गावाकडे निघालो. बरोबर दोन तासात आपल्या गावी पोहचलो. घरी पोहचल्यावर आम्ही आई-बाबांचा आशीर्वाद घेतला. चहापाणी झाल्यावर आपल्या नातेवाईकांना भेटायला निघालो. वाटेत बालमित्र भैयासाहेब जोशीकडेच्च बसलो. तेथे बराच वेळ आमची मैफिल जमली. नातेवाईकांनकडे गप्पागोष्टी, बरेच विषयांवर चर्चा. मग शेवटी जेवणाचा आग्रह न टाळता केव्हा सायंकाळचे आठ वाजले, कळलेच नाही. जेवण करून आम्ही सरळ आपल्या गावातले घरात आलो. प्रवासात दमलो म्हणून लवकर झोपलो. सकाळी लवकर उठलो, चला गावाचा एक फेरफटका मारायचा असं ठरवलं, तेवढ यात मुलांनी गावाचे निसर्गसौंदर्य पाहण्याची आठवण दिली. आम्ही घाईत चहा पिऊन घराबाहेर पडलो. गावाचा पूर्ण चक्कर लावण्याचा ठरवलं. गावाचे वातावरण शहरापासून अगदी वेगळे, डोंगर माथ्यावरील हे खेडेगाव, नाव ‘परशुराम चहुकडे हिरवेगार शेत, मोठ-मोठाल्ले झाडे सर्वत्र शांतता, शहरासारखी कोलाहल नाही, नैसर्गिक ठंडावा, शुद्ध वातावरण, सह्याद्री पर्वताने घेरलेले, समोर एक किमी. वर समुद्रतट, जलश्रोत, समुद्राचा लल्लाट आवाज, पाण्याची कलकल, सदाकदा न सांगता जोरात येणारा पाऊस आणि समुद्रतटावर सतत येणारे पर्यटकांची गर्दी. सुंदर जलवायू असलेले असे हे गावाचे चित्रण. हे सर्व पाहून मुलं खूप आनंदीत झाले, अशे दृश्य त्यांना कधीच पाहायला नाही मिळाले. हे गाव निसर्गाचं अगदी प्रत्यक्ष उदाहरण आहे. गावाचे लहान सुंदर घरे, सडा, रांगोळी, शेताचे मळे, त्यात काम करणारे शेतकरी, शांत वातावरण, शहरासारखी दगदग नाही, गर्दी नाही रस्त्याभर प्रत्येक येणारे-जाणारेंची राम-राम. खरोखरच! गावात मिळणारा मनसुख शहरात नाही. गाव निसर्गाने भरलेलं आहे. पर्यावरण संतुलन हे शहरापेक्षा गावात जास्त आहे. निसर्गाचं अनुपम सौंदर्य आमच्या गावात दिसते. ‘जगा आणि जगु दया’ ही म्हण आमच्या गावासाठी अगदी खरी ठरते. निसर्गाचं सुंदर स्वरूप आम्ही आपल्या गावात अनुभवत आहे. निसर्ग खऱ्या अर्थाने गावाचा सोबती आहे. एवढ असूनही लोकं शहराच्या भौतिक सुखासाठी पळत आहे. पण शहराची भाकर जुळल्यामुळे तिथे जाणं पण भाग आहे. म्हणून शेवटी गावाचे सुप्रसिद्ध शिव मंदिराचे दर्शन व एखाद तास समुद्रतटावर घालून आम्ही परत गावाच्या घरात आलो. दिवाळीच्या सुट्टीत गावाचा चांगला अनुभव घेऊन व अप्रतिम निसर्गसौंदर्य पाहून पुण्यास परत येऊन आपल्या कामात गुंतलो. मुलांचीतर एकप्रकारे नविसरणारी सहलच झाली. ‘बाबा, परत गावाला केव्हा चलायचं ?’ – असे परत परत प्रश्न विचारायचे.
शेवटी मला एवढेच म्हणायचे!
2. ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती।
तेथेकर माझी जळती॥’
मी शेतकरी बोलतोय!
मी काही कामानिमित्त एस. टी. मधून कोल्हापूरला जात होतो. एस. टी. मध्ये बरेच प्रवासी होते. मी वाचत होतो. त्यावेळी माझ्या कानावर शब्द पडले, “साहेब इथं बसू?” मी पाहिले तर एक शेतकरी माझ्याकडे दिनवाणीने माझ्या शेजारच्या’ जागेवर बसण्यासाठी विचारत होता. मला त्यांच्याबद्दल आपुलकी वाटल्याने मी त्याला होकार दिला. इकडे-तिकडे गप्पा मारता मारता तो सांगू लागला की.
“मी एका गरीब कुटुंबात जन्माला आलो. कोल्हापूरजवळ माझे गाव आहे. घरी गरिबी असल्यामुळे माझे शिक्षण जेमतेमच झाले. मला शिक्षणाची खूप हौस होती. पण परिस्थितीमुळे शेती करावी लागली. पहिल्यांदा शेतीची आवड नव्हती पण आता शेतीच बरी वाटते.’
शेतकरी म्हटले की लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तो अडाणी, गावंढळ आहे असा बहुतेक जणांचा समज असतो. पण आता तसे नाही. आता गावा-गावामध्ये शाळा आहेत. रेडिओ आहे, टी. व्ही. आहे. त्यामुळे अडाणी कोणी राहत नाही. रेडिओ-टी. व्ही. मुळे हवामानाचा अंदाज, बाजारपेठेची माहिती होते. त्यामुळे शेतीत आता बदल करता येतात. नवीन बी- बियाणे, तंत्रज्ञान यांचा शेतीमध्ये वापर करता येतो. देशाच्या विविध भागातील माहिती मिळते. त्यामुळे पूर्वीसारखा शेतकरी आता अडाणी राहिला नाही हे लोकांनी समजून घेतले पाहिजे.
आपल्या येथील शेती निसर्गावर बऱ्याच प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळे कधी दुष्काळाला तोंड द्यावे लागते, कधी जास्त पावसामुळे पिकांचे नुकसान होते. ठरविलेले अंदाज आणि उत्पन्न येईल याची खात्री नसते. त्यामुळे आता बरेच तरुण शेतीऐवजी नोकरीकडे वळत आहेत. शेतीमध्ये नुकसानच होते आणि शेतकरी हा कायम कर्जबाजारीच राहतो असा सर्वांचा समज होतो. पण या गोष्टीत पूर्णपणे सत्यता नाही. व्यवस्थित नियोजन करून सर्वांवर नियंत्रण ठेवले आणि नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याची तयारी ठेवल्यास शेतीमध्ये आपण यशस्वी होतो हे नक्कीच.”
असे तो सांगत असतानाच त्याचे गाव आल्यामुळे तो एस. टी. तून उतरला आणि मी त्याने सांगितलेली हकीकत कशी योग्य आहे याचा विचार करत बसलो.
![]()
3. दुःखच नसते तर!
जगामध्ये आपण पाहिले आहे की काही जण सुखी आहेत तर काही जण दु:खी आहेत. कोणीही संपूर्णपणे सुखी नाही किंवा संपूर्णपणे दुःखी नाही. म्हणूनच म्हटले जाते की “जगी सर्वसुखी असा कोण आहे?” या उक्तीवरून जगामध्ये सुख आणि दुःख हे दोन्हीही आहे. पण जगामध्ये दुःखच नसते तर काय झाले असते? याचा विचार कोणी केला आहे काय? नाण्याला किंवा कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतातच. तेव्हा एकाच बाजूचा विचार कसा चालणार?
सुख आणि दुःख हे नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुख आहे म्हणून दुःख असते हे कळते. तर दुःखच नसते तर सुखाची किंमतच आपणाला कळली नसती. कायम आपण सुखात लोळत पडलो असतो. कोणताही कामधंदा फार कष्ट घेऊन केला नसता. पैशाची किंवा म्हातारपणीच तजवीज केली नसती. त्याबद्दल किंवा भविष्यकाळाबद्दल कधी विचारच केला नसता. जेवढे समोर येते तेवढेच करायचे. जादा कष्ट, जादा विचार अशा गोष्टी कधी मनात आणल्याच नसत्या. कायम निवांतपणे हिंडायचे, फिरायचे आणि मजा करून बसावयाचे असे चाललेले असते. पण हे कोठवर चालणार. निवांत किती वेळ बसणार? मजा किती वेळ मारणार? शेवटी प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा आहे. ही मर्यादा नसली तर मजा मारणे, ऐषाराम या गोष्टींचासुद्धा माणसाला कंटाळा आला असता.
दु:ख नसते तर सुखाचे महत्त्वच कळले नसते. कायम चैन, मौजमजा यामध्ये रोज तेच तेच पाहून कंटाळा आला असता. सर्वत्र कंटाळवाणे जीवन झाले असते. कोणत्याही गोष्टीचे कौतुक वाटले नसते किंवा आनंद वाटला नसता. मग दुःख नसून चालले असते काय? माणसे दुःखाला घाबरतात हे चुकीचे आहे. दुःखामुळे सुख ही गोष्ट काय आहे? कशी आहे याची पूर्ण कल्पना येते. दु:खामुळे माणूस जीवनात संघर्ष करणे, धडपड, दुःखाला सामोरे जाणे, धैर्यवान होणे अशा अनेक गोष्टी माणसाला कर्तृत्ववान बनवितात.
काहीतरी ध्येय माणसासमोर उभे राहते. कारण सुख हे कायम टिकणारे नसते. सुखानंतर दुःख येते. म्हणून माणूस धडपडत असतो. दुःखात टिकून राहण्यासाठी काही तजवीज करून ठेवले तेव्हा कोणालाही कायम सुख किंवा कायम दु:ख अशी अवस्था उपयोगी नाही. म्हणूनच निसर्गाने सुख-दुःखाचे चक्र निर्माण केले आहे आणि ते योग्यच आहे.
सुखामागून दुःख आणि दुःखापासून सुख हे पाहिजेच!