Maharashtra Board SSC Class 10 Marathi Question Paper 2024 with Answers Solutions Pdf Download.
SSC Marathi Question Paper 2024 with Answers Pdf Download Maharashtra Board
Time : 3 Hours
Max. Marks : 80
कृतिपत्रिकेसाठी सूचनाः
(1) सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
(2) आकृत्या पेननेच काढाव्यात.
(3) उपयोजित लेखनातील कृतींसाठी (सूचना, निवेदन) आकृतीची आवश्यकता नाहीं. तसेच या कृती लिहून घेऊ नयेत.
(4) विभाग-5 उपयोजित लेखन प्र. 5 (अ) 2 सारांशलेखन या घटकासाठी गदय, विभागातील प्र. 1 (इ) अपठित उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहावयाचा आहे.
(5) स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे.
विभाग 1 : गदय
प्रश्न 1.
(अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) उपोषणाची बातमी चाळीत जाहीर झाल्यावर कानांवर येणारी वाक्ये लिहा. (2)
(i) ……………………….
(ii) ……………………..
माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी ‘नाही ती भानगड’ आहे, उगीच ‘हात दाखवून अवलक्षण’ आहे, ‘पेललं नाही तेव्हा खाजगी झालं।’ अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली; पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. ‘एकशे एक्क्याऐंशी पौंड.’ रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे, या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाड झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. “घोरत तर असता रात्रभर!” अशासारखी दुरुत्तरे ती. मला करत असे.
“दोन महिन्यांत पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!” अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. सान्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या ‘कॅलरीज’ मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले.
(2) आकृतिबंध पूर्ण करा: (2)
(3) स्वमतः
वजन कमी करण्यासाठी लेखकाने केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.
(आ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) आकृती पूर्ण करा:
अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या रेखामावशी आत आल्या. आल्या आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता. काल त्यांच्याकडे सुमित आला होता कानपूरहून सुमित म्हणजे अभिषेकचा आतेभाऊ तो आय. आय. टी. कानपूरला शिकत होता. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्यानं केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. त्यामुळे रात्री झोपायला दोन वाजले. “काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता?” हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखामावशी फरशी पुसत होत्या; पण मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते. स्वच्छतेची भोक्ती असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. रेखामावशीही बिचाऱ्या वरमल्या होत्या.
“अवो, स्नेहाताई, मी कुठं एसीत बसूनशान काम करत्ये बाई, शेनामातीत काम करावं लागतं आन आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखणलाय. समदी धूळ लागती पायास्नी. आन धा धा मिनटाला हातपाय धोयाला येळ बी नाय आन पानी तरी कुठं हाय बक्कळ?”
“सॉरी, मावशी खरंच सॉरी,” आपण त्यांच्या मळकट पायाबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसंतरी वाटलं.
(2) चौकटी पूर्ण करा: (2)
(3) स्वमत:
‘सर्वांनी आठवड्यातून एकदातरी सायकलचाच वापर करावा’ या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. (3)
अपठित गदय
(इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) आकृतिबंध पूर्ण करा: (2)
मानवी जीवनविकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. शिक्षण मानवाच्या मानसिक बौद्धिक शक्तींचा विकास करते. शिक्षणाशिवाय माणूस पशूसमान होतो. स्त्री आणि पुरुष दोघांनीही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही, तर अर्धा अधिक समाज मागासलेला राहील. आजकाल जगातील पुष्कळशा भागांत आपणांस स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात. परिणामतः पुष्कळ वाईट रीतिभाती आणि अंध श्रद्धा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि त्यांच्या बरोबरीनेच जबाबदारीच्या कामात मदत करीत आहेत.
(2) टीप लिहा: (2)
स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम
उत्तर:
(अ) (1) (i) नाही ती भानगड
(ii) हात दाखवून अवलक्षण
(2)
(3) स्वमत: वजन कमी करण्यासाठी लेखकाने दोरीवरच्या उड्या मारण्यांचा प्रयत्न केला पण तोही फसला. यानंतर लेखकाने आहारशास्त्राची पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. वजन उतरेपर्यंत उपास करण्याची भीष्मप्रतिज्ञा केली. लेखक बिनसाखरेचा, बिनदुधाचा तसेच बिनलहाचा चहा देखील पिऊ लगले. केवळ फळे खाऊ लागले. धारोळा दूध मिळावे म्हणून अधूनमधून अंधेरी येथील गोठ्यात जाऊ लागले. कार्यालयातून पायी चालत घरी येऊ लागले. पोष्टिक आणि सात्त्विक आहार घेऊ लागले. अशा प्रकारे लेखक हर तऱ्हेने वजन कमी करण्यालाठी प्रयत्न करत होते.
(आ)
(3) आपण सगळेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या ग्लोबल वॉर्मिगला हातभार लावत असतो. आपण ज्या वाहनांचा उपयोग करतो ती वाहने कार्बनचे उत्सर्जन करतात. त्यामुळेच पृथ्वीचे तापमान दिवसेदिवस वाढत आहे. पृथ्वीचे तापमान आटोक्यात आणायचे असेल तर आपण सर्वांनी कार्बनचे उत्सर्जन करणारी उपकरणे, वाहने यांचा शक्य असेल तेव्हा कमीत कमी वापर केला पाहिजे. म्हणजेच आठवड्यातून किमान एकदा तरी सायकलचा वापर केल्यास कार्बनचे उत्सर्जन थांबेल आणि पृथ्वीची तापमान वाढ आटोक्यातत येईल.
(इ) (1)
(2) स्त्रीशिक्षणामुळे समाज अधिक सुधारतो, मागासलेला राहत नाही. स्त्रीशिक्षणाने अनेक वाईट रीतीभाती आणि अंधश्रद्धा समाजातून वेगाने नाहीशा होतात. राष्ट्रीय विकासात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकतात. स्त्रियांना शिक्षणापासून वंचित नाही ठेवले तर कुटुंबाची प्रगती वेगाने होते.
विभाग 2 : पद्म
प्रश्न 2.
(अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) एका शब्दात उत्तर लिहा:
(i) कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट
i) कवीचा जवळचा मित्र –
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली; भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली. हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले हरघडी आश्र वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले. दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखात गेले. |
(2) कृती पूर्ण करा:
(i) कवीचा प्रयत्नवाद व आशावाद दाखवणारी ओळ लिहा.
(ii) ‘दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात’ या शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
(3) पुढील शब्दांश अर्थ लिहा:
शब्द | अर्थ |
1. दारिद्र्य | ………………… |
2. हरघडी | ………………… |
3. साहाय्य | ………………… |
4. दुनिया | ………………… |
(4) ‘कवितेत व्यक्त झालेले जीवनसत्य’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
(आ) खालील मुद्दयांना अनुसरून कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा: (2)
उत्तर:
(अ) (1) (i) कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट – हात
(ii) कवीचा जवळचा मित्र – अश्रू
(2) (i) दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, यांच शाळेत शिकलो.
(ii) हतबल झालेले हात.
(3)
शब्द | अर्थ |
1. दारिद्र्य | गरिबी |
2. हरघडी | प्रत्येक वेळी |
3. साहाय्य | मदत |
4. दुनिया | जग |
(4) कवी नारायण सुर्वे यांनी आपल्या ‘दोन दिवस’ या कवितेतून ‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दिवस दुःखात गेले’ असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली’ असे भीषण जीवनसत्य मांडले आहे. कष्टकऱ्याची व्यथा मांडताना ते कवी म्हणतात ‘पोटभर अन्न मिळवण्यातच कष्टकऱ्याचे संपूर्ण जीवन संपत असते.’ अत्यंत कमी वेतनावर ते प्रचंड मेहनतीचे काम कष्टकरी करीत असतात. त्यांना जीवन जगणे खूप कठीण जाते.
(आ)
मुद्दे | ‘अंकिला मी दास तुझा’ ← किंवा → ‘स्वप्न करू साकार’ | |
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री- |
संत नामदेव | किशोर पाठक |
(2) प्रस्तुत कवितेचा विषय – | प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांजी विविध दृष्टान्तांतून परमेश्वरा कृपेची याचना केली आहे. | देशाच्या उम्वल भविष्याची स्वप्ने, एकजुटता व श्रमप्रतिष्ठा रेखाटले आहे. |
(3) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण – |
‘अंकिला मी दास तुझा’ हा अभंग मला फार आवडतो कारण, अभंगाची भाषा साधी सरळ आहे. अत्यंत मोजक्या शब्दांत विविध दृष्टांत देऊन संत नामदेव आपला उत्कट भाव व्यक्त करतात. छोट्या-छोट्या चरणांनी नेमका अर्थ आपल्याला होतो. बिंदूमध्ये सिंधू’ म्हणजेच कमी शब्दांत खूप अर्थ व्यक्त करण्याची शक्ती आहे. हे या अभंगातून दिसून येते. ही संतवाणी वाचनी आणि श्रवणीय असल्याने मला फार आवडते. | ‘स्वप्न करू साकार’ ही कविता मला फार आवडते कारण, कवीने एकात्मता, श्रम आणि एकी या शक्तींचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न या शक्तीवरच टिकून आहे. |
(4) दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ- | जंगलाला आग लगल्यावर हरिणी जसे आपल्या पाडसाची काळजीने सैरभैर होते तसेच विठुरायाने आपली काळजी करावी असे संत नामदेव म्हणतात. | प्रस्तुत ओळींमध्ये आपल्या देशाच्या मातीच्या कणाकणांवर आपला अधिकार असल्याचे नमूद केले आहे. तर दुसन्या ओळीत नवी पिढी आणि नव्या युगाचे स्वप्न साकार करण्याचे आपले कर्तव्य यांची जाणीव कवी करून देतात. |
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ- | (i) माता- आई, जननी (ii) कनवाळू – दयाळू (iii) काज – काम (iv) धेनू – गाय |
(i) विभव ऐश्वर्य, संपत्ती, वैभव (ii) शक्ती – ताकद (iii) विश्व – जग (iv) हस्त – हात |
विभाग 3 : स्थूलवाचन
प्रश्न 3.
खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा: (6)
(i) टीप लिहा डॉ. होमी भाभा.
(ii) पणतीच्या ‘उदाहरणातून ‘जाता अस्ताला’ या कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.
(iii) ‘थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस’ या विधानाची यथार्थता ‘जगणं कॅक्टसचं’ या पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर:
(i) डॉ. होमी भाभा डॉ. होमी भाभा हे विश्वविख्यात भारतीय अनुशस्त्रज्ञ होते. भारतीय अणुसंशोधनाचा पाया यांनी घातला. त्यामुळे भारतीय अणुसंशोधन केंद्राला त्यांचे नाव देण्यात आले आहे. डॉ. होमी भाभा यांचे व्यक्तित्व तरुण शास्त्रज्ञ पिढीला स्फूर्तिदायक होते. आपण काय काम करायचे ते आपणच ठरवावे. बॉसने सांगिणलं तेवढच काम करायचं ही प्रवृत्ती सोडली पाहिजे. हा त्यांचा विचार लेखकाच्या मनात रुजवला डॉ. होमी भाभा भारतीय अणु ऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष आणि अणु ऊर्जा विभागाचे सचिव होते. डॉ. भाभा यांनी भारतीय अंतराळ कार्यक्रमाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली.
(ii) आपल्या अस्तानंतर अंधकारमय होणाऱ्या पृथ्वीच्या काळजीने सूर्य चिंतित झाला आहे. पृथ्वी अंधारात बुडून जाऊ नये म्हणून, तो या सृष्टीतील घटकांना पृथ्वीला मदत करण्यासाठी पुढे येण्याची विनंती करतो. असे असले तरी त्याच्या हाकेला प्रतिसाद देत नाही त्याचवेळी लहानशी पणती मोठ्या धैर्यानि सूर्याांचे कार्य जमेल तितके करण्याची जबाबदारी उचलते. सूर्याइतका प्रकाश ती पणती पृथ्वीला देऊ शक्त नाही याची तिला पूर्ण कल्पना आहे. तरीसुद्धा आपल्या प्राकाशाने शक्य तेवढा अंधार दूर करण्याची तयारी दर्शनीसे सूर्याला मदत करण्याची उदात्त भावना पणतीत दिसून येते. एखाद कार्य हाती घेताना प्रामाणिकपणा प्रबळ इच्छाशक्ती कामी येते. प्रत्येक लहानतल्या लहान वस्तूत आंतरिक शक्ती असते. फक्त त्या शक्तीला ओळखून जग सुंदर बनविण्याची इच्छा बाळगणे गरजेचे आहे, हा विचार पणतीसारख्या छोट्या प्रतीकाच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे.
(iii) वाळवटांत टिकून राहण्यासाठी कॅक्टस या वनस्पतीला निसर्गाने अनोखी वैशिष्ट्ये बहाल केली आहेत. पावसाळचात मिळेल ते पाणी कॅक्टस स्वतः साठवून ठेवतो आणि कोरड्या हंगामात त्याची वाढ हळूहळू होत राहते. या झाडाच्या मुळाची रचना कमी वेळेत जास्त पाणी शोषून घेई अशी असते. खोलवर मुळे पसरवून कॅक्ट्स सभोवतालच्या भागातील पाणी शोषून घेते. याच बरोबर कॅक्टसची अंगरचना पाणी साठवण्या साठी अनुकूल अशी आहे. कॅक्टसचा कमीत-कमी भाग कोरड्या, उष्ण हवेसमोर येतो. त्याची रचना घडीदार असल्याने पाऊस काळात घड्यांचा उपयोग पन्हाळीसारखा होऊन पावसाचे पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचते. बाष्पीभवनापासून वाचण्यासाठी या झाडाला पाने नसतात. या सर्व वैशिष्ट्यांमुळे कॅक्टस हा ‘थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा उत्तम नमुना आहे’ हे विधान यथार्थ वाटते.
विभाग 4 : भाषाभ्यास
प्रश्न 4.
(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:
(1) पुढील वाक्यांचा वाक्यप्रकार ओळखा: (2)
(i) शाब्बास! चांगले काम केलेस तू!
(ii) मुलांनो रांगेत चला.
(2) पुढील वाक्यांचे रूपांतर सूचनेनुसार करा: (2)
(1) ही कल्पना चांगली आहे. (नकारार्थी करा.)
(ii) जगात सर्व सुखी असा कोण आहे? (विधानार्थी करा.)
(3) पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा (कोणतेही दोन): (4)
(i) रममाण होणे
(ii) झोकून देणे
(iii) अंगाचा तिळपापड होणे.
(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:
(1) शब्दसंपत्ती:
(i) समानार्थी शब्द लिहा:
(I) झाड़
(II) घर
(ii) विरुद्धार्थी शब्द लिहा:
(I) प्रामाणिक
(II) सावध
(iii) पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा:
समाजसेवा करणारा
(iv) पुढील शब्दांचे वचन बदला:
(I) रस्ता
(II) भिंत
(2) अचूक शब्द ओळखून लिहा
(i) गारहाणी / गाहाणि / गा-हाणी /ग्राहाणी
(ii) प्रक्रिया / परकिरया/प्रक्रीया/परक्रिया
(3) पुढील विरामचिन्हांची नावे लिहा:
उत्तर:
(अ) (1) (i) उद्गारार्थी वाक्य
(ii) विधानार्थी वाक्य
(2) (i) ही कल्पना वाईट नाही
(ii) जगात सर्व सुखी असा कोणीच नाही
(3) (i) रममाण होणे – मग्न होणे
दिवाळीत फटाके उडवताना लहान मुले रममाण होतात.
(ii) झोकून देणे पूर्णपणे सहभागी होणे.
मातृभूमीच्या रक्षाणासाठी लढणारे जवान देशसेवेत स्वतःला झोकून देतात.
(iii) अंगाचा तिळपापड होणे – संताप होणे
सिद्धीला मिळालेल्या कमी गुणांमुळे तिच्या आईच्या अंगाचा तिळपापड झाला.
(आ) (1) (i) (I) झाड – वृक्ष
(II) घर – सदन, निवास
(ii) (I) प्रामाणिक – अप्रामाणिक
(II) सावध – बेसावध
(iii) समाजसेवा करणारा – समाजसेवक
(iv) (I) रस्ता रस्ते
(II) भिंत — भिंती
(2) (i) गाऱ्हाणी
(ii) प्रक्रिया
(3)
विभाग 5: उपयोजित लेखन
प्रश्न 5.
(अ) खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा: (6)
(1) पत्रलेखन:
किंवा
(2) सारांशलेखन :
विभाग- 1 : हृदय (इ) [ प्रश्न क्र. 1 – इ मधील अपठित उताऱ्याचा 1/3 एवढा सारांश लिहा.
(आ) खालील कृतींपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा: (10)
(1) जाहिरातलेखन:
खालील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा.
कृती करा:
(1) जंगल भ्रमंतीसाठी नोंदणी शुल्क –
(2) उद्यानात भ्रमंती करण्यासाठी वयोगट –
(3) उद्यानात फिरण्याचा कालावधी
(4) जंगल भ्रमंतीचे ठिकाण
(5) आयोजक संस्थेचे नाव –
(2) बातमीलेखन :
खालील विषयावर बातमी तयार करा :
जनता विद्यालय, शिरवळ येथे मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा.
प्रमुख पाहुणे – ज्येष्ठ साहित्यिक श्री. अरविंद मोरे
अध्यक्ष श्री. सागर शिंदे
दि. 27 फेब्रुवारी वेळ – स. 10.00
(3) कथालेखन:
पुढील मुद्द्यांवरून कथालेखन करा.
मुद्दे : एक राजा – त्याची प्रजा आळशी होती – त्यांना उद्योगी बनवण्यासाठी राजा युक्ती करतो – रस्त्यात मधोमध दगड ठेवतो – त्यांच्याखाली सोन्याची नाणी असलेली पिशवी – अनेक लोक जातात, पण दगड उचलत नाहीत – एक गरीब माणूस तो उचलतो – पिशवीतील नाणी त्याला मिळतात – लोकांना हे कळते – लोक उद्योगी बनतात –
(इ) निबंधलेखन:
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतोही एक कृती सोडवा.
(1) प्रसंगलेखन:
वरील कार्यक्रमास तुम्ही विदयार्थी म्हणून उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
(2) आत्मकथन:
(3) वैचारिक:
“मी माझ्या देशाचा नागरिक” या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
मुद्दे : जबाबदार नागरिक – हक्क व कर्तव्ये यांची जाणीव – देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान – स्वतः चे वागणे – देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.
वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.
उत्तर:
(अ) 1. पत्रलेखन
दिनांक – 12 एप्रिल 2024
प्रति,
माननीय व्यवस्थापक,
हिरवाई ट्रस्ट,
बालोद्यान मार्ग,
तळेगाव दाभाडे
[email protected]
विषयः शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम उत्तम झाल्याबद्दल व रोपांचे मोफत वाटप केल्याबद्दल आपणास धन्यावाद पत्र सप्रेम नमस्कार,
अभिनंदन! आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून रोजी राबविलेल्या ‘झाडे लावा….. झाडे जगवा’ उपक्रम अत्यंत यशस्वी झाल्याचे आजच्या वर्तमानपत्रात वाचले. हे वाचून मला खूप आनंद झाला. काळाची गरज ओळखून ज्या पद्धतीने आपण हा उपक्रम राबवून’ रोपांचे मोफत वाटप केलेत ते अत्यंत अभिनंदनीय आहे. आपल्या या उपक्रमांमुळे आम्ही आमाच्या शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करू शकलो.
आपण यापुढेही असेच समाजोपयोगी उपक्रम राबवून पर्यावरणाचे संवर्धन करण्यात आपला वाटा उचलाल ही अपेक्षा पुनश्च आपले अभिनंदन ! पुढील वाटचालीस शुभेच्छ
कळावे.
आपला / आपली कृपाभिलाषी
कुणाल /गायत्री पिंग
विद्यार्थी प्रतिनिधी,
ज्ञानसंपदा विद्यालय,
तळेगाव दाभाडे
किंवा
विषयाः शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणेबाबत
महोदय,
मी, कुणाल पिंगळे, विद्यार्थी प्रतिनिधि, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे येथून आपणास लिहीत आहे. आमच्या शाळेत जागतिक पर्यावरण दिनानिमित वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सदर कार्यक्रमासाठी आपण आपल्या रोपवाटिकेच्या सुरू असलेल्या मोफत रोपांचे वाटप या योजने अंतर्गत रोरोपे उपलब्ध करून दयावीत. आपणांस विनंती की खालील यादीप्रमाणे झाडांची रोपे शाळेत पाठविण्याची व्यवस्था करावी.
रोपांची यादी
चिंच – 10
पिंपळ – 10
वड – 10
आंबा – 10
गुलमोहोर – 10
निलगिरी – 10
शिसम – 10
कडुलिंब – 10
कव्यावे
आपला आपली कृपाभिलाषी,
कुणाल / गायत्री पिंगळे,
विद्यार्थी प्रतिनिधी.
ज्ञानसंपदा विद्यालय,
तळेगाव दाभाडे,
किंवा
2. सारांशलेखन:
मानवाच्या मानसिक आणि बौद्धिक शक्तीच्या विकासासाठी शिक्षणाला महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षणावाचून माणूस पशुतुल्य होतो. समाजातील वाईट चालीरीती आणि अंधश्रद्धा घालवण्यासाठी स्त्रीशिक्षण महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत.
(आ) (1) जाहिरातलेखन:
(1) जंगल भ्रमंतीसाठी नोदंणी शुल्क – 200 रुपये
(2) उद्यानात भ्रमंती करण्यासाठी वयोगट – 10 ते 15
(3) उद्यानात फिरण्याचा कालवधी – 25 ते 27 डिसेंबर
(4) जंगल भ्रमंतीचे ठिकाण – तापोळा
(5) आयोजक संस्थेचे नाव – जंगल भ्रमंती संस्था, तापोळा
(2) बातमीलेखन:
मराठी भाषा दिन
दि. 28 फ्रेब्रुवारी
काल (दिनांक 27 फेब्रुवारी) जनता विद्यालय, शिरवळ येथे मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी सकाळी 10 वाजता साजरा करण्यात आला. या खास दिवशी, मराठी भाषेचे महत्त्व, समुद्धी प्रदर्शित करण्यासाठी अनेक सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. ज्येष्ठ साहित्यिक श्री अरविंद मोरे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्यांच्या मराठी भाषेच्या समृद्ध वारशाचे महत्त्व उलगडून दाखविणऱ्या भाषणाने सवांच्या मनात मराठी भाषेप्रति असणारा आदर आणि प्रेम वाढण्यास मदत झाली.
या कार्यक्रमास श्री सागर शिंदे, अध्यक्ष लाभले. त्यांच्या भाषणाने विद्यार्थ्याना मराठी भाषेच्या महत्त्वाची जाणीव करून दिली. या विशेष दिनानिमित्त कविता वाचन, मराठी गीतांचे सादरीकरण, मराठी भाषेच्या इतिहासावर आधारित प्रश्नमंजुषा, अशासारख्या उपक्रमांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी आपल्या कला आणि साहित्यिक अभिरुचीचे प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली.
जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक, सहशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एकत्रितपणे काम केले. ज्याचे समाजातील सर्व स्तरांतील लोकांनी स्वागत केले.
(3) कथालेखन:
फार वर्षापूर्वी दूरदेशी ‘विजयनगर’ नावाचे राज्य होते. त्या राज्याचा राजा अतिशय बुद्धिमान आणि लोकहितोपयी होता. प्रजा आळशी असल्याने त्या राज्याची प्रगती म्हणावी तशी होत नव्हती. याने राजा खूप चिंतित होता. आपली प्रजा कशी उद्योग आणि कष्टाळू होईल याचा तो विचार करू लागला. त्यासाठी तो एक युक्ती करण्याचे ठरवतो. एकेदिवशी राजा विजयसिंह नगरातील मुख्य रस्त्यावर मध्यभागी एक मोठा दगड ठेवण्याचा आदेश देतो. त्या दगडाखाली एका पिशवीत सोन्याची नाणी ठेवतो. दिवसभरात अनेक जण त्या दगडापासून ये जा करतात पण कोणीही तो दगड उचलत नाही. अनेक जण त्या दगडाला एक अडचण समजून त्याच्या बाजूने निघून जात.
काही दिवस असेच गेले पण कोणीही तो दगड रस्त्यातून बाजूला केल नाही एकदिवशी गरीब माणूस त्या रस्त्यावरून जात होता. त्याला रस्त्याच्या मधोमध असलेला तो दगड दिसला आणि त्याने तो बाजूला करण्याचे ठरवले. त्याने दगड उचलताच त्याखाली ठेवलेली सोन्याच्या नाण्यांनी भरलेली पिशवी त्याला दिसली तो दगड रस्त्याच्या बाजूला करून त्याखालील पिशवी घेऊन आनंदाने राजाकडे गेला. राजाने त्याच्या कार्याचे खूप कौतुक केले तसेच त्याला अजून बक्षीससुद्धा दिले. हा हा म्हणता ही बातमी वान्यासारखी राज्यभर पसरली. त्यामुळे नगरवासीयांना समजले की उद्योगी आणि कष्टाळू असणे किमी महत्त्वाचे आहे. रयतेने आळशीपणा सोडून कष्ट करण्यास सुरूवात केली. प्रत्येक नगरवासीय आपल्या कामात अधिक कष्ट आणि परिश्रम घेऊ लगला. त्यामुळे विजयनगर राज्य प्रगतीच्या नव्या उंचीवर जाऊन पोहोचले.
राजा विजयसिंहाची प्रजेला उद्योगी बनविण्याची भक्ती चांगलीच यशस्वी ठरली. ज्यामुळे त्याच्या राज्यातील सर्वजन गुण्या गोविंदाने आणि आनंदाने राहू लागले. राज्यात सुबत्ता आणि समृद्धी आली. राजा विजयसिंहाचे नाव एक उत्कृष्ट राजा म्हणून इतिहासात नोंदले गेले.
(इ) (1) प्रसंगलेखन:
शालेय प्रजासत्ताक दिन
प्रजासत्ताक दिन हा देशभक्तीपूर्ण उत्साहाने साजरा करण्याचा दिवस. आज एक विद्यार्थी म्हणून माझ्या शाळेतील प्रजासत्ताक दिन समारंभास हजर राहिलो. समारंभाची सुरूवात सकाळी ठीक 8 वाजता झाली. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.
मुख्य समारोह सुरुवातीला ध्वजारोहणाने झाली. सर्वांनी मिळून राष्ट्रगीताचे गायन केले. त्यानंतर मुख्याध्यापकांनी आम्हाला भाषण देऊन प्रेरित केले. त्यानंतर मुख्याध्यापकांनी आम्हाला भाषण देऊन प्रेरित केले आणि देशाच्या महान संविधानाची महत्ता समजावून सांगितली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहान भाग घेतला.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्षांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व पटवून दिले. विविध कार्यक्रमात देशभक्तीपर नाटक नृत्य, भाषणे सादर झाली. मी सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवून जोरदार भाषण केले. त्यानंतर नाटकाच्या सादरीकरणात सुद्धा सहभाग घेतला. माझे खूप कौतुक झाले.
त्यानंतर आभार प्रदर्शन करण्यात आले आणि सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता झाल्यावर आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी शाळेची साफसफाई केली. आमचा हा दिवस खूप आनंदी आणि विस्मरणीय राहील. आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने आम्ही देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचा अर्थ समजून घेतला.
(2) आत्मकथन:
“काय दोस्ता, आलास? परीक्षा संपली वाटतं ? तुम्ही सर्व आलात की कसं बरं वाटतं त्यानिमित्ताने का होईना माइलेले दगड-धोंडे, कचरा दूर केला जातो. तुमच्या किलबिलाटाने, दंगामस्तीने मी गजबजून जातो, आनंदून जातो.
सकाळची कोवळी उन्हे घेण्यासाठी, दुपारी जेवल्यानंतर शतपावली करण्यासाठी, संध्याकाळी मित्रमैत्रिणीसोबत खेळण्यासाठी, रात्री फेरफटका मारण्यासाठी जेव्हा तुम्ही माझ्याजवळ येता तेव्हा मला खूप आनंद होतो. पावसात तुम्ही इथे चिखलात फुटबॉल खेळायला येता, डबक्यातल्या पाण्यात होड्या सोडता, माझ्यावर दणादण उड्या मारता तेव्हा माझंही मन ओलंचिंब होऊन जातं. तुम्ही नसलात, की नुसता शुकशुकाट असतो. मम काय, कुठल्या राजकारण्याची सभा किंवा साखरपुड्यासाठी सणाकार्यक्रमांसाठी लोक माझ्झा वापर करण्याची संधी सोडत नाहीत; पण खरं सांगू का ? मला खेळासाठीचं हक्काचं अंगण म्हणूनच जर तुम्ही मान दिलात. तरच मला जन्म सार्थकी लागल्यासारखा वाटेल.
आज मैदानी खेळ खेळण्यापेक्षा मुलांना मोबाइल, संगणकामधील यांत्रिक खेळ खेळण्यात अधिक रस वाटत आहे. लहान ययातच लठ्ठपणा, मानदुखी, डोळ्यांच्या विकारांना आयतं आमंत्रण मिळालं आहे. शिवाय, माझ्यापेक्ष टीव्हीचा वाढता प्रभाव आहेच. तासनतास मनोरंजनाच्या या ‘इडियट बॉक्स’ समोर बसून आपला वेळ वाया घालवणाऱ्या, तळलेले, खारट पदार्थ खात डोळ्यांवर जाड भिंगांचा चष्मा सावरणाऱ्या माझ्या दोस्तांना पाहून मला खूप वाईट वाटतं; पण माझा नाइलाज आहे रे. आपल्या व्यस्त जीवनक्रमांतून खेळण्यासाठी वेळ काढणे त्यांना कठीणच होऊन बसले आहे.
हल्ली टोलेजंग इमारती बांधणारे विकासक आमच्यावर अतिक्रमण करून त्याजागी भलेमोठे घरांचे प्रकल्प उभारत आहेत. आमची जागा हळूहळू दुकाने, मॉल्स उभारण्याकरता विकली जात आहे. प्रगतीच्या नावाखाली आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. हे जर असेच चालू राहिले, तर भविष्यात मुले खेळणार कुठे?
जर तुम्ही खेळलात, तर मी टिकून राहीन, नाहीतर माझे अस्तित्वच नष्ट होईल किंवा खेळांडूपुरतेच माझे अस्तित्व मर्यादित राहील, म्हणून सांगतो. रोज खपू खेळा… माझ्याजवळ या…या चिमण्यांनो परत फिरा… याल ना?
(3) वैचारिक:
“मी माझ्या देशाचा नागरिक” हा विचार करताना, आपल्या मनात प्रथम येते ते आहे जबाबदारी. जबाबदार नागरिक म्हणून आपले हक्क आणि कर्तव्ये हे दोन्ही समान महत्वाचे आहेत. हक्क मिळवणे हे प्रत्येकाचे अधिकार आहे, परंतु त्याचबरोबर कर्तव्ये पार पाडणे ही आपली जबाबदारी आहे. उदाहरणार्थ, निवडणुकीत मतदान करणे हा आपला हक्क आहे, परंतु शिक्षित, सजग आणि विचारपूर्वक मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे.
देशाच्या सद्यस्थितीचे ज्ञान हे एक जबाबदार नागरिकाच्या वृत्तीचे प्रमुख लक्षण आहे, आपल्या देशाची आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थिति काय आहे, याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे आपल्याला समाजातील विविध समस्या आणि आव्हानांविषयी माहिती मिळते आणि त्यावर योग्य उपाय शोधण्याची दिशा मिळते.
स्वतः चे वागणे हे देशप्रेम आणि राष्ट्रीयत्वाची जाणीव दाखवण्याचा एक प्रमुख मार्ग आहे. आपल्या वर्तनातून, बोलण्यातून आणि कृतीतून आपण देशप्रेम आणि राष्ट्रीयत्वाचे मूल्य प्रदर्शित करू शकतो. समाजातील अन्य लोकांसाठी एक आदर्श बनून, आपण देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान देऊ शकतो.
देशप्रेम आणि राष्ट्रीयत्व या भावना आपल्या मनात नेहमी जागृत असल्या पाहिजेत. या भावनांमुळे आपण आपल्या देशासाठी काहीतरी सार्थक करण्याची इच्छा आणि प्रेरणा मिळते. आपण देशाच्या विकासासाठी आपल्या सामर्थ्यानुसार काम करू शकतो, मग ते शिक्षण पर्यावरण संरक्षण, समाजसेवा किंवा आर्थिक विकासासाठी असो.