Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा

Students can find the best Marathi Balbharati Class 8 Solutions and Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा for exam preparation.

Std 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा

Maharashtra Board Solutions Class 8 Marathi Balbharati Chapter 13 पाड्यावरचा चहा

पाड्यावरचा चहा Question Answer

प्रश्न १.
पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्दयांना अनुसरून वर्णन करा.

(अ) खोपटे वसण्याचे ठिकाण
(आ) खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य
(इ) दारे, खिडक्या व छप्पर
(ई) दालन
उत्तर:
(अ) साधारण उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला ही खोपटी वसलेली असतात.
(आ) भिंतीकरिता कारव्यांच्या किंवा बांबूंच्या काठ्या, सारवणाकरिता शेण आणि माती, मेढी, चौकटी आणि वासे यांकरिता थोडेसे लाकूड, छपराकरिता पेंढा, पळसाची पाने क्वचितच कौले, ओट्याकरिता दगड वापरले जातात.
(इ) खोपटाला एकच दार असे. कुठल्याही कारव्या अगर कामट्या मोडल्या, की खिडकी तयार होते. छप्पर म्हणून घरांवर पेंढा, पळसाची पाने घातली जातात. क्वचितच कौलारू घरेही दिसतात.
(ई) वारली लोकांची खोपटी एकदालनी असतात. सर्व व्यवहार या एकाच दालनात पार पडतात.

प्रश्न २.
पाठाधारे खाली दिलेल्या गोष्टींचे उपयोग सांगा.

(अ) माची
(आ) लहान लहान खड्डे.
(इ) सारवलेला ओटा
उत्तर:
(अ) माची:
लहान टेबलासारख्या माचीचा उपयोग पिण्याच्या पाण्याची मडकी ठेवण्याकरिता केला जाई.

(आ) लहान लहान खड्डे:
यांचा उपयोग कोंबड्यांना पिण्याकरिता पाणी ओतून ठेवण्याकरिता केला जाई.

(इ) सारवलेला ओटा :
याचा उपयोग बसण्याकरिता केला जाई.

प्रश्न ३.
आकृत्या पूर्ण करा.

(अ)
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 30
उत्तर:
खाई

(आ)
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 31
उत्तर:
डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचे कोपरे ठेवून, तो नाकापर्यंत उभा धरणे

प्रश्न ४.
कारणे लिहा.

(अ) लेखिका निराश झाली तरी तिने स्वतःला सावरले; कारण…………
उत्तर:
लेखिकेची त्यांच्या ध्येयावरील निष्ठा व गरीब लोकांबद्दलची तळमळ अविचल होती.

(आ) लेखिका कंटाळून नाइलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली; कारण…………..
उत्तर:
लेखिका ज्या पाड्यावरील वारल्यांना भेटण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन पाड्यावर आली होती ते वारली बोलावणे पाठवूनही बराच वेळ गेला तरी परतण्याची चिन्हे दिसत नव्हती.

प्रश्न ५.
लेखिका आणि कॉ. दळवी यांच्या वारली लोकांबरोबर होणाऱ्या सभेच्या तयारीचा ओघतक्ता करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 32
उत्तर:
१. एका वारल्याने खोली झाडली
२. दुसऱ्याने पाहुण्यांसाठी हातरी टाकली
३. वारल्यांनी एक बाज आणली
४. दहा-पंधरा वारली जमले आणि हळूहळू कुडापाशी ओळीने बसले

प्रश्न ६.
परिच्छेदाच्या आधारे लिहा.

(अ) चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते, स्पष्ट करा.
उत्तर:
वारली लोकांच्या पाड्यावर दारिद्र्य ठाण मारून बसलेले होते. जीवनावश्यक गोष्टीही येथे अत्यंत कमी प्रमाणात कशाबशा उपलब्ध होत. पोटभरीसाठी लागणाऱ्या जेवणाची सोय येथील लोकांना करावीच लागे. त्यामुळे, किमान पोट भरावे याकरिता, जेवणासाठी लागणारे साहित्य येथील खोपटांमध्ये थोड्याफार प्रमाणात आढळून येई. त्यामुळे असेल तेवढ्या साहित्यात जेवण बनवणे त्यांना शक्य होते; मात्र चहासारखी गोष्ट त्यांच्या स्वप्नातही येत नसे.

चहासारखी चैनीची गोष्ट आपल्यासाठी नाही हीच त्यांची दृढ भावना होती. त्यामुळे, चहासाठी लागणारी साखर, चहाची पावडर त्यांच्या घरात असण्याचा प्रश्नच नव्हता. शिवाय, पाड्यावर गाई- म्हशी नसल्याने दुधाचा थेंबही मिळणे अवघड होते. शिवाय साखर, चहाची पावडर, दूध हवे असल्यास किमान तीन मैलांवर असलेले दुकान गाठावे लागे. मुळातच वारल्यांकडे पैशांची अगदीच कमतरता असल्याने दुकानातून अशा काही गोष्टी विकत आणण्याची ते कल्पनाही करत नाहीत. त्यामुळे, घरात उपलब्ध, निसर्गातून सहज मिळू शकणारे पदार्थ वापरून जेवण बनवणे हे वारल्यांसाठी चहा तयार करण्यापेक्षा सोपे होते.

(आ) तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धत यांतील फरक स्पष्ट करा.
उत्तर:
आमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धत यांत खूप फरक आहे. आमच्या घरात आवश्यक किराण्याबरोबर चहाचे साहित्य दरमहा मागवले जाते. दूध तर घरी रोजच येते. त्यामुळे, वारली लोकांसारखी या वस्तू आणण्याकरिता धावपळ होत नाही. आमच्या घरचा चहा वारली लोकांप्रमाणे चुलीवर न होता तो गॅस किंवा इंडक्शनवर होतो. वारल्यांप्रमाणे गळवट पातेले न भरता प्रत्येकी अर्धा कप या हिशेबाने पाणी लहानशा चहाच्या पातेल्यात भरून ते गॅसवर ठेवले जाते. त्यात चहाची पावडर आणि चहाचा मसाला प्रमाणात टाकले जातात.

चहाला उकाळा येताच हा चहा गाळणीने गाळून चहाच्या पात्रात ठेवला जातो. मग एका भांड्यात गरम दूध आणि एका भांड्यात साखर घेऊन. सारा सरंजाम डायनिंग टेबलवर ठेवला जातो. मग घरातील प्रत्येकाला आवडेल त्याप्रमाणे चहा कपात ओतून त्यात योग्य वाटेल तेवढे दूध आणि साखर घालून, चमच्याने अलगद घोळवत चहा तयार होतो. वारली लोकांप्रमाणे सगळे गरगट मिसळले जात नाही, प्रत्येकाची आवड वेगळी असल्याने चहाचे सोपस्कार असे पार पाडले जातात.

खेळूया शब्दांशी

(अ) जोड्या लावा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 33
उत्तर:
(i – ड),
(ii – अ),
(iii – ब),
(iv – क)

(आ) खालील नादानुकारी शब्द लिहा.

उदा., ढगांचा गडगडाट

(अ) कोंबड्यांचा – ………………………
(आ) पाखरांचा – ………………………
(इ) पाण्याचा – ………………………
उत्तर:
(अ) फडफडाट
(आ) चिवचिवाट, कलकलाट
(इ) खळखळाट

(इ) खालील शब्दांसाठीचे विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा.

  1. गैरहजर ×
  2. उंच ×
  3. भरभर ×
  4. अदृश्य ×
  5. उशिरा ×

उत्तर:

  1. हजर
  2. ठेंगणी
  3. हळूहळू
  4. दृश्य
  5. लवकर

उपक्रम : तुमच्याजवळची झोपडपट्टी, पाडा, वाडी-वस्ती, तांडा, फिरत्या लोकांची पालं यांपैकी शक्य त्या ठिकाणास शिक्षक किंवा पालक यांच्यासोबत भेट दया. तेथील लोकांचे जीवन समजून घेण्यासाठी त्यांच्याशी बोला. त्या भेटीतील लोकांचे जीवन आणि पाठातील लेखिकेचे अनुभव यांची तुलना करून भेटीचा अहवाल लिहा. तो वर्गात वाचून दाखवा. तुम्हांला अशा लोकांसाठी काही करता येईल का ते गटात मित्रांशी चर्चा करून ठरवा.
(टीप: वरील उपक्रम विदयार्थ्यांनी स्वत: पूर्ण करावा.)

आपण समजून घेऊया.

(आ) आता आपण अर्थालंकारातील ‘उपमा’ व ‘उत्प्रेक्षा’ या अलंकारांचा अभ्यास करू.

अर्थालंकारात खालील गोष्टी नीट अभ्यासा.
उदा., हा आंबा साखरेसारखा गोड आहे.

उपमेय
उपमान
साम्यवाचक
शब्द
समान धर्म
आंबा
साखर
सारखा
गोडी

खालील संकल्पना लक्षात ठेवा.

(अ) ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात.
(आ) ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात.
(इ) दोन वस्तूंत असणारा सारखेपणा याला समान धर्म म्हणतात.
(ई) सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द त्याला साम्यवाचक शब्द म्हणतात.

उपमा अलंकार

• खालील उदाहरणे वाचा, समजून घ्या व कृती सोडवा.

सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ।

(अ) प्रस्तुत वाक्यांतील उपमेय – ………..
(ब) प्रस्तुत वाक्यांतील उपमान – …………
(क) प्रस्तुत वाक्यांतील समान धर्म – …………….
(ड) प्रस्तुत वाक्यांतील साम्यवाचक शब्द – …………
उत्तरः

क्र. उपमेय उपमान समान धर्म साम्यवाचक शब्द
i. तुझा रंग पावसाळी नभ सावळेपणा परी

Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 37

दोन वस्तूंतील साम्य चमत्कृतिपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते, तिथे ‘उपमा’ अलंकार होतो.

(२) उत्प्रेक्षा अलंकार

• खालील उदाहरण वाचा, समजून घ्या व कृती सोडवा.

हा आंबा म्हणजे जणू साखरच !

(अ) प्रस्तुत वाक्यातील उपमेय- ………………
(आ) प्रस्तुत वाक्यातील उपमान- ………………
(इ) प्रस्तुत वाक्यातील समान धर्म- ………………
(ई) प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द- ………………
उत्तरः

क्र. उपमेय उपमान समान धर्म साम्यवाचक शब्द
ii. हा आंबा साखर गोडवा जणू

Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 40

उपमेय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णिलेले असते, तिथे ‘उत्प्रेक्षा’ अलंकार होतो.

• खालील वाक्ये वाचा व तक्ता पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 42

Class 8 Marathi Balbharati Chapter 13 पाड्यावरचा चहा Question Answer

संकलित मूल्यमापन

परिच्छेद १

कृती १ – आकलन

१. आकृत्या पूर्ण करा.

i.
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 5
उत्तर:
१. सात आठ किंवा दहा – पंधरा खोपट्यांचा समूह
२. एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून अर्धा मैल, मैल किंवा दोन- तीन मैल अंतरावर वसलेला असतो
३. साधारण उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला वसलेले

ii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 6
उत्तर:
१. मेढी
२. चौकटी
३. वासे

२. चौकटी पूर्ण करा.

  1. सात-आठ किंवा दहा-पंधरा खोपट्यांचा समूह असलेले ठिकाण → □
  2. पाच-सात, दहा, क्वचित पंधरा पाडे मिळून तयार होणारे → □
  3. लेखिका गेल्या होत्या तो पाडा → □
  4. ठेंगणे खोपटे असलेला लेखिकेचा कार्यकर्ता → □

उत्तर:

  1. पाडा
  2. गाव
  3. सालकर पाडा
  4. लक्ष्मण सापट

[सात – आठ किंवा दहा …………
………. ओतून ठेवले होते.]

कृती २ आकलन

१. कारणे लिहा.

i. एका गावातल्या साऱ्या पाड्यांना भेट दयायची म्हणजे पाच-सहा मैलांचा फेरफटका करावा लागतो; कारण…
उत्तर:
पाच-सात, जास्तीत जास्त दहा क्वचित पंधरा पाडे मिळून बनलेल्या गावातील एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून अर्धा मैल, मैल काही ठिकाणी दोन-तीन मैल अंतरावर वसलेला असतो.

ii. कार्यकर्ता लक्ष्मण सापट यांच्या घरी लेखिकेला नेहमी जपून आत-बाहेर करावे लागे; कारण…
उत्तर:
कार्यकर्ता लक्ष्मण सापट यांचे घर इतके ठेंगणे होते, की आत जायचे म्हटले तरी वाकून जावे लागे..

iii. वारल्यांच्या खोपट्यांची रचना ढकलली, तर कोसळून पडतील अशी असायची; कारण…
उत्तर:
वारल्यांच्या घरांत रक्षण करण्याची गरज असावी असे काहीच नसे.

कृती ३ – स्वमत / अभिव्यक्ती

१. तुम्ही एखादया पाड्याला भेट दिली आहे का ? तुमचा अनुभव लिहा.
उत्तर:
हो. यावर्षीची वर्षासहल आमच्या गुरुजींनी आमच्या जवळच्या एका पाड्यावर नेली होती. हा अनुभव अनोखा होता. गावापासून कित्येक मैल दूर डोंगरात असलेल्या या पाड्यावर पोहोचताना आमची दमछाक झाली होती; मात्र तेथे गेल्यावर तेथील वातावरण, तेथील गार वारा लागताच आणि झऱ्यातले गार पाणी पोटात जाताच हा थकवा दूर पळाला. तेथे गेल्या गेल्या पाड्यावरची लोकं आमच्याभोवती गोळा झाली. आमच्या गुरुजींनी पाड्याच्या प्रमुखासोबत बोलणे केले आणि लगेचच त्यांनी आमची बसण्याची, विश्रांतीची व्यवस्था केली.

साध्याशा झोपड्यांमध्ये राहणाऱ्या या लोकांच्या झोपड्या शेणा-मातीने लिंपून त्यांवर छान चित्रे काढली होती. संपूर्ण पाडा झाडा- झुडपांमध्ये जणू लपाछपी खेळत होता. पाड्यावरच्या मोठ्यांनी आमच्या जेवणाची व्यवस्था केली. तोवर पाड्यावरच्या मुलांमध्ये आम्ही मिसळून छान खेळलो. तेथील रानभाज्यांची लज्जत न्यारी होती. तेथील मुलांना आम्ही नेलेले चॉकलेट्स दिले आणि त्यांचा निरोप घेऊन गोड आठवणींसह आम्ही निघालो.

परिच्छेद २

कृती १ – आकलन

१. आकृत्या पूर्ण करा.

i.
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 7
उत्तर:
१. पाखरांचा चिवचिवाट
२. कोंबड्यांचा फडफडाट

ii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 8
उत्तर:
१. मुले
१. कुत्र्यांचे भुंकणे

iii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 9
उत्तर:
१. तीन दगडांची चूल आणि चुलीतील व चुली बाहेरील ढीगभर राख
२. राप बसलेले ॲल्युमिनिअमचे पातेले
३. एक-दोन मडकी
४. एक-दोन तवल्या
५. तळाशी चार भाताचे दाणे असलेले मडके
६. शिंक्यावर आंबील भरलेले मडके
७. हळकुंड असलेली तवली
८. एक-दोन कांदे, लसणीच्या पाकळ्या
९. आपट्याची पाने
१०. बांबूच्या पेराचा तुकडा

iv.
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 10
उत्तर:
१. लेखिका घाबरली
२. तिचे मन उदास झाले
३. तिला एक प्रकारची हुरहुर वाटू लागली

v.
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 12
उत्तरः
१. आपण कुठल्या खाईत येऊन पडलो ?
२. पुढे काय होणार?
३. आपल्याला माघार घ्यावी लागणार काय?
४. आपल्याला हे झेपेल काय?

२. चौकटी पूर्ण करा.

  1. पाड्यावरच्या मुलांचे विशेष → □
  2. विड्या वळण्यासाठी आणलेली. → □
  3. बांबूच्या तुकड्याला दिलेली उपमा → □

उत्तर:

  1. केविलवाणी
  2. आपट्याची पाने
  3. जंगलातील बरणी

[आम्ही काही वेळ …………….
………. हे झेपेल काय ?]

कृती २ – आकलन

१. परिच्छेदाच्या आधारे खाली दिलेल्या गोष्टींचे उपयोग सांगा.

i. शिंके
ii. एका बाजूने बंद असलेला बांबूच्या पेराचा तुकडा
उत्तर:
i. शिंकेः
याचा उपयोग आंबील भरलेले मडके ठेवण्यासाठी केला जाई.

ii. एका बाजूने बंद असलेला बांबूच्या पेराचा तुकडाः याचा उपयोग तंबाकूची पाने किंवा तंबाकू ठेवण्यासाठी केला जाई.

२. कारणे लिहा.

i. लेखिका घाबरली.
उत्तर:
पाड्यावरच्या एका खोपट्यात शिरताच लेखिकेला पाडा ग्लानी येऊन निपचित पडलेल्या माणसासारखा निपचित पडलेला वाटला. त्या खोपट्याची कळा, तेथे नांदणारे अठराविश्वे दारिद्र्य, तेथील भयाण, भकास वातावरण पाहून लेखिका घाबरली.

ii. लेखिकेचे मन उदास झाले.
उत्तर:
आपण पाहिलेला भयाण, निर्मनुष्य पाडा आता आपल्याला गिळून टाकणार की काय या भितीने लेखिकेचे मन उदास झाले.

कृती ३ – स्वमत / अभिव्यक्ती

१. वरील परिच्छेदाच्या आधारे पाड्यांच्या स्थितीविषयी तुम्हांला काय वाटते ते लिहा.
उत्तर:
वरील परिच्छेद पाड्यांवरील भयाण वास्तवाचें चित्रण करतो. पाड्यावरील लोकांची गरिबी, सोईसुविधांचा अभाव, तेथील निर्मनुष्य वातावरण, तेथे नांदणारे अठराविश्वे दारिद्र्य, आधुनिकतेशी न जुळलेली तार आणि या सर्वांमुळे प्रगत जगापासून कित्येक वर्षांनी मागे पडलेला पाडा आपल्यासमोर उभा राहतो. येथील मोडक्या, तकलादू घरांची स्थिती, घरातील मूलभूत सोईंचा अभाव यांमुळे झालेली दारुण अवस्था दिसून येते.

घरांमधील जाणती लोकं मजुरीसाठी गेल्याने पाड्यावर उरलेली लहान मुले तेथील गरजूंच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर उभा करतात. त्यांच्या खोपट्यांची दुरावस्था त्यांच्या वाट्याला लिहिलेले दारिद्र्य ओरडून सांगते. या पाड्यांना आधुनिकतेचा स्पर्शही झालेला नाही, हे आपल्याला जाणवते. या पाड्यांना विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी त्यांना सहकार्य मिळणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. शिक्षण, वैदयकीय सेवा, उत्तम निवारे, चांगले अन्न मिळावे यांकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मला वाटते.

परिच्छेद ३

कृती १ – आकलन

१. आकृती पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 13
उत्तर:
१. गुरांच्या
२. बकऱ्यांच्या

२. चौकटी पूर्ण करा.

  1. हे ठिकाण गाठेपर्यंत घोटभर चहा सुद्धा मिळणार नव्हता → □
  2. खजुऱ्या गोळा करून आणणारे → □
  3. पाड्यावर या सभेतले लोक आले होते → □

उत्तर:

  1. संजाण स्टेशन
  2. कॉम्रेड दळवी
  3. टिटवाळ्याच्या

[आम्ही सुमारे तीन …………..
…………. नजरकैदेतून सुटलो.]

कृती २ – आकलन

१. परिणाम लिहा.

i. गुरांच्या व बकऱ्यांच्या मागे गेलेल्या मुलांना लेखिका व सहकारी पाड्यावर आल्याची बातमी समजली.
परिणाम: बरीच मुले त्यांना बघण्यासाठी त्यांच्याभोवती जमा झाली.
ii. लेखिका व तिच्या सहकाऱ्यांभोवती असलेली मुलांपैकी बरीचशी मुले पांगली.
परिणाम: लेखिका व तिचे सहकारी त्यांच्या नजरकैदेतून सुटले असे लेखिकेला वाटले.

२. कारणे लिहा.

i. लेखिकेचा जीव अगदी रडकुंडीला आला; कारण…
उत्तर:
पाड्यावर जाण्याकरिता तीन मैलांची पायपीट झाली होती. उन्हातान्हातून आणखी तेवढीच रपेट परतीच्या वेळीही करावी लागणार होती. लेखिकेला चहाची सवय होती; मात्र तो मिळणेही शक्य नव्हते.

ii. गावात मोठी माणसे नव्हती; कारण…
उत्तर:
गावातील एकूण एक मोठी माणसे जमीन मालकांकडे कामाला गेलेली होती.

कृती ३ – स्वमत / अभिव्यक्ती

१. मुले पांगताच लेखिकेला नजरकैदेतून सुटल्यासारखे का वाटले असावे? तुमचे मत लिहा.
उत्तर:
लेखिका ज्या पाड्यावर भेटीसाठी गेली होती तो पाडा मूळ शहरापासून, गावापासून अनेक अंतरावर होता. त्यामुळे, आधुनिकतेपासून, सोईसुविधांपासून तेथील लोक कोसो दूर होते. शहरात राहणारी लेखिका जेव्हा या पाड्यावर गेली तेव्हा कोणीतरी अनोखी माणसं पाड्यावर आली आहेत अशारीतीने, पाड्यावरील मुलं त्यांच्याभोवती गोळा झाली.

आपल्यापेक्षा खूप वेगळी असणारी, वेगळे बोलणारी, वेगळी वेशभूषा असलेली लोकं समोर आल्याने उत्सुकता, आश्चर्य अशा भावना तेथील मुलांमध्ये जाग्या झाल्या. अशी माणसं आपल्या पाड्यावर कशासाठी आली असतील असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला असावा. त्यामुळेच, ही मुले लेखिकेला व तिच्या सहकाऱ्यांना गराडा घालून त्यांच्याकडे टकामका पाहत होती. त्यामुळेच, लेखिकेला अवघडल्यासारखे वाटत असावे. त्यामुळे, ही सतत पाहणारी मुले पांगताच लेखिकेला नजरकैदेतून सुटल्यासारखे वाटले असावे.

परिच्छेद ४

कृती १ – आकलन

१. आकृत्या पूर्ण करा.

i.
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 14
उत्तर:
१. मनातली कालवाकालव दडपून
२. विशेष काहीच नाही असे चेहरे करून
३. चिकाटीने

ii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 15
उत्तर:
१. कुडाच्या भिंती असलेली
२. लांबट चौकोनी झोपडी

२. चौकटी पूर्ण करा.

  1. लेखिकेला याची तल्लफ जाणवू लागली → □
  2. वारल्यांच्या येण्याची चिकाटीने वाट पाहणारे → □
  3. वारल्यांच्या चेहऱ्याचे विशेष → □

उत्तर:

  1. चहाची
  2. कॉ. दळवी, लेखिका
  3. निर्विकार

[बराच वेळ गेला तरी …………..
……….. आमच्यापुढेही प्रश्नच होता.]

कृती २ आकलन

१. लेखिकेचे नैराश्य दर्शवणारी वाक्ये परिच्छेदातून शोधून लिहा.
उत्तर:

  1. बराच वेळ गेला तरी कोणी येण्याचे चिन्ह दिसेना
  2. भयाण जागेत एक-एक क्षण आम्हांला तासासारखा भासू लागला.
  3. ती मुले जी गेली ती कोठे गेली, कोणाला बोलावून आणणार का तशीच कुठेतरी निघून जाणार काहीच समजेना.
  4. मला तर ब्रह्मांड आठवू लागले.
  5. कंटाळून नाइलाजाने आम्ही परत जाण्याचा विचार करत होतो.

२. परिणाम लिहा.

i. लेखिका व तिच्या सहकाऱ्यांनी पाठवलेली मुले व त्यांच्या मागोमाग दोन-तीन वारली येताना दिसले.
परिणाम: लेखिकेच्या जीवात जीव आला.
ii. ‘टिटवाळा परिषदेतले लोक’ आले आहेत हे पाड्यावरच्या वारली लोकांना कळले.
परिणाम: कामावरून जाण्याकरिता मनाई करणाऱ्या मुकादमाशी थोडा तंटा करून ते पाड्यावर परत आले.

३. कारणे लिहा.

i. लेखिकेला ब्रह्मांड आठवू लागले; कारण…
उत्तर:
लेखिका पाड्यावरील वारल्यांची वाट पाहत होती. बराच वेळ गेला तरी त्यांपैकी कोणी येण्याचे चिन्ह दिसेना. दुसरे काहीच करण्यासारखे नसल्यामुळे भूक आणि तहान तीव्रतेने भासू लागल्याने लेखिकेला ब्रह्मांड आठवले.

ii. कामासाठी गेलेल्या वारल्यांना लवकर परतता आले नाही; कारण….
उत्तर:
मुकादम त्यांना कामावरून लवकर जाऊ देत नव्हता.

iii. वारली लवकर जमणे शक्य नव्हते; कारण…
उत्तर:
सारे वारली जागोजाग वेठीला गेलेले होते.

कृती ३ – स्वमत/अभिव्यक्ती

१. तुम्हांला ब्रह्मांड आठवू लागले होते असा एखादा प्रसंग लिहा.
उत्तर:
काही दिवसांपूर्वी मी आई-बाबांसोबत कोकणात आमच्या गावी गेलो होतो. गावी तशा फार सुविधा नाहीत; पण तेथील मोकळं वातावरण, निसर्गाचा सहवास यांकरिता आम्ही दरवर्षी तेथे जातो. नेहमीप्रमाणे या वेळीही मी प्रवासात खूप चॉकलेट्स खाल्ले. थोड्या वेळात आम्ही गावी पोहोचलो आणि त्याच रात्री माझी दाढ दुखू लागली. त्या वेदना मला असह्य होऊ लागल्या. दात घासून, चूळ भरली, लवंग दाताखाली धरली; पण त्याचा काही उपयोग होईना.

गावात दवाखानाही नसल्याने आणि रात्री गाडीचीही सोय नसल्याने मला डॉक्टरकडे जाता येईना. मग गावाकडचे उपाय सुरू झाले. मिठाचा खडा, पेरुचा पाला या उपचारांनी मी आणखी हैराण झालो. ठणका मात्र क्षणोक्षणी वाढतच होत्या. मला ब्रह्मांड आठवू लागले होते. रडून रडून मी थकून गेलो होतो. अखेरीस या गोंधळात सकाळ झाली आणि पहिल्या गाडीने आम्ही शहरातला दवाखाना गाठला. गोळ्या घेताच वेदना थांबल्या आणि मला हायसं वाटलं.

परिच्छेद ५

कृती १ – आकलन

१. आकृत्या पूर्ण करा.

i.
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 17
उत्तर:
१. जेवण करणे
२. चहा करणे

ii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 18
उत्तर:
१. जेवणाची
२. चहाची

iii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 19
उत्तर:
१. खांड
२. गोड

iv.
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 20
उत्तर:
१. एखादी बकरी शोधायची
२. ती पकडायची
३. तिचे दूध काढून आणायचे

२. चौकटी पूर्ण करा.

  1. परिच्छेदात उल्लेखलेले चलन → □
  2. वारल्यांचा दोन टांगांचा अंदाज म्हणजे → □

उत्तर:

  1. शिवराई
  2. तीन मैल

[कॉ. दळवी व मी ………….
…………. ती खटपटच होती.]

कृती २ – आकलन

१. कारणे लिहा.

i. चहा करायचा म्हणजे वारली लोकांपुढे प्रश्नच होता; कारण…
उत्तरः
त्यांच्याकडे साखर, चहाची पवाडर नव्हती. शिवाय गावात गाय, म्हैस नसल्याने दुधाचा थेंब मिळणे अत्यंत कठीण होते.

ii. वारली चहा घेतलाच तर तो बिगर दुधाचाच घेत; कारण…
उत्तर:
दूध पिणे त्यांना माहीतच नव्हते आणि काहींना तर दुधाचा चहाच आवडत नसे, उलटी होई.

iii. चहा करून प्यायचा हे वारल्यांच्या स्वप्नात सुद्धा आले नसेल; कारण…
उत्तर:
चहा आपल्यासाठी नाही हीच त्यांची दृढ भावना होती.

परिच्छेद ६

कृती १ – आकलन

१. आकृती पूर्ण करा.
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 21
उत्तर:
१. एका पळसाच्या पानावर गूळ घेतला
२. एकावर चहाच्या भुक्कीची पुडी घेतली
३. स्वच्छ पाण्याने भरलेले एक मडके
४. एक स्वच्छ घासलेला टोप
५. तीन दगड ठेवून पेटवलेली चूल

२. चौकटी पूर्ण करा.

i.
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 22

ii.
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 23
उत्तर:
i. बकरीचे दूध आणण्यासाठी, चहा पिण्यासाठी
ii. दहा-पंधरा

[सारी जमवाजमव ……….
……….. आनंदात पार पडली.]

कृती २ – आकलन

१. चुकीचे विधान ओळखा.

अ. कॉ. दळवी झाडाखाली हातरी पसरून निजले.
ब. चहात गूळ आणि दूध टाकून चहाच्या भुक्कीची वाट पाहत होते.
क. पातेल्यात सारे जिन्नस ओतून ते सारे गरगट, पाण्याला थोडा चहाचा रंग येईपर्यंत खळाखळा उकळले.
ड. लेखिकेने व सहकाऱ्यांनी वारली लोकांसोबत चहा घेतला.
उत्तर:
चहात गूळ आणि दूध टाकून चहाच्या भुक्कीची वाट पाहत होते.

२. हे केव्हा घडले ते लिहा.
लेखिका शाळेच्या बाहेर, झाडाखाली, बाजेवर जाऊन पडली.
उत्तर:
जेव्हा सारी जमवाजमव होऊन चहा तयार होण्यास बराच वेळ लागेल याचा अंदाज लेखिकेला आला.

३. परिणाम लिहा.

i. लेखिका आणि कॉ. दळवी खूप थकले होते.
परिणामः झाडाखाली गार वाऱ्याची झुळूक लागताच त्यांना ताबडतोब झोप लागली.

ii. वारली लोकांनी बनवलेला चहाच घेण्याची इच्छा लेखिकेने बोलून दाखवली.
परिणाम: वारली लोकांना बरे वाटले व एक प्रमुख वारली चहा तयार करण्यासाठी चुलीपुढे सरसावला.

भाषाभ्यास विभाग

अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती

१. खालील वाक्ये वाचा व तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 24

२. खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा व लिहा.

  1. कौलारू घरे क्वचित दिसत.
  2. चुलीत व बाहेर ढीगभर राख !
  3. मोठ्या माणसांना सांगा, की टिटवाळ्याच्या सभेतले लोक आले आहेत.
  4. बापरे! अजून किती वेळ लागणार ?

उत्तर:

  1. कौलारू – विशेषण, क्वचित – क्रियाविशेषण अव्यय
  2. बाहेर – क्रियाविशेषण अव्यय, राख – नाम
  3. की – उभयान्वयी अव्यय, आहेत – क्रियापद
  4. बापरे ! – केवलप्रयोगी अव्यय

३. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखून लिहा.

  1. तो बकरी गवसायला गेला.
  2. तिने चहा केला.
  3. तिला कसेसेच होत होते.
  4. दादू चहा प्यायला.
  5. त्याने मडके स्वच्छ पाण्याने भरले.

उत्तर:

  1. कर्तरी प्रयोग
  2. कर्मणी प्रयोग
  3. भावे प्रयोग
  4. कर्तरी प्रयोग
  5. कर्मणी प्रयोग

४. खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा.
i. दरसाल
ii. अनादी
iii. विदयालय
iv. चौकोन
उत्तरः
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 43

५. खालील ओळींचे गण पाडा.

i. गिरिसम जरि ओतू काजळी सागरांती
सुरतरुवरशाखा लेखणी पत्र भूती
धरुनि जरि लिही ती शारदा सर्वकाल
तरि न तवगुणांच्या पार जाऊ शकेल
उत्तर:
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 25

ii. उपेक्षू नको गुणवंता अनंता
रघूनायका मागणे हेचि आता ।
उत्तर:
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 26

iii. घोडे कधी न खळती रविच्या रथाचे
उत्तर:
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 27

६. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

  1. फेरफटका मारणे
  2. चाहूल लागणे
  3. भास होणे
  4. ग्लानी येणे
  5. खाईत पडणे
  6. रपेट करणे
  7. रडकुंडीला येणे
  8. सावरून घेणे
  9. टकामका बघणे
  10. कुजबुज करणे
  11. गर्दी पांगणे
  12. नजरकैदेतून सुटणे
  13. मनातील कालवाकालव दडपणे
  14. तल्लफ येणे
  15. जीवात जीव येणे
  16. तंटा करणे
  17. वर्दी पोचणे

उत्तरः

  1. फेरफटका मारणे – फिरून येणे, चक्कर टाकणे.
    वाक्य: रघूने त्या उजाड माळरानावर एक फेरफटका मारला.
  2. चाहूल लागणे – एखादयाच्या असण्याची जाणीव होणे.
    वाक्य:मला घरात मनी आल्याची चाहूल लागली.
  3. भास होणे – मनाला भ्रम होणे.
    वाक्य:मला समोरच्या लाकडी खुर्चीत आजोबा बसले असल्याचा भास झाला.
  4. ग्लानी येणे – चक्कर येणे, मरगळ येणे. वाक्य:कडक उन्हात चालल्याने समीरला ग्लानी आली.
  5. खाईत पडणे – संकटात सापडणे.
    वाक्य:जंगलात भटकताना रस्ता चुकल्याने मिनू अचानक खाईत पडला.
  6. रपेट करणे – चकरा मारणे.
    वाक्य:सरसगडावरील खाणाखुणा पाहण्यासाठी आम्ही बरीच रपेट केली.
  7. रडकुंडीला येणे – रडायला येणे.
    वाक्य: आपला लेक घरी आला नाही हे कळताच शैलाताई रडकुंडीला आल्या.
  8. सावरून घेणे – सांभाळून घेणे.
    वाक्य: शितलने आपल्या उत्तम भाषणाने रटाळ कार्यक्रम सावरून घेतला.
  9. टकामका बघणे – उत्सुकतेने डोळे मोठे करून पाहणे.
    वाक्य: सुंदर स्मिताकडे गावातील बायकापोरे टकामका बघत होती.
  10. कुजबुज करणे – एकमेकांशी हळू आवाजात बोलणे. वाक्य: सदूभाऊंना अचानक दवाखान्यात नेल्याने गावातील लोक
    आपापसांत कुजबुज करू लागले.
  11. गर्दी पांगणे – गर्दी कमी होणे, गर्दी विखुरणे.
    वाक्य: डोंबाऱ्याचा खेळ संपताच रस्त्यावरील गर्दी पांगली.
  12. नजरकैदेतून सुटणे – इतरांच्या नजरांपासून सुटका होणे.
    वाक्यःसभेत रामभाऊ येताच सदाभाऊ लोकांच्या नजरकैदेतून सुटले.
  13. मनातील कालवाकालव दडपणे – मनातील काळजी, अस्वस्थता दडपणे.
    वाक्य: आपले दुःख लपवत रमेशने मनातील कालवाकालव दडपली.
  14.  तल्लफ येणे – हुक्की येणे.
    वाक्य:मला वाफाळता चहा पिण्याची तल्लफ आली.
  15. जीवात जीव येणे – हायसे वाटणे, मनातील अस्वस्थता दूर होणे.
    वाक्य: वाट चुकलेल्या आपल्या वासराला समोरून धावत येताना पाहून सदूच्या जीवात जीव आला.
  16. तंटा करणे – भांडण, वाद करणे.
    वाक्य: जमिनीच्या मालकी हक्कावरून माधवने आपल्या भावाशी तंटा केला.
  17. वर्दी पोचणे – बातमी / निरोप कळणे.
    वाक्य:सीमाला फोनवरून आजी सुखरूप घरी आल्याची वर्दी पोचली.

आ. भाषिक घटकांवर आधारित कृती

१. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

  1. सावली
  2. पाऊस
  3. पान
  4. दगड
  5. मार्ग

उत्तर:

  1. छाया
  2. वर्षा, पर्जन्य
  3. पर्ण
  4. शिळा, अश्म
  5. पथ, रस्ता

५. खालील शब्दांचे वचन बदला.

  1. म्हैस
  2. गाय
  3. काम
  4. ओळ
  5. चिन्हे
  6. कोपरे

उत्तरः

  1. म्हशी
  2. गाई
  3. कामे
  4. ओळी
  5. चिन्ह
  6. कोपर

पाड्यावरचा चहा पाठाची पार्श्वभूमी

प्रस्तुत पाठ म्हणजे निसर्गाच्या सहवासात आयुष्य व्यतित करणाऱ्या वारली समाजाच्या कष्टमय, खडतर जीवनाचे चित्रण होय. वारली समाजातील लोक राहत असलेला एक पाडा, तेथील सोईसुविधांचा आभाव, या लोकांमध्ये पाहुण्यांप्रति असलेला आदरभाव, आधुनिकतेचा स्पर्श न झालेल्या समाजाची लहान लहान गोष्टींसाठी होणारी धावपळ या सर्वांचे रेखाटलेले शब्दचित्र म्हणजे हा पाठ होय.

पाड्यावरचा चहा शब्दार्थ

Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 1
Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 2

पाड्यावरचा चहा वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 3

पाड्यावरचा चहा टिपा

Class 8 Marathi Balbharati Chapter 13 Question Answer पाड्यावरचा चहा 4

Leave a Comment