Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 1 वंद्य ‘वन्दे मातरम्’

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 1 वंद्य ‘वन्दे मातरम्’ Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 1 वंद्य ‘वन्दे मातरम्’

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 1 वंद्य ‘वन्दे मातरम्’ Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
हे गीत विद्यार्थ्यांनी समूहाने तालासुरात मोठ्याने म्हणावे व त्याचा काव्यानंद अनुभवावा.

वंद्य ‘वन्दे मातरम्’ Summary in Marathi

कवितेचा आशय:

राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन ज्या शूर राष्ट्रभक्तांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान दिले, त्या देशभक्तांच्या गौरवाचे हे गीत कवींनी लिहिले आहे. या गीतात कवींनी वीर भारतपुत्रांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

शब्दार्थ:

  1. वंद्य – वंदनीय, आदरणीय.
  2. वन्दे – वंदन करतो.
  3. मातरम् – मातृभूमी,
  4. माउली – आई, (येथे अर्थ) भारतमाता.
  5. मुक्तता – सुटका,
  6. यज्ञ – अग्निकुंड (इथे अर्थ) स्वातंत्र्यसंग्राम.
  7. भारती – भारतात.
  8. जीवित – जीवन, आयुष्य.
  9. आहुती – प्राणार्पण.
  10. सिद्ध – तयार.
  11. मंत्र – श्लोक, सुवचन, घोषवाक्य.
  12. मृतांचे – मेलेल्या शरीराचे, कलेवरांचे,
  13. जागले – (विचारांनी) जागृत झाले.
  14. शस्त्रधारी – हत्यार बाळगणारे,
  15. निष्ठुर – कठोर, क्रूर.
  16. शांतिवादी – शांतता रुजवणारे लोक (भारतीय),
  17. झुंजले – लढले.
  18. शस्त्रहीनां – ज्यांच्या हाती हत्यार नाही असे लोक.
  19. लाभो – मिळो.
  20. निर्मिला – निर्माण केला, तयार केला,
  21. आचरीला – वर्तनात आणला, वागणुकीत आणला.
  22. हुतात्मे – वीरमरण लाभलेले राष्ट्रभक्त.
  23. स्वर्गलोक – देवांचा रहिवास असलेले.
  24. तयांच्या – त्यांच्या.
  25. आरती – प्रार्थना, आळवणी करणारे भजन.

टीप : वेद : प्राचीन काळी ऋषिमुनींनी लिहिलेले जीवनस्तोत्र.

कवितेचा भावार्थ:

राष्ट्रप्रेमाने भारलेल्या व भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या राष्ट्रभक्तांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना कवी म्हणतात – वेदांच्या मंत्रांपेक्षाही ‘वंदे मातरम!’ हा जयघोष आम्हां भारतीयांना वंदनीय आहे, आदरणीय आहे.

(स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये) या भारतवर्षात भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा धगधगता स्वातंत्र्यसंग्राम (यज्ञ) झाला. त्या स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात लाखो वीरांच्या प्राणांची आहती पडली. लाखो देशभक्तांनी बलिदान दिले. त्यांच्या या पवित्र बलिदानाने ‘वन्दे मातरम्!’ हा मंत्र निर्माण केला. सिद्ध केला. ‘वन्दे मातरम्!’ या मंत्राने त्या वेळी मुर्दाड झालेली व स्वाभिमान हरवून बसलेली राष्ट्रीयता जागृत झाली. सारे भारतीय खडबडून जागे झाले, कायम शांतीचा पुरस्कार करणारे भारतीय, संगिनधारी सशस्त्र, क्रूर इंग्रजी जुलमी सत्ताधाऱ्यांशी लढले. त्या झुंजीमध्ये निःशस्त्र असणाऱ्या भारतीयांना ‘वन्दे मातरम्!’ हा एकच महामंत्र शस्त्रासारखा लाभला होता.

स्वातंत्र्यलढ्यामध्ये ज्या देशभक्तांनी ‘वन्दे मातरम्’ हा मंत्र निर्माण केला व तोच वर्तनात आणून परकीय सत्तेशी झुंज दिली. जे राष्ट्रभक्त या रणकुंडात प्राणार्पण करून हुतात्मे झाले ते देव होऊन स्वर्गलोकी गेले. त्यांना देवत्व प्राप्त झाले. त्यांच्या बलिदानाची आरती म्हणजेच हे ‘वन्दे मातरम्!’ गीत आहे. आपण ते गाऊ या.

Leave a Comment