Maharashtra Board SSC Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers Solutions Pdf Download.
Maharashtra Board Class 10 Marathi Model Paper Set 5 with Answers
Time: 3 Hours
Total Marks: 80
कृतिपत्रिकेसाठी सूचना:-
(1) सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
(2) आकृत्या पेननेच काढाव्यात.
(3) उपयोजित लेखनातील कृतींसाठी (सूचना, निवेदन), आकृतीची आवश्यकता नाही. तसेच, या कृती लिहून घेऊ नयेत.
(4) विभाग 5 – उपयोजित लेखन प्र. 5 (अ) (2) सारांशलेखन या घटकासाठी गदय विभागातील प्र. 1 (इ) अपठित उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहावयाचा आहे.
(5) स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे.
विभाग 1 : गदय
पठित गदय
प्रश्न 1.
(अ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. i. आकृती पूर्ण करा. (1)
![]()
ii. चौकटी पूर्ण करा. (1)

| ‘सॉरी, यू हॅव ‘डर्टीएस्ट फूटप्रिन्ट्स परफेक्ट ब्लॅक फूटप्रिन्ट्स’ पावडेकाकांचा चेहरा एकदम पडला. “काय नाटक आहे हे? असल्या व्हर्चुअल गोष्टी नका सांगू मला “, पावडेकाका रागाने म्हणाले. सुमितनं त्यांच्या नाराज चेहऱ्याकडं पाहिलं आणि तो समजावणीच्या सुरात म्हणाला, “माफ करा, काका, पण ही पावलं व्हर्म्युअल नाहीत, उलटपक्षी ती अधिक खरीखुरी आहेत. काका, हे ॲप आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो, हे मोजतं. थोडक्यात आपल्या जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिन्ट्स रेखाटतं. त्या आपल्याला उघडचा डोळयांना दिसत नाहीत. आता तुम्ही वीस कि. मी. अंतर तुमच्या कारनं येता, तेव्हा तुम्ही किमान एक लीटर पेट्रोल जाळता म्हणजेच त्याच्या दुपटीहून अधिक कार्बन डाय ऑक्साइड वातावरणात सोडता ”
“काहीतरीच! मला नाही पटत,” काका म्हणाले. |
2. i. एका वाक्यात उत्तर लिहा. (1)
सुमितने तयार केलेले ॲप कोणती गोष्ट मोजते?
ii. कारण लिहा. (1)
रेखामावशीची पावलं इतरांहून अधिक सुंदर, चंदेरी होती; कारण….
3. स्वमत (3)
‘तापाने फणफणलीय आपली धरती ही स्थिती बदलण्यासाठी उपाय सुचवा.
(आ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृत्या पूर्ण करा. (2)
i.

ii.

| वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरे नर वाघ, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूंचा राबता होताच. त्यामुळे तिला ही खबरदारी घेणं आवश्यकच होतं. वाघांच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो. त्यामुळं वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजून वर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडं झेपावली होती. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बांबूमधून मला वाघीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घे होती; पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. त्यांतील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली; पण तिथून घसरल्यानं ते धपकन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीनं मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली; पण पिल्लांना त्याच्याशी काहीच देणं-घेणं नव्हतं. त्यांचा आईच्याभोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला. साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही पाच महिन्यांची पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात, तशीच ही खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. |
2. i. कारण शोधा व लिहा. (1)
वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती. कारण…
ii. खालील घटनेचे / कृतीचे परिणाम लिहा. (1)
पिल्लू पाण्यात पडल्याने वाघिणीच्या तोंडावर पाणी उडाले.
3. स्वमत (3)
वाघीण आणि तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग शब्दबद्ध करा.
अपठित गदय
(इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृती पूर्ण करा. (2)

| भारतात आढळणाऱ्या विविध प्रकारच्या सुंदर, सुगंधी फुलांपैकी कमळाच्या फुलाला भारताचे राष्ट्रीय फूल म्हणून ओळखले जाते. या फुलाला हे स्थान प्राप्त होण्यामागे अनेक कारणे आहेत. कमळ म्हणजे पावित्र्याचे दर्शन घडवणारे, सौंदर्याची मुक्त उधळण करणारे, शुभाचे, शालीनतेचे, ज्ञानाचे व शांतीचे एक प्रतीक होय. या कमळाच्या असंख्य पाकळ्यांतून एकात्मतेचे दर्शन घडून येते. या सर्व गुणवैशिष्ट्यांमुळे संविधानात कमळाला राष्ट्रीय फुलाचा दर्जा देण्यात आला आहे. चिखलात जन्मणाऱ्या कमळाची पाने पाण्यावर तरंगत असूनही पाण्याचा एक थेंबही त्याच्या पानांवर टिकत नाही. जणू ती पाने मानवाला मोहांनी भरलेल्या दुनियेत राहूनही मोहांपासून दूर राहण्याचा सुरेख संदेश देत असतात. जीवन जगण्याकरिता या फुलाकडून मिळणारा हा सल्ला मोलाचा ठरतो. |
2. i. चौकटी पूर्ण करा. (1)

ii. एका वाक्यात उत्तर लिहा. (1)
कमळाची पाने मानवाला कोणता संदेश देतात?
उत्तर:
(अ)
पठित गदय
1.

2. i. सुमितने तयार केलेले ॲप आपण दैनंदिन व्यवहारात किती कार्बन वातावरणात सोडतो, हे मोजते.
ii. रेखामावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वाव नव्हता.
3. थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीप्रमाणे आपण प्रत्येकाने केलेल्या थोड्या-थोड्या प्रदूषणाचा आ भस्मासूर झाला आहे. यामुळे, ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण वाढले आहे. ही स्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. मागचा पुढचा विचार न करता केली जाणारी जंगलतोड प्रथमतः थांबवली पाहिजे. विषारी धूर, रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर नियम लावले पाहिजेत. मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या खाजगी वाहनांची संख्या कमी केली पाहिजे. याव्यतिरिक्त, वातानुकूलित यंत्र (एसी), शीतकपाट (फ्रीज), परफ्युम्स इत्यादी रासायनिक वायू निर्माण करणाऱ्या साधनांचा वापर कमी केला पाहिजे. अशाप्रकारे, आपण ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण कमी करू शकतो. प्रत्येकाने किमान एक झाड लावून, त्याची नीट काळजी घेतली पाहिजे. तरच ही भयानक परिस्थिती टाळता येईल
(आ)
1.

2. i. जंगलात इतर नरवाघ, बिबळा, रानकुत्री या प्राण्यांचा राबता असतो. हे सर्व प्राणी वाघिणीच्या पिल्लांचे संभाव्य शत्रू असल्यामुळे तिची पिल्लं या भक्षकांच्या शिकारीला बळी पडण्याची शक्यता होती.
ii. रात्रभराच्या वाटचालीने थकलेल्या, विश्रांतीसाठी बसलेल्या वाघिणीने मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली.
3. मुलांपासून दूर गेलेली आई परत आल्यानंतर आई व मुले दोघांनाही खूप आनंद होतो. ह्या पाठातील वाघीण आपल्या पिल्लांना सुरक्षित जागी सोडून रात्री शिकारीला गेलेली होती. सकाळी पिल्लांजवळ परत येताच तिने त्यांना हाक मारली. आईची हाक कानावर पडल्यामुळे पिल्लांना खूप आनंद झाला. लपून बसलेली ती पिल्ले खेळकरपणे पटापट आईकडे झेपावली, तिच्या अंगावरही उड्या मारू लागली. एक पिल्लू तिच्या पाठीवर उडी मारताना घसरून धपकन पाण्यात पडलं; पण आपण पडलोय याचंही त्याला भान नव्हतं. आपली आई खूप थकून आलीय आणि तिला विश्रांतीची गरज आहे याचंही त्यांना भान नव्हतं. थकल्या – भागलेल्या वाघिणीला खरंतर या गोंधळाचा त्रास होत होता; पण ती त्यांच्यावर फारशी रागावली नाही. कदाचित तिलाही त्यांच्या आनंदामुळे जणू सुखच मिळत असावं. आई व मुलांच्या भेटीचा हा प्रसंग मनाला भिडणारा आहे.
अपठित गदय
(इ)
1.

2. i.
![]()
ii. कमळाची पाने मानवाला मोहांनी भरलेल्या दुनियेत राहूनही मोहांपासून दूर राहण्याचा संदेश देतात.
![]()
विभाग 2 – पदय
प्रश्न 2.
(अ) कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
1. चौकटी पूर्ण करा. (2)

| जेवी चंद्रकिरण चकोरांसी पांवा जेवीं पिलियांसी। जीवन जैसे कां जीवांसी। तेवीं सर्वांसी मृदुत्व।। जळ वरिवरी क्षाळी मळ। योगिया सबा करी निर्मळ।। उदक सुखी करी एक वेळ। योगी सर्वकाळ सुखदाता।। उदकाचे सुख ते किती सर्वच क्षणे तृषितें होती। योगिया दे स्वानंदतृप्ती। सुखासी विकृती पैं नाही।। उदकाची जे मधुरता। ते रसनेसीचि तत्त्वतां। योगियांचे गोडपण पाहतां होय निययिता सर्वेद्रियां।। मेघमुखें अध: पतन। उदकाचें देखोनि जाण।। अधःपातें निवती जन। अन्नदान सकळांसी।। तैसे योगियासी खालुतें येणें। जे इहलोकीं जन्म पावणें। जन निववी श्रवणकीर्तनें निजज्ञानें उद्धरी।। |
2. i. योग्य पर्याय निवडा.
पाणी बाह्यांग स्वच्छ करते; पण योगीपुरुष __________
अ. काहीजणांशी मृदुत्वाने वागतो.
ब. तात्पुरता आनंद मिळवून देतो.
क. सबाह्य निर्मळ करतो.
ड. एकटाच स्वानंदात रममाण असतो.
ii. खालील आकृती पूर्ण करा. (1)

3. खालील शब्दांचे अर्थ लिहा. (2)
i. तृषित
ii. उदक
iii. सबाह्य
iv. क्षाळणे
4. तैसे योगियासी खालुतें येणें जे इहलोकी जन्म पावणें।
जन निववी श्रवणकीर्तनें निजज्ञानें उद्धरी।। या ओळींतील आशय स्पष्ट करा. (2)
(आ) खालील दोन कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.
‘दोन दिवस’
किंवा
‘ओक्षण’
1. प्रस्तुत कवितेच्या कवीचे/कवयित्रीचे नाव लिहा. (1)
2. प्रस्तुत कवितेचा विषय लिहा. (1)
3. ‘शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.’ या ओळींचा सरळ अर्थ लिहा.
किंवा
‘जीव ओवाळावा तरी
जीव किती हा लहान;
तुझ्या शौर्यगाथेपुढे
त्याची केवढीशी शान;’ या ओळींचा सरळ अर्थ लिहा. (2)
4. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश थोडक्यात लिहा. (2)
5. प्रस्तुत कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. (2)
उत्तर:
(अ) 1. i.

2. i. पाणी बाह्यांग स्वच्छ करते; पण योगीपुरुष सबाह्य निर्मळ करतो.
ii.

3. i. तहानलेला
ii. पाणी
iii. आतून व बाहेरून
iv. धुणे
4. ‘योगी सर्वकाळ सुखदाता’ ही एकनाथी भागवतातील संत एकनाथांची रचना योगीपुरुषाची लक्षणे स्पष्ट करते. यात योगीपुरुष व पाण्याची तुलना केली असून योगीपुरुषाचे गुण हे पाण्याच्या गुणांपेक्षाही श्रेष्ठ आहेत, हे विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे.
पाणी हे ढगांतून खाली पडते. त्यामुळे, सर्व लोक सुखावतात. त्याप्रमाणेच, योगीपुरुषाचे इहलोकात (पृथ्वीलोकात) जन्म घेणे हे लोकांना श्रवणकीर्तनातून आत्मज्ञान करून देण्यासाठी व त्यांचा उद्धार करण्यासाठीच असते असा आशय वरील काव्यपंक्तींतून व्यक्त केला आहे
(आ)
कविता – दोन दिवस
1. कवी – नारायण सुर्वे
2. ‘कष्टकऱ्याच्या जीवनाचे वास्तव व त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन रेखाटणे’ हा या कवितेचा विषय आहे.
3. आभाळात शेकडो वेळा चंद्र उगवला, तारे उमलले आणि सुखमयी, धुंदावणाऱ्या रात्री आल्या; पण रोजची भूक भागवण्यासाठी खाव्या लागणाऱ्या खस्ता, कराव्या लागणाऱ्या मेहनतीतच माझे सारे आयुष्य निघून गेले.
4. प्रस्तुत कवितेत खूप कष्ट सोसूनही जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या कामगाराच्या जीवनाचे यथार्थ वर्णन कवीने केले आहे. या कष्टकऱ्याप्रमाणेच आपणही जीवनात येणारे दु:ख, अडचणी, संकटे पचवण्याची हिंमत बाळगायला हवी. त्यांचा बाऊ करू नये. त्यातूनही वाट काढत आयुष्य नव्याने जगायला शिकायला हवे असा प्रेरणादायी व सकारात्मक संदेश या कवितेतून मिळतो.
5. ‘दोन दिवस’ या कवितेत कवी नारायण सुर्वे यांनी मांडलेले कामगारांचे भावविश्व जीवनाचे एक वेगळेच रूप दाखवते. अडी-अडचणींच्या काळातही जीवनाकडे पाहण्याचा आशादायी व सकारात्मक दृष्टिकोन देते. कवीने साध्यासोप्या भाषेत जगण्याचे तत्त्वज्ञान आपल्यासमोर मांडले आहे. ही गढ्यासारखी भासणारी निवेदनात्मक लेखनशैली मला फार आवडली. भाकरीचा चंद्र, माना उंचावलेले किंवा कलम झालेले हात अशा सुंदर कल्पना मला फार आवडल्या. जीवनाचे धगधगीत वास्तव रेखाटतानाही कामगाराचे जीवन जगण्यावरील प्रेम कायम आहे ते प्रेम टिपणारी ही कविता मला फार आवडते.
किंवा
कविता – औक्षण
1. कवयित्री – इंदिरा संत
2. ‘सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाविषयी सान्या देशवासियांच्या मनात दाटून येणाऱ्या विविध भावभावनांचे चित्रण करणे’ हा या कवितेचा विषय आहे.
3. तुझ्यावरून जीव ओवाळून टाकावा अशी मनाशी इच्छा असली तरी माझा जीव किती लहान आहे! क्षुद्र आहे! तुझ्या शौर्याच्या पराक्रमांच्या महानतेपुढे माझ्या जीवाची तुलनाच होऊ शकत नाही.
4. प्रस्तुत कवितेत कवयित्री इंदिरा संत सीमेवर लढायला जाणाऱ्या जवानाला सान्या देशवासियांकडून जणू औक्षण करत आहेत. कठीण परिस्थितीतही जिद्दीने पुढे जाणाऱ्या, देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकाबद्दल त्या आदर व कृतज्ञता व्यक्त करत आहेत. हीच कृतज्ञतेची भावना आपणही आपल्या मनात बाळगावी असा संदेश या कवितेतून मिळतो.
5. कमीत कमी शब्दांत कवयित्री सैनिकांप्रतिच्या उत्कट भावना सहजपणे आपल्यापर्यंत पोहोचवते. युद्धभूमीवरील चित्र आपल्या डोळ्यांसमोर जिवंतपणे साकार करते. साधी, सोपी भाषा वापरल्यामुळे कवितेचे सहजपणे आकलन होते. सर्व देशवासियांची प्रतिनिधी बनून सैनिकाचे औक्षण करण्याची कवयित्रीची कल्पनादेखील सुंदर आहे. तसेच, डोळ्यांना निरांजनाची, तर अश्रूंना निरांजनातील ज्योतीची दिलेली उपमा मनाला भावते. यमक, अनुप्रास अलंकारांचा सुयोग्य वापर केल्यामुळे कविता लगेच तोंडपाठ होते. या सर्व गोष्टींमुळे मला ही कविता खूपच आवडते.
![]()
विभाग 3 – स्थूलवाचन
प्रश्न 3.
खालीलपैकी कोणात्याही दोन कृती सोडवा.
i. ‘मोठे होत असलेल्या मुलांनो’ या पाठाआधारे बार्क या संस्थेवर टीप लिहा.
ii. सूर्यास्ताच्या दर्शनाने मनात निर्माण होणाऱ्या मानवी भावभावना शब्दबद्ध करा.
iii. खालील मुद्दयांच्या आधारे व्युत्पत्ती कोशावर टीप लिहा.

उत्तर:
i. ‘बार्क’ हे ‘भाभा ॲपॉमिक रिसर्च सेंटर’ म्हणजेच ‘भाभा अणुसंशोधन केंद्र’ या संस्थेच्या नावाचे लघुरूप आहे. ही अणुसंशोधन क्षेत्रात काम करणारी एक प्रचंड मोठी संस्था आहे. डॉ. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, म्हणून या संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. लेखक डॉ. अनिल काकोडकर कॉलेजचे शिक्षण झाल्यानंतर या संस्थेच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी दाखल झाले. तेथे असताना त्यांना डॉ. होमी भाभा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हे प्रशिक्षण संपल्यावर लेखक बार्कमध्ये इंजिनिअर म्हणून रुजू झाले.
ii. सूर्य अस्ताला जाऊ लागला, की कवीमन कविता करू लागते, तर चित्रकाराचा कुंचला अलगद रंगांची उधळण करू लागतो. सूर्यास्ताच्या वेळचे निसर्गाचे ते रमणीय दृश्य पाहताना मन विचारांनी, आठवणींनी भरून येते. सूर्यास्तासमयी आकाशात दिसणारे रंग डोळ्यांना सुखावणारे असतात.
सूर्योदय सूर्यास्त जणू मनुष्याच्या जन्म-मृत्यूचे प्रतीक आहेत. मनुष्याचा जन्म म्हणजे सूर्योदय, ऐन तारुण्याचा काळ म्हणजे दिवस आणि म्हातारपण (वार्धक्य) म्हणजे जणू आयुष्याची संध्याकाळ होय. सूर्यास्ताची वेळ मनाला शांतता व समाधानाचा अनुभव देत असते. असा अनुभव माणसाला त्याच्या उतारवयात येत असतो. ऐन तारुण्याचा, उमेदीचा काळ चांगल्या मार्गाने जगल्यास आयुष्याचा शेवटही शांत, समाधानकारक होतो, हेच जणू हा सूर्यास्त आपल्याला सांगत असतो.
दिवसभर कष्ट करणाया कष्टकऱ्यांसाठी सूर्यास्त विश्रांती घेऊन येतो. आजचा दिवस संपल्याची जाणीव करून देणारा हा क्षण मनात नव्या दिवसाची ओढही जागवतो. गेलेला दिवस भूतकाळात जमा होणार असतो व येणारा दिवस उज्ज्वल भविष्यकाळ घेऊन येत असतो. काहीवेळा अपूर्ण राहिलेले पूर्ण करण्याची आशा मनात निर्माण करून, तर काही वेळा पूर्ण केलेल्या कामांचे समाधान चेहऱ्यावर उमटवून सूर्यास्त आपले विविध रंग आकाशात उधळत असतो. देवळात होणारा घंटानाद, आरतीचे सूर, देव्हाऱ्यातील दिव्याचा मंद प्रकाश सूर्यास्ताचे सौंदर्य वाढवतात. सूर्यास्ताच्या वेळी प्रत्येकाच्या मनात असलेल्या श्रद्धास्थानाप्रति हात जोडले जातात.
iii. 1938 साली मुंबई येथे स्वा. सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ पार पडले. यात ‘व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव मंजूर करण्यात आला. कृ. पां. कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवली गेली. व्युत्पत्ती कोशनिर्मितीसाठी बॅ. मुकुंदराव जयकर यांनी अर्थसाहाय्य केले. श्री. दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी कोशास पुरस्कृत केले. यामुळे, कोशनिर्मितीस मोठी मदत झाली. 1946 साली या कोशाचे पहिले प्रकाशन झाले. यानंतर या कोशाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत.
[टीप : विदयार्थ्यांनी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे.]
![]()
विभाग 4 – भाषाभ्यास
प्रश्न 4.
(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती.
1. खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. (2)
i. चिठ्ठी तूच वाचून दाखव.
ii. वाह! फारच सुंदर चित्र आहे हे!
2. कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा. (2)
i. पांढरा रंग कोणाला आवडत नाही? (विधानार्थी करा.)
ii. हा पर्वत खूपच उंच आहे. (उद्गारार्थी करा.)
3. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. (कोणतेही दोन) (4)
i. हातभार लावणे
ii. उपद्व्याप करणे
iii. मूठभर मांस वाढणे
(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती.
1. शब्दसंपली
i. अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा. (1)
पुण्यात मला पुस्तकांचा सहवास लाभला.
ii. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. (1)
अ. फायदा ×
ब. शेवट ×
iii. खालील शब्दांचे वचन बदला. (1)
अ. पुस्तक
ब. भाकरी
iv. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. (1)
तो एक आदर्श विद्यार्थी आहे.
2. लेखननियमांनुसार लेखन
खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा. (2)
i. सर्वांनी मुर्तीला विनर्म अभिवादन केले.
ii. ती वादळापुर्वीची शान्तता होती.
3. विरामचिन्हे
खालील वाक्यांत योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करून वाक्ये पुन्हा लिहा. (2)
i. वा तुझी चित्रकला खूपच सुधारली आहे.
ii. मी खूप वाट पाहिली पण दादा आलाच नाही.
उत्तर:
(अ)
1. i. आज्ञार्थी वाक्य
ii. उद्गारार्थी वाक्य
2. i. पांढरा रंग सर्वांनाच आवडतो.
ii. किती उंच पर्वत आहे हा!
3. i. हातभर लावणे – मदत करणे.
वाक्य : शाळा सुटताच वैभव भाजी विकण्याचे काम करून आईबाबांना हातभार लावत असे.
ii. उपद्व्याप करणे – नको त्या गोष्टी करणे.
वाक्यः लहानपणी आपण मित्रांसोबत काय उपद्व्याप केले ते आठवून सतीशला हसू आले.
iii. मूठभर मांस वाढणे – स्तुतीने हुरळून जाणे.
वाक्यः परीक्षकांनी क्षमाच्या गाण्याची तारीफ करताच तिच्या अंगावर मूठभर मांस वाढले.
[टीपः विदयार्थ्यांनी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करणे अपेक्षित आहे.]
(आ)
1. i. पुण्यात मला पुस्तकांची सोबत लाभली.
ii. अ. फायदा × तोटा
ब. शेवट × सुरुवात
iii. अ. पुस्तके
ब. भाकऱ्या
iv. ती एक आदर्श विद्यार्थिनी आहे.
2. i. सर्वांनी मूर्तीला विनम्र अभिवादन केले.
ii. ती वादळापूर्वीची शांतता होती.
3. i. वा! तुझी चित्रकला खूपच सुधारली आहे.
ii. मी खूप वाट पाहिली; पण दादा आलाच नाही.
![]()
विभाग 5 – उपयोजित लेखन
प्रश्न 5.
(अ) खालील कृती सोडवा.
1. पत्रलेखन (6)
खालील जाहिरात वाचा व दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

किंवा
सारांशलेखन
विभाग 1 गदय (इ) (प्र. क्र. 1 इ) मधील अपठित उताऱ्याचा एक तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. (10)
1. जाहिरातलेखन (शब्दमर्यादा 50 ते 60 शब्द)
डेअरीची जाहिरात तयार करा.
2. बातमीलेखन (शब्दमर्यादा 50 ते 60 शब्द)
खालील विषयावर बातमी तयार करा.
रेल्वे प्रवासात प्रवासी नागरिकांजवळ स्वओळखपत्र असणे अनिवार्य.
(आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड यांपैकी कोणतेही एक.)
3. कथालेखन (शब्दमर्यादा 80 ते 90 शब्द)
खाली एका कथेचा शेवट दिला आहे. त्याआधारे पूर्ण कथा लिहा.
(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची आवश्यकता नाही.)
…………. आवाजाच्या दिशेने जाताच गोविंद मेंढपाळाला ढोलीत अडकलेला लांडगा दिसला. झाला प्रकार त्याच्या लक्षात आला. मग काय ….. गोविंदने सोटा आणून लांडग्याला चांगलेच बदडले. तो तेथून निघून गेला. अख्खी मेंढी फस्त केल्यामुळे फुगलेले लांडग्याचे पोट दोन दिवसांनी कमी झाले व त्याला ढोलीतून बाहेर येता आले. तो धूम ठोकून जंगलात पळाला. हावरटपणाची त्याला चांगलीच अद्दल घडली होती. तो पुन्हा कधीच गावाच्या आसपासही फिरकला नाही.
(इ) लेखनकौशल्य (8)
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. (शब्दमर्यादा 100 ते 120 शब्द)
1. प्रसंगलेखन
खालील ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात, असे समजून ‘मी पाहिलेला क्रिकेटचा सामना’ या विषयावर प्रसंगलेखन करा.

2. आत्मकथन
खालील मुद्दयांच्या आधारे क्रीडांगणाचे आत्मकथन लिहा.

3. वैचारिक लेखन
‘आंतरजाल: गरज की व्यसन?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे लेखन करा.
आंतरजाल : गरज की व्यसन उपयोग दुष्परिणाम उपाययोजना निष्कर्ष

उत्तर:
(अ)
1. औपचारिक पत्र (मागणी)
दिनांक 28 सप्टेंबर 2023.
प्रति,
माननीय श्री. सतीश वैदय,
व्यवस्थापक,
‘सोबती’ पर्यावरण संस्था,
हिंदवी सभागृह, बापट मार्ग,
गोवंडी (पूर्व)- XOXXXXx
विषय: इको फ्रेन्डली साधनांची मागणी करण्याबाबत.
माननीय महोदय,
मी अ.ब.क. ‘विदयामंदिर’ शाळेचा विदयार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणांस पत्र लिहीत आहे. आपल्या ‘सोबती’ या पर्यावरण संस्थेने इको फ्रेन्डली साधनांचे प्रदर्शन भरवले असल्याची बातमी वाचली. आमच्या शाळेत संस्कार शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी आम्हांला आपल्याकडून या इको फ्रेन्डली साधनांची मागणी करायची आहे. त्यांची यादी येथे देत आहे.
| साधने | एकूण नग |
| i. केळीच्या सोप्यापासून तयार केलेली ताटे | 1000 |
| ii. केळीच्या सोप्यापासून तयार केलेल्या वाट्या | 1000 |
| iii. केळीच्या सोप्यापासून तयार केलेले चमचे | 500 |
वरील साधने बिलासह लवकरात लवकर शाळेच्या पल्ल्यावर पाठवण्याची आपण व्यवस्था करावी ही विनंती. बिलावरील रकमेचा धनादेश त्वरित आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था आम्ही करू. पर्यावरण संवर्धनाच्या या मोहिमेत आम्ही खारीचा वाटा उचलत आहोत. हे जाणून आपण योग्य ती सवलत दयाल, याचा विश्वास आहे.
कळावे,
आपला विश्वासू
अ. ब. क.
विद्यार्थी प्रतिनिधी,
विद्यामंदिर शाळा,
पी.के. मार्ग,
चेंबूर (पूर्व) – xxxxxx
[email protected]
किंवा
अनौपचारिक पत्र (अभिनंदन)
दिनांक 1 ऑक्टोबर 2023.
तीर्थस्वरूप काकास,
शिरसाष्टांग नमस्कार.
नमस्ते, सतीश काका! कसा आहेस? ‘सोबती’ या तुझ्या संस्थेने आयोजित केलेले ‘इको फ्रेन्डली’ साधनांचं प्रदर्शन पाहून आले. असा पर्यावरण संवर्धनाला हातभार लावणारे स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन!
‘काका, ‘प्लॅस्टिकबंदी’ चा कायदा आला तरीही लोक अधूनमधून सर्रास प्लॅस्टिक वापरतात. बाला उत्तम पर्याय म्हणजे ही इको फ्रेन्डली साधने! जर जास्तीत जास्त लोकांनी अशा पर्यावरणपूरक साधनांचा वापर केला, तर प्लॅस्टिकचा कचरा नक्कीच कमी होईल. लोकांना या बाबतीत जागरूक करणे व ही पर्यायी साधने त्यांना उपलब्ध करून देणे हे अत्यंत महत्त्वाचे काम तू करत आहेस. मला अभिमान वाटतो तुझा!
अशा प्रकारची अधिकाधिक प्रदर्शने तू भरवावीस, अशी कळकळीची विनंती आहे. प्रदर्शन भरवण्याआधी तू मला तारखा कळवशील का? जेणेकरून मी मोबाइलद्वारे वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर या प्रदर्शनाची माहिती टाकेन. तुझ्या या स्तुत्य उपक्रमांना नेहमी यश मिळावे, ही देवाचरणी प्रार्थना! पुन्हा एकदा तुझे खूप खूप अभिनंदन!
घरी सर्व कसे आहेत? तब्येतीला जप. अधूनमधून पत्र लिहीत जा, असा निरोप दिला आहे आईने.
कळावे,
तुझा लाडका,
अ. ब. क.
5. सुखदर्शन,
फडके रोड,
चेंबूर (पश्चिम) – xxxxxx
[email protected]
किंवा
2. सारांश
भारतीय संविधानाने कमळाला राष्ट्रीय फूल घोषित केले आहे. कमळ हे शुभाचे पावित्र्याचे, सौंदर्याचे, शालीनतेचे, ज्ञानाचे, शांतीचे चिन्ह मानले जाते. या फुलाची पाने मानवाला जीवन जगताना या जगातील आकर्षणांना न भुलण्याचा संदेश देतात. या गुणवैशिष्ट्यांमुळेच त्याला राष्ट्रीय फुलाचा दर्जा मिळाला आहे.
[टीप : विद्यार्थ्यांनी कोणतीही एक कृती सोडवणे अपेक्षित आहे.]
(आ)
1.

2.
| जनसत्ता |
|
रेल्वे प्रवास होणार अधिक सुरक्षित! दि. २० जानेवारी २०२३ |
3. अति हाव संकटात नेई
रामपूर नावाचे एक गाव होते. गावापासून काही अंतरावर गोविंद नावाचा एक मेंढपाळ राहत होता. मेंढ्या पाळून त्यावर तो आपला उदरनिर्वाह चालवत असे. त्यामुळे, त्याचं त्याच्या मेंढ्यांवर अतोनात प्रेम होतं; मात्र अचानक गोविंदची लहान कोकरं एक एक करत गायब होऊ लागली. कोणी लांडगा आपली कोकरं चोरत आहे हे गोविंदच्या लक्षात आलं. त्याने सावध राहायचं ठरवलं; पण खूप प्रयत्न करूनही लांडगा काही हाती आला नाही; गोविंद चिंतेत पडला. पंधरा दिवसांत त्याची चार कोकरं गायब झाली होती. इकडे या लांडग्याची हाव आता आणखी वाढली होती. एकदा त्याने मोठ्या मेंढीलाच आपले भक्ष्य बनवले. तो तिला खेचत नेत असताना त्या आवाजाने गोविंदला जाग आली. तो तात्काळ काठी घेऊन धावला. एवढी मोठी मेंढी खेचून पळताना लांडगा थकला. त्याने एक युक्ती वापरली.
शेजारी असलेल्या एका झाडात त्याला एक ढोली दिसली. लांडग्याने मेंढीला घेऊन त्या ढोलीत प्रवेश केला व तो त्यात लपून बसला. गोविंदच्या हातून निसटल्याने त्याने सुटकेचा निःश्वास सोडला. लांडगा न सापडल्यामुळे गोविंदही हताश होऊन परतला. मग लांडग्याने ढोलीत बसूनच मेंढीवर ताव मारला. मेंढी मोठी असल्याने त्याला ती संपेना! त्याच्या पोटात आता जागा उरली नव्हती; मात्र तरीही त्या हावरट लांडग्याने सगळी मेंढी फस्त केली. खाणे पूर्ण झाल्यावर त्याने हळूच कानोसा घेतला. आजूबाजूला कोणी नाही याची जाणीव होताच तो ढोलीतून बाहेर पडू लागला; पण……. हे काय ? लांडग्याला बाहेर पडताच येईना! बिचारा जोर लावू लागला; पण फुगलेल्या पोटामुळे तो ढोलीत अडकून बसला होता. काही केल्या त्याला बाहेर येता येईना. रात्रभर तो त्यातच अडकून होता. सकाळ होताच गोविंद बाहेर पडला. त्याला लांडग्याच्या कण्हण्याचा आवाज येऊ लागला……..
तात्पर्य : अति हाव करू नये.
(टीप: विदयार्थ्यांनी कोणत्याही दोन कृती सोडवणे अपेक्षित आहे.
(इ)
1. प्रसंगलेखन
मी पाहिलेला क्रिकेटचा सामना
वानखेडे स्टेडिअमची तिकिटे मिळाली त्याचा केवढा आनंद झाला होता आम्हांला! नियोजित वेळी जेव्हा त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा साधारण 32,000 प्रेक्षक मावतील एवढे मोठे प्रेक्षागार पाहून आम्ही थक्क झालो होतो. 2 एप्रिल 2019… भारत विरुद्ध श्रीलंका असा सामना होता. काही वेळातच नाणेफेक होऊन श्रीलंकेच्या सलामीवीरांनी फलंदाजीला सुरुवात केली. 17 व्या चेंडूला त्यांचा पहिला सामनावीर बाद झाला तेव्हा भारतीय प्रेक्षक म्हणून आम्हांला बरे वाटले. 60 व्या चेंडूला त्यांचा दुसरा सलामीवीर वाद झाला तेव्हा प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. युवराज सिंग, सुरेश रैना व विराट कोहली यांनी क्षेत्ररक्षण उत्तम रीतीने सांभाळले. झहीर खानची गोलंदाजी अप्रतिम होती. एका बाजूची श्रीलंकन फलंदाजांची फळी बाद होत असतानाही महेला जयवर्धनेने एक बाजू सावरून धरत 88 चेंडूत नाबाद 103 धावांची सुंदर खेळी केली. अशाप्रकारे, नियोजित 50 षटकांमध्ये श्रीलंकेने भारतासमोर 274 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
मधल्या विश्रांतीच्या काळात आम्ही सोबत आणलेल्या खादयपदार्थाची चव घेतली; पण खरी ओढ लागली होती ती सामना पुन्हा सुरू होण्याची. आता भारतीय संघ मैदानात उतरणार होता. भारताचे दोन महत्त्वाचे सलामीवीर वीरेंद्र सेहवाग व सचिन तेंडुलकर मैदानात उतरले. लसिथ मलिंगाच्या दुसऱ्याच चेंडूवर वीरेंद्र सेहवाग बाद झाला, हे पचवणे अत्यंत धक्कादायक होते. क्रिकेटचा देव सचिन या वेळी मैदानावर होता, त्यामुळे तोच सामन्यात रंगत आणू शकेल यावर विश्वास ठेवून आम्ही प्रेक्षक डोळ्यांत तेल घालून तो सामना पाहू लागलो; पण 14 चेंडूत 18 धावा करून धावचीत झाला; मात्र तरीही सचिनSS सचिनSS असा जल्लोष वातावरणात घुमत राहिला. त्यानंतर गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज यांनी मग खेळ सावरला. शेवटच्या क्षणी तर ताण अगदी वाढला होता. एक चेंडू शिल्लक होता. अजून चार धावांची गरज होती. सर्वांचे श्वास रोखले गेले, डोळे गोलंदाजाच्या चेंडूवर खिळले होते. तो चेंडू फेकला आणि.. धोनीने बॅट चेंडूला लगावली आणि पाहतो तो काय, षट्कार!
सर्वांनी एकच जल्लोष केला! अख्खे स्टेडिअम आनंदाने नाचू लागले. आकाशात धडाधड फटाके फुटू लागले. सर्व खेळाडूंनी एकत्र रिंगण केले, विजयोत्सव साजरा केला. भारताचा तिरंगा फडकावून सर्व स्टेडिअमभर फिरले, तेव्हा तर डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. अशा अटीतटीच्या सामन्याचा थरार प्रत्यक्ष अनुभवणं हा प्रसंग खूपच अविस्मरणीय होता.
किंवा
2. आत्मकथन
मी क्रीडांगण बोलत आहे…
“काय दोस्ता, आलास ? परीक्षा संपली वाटतं ? अरे, मी तुमचं आवडतं क्रीडांगण. तुम्ही सर्व आलात की कसं बरं वाटतं! त्यानिमित्ताने का होईना, माझ्यावर टाकलेले दगडधोंडे, कचरा दूर केला जातो. असं साफसूफ झाल्यावर मला ताजंतवानं व्हायला होतं. तुमच्या क्रिकेट, फुटबॉल, लंगडी, खो-खो, पंजाबी साखळ्या, लपंडाव अशा खेळांनी मला जिवंत झाल्यासारखं वाटतं. तुमचे हे खेळाचे, लुटुपुटुच्या भांडणाचे, रडीचे, चिडीचे डाव पाहत असताना मी रमून जातो. तुमच्या किलबिलाटाने, दंगामस्तीने गजबजून जातो. किती उत्साहाने बागडत असता तुम्ही माझ्यावर! सकाळची कोवळी उन्हे घेण्यासाठी, दुपारी जेवल्यानंतर शतपावली करण्यासाठी, संध्याकाळी मित्रमैत्रिणींसोबत खेळण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, रात्री फेरफटका मारण्यासाठी जेव्हा तुम्ही माझ्याजवळ येता तेव्हा मला खूप आनंद होतो.
आज तर मुलांचं खेळाकडे दुर्लक्षच झालं आहे. मैदानी खेळ खेळण्यापेक्षा त्यांना मोबाइल, संगणकामधील यांत्रिक खेळ खेळण्यात अधिक स्वारस्य वाटत आहे. पैसे खर्च करून बैठे खेळ खेळले जात आहेत. शिवाय, माझ्यापेक्षा टिव्हीचा वाढता प्रभाव आहेच. यामुळे, लहान वयातच लठ्ठपणा, मानदुखी, डोळ्यांच्या विकारांना आयतं आमंत्रण मिळालं आहे. शिवाय, आमच्यावर अतिक्रमणं करून टोलेजंग इमारती, दुकाने, मॉल्स बांधले जात असल्याने आमची संख्याही कमी झाली आहे. तुम्हांला आमचं महत्त्व कळत नाही याची फार खंत वाटते.
माझ्या बालदोस्तांनो, संध्याकाळी दिवा लागल्यावर शुभंकरोती म्हणताना ‘आरोग्यम् धनसंपदा’ म्हणता ना, मग निरोगी आरोग्य लाभण्यासाठी खेळ खेळण्याची अत्यंत गरज आहे. त्यामुळे, तुमचे रक्ताभिसरण सुरळीत चालते. तुम्ही तंदुरुस्त, ताजेतवाने, उत्साही राहता; शिवाय तुमच्यात खिलाडूवृत्ती निर्माण होते. उत्तम क्रीडापटू घडण्याची प्रक्रिया माझ्यापासूनच सुरू होते. म्हणून, आंतरराष्ट्रीय स्पर्धांत विविध खेळांत भारताचे प्रतिनिधित्व करणारे क्रीडापटू घडवण्यासाठी माझी गरज लागणारच आहे.
जर तुम्ही खेळलात, तर मी टिकून राहीन. तुम्ही खेळलाच नाहीत, तर मग माझी आवश्यकताच उरणार नाही. माझे अस्तित्वच नष्ट होईल. मग तुमच्या पुढील पिढीला माझा अवतार फक्त चित्रांतच पाहायला मिळेल. अथवा खेळाडूंपुरतेच माझे अस्तित्व मर्यादित राहील. म्हणून सांगतो, रोज खूप खेळा… माझ्याजवळ या… या चिमण्यांनो परत फिरा… याल ना?”
किंवा
3. वैचारिक लेखन
आंतरजाल : गरज की व्यसन?
आज आपण एकविसाव्या शतकात म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत. या युगाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आंतरजालाचा वाढता वापर. आजकाल प्रत्येक क्षेत्रात आंतरजालाचा वापर सहजपणे होताना दिसतो.
वस्तू खरेदी करण्यासाठी आता आंतरजालाचा वापर केला जातो आणि ऑनलाईन शॉपिंगद्वारे ती वस्तू आपल्या दारात हजर होते. बँकेचे व्यवहार, विविध प्रकारची देवके (बिल्स) भरणे, कर भरणे, रेल्वे, विमान प्रवासांची तिकिटे काढणे असे कोणतेही कार्य आंतरजालाच्या मदतीने चुटकीसरशी करता येते. संदेशवहनासाठी पत्र, तार अशा माध्यमांऐवजी आता विविध समाजमाध्यमे तर वृत्तपत्रवाचनासाठी बातम्या देणारी विविध अॅप्स वापरली जातात. जगाच्या कानाकोपऱ्यांत कोणाशीही क्षणार्धात संपर्क साधता येतो, एक वटण दाबताच माहितीचे भांडार आपल्यासमोर खुले होते, हीसुद्धा आंतरजालाचीच किमया आहे. त्यामुळे, आंतरजाल ही आजच्या काळाची ‘गरज’ बनली आहे.
पण, आंतरजाल ही जरी आपली गरज असली तरी आजकाल ते एक व्यसन बनू पाहत आहे, ही गोष्ट दुर्लक्षून चालणार नाही. सतत सेल्फी काढून ते समाजमाध्यमांवर प्रदर्शित करणे, तासन्तास मोबाइल हातात घेऊन त्यामधील आभासी विश्वात रमणे, जीवावर बेतणाऱ्या ब्लू व्हेलसारख्या गेम्सच्या आहारी जाणे, आभासी युद्ध, गाड्यांच्या शर्यती (त्यात घडवून आणलेले अपघात) असे व्हिडिओ गेम्स खेळणे, अयोग्य व्हिडिओ पाहणे ही आंतरजालाच्या गैरवापराची काही उदाहरणे आहेत.
आंतरजालाच्या मदतीने माहिती पुरवणान्या अत्याधुनिक यंत्र – उपकरणांशी अतिसंपर्क व अनावश्यक वापर यांमुळे सामाजिक आरोग्यही धोक्यात येते; कारण तासन्तास आंतरजालाचा वापर करणाऱ्या व्यक्तींना सभोवतालचे काही भान राहत नाही. मोबाइलच्या प्रारणांमुळे डोकेदुखी, सांधेदुखी, मानदुखी तसेच डोळ्यांचे विकार उद्भवतात. सतत आंतरजाल व संगणकाचा वापर करणाऱ्या व्यक्ती एकलकोंड्या बनतात. त्या समाजातील इतर व्यक्तींशी नीट संवाद साधू शकत नाहीत. त्यांच्यातील संवेदनशीलता कमी होते. फक्त स्वतःचाच विचार करण्याची वृत्ती बळावते.
जे आपण पाहतो, तेच आपण वागतो. त्यामुळे, आंतरजालावर पाहिलेल्या वाईट किंवा चुकीच्या गोष्टींचे संस्कार आपल्या मनावर घडतात. त्याचे आपल्या वृत्तीवर आणि स्वभावावरही नकारात्मक परिणाम घडतात. आंतरजालाच्या अतिवापराने वेळेचा अपव्यय तर होतोच शिवाय एकाग्रता नष्ट होते. आर्थिक नुकसान होते.
वास्तविक, ‘आंतरजाल’ ही मानवाने आपल्या बुद्धिसामर्थ्याच्या वळावर शोधलेला अनमोल उपहार आहे. त्याचा अनेक विधायक कामांकरिता वापर होतो तसाच विघातक कामांकरिताही वापर होतो. म्हणूनच, आंतरजालाचा वापर सकारात्मक कामांकरिता आणि गरजेपुरताच करावा. तासन्तास आपला अनमोल वेळ आंतरजालावर वाया घालवून त्याच्या आहारी जाऊ नये असे मला वाटते.