Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers

Maharashtra Board SSC Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers Solutions Pdf Download.

Maharashtra Board Class 10 Marathi Model Paper Set 6 with Answers

Time: 3 Hours
Total Marks: 80

कृतिपत्रिकेसाठी सूचना:-
(1) सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
(2) आकृत्या पेननेच काढाव्यात.
(3) उपयोजित लेखनातील कृतींसाठी (सूचना, निवेदन), आकृतीची आवश्यकता नाही. तसेच, या कृती लिहून घेऊ नयेत.
(4) विभाग 5 – उपयोजित लेखन प्र. 5 (अ) (2) सारांशलेखन या घटकासाठी गदय विभागातील प्र. 1 (इ) अपठित उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहावयाचा आहे.
(5) स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे.

विभाग 1 : गदय

पठित गदय

प्रश्न 1.
(अ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृत्या पूर्ण करा. (2)
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers 3

माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी ‘नाही ती भानगड आहे’, उगीच ‘हात दाखवून अवलक्षण आहे’, ‘पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!’ अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली; पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. ‘एकशे एक्याऐंशी पौंड.’ रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. “पोरत तर असता रात्रभर!” अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे.

“दोन महिन्यांत पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!” अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या ‘कॅलरीज’ मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले.

2. i. ‘कॅलरीज’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. (1)
ii. कारण लिहा.
लेखकाची झोप उडाली होती.(1)
3. स्वमत
तुम्ही एखादा संकल्प केला आणि तो पूर्ण केला नाही, तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील, याची कल्पना करून लिहा.
(आ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. i.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers 4
ii.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers 5

ही मॅच पाहिल्यावर तिच्या माझ्या मनावर फारच परिणाम झाला. विशेषत: मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी जी झिम्मड उडते, तेव्हाचे ते दृश्य काळजात भिडले. काही खेळाडू आनंदाने स्वाक्षरी देत होते, तर काही नाकारत होते. हा सर्व सोहळा पाहून मनात आले, की आपणही एक मोठे खेळाडू व्हावे. मग आपल्या भोवतीही अशीच स्वाक्षरीसाठी गर्दी होईल. बस तेव्हापासून स्वाक्षरीच्या तालमीला सुरुवात झाली विशेष म्हणजे वर्गात गणिताच्या तासाला वहीची अनेक पाने माझ्या स्वाक्षरीने भरू लागली. जर चुकूनमाकून शिक्षकांचे माझ्याकडे लक्ष गेलेच व मला प्रश्न विचारलाच तर न कळत माझ्या तोंडातून, ‘हाऊज दॅट ?’ असे उत्तर बाहेर पडे हे उद्गार ऐकून वर्गात एकच हशा होई आणि माझी मान लाजेने खाली होई; पण हीच लाजेने खाली घातलेली मान मी जेव्हा थोडयाच दिवसांनी आंतरशालेय सामन्यात 100 धावा केल्या, तेव्हा सर्वांच्या डोळ्यांतील कौतुकांचे भाव पाहण्यासाठी अभिमानाने वर झाली. माझे नाव मोठ्या अक्षरांत शाळेच्या बोर्डावर झळकले. विदयार्थ्यांनी आणि शिक्षकांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि त्याच वेळी प्रथम मला खेळत असल्याबद्दल धन्य-धन्य वाटले.

माझ्या मनात क्रिकेटचे बीज पेरले गेले आणि उगवले ते असे.

2. ओघतक्ता पूर्ण करा. (2)
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers 6
3. स्वमत (3)
तुमच्या मते लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज कसे उगवले ते लिहा.

अपठित गदय

(इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृत्या पूर्ण करा. (2)
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers 7

भारत हा सण, उत्सवांचा देश म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. या सणांमागे समाजाने एकत्र येणे, पर्यावरणाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे अशी अनेकविध कारणे आहेत; मात्र आजकाल हे सगळे उद्देश मागे पडून सण साजरे करण्याच्या पद्धती बदललेल्या दिसून येतात. गणेशोत्सवात होणारा कर्णकर्कश गाण्यांचा गोंगाट ध्वनिप्रदूषणास तर दिवाळीच्या सणात फटाक्यांचा अनिर्बंध वापर ध्वनी आणि वायूप्रदूषणास कारणीभूत ठरतो. निर्माल्याच्या नावाने जलप्रदूषणास हातभार लावला जातो. होळी, गोविंदासारख्या सणांत पाण्याचा अपव्यय केला जातो. सणांचे बदललेले स्वरूप संपूर्ण देशाला हानिकारक ठरत आहे. सण खऱ्या अर्थाने साजरे करण्याकरिता त्यामागील परंपरा, ती निर्माण होण्यामागे असलेली कारणे, त्यांचा मूळ उद्देश त्यांचे फायदे लक्षात घेणे व इतरांना उपद्रव न देता परंपरा जपणे आवश्यक झाले आहे.

2. i. चौकटी पूर्ण करा. (1)
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers 8
ii. एका वाक्यात उत्तर लिहा. (1)
सण कशाप्रकारे साजरे करण्याची आवश्यकता आहे?
उत्तर:
(अ)
पठित गदय
1.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers 9

2. i. ताटातले पदार्थ न दिसता लेखकाला त्या जागी काय दिसू लागले ?
ii. लेखकाचे वजन एकशे एक्याऐंशी पौंडपर्यंत वाढल्याचे त्यांच्या लक्षात येताच आपले वजन कमी केले पाहिजे या विचाराने लेखकाची झोप उडाली.

3. मी संकल्प केला; पण तो पूर्ण केला नाही ही गोष्ट माझ्या आई-वडिलांना नक्कीच आवडणारी नाही. त्यामुळे, बाबा या गोष्टीने माझ्यावर रागावतील, मला ओरडतील. आई-बाबांची प्रतिक्रिया ही नेहमीच एकमेकांना पूरक अशी असते. त्यामुळे, बाबा रागावल्यानंतर आई मला समोर बसवून बाबांच्या रागावण्याचं कारण समजावून सांगेल. माझी चूक, त्याचे परिणाम हे सगळं ती मला पटवून देईल. एवढंच नव्हे, तर मी माझा संकल्प कसा दृढ करावा, यासाठी ती मला मार्गदर्शनही करेल; पुन्हा संकल्प करण्यासाठी प्रेरित करेल. ताईची प्रतिक्रिया मला चिडवण्याची असेलच; पण तिचं चिडवणंही मी सकारात्मक पद्धतीने घ्यावं असाच आईचा सल्ला असेल. बाबांचा धाक, आईचं प्रेमळ मार्गदर्शन आणि ताईचं गमतीदार चिडवणं हे सगळं माझ्यासाठी प्रेरणा देणारं असेल हे नक्की.

(आ)
1.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers 10
2.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers 11

3. लेखकाची खेळाची आवड पुण्यात असताना वाय. एम. सी. ए. मध्ये जोपासली गेली. तिथे खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना पाहून त्यांच्या मनात क्रिकेटचे बीज पेरले गेले. प्रसिद्ध खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी लोकांची होणारी गर्दी पाहून लेखकाच्या मनात आपणही मोठे खेळाडू व्हावे आणि आपल्या भोवतीही लोकांनी स्वाक्षरीसाठी गर्दी करावी अशी इच्छा निर्माण झाली. त्यांनी स्वाक्षरीच्या तालमींनाही सुरुवात केली. आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करताना त्यांनी आंतरशालेय सामन्यात १०० धावा केल्या आणि विद्यार्थी व शिक्षकांची शाबासकी मिळवली. अशाप्रकारे, लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज उगवले असावे.

अपठित गदय

(इ)
1.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers 12

2. i.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers 13
ii. सणांमागील परंपरा, ती निर्माण होण्यामागील कारणे, त्यांचा मूळ उद्देश, त्यांचे फायदे लक्षात घेऊन व इतरांना उपद्रव न देता सण साजरे करण्याची आवश्यकता आहे.

Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers

विभाग 2 – पदय

प्रश्न 2.
(अ) कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
1. i. खालील आकृती पूर्ण करा. (1)
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers 14
शेतकऱ्यांना पाठबळ देणे
ii: चौकटी पूर्ण करा. (1)
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers 15

फुलाफुलांचे दाट ताटवे, जिथे पोचते दृष्टी
रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी.
धान्य देईना संगणक हा काळी आई जगवू
मातीमध्ये जे हात राबती तयांस देऊ पुष्टी….
रंग मजेचे, रंग उद्याचे
उधळ फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे
गच्च माजतील राने, होईल आभाळातून वृष्टी ….
रंग मजेचे रंग उदयाचे
डोंगरातून वाहत येते, खळाळते हे पाणी
फेनधवलशा तुषारांमध्ये, राहाल कैसे कष्टी?
रंग मजेचे, रंग उद्याचे
मिळेल पैसा मिळेल दोलत यंत्रांच्या संगती
आभाळाच्या छत्राखाली, एक अनोखी तुष्टी…
रंग मजेचे, रंग उद्याचे
हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या
गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी ….
रंग मजेचे, रंग उदयाचे

2. i. ‘कष्ट करणाऱ्यांना मदत करू’ या आशयाची ओळ शोधा. (1)
ii. ‘दौलत’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. (1)
3. खालील शब्दांचे अर्थ लिहा. (2)
i. फेनधवल
ii. अनोखी
iii. वृष्टी
iv. तुष्टी
4. ‘हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या
गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी’ या ओळींचे आशयसौंदर्य स्पष्ट करा. (2)
(आ) खालील मुद्दयांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
‘हिरवंगार झाडासारखं’
किंवा
‘योगी सर्वकाळ सुखदाता’
1. प्रस्तुत कवितेच्या कवीचे/कवयित्रीचे नाव लिहा. (1)
2. प्रस्तुत कवितेचा विषय लिहा. (1)
3. ‘पक्षी झाडांचे कुणीच नसतात
तरीही झाड त्यांचं असतं
मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते’ या ओळींचा सरळ अर्थ लिहा.
किंवा
‘जळ वरिवरी क्षाळी मळ। योगिया सबाह्य करी निर्मळ।
उदक सुखी करी एक वेळ। योगी सर्वकाळ सुखदाता।।’ या ओळींचा सरळ अर्थ लिहा. (2)
4. कवितेतून मिळणारा संदेश लिहा. (2)
5. खालील शब्दांचे अर्थ लिहा. (2)
कविता हिरवंगार झाडासारखं
i. मौन व्रत
ii. खडणे
iii. व्रत
iv. पानझड

किंवा

कविता- योगी सर्वकाळ सुखदाता
i. पांखोवा
ii. जेवीं
iii. निर्वाविणे
iv. निजज्ञान
उत्तर:
(अ)
1. i.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers 16
ii.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers 17

2. i. मातीमध्ये जे हात राबती, तयांस देऊ पुष्टी.
ii. यंत्रांच्या संगतीने मानवाला काय मिळेल ?

3. i. फेसाप्रमाणे पांढऱ्या
ii. निराळी / वेगळी
iii. पाऊस
iv. तृप्ती

4. ‘रंग मजेचे रंग उदयाचे’ या कवितेत कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी आजच्या संगणकयुगातील मानवाशी संवाद साधला आहे. त्याने निसर्गाचा मनमुराद आनंद लुटावा, पर्यावरण संवर्धन करावे असा संदेश यात दिला आहे. जागतिकीकरणाच्या या काळात जगणाऱ्या माणसाने निसर्गाशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध तुटू न देता निसर्गसौंदर्याचा खराखुरा आनंद घ्यावा असा विचार यात व्यक्त होतो.. हिरवीगार सृष्टी पाहताना, हिरव्या रंगाच्या विविध छटा डोळ्यांत साठवताना मनेही हिरवीगार होऊन जातील असे कवयित्री म्हणते. ही हिरवळ समृद्धी, शुद्धता, आनंद यांचे प्रतीक असते. ती स्वतःमध्ये सामावून घेतल्यास आपली मनेही शुद्ध, समृद्ध आणि आनंदाने भरलेली होतील. पावसामुळे आलेल्या समृद्धीमुळे मनात अनेक भावनिक आंदोलने निर्माण होतील. त्यातून एक कोवळी, लुसलुशीत, रेशमी सळसळ मनात निर्माण होईल. या सळसळण्यातून आपण विश्वाला पर्यावरण संवर्धन व संगोपनाचा संदेश देत राहू, असा आशय कवयित्री वरील ओळींद्वारे मांडत आहे.

(आ) कविता – हिरवंगार झाडासारखं
1. कवी – जॉर्ज लोपीस

2. ‘झाडांमधील विविध गुण स्वतःमध्ये रुजवण्याचा संदेश’ हा या कवितेचा विषय आहे.

3. पक्ष्यांचे झाडाशी कोणतेच नाते नसते. तरीही झाड त्यांना आसरा देते. कोणी झाड तोडण्यासाठी त्याच्या मुळांवर घाव घातला तरी झाड प्रतिकार करत नाही. निमूटपणे सहन करते.

4. ‘हिरवंगार झाडासारखं’ या कवितेत झाडांच्या सहनशीलता, परोपकारी वृत्ती, दानीपणा, कठीण प्रसंगांतही घट्ट पाय रोवून उभे राहण्याचा खंबीरपणा अशा गुणांचे वर्णन केले आहे. आनंदी व समृद्ध जीवन जगण्यासाठी मानवानेही हे सगळे गुण आपल्या अंगी बाणवायला हवेत. तसेच, आपणही झाडांसारखे हिरवेगार, ताजे व प्रफुल्लित जीवन जगायला हवे असा संदेश कवीने या कवितेतून दिला आहे.

5. i. काहीही न बोलणे
ii. तोडणे
iii. किंवा
iii. नियम
iv. पाने गळून पडणे

किंवा

कविता – योगी सर्वकाळ सुखदाता

1. कवी – संत एकनाथ

2. ‘योगीपुरुषाच्या गुणांची पाण्याशी तुलना करून योगीपुरुषाच्या गुणांचे श्रेष्ठत्व दर्शवून देणे’ हा या कवितेचा विषय आहे.

3. पाण्याने शरीराच्या बाह्यभागावरील मल वरच्यावर नष्ट होतो; परंतु योगीपुरुष त्याच्या संपर्कात येणाऱ्यांचे बाह्यरंग व अंतरंग दोन्ही निर्मळ करतो. पाणी प्यायल्यानंतर मिळणारे सुख हे काही काळापर्यंतच असते; परंतु योगीपुरुषाचा सहवास हा सर्वकाळ सुख देणारा असतो.

4. या कवितेत संत एकनाथांनी योगीपुरुष व पाण्याची तुलना केली आहे. योगीपुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, हे विविध उदाहरणांद्वारे ते पटवून देतात. योगीपुरुषाच्या संपर्कात राहिल्याने आपला अंतर्बाह्य विकास होतो. त्यामुळे, अशा योगीपुरुषाच्या सहवासात राहणे व आपला विकास घडवणे अत्यंत आवश्यक आहे, असे ते सांगू पाहत आहेत.

5. i. पक्षिणीचे पंख
ii. ज्याप्रमाणे
iii. संतुष्ट करणे
iv. आत्मज्ञान

Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers

विभाग 3 – स्थूलवाचन

प्रश्न 3.
खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. (6)
i. सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वतः च्या कल्पनेने लिहा.
ii. ‘जगणं कॅक्टसचं’ या पाठाआधारे वाळवंटात दिसणारे वनस्पतीसृष्टीचे वैभव पहाटे पडणाऱ्या स्वप्नाप्रमाणे असते, हे विधान स्पष्ट करा.
iii. मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत, ते ‘मोठे होत असलेल्या मुलांनो’ या पाठा आधारे सविस्तर लिहा.
उत्तर:
i. सूर्य : (उदास) अहो, कोणी ऐकतंय का? माझी अस्ताची वेळ झाली आहे. मी अस्ताला गेल्यानंतर या धरतीचे कसे होईल ? कोणी येईल का माझ्या मदतीला ? या पृथ्वीला अंधाराच्या खाईत जाण्यापासून वाचवा हो!
पणती : हे महान सूर्या ! मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे.
सूर्य : बोल… पणती !
पणती : (नम्रतेने) मी तुझी चिंता दूर करू इच्छिते. मला माहीत आहे, मी तुझ्याइतकी सामर्थ्यवान नाही ; पण मला जसे जमेल तसे मी पृथ्वीवरील अंध:कार दूर करण्याचा प्रयत्न करेन.
सूर्य : (आनंदाने) खरंच पणती, तू वाचवशील या पृथ्वीला ? तू करशील मला मदत?
पणती : हो ! आनंदाने.
सूर्य : तू लहान आहेस ; परंतु तुझी जिद्द मोठी आहे. तुझे हे बोल ऐकून माझ्या मनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
पणती : सूर्या, तू माझ्यावर विश्वास ठेव. मी नक्कीच तुझा विश्वास तुटू देणार नाही.
सूर्य : हो, पणती. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू नक्कीच या धरतीला प्रकाशित करशील. आता मी निश्चिंत मनाने अस्ताला जातो.
पणती : धन्यवाद भास्करा! तू मला माझी क्षमता दाखवण्याची संधी दिलीस. मी तुझा विश्वास कधीच ढळू देणार नाही.

ii. वाळवंटी प्रदेशात वर्षातून एकदाच पाऊस पडतो. अनेकदा तर तीन-तीन वर्षे पावसाचा पत्ता नसतो. अशावेळी येथील झाडे-झुडपे निष्पर्ण होतात. वनस्पतींच्या बिया जमिनीत सुप्तावस्थेत पडून राहतात. एक दिवस पाऊस पडला, की जादू व्हावी त्याप्रमाणे, पाहता पाहता निष्पर्ण झालेल्या झाडाझुडपांना पालवी फुटते. जमिनीत दडलेल्या बियांमधून रोपे उगवतात. त्यांना भरगच्च फुले येतात आणि तो ओसाड वाळवंटी प्रदेश पाहतापाहता हिरव्या, पिवळ्या, लाल रंगांनी नटून एखादया चित्रमय बगिच्याप्रमाणे दिसतो; पण हे सृष्टिवैभव फार काळ टिकून राहत नाही. लवकरच सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे हवा तापल्याने पाने, फुले, गवत करपून मातीत मिसळून जाते. मातीत मिसळलेल्या बिया पुढील वर्षीच्या पावसाची वाट पाहत राहतात. अशाप्रकारे, वाळवंटात दिसणारे वनस्पतीसृष्टीचे वैभव पहाटेच्या स्वप्नाप्रमाणे थोडाच काळ टिकणारे असते.

iii. मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करण्यासाठी ज्यांची नेमणूक केली जात असे ते लोक कामाचे स्वरूप, त्यांमधील बारकावे हे काहीही न शिकता प्रथम आपल्या हाताखाली काम करण्यासाठी मदतनिसांची मागणी करत. काम सुरू होण्याआधीच साधनसामग्रीची मागणी केली जात असे. या वृत्तीमुळेच ते काम कधी झाले नाही. काम शिकून, समजून घेण्यात कोणालाच रस नसे. वरिष्ठांना ही गोष्ट न आवडल्याने या कामासाठी कोणाची नेमणूक झाली नाही. यामुळेच, मेटलायझिंग प्रक्रियेवर काम झाले नसावे असे वाटते.
[टीप : विदयार्थ्यांनी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे.]

Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers

विभाग 4 – भाषाभ्यास

प्रश्न 4.
(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती.
1. खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. (2)
i. चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली.
ii. गर्दीत कुणाचा धक्का लागला तर?
2. कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा. (2)
i. तुझा बेत पार पडणे शक्य नाही. (होकारार्थी करा.)
ii. तुम्ही रोज पाढे म्हणा. (विधानार्थी करा.)
3. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. (कोणतेही दोन) (4)
i. अंगाचा तिळपापड होणे
ii. गलका करणे
iii. आर्जव करणे
(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती.
1. शब्दसंपत्ती
i. विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. प्रामाणिक अ. साम्य
2. फरक ब. प्रशंसा
क. अप्रामाणिक

ii. खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. (1)
एखादया व्यक्तीच्या आयुष्याचे वर्णन करणारा लेखनाचा प्रकार
iii. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा. (1)
वजन कमी करण्याचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो.
iv. खालील शब्दांचे लिंग बदला. (1)
अ. दिग्दर्शक
ब. मैत्रीण
2. लेखननियमांनुसार लेखन
अचूक शब्द ओळखा. (2)
i. पारंपरिक / पारंपारिक / पारंपरीक / पारपंरिक
ii. दृष्टीकोन / द्रुष्टिकोन / दृश्टीकोन / दृष्टिकोन
3. विरामचिन्हे
खालील वाक्ये योग्य विरामचिन्हांचा वापर करून पुन्हा लिहा. (2)
i. अगदी बरोबर तुझे उत्तर खूपच छान होते
ii. ताई तुझी परीक्षा कधी संपणार
उत्तर:
(अ)
1. i. विधानार्थी वाक्य
ii. प्रश्नार्थी वाक्य
2. i. तुझा बेत पार पडणे अशक्य आहे.
ii. तुम्ही रोज पाढे म्हणावे.

3. i. अंगाचा तिळपापड होणे – संताप होणे.
वाक्य : अनेक वेळा सांगूनसुद्धा जेव्हा शेजाऱ्यांनी खिडकीतून कचरा खाली टाकला, तेव्हा समीरच्या अंगाचा तिळपापड झाला.
ii. गलका करणे गोंगाट करणे.
वाक्य : बाई वर्गातून बाहेर जाताच वर्गात मुलं गलका करू लागली.
iii. आर्जव करणे – विनंती करणे.
वाक्य : कर्ज फेडण्यासाठी थोडा वेळ दयावा म्हणून तो गरीब शेतकरी सावकाराकडे आर्जव करत होता.
(टीप: विद्यार्थ्यांनी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करणे अपेक्षित आहे.]

(आ) 1. i.

1. प्रामाणिक अप्रामाणिक
2. फरक साम्य

ii. चरित्र
iii. वजन कमी करण्याचे मार्ग भलत्याच काट्यातून जातात.
iv. अ. दिग्दर्शिका
ब. मित्र

2. i. पारंपरिक
ii. दृष्टिकोन

3. i. अगदी बरोबर! तुझे उत्तर खूपच छान होते.
ii. ताई, तुझी परीक्षा कधी संपणार?

Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers

विभाग 5 – उपयोजित लेखन

प्रश्न 5.
(अ) खालील कृती सोडवा.
1. पत्रलेखन
खालील सूचना वाचा व कृती सोडवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers 18

किंवा

2. सारांशलेखन
विभाग 1 गदय (इ) (प्र. क्र. 1 – इ) मधील अपठित उताऱ्याचा एक तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.
1. जाहिरातलेखन (शब्दमर्यादा 50 ते 60 शब्द)
‘टेस्टी बिस्किट्स’ या उत्पादनाची जाहिरात तयार करा.
2. बातमीलेखन (शब्दमर्यादा 50 ते 60 शब्द)
खालील विषयावर बातमी तयार करा.
विदयासागर विदयालय येथे मराठी भाषा दिन साजरा
3. कथालेखन (शब्दमर्यादा 80 ते 90 शब्द)
खालील मुद्द्यांवरून कथा लिहा.
[मुद्देः मुलगा व आई – फणस पिकणे – मुलाला गऱ्यांची आवड – आईने आधी गरे शेजाऱ्यांना वाटणे – मुलगा नाराज – आईने समजावणे देतो तो देव – राखून ठेवतो तो राक्षस स्वतः आधी इतरांचा विचार]
(इ) लेखनकौशल्य (8)
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. (शब्दमर्यादा 100 ते 120 शब्द)
1. प्रसंगलेखन
‘माझा पहिला उपवास’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers 19
2. आत्मकथन
मी फळा बोलतोय… या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे लेखन करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers 20
3. वैचारिक लेखन
‘झाडे लावा झाडे जगवा…’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे लेखन करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers 21
उत्तर:
(अ)
1. औपचारिक पत्र (मागणी)
दिनांक 30 जून 2023.
प्रति,
मा. रमाकांत जांभळे,
संचालक,
वृक्षवल्ली नर्सरी,
वनराई, हमरापूर,
रायगड – xxxxxx
विषय: वृक्षारोपणाकरिता रोपांची मागणी करण्याबाबत.
माननीय महोदय,

मी अ.ब.क. ‘नवोदय हायस्कूलचा’ विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणांस पत्र लिहीत आहे. यावर्षी आमच्या शाळेने वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यातील पहिल्याच आठवड्यात हा वृक्षारोपण सोहळा पार पाडण्याचे ठरले आहे. त्याचबरोबर शाळेच्या परिसरात लहानसे वनौषधी उद्यान तयार करायचे आहे.

यासाठी आवश्यक असणाऱ्या रोपांची यादी मी सोबत जोडत आहे. ती लवकरात लवकर शाळेत पाठवण्याची व्यवस्था करावी ही विनंती. योग्य त्या रकमेचा धनादेश त्वरित आपल्याला देण्यात येईल. पर्यावरण संवर्धनाच्या आमच्या प्रयत्नाला आपण साथ दयाल व योग्य ती सवलत दयाल, असा आम्हांला विश्वास आहे.

वनस्पतींची नावे नग
i. अडुळसा 15
ii. आवळा 7
iii. कोरफड 8
iv. ब्रह्म नग 5
v. जांभूळ 10
vi. सुबाभूळ 11

कळावे,
आपला विश्वासू,
अ. ब. क.
विदयार्थी प्रतिनिधी,
नवोदय हायस्कूल.
महाड,
रायगड – xxxxxx
[email protected]

किंवा

अनौपचारिक पत्र (अभिनंदन)
दिनांक : 5 ऑगस्ट 2022.
प्रिय दादा,
सप्रेम नमस्कार.
अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!
दादा, कालच वर्तमानपत्रात तुला ‘वनराई’ या संस्थेने ‘वृक्षमित्र’ ही पदवी देऊन सन्मानित केल्याची बातमी वाचली. खूपच आनंद झाला ही बातमी वाचून! आपल्या सर्व परिवाराला ही बातमी कळली आहे. सारेच खूश आहेत तुझ्या कामगिरीवर !

प्रगतीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सर्रास वृक्षतोड होत आहे. हा नाश थांबवण्यासाठी छोटासा हातभार म्हणून तू वनराई संस्थेच्या ‘वृक्षसंवर्धन’ मोहिमेत सहभागी झालास. वृक्षतोड थांबवण्यासाठी संस्थेने आखलेल्या प्रत्येक मोहिमेला तू फक्त हजर राहायचा नाहीस तर पुढाकार घेऊन ती मोहीम यशस्वी करायचास. गडकिल्ल्यांच्या आसपासच्या परिसरात वृक्षारोपण करणे, संस्थेने लावलेल्या झाडांची जपणूक नीट होत आहे ना हे पाहणे अशा प्रत्येक कामात तू हिरिरीने भाग घेतोस आणि स्वतःला झोकून देतोस. तू केलेल्या परिश्रमांचे फळ किंवा कौतुकाची थाप तुला या पुरस्काराद्वारे मिळत आहे, हे खूप अभिमानास्पद आहे.

दादा, तुझ्यासारख्या ध्येयवेड्या पर्यावरणप्रेमींची आज निसर्गाला गरज आहे. मला तुझा खूप खूप अभिमान वाटतो.

पुनःश्च एकदा अभिनंदन ! तब्येतीची काळजी घे आणि सर्वांना लवकरच भेटायला ये.
तुझाच भाऊ,
अ. ब. क.
सरस्वती निवास,
पळसाई पेठ, महाड
रायगड – xxxxxx
[email protected]

किंवा

2. सारांश
भारतात पर्यावरणाचे संवर्धन करत सर्वांनी एकत्र येण्याकरिता सण साजरे केले जातात; मात्र आज सणांचे विद्रुपीकरण झालेले दिसते. गणेशोत्सव, दिवाळी, दहीहंडी, होळी इत्यादी सणांमध्ये ध्वनी, जल, वायू प्रदूषण होताना दिसून येते. सणांचा मूळ हेतू समजून घेऊन इतरांना त्रास न देता सण साजरे करणे आवश्यक आहे.
[टीपः विदयार्थ्यांनी कोणतीही एक कृती सोडवणे अपेक्षित आहे.]

(आ)
1.
Maharashtra Board Class 10 Marathi Sample Paper Set 6 with Answers 22

2.

लोकमानस
विद्यासागर विद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा
28 फेब्रुवारी 2023
कराड (जि. सातारा) :
दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही येथील विद्यासागर विद्यालयामध्ये 27 फेब्रुवारी या दिवशी कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त काव्यवाचन, निबंधलेखन, कथालेखन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक श्री. प्रविण दवणे उपस्थित होते. या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या काव्यवाचन, निबंधलेखन, कथालेखन या तिन्ही स्पर्धांमध्ये विदयार्थी, विदयार्थिंनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. प्रमुख पाहुणे श्री.दवणे सर यांनी मुलांना मराठी भाषेतील शब्दांच्या गमतीजमती उलगडून दाखवल्या. तसेच, आपल्या आयुष्यातील भाषेचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर ‘वंदे मातरम्’ या गीताच्या गायनाने या बहारदार कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

3. एक वाटा संस्कारांचा
एका गावात रघू नावाचा एक मुलगा व त्याची आई राहत असे. बाबा कामानिमित्त बाहेरगावी असत. छोट्या रघुला फणसाचे गरे फार आवडत. झाडाला फणस लागल्यापासून ते कधी पिकणार? असा प्रश्न घेऊन तो आईमागे फिरत असे. एकदा आईने एक पिकलेला फणस काढून ठेवला. घू नजर त्यावर पडताच तो भलताच खूश झाला. आईने तो फणस कापण्याची रघू वाटच पाहत होता. त्यातच त्याला झोप कधी लागली ते कळलेच नाही.

सकाळी उठला तेव्हा घरात गऱ्यांचा घमघमाट पसरला होता. रघूच्या चेहऱ्यावर आनंदाने हसू आले. धावतच तो स्वयंपाकघरात आईपाशी पोहोचला. त्याने गन्यांकरिता आईसमोर हात पुढे केला. आईने त्याला गरे न देता आधी आंघोळीला पाठवले. पटापट आंघोळ उरकून रघू बाहेर आला. पुन्हा गन्यांच्या दिशेने वळला. आईने त्याला अडवले. हातात दोन वाट्या दिल्या. गरे होते त्यात! पण ते गरे त्याच्यासाठी नसून ‘ते शेजारी देण्याकरिता होते, हे आईने सांगताच रघूचा चेहरा पडला. पाय आपटत तो शेजारच्या दोन घरांत गरे देऊन आला. चेहऱ्यावर प्रचंड नाराजी पसरलेल्या रघुला अशा आणखीन सहा वाट्या घेऊन शेजारच्या घरांमध्ये जावे लागले. आता मात्र रघूची सहनशक्ती संपली होती.. त्याचा राग अनावर झाला होता. रघू कोपऱ्यात जाऊन रुसून बसला.

रघू रुसला, की त्याचे नाक लाल होई. आईने ते हेरलं आणि लगेचच तिने रघूला जवळ बोलावलं. थोड्या नाराजीने तो आईजवळ आला. आईने त्याला मांडीवर बसवले आणि सांगितले, “बाळ रघू. आपण कोणतीही खाण्याची वस्तू आणली तरी ती इतरांना आधी दयावी. नंतर आपण स्वत: खावी. तुला गरे आवडतात. ते तुझ्यासाठी शिल्लक राहिलेच आहेत. जीवनात पुढेही तू लक्षात ठेव, की नेहमी दुसऱ्यांचा विचार आधी करावा आणि नंतर स्वतः चा जो देतो तो देवमाणूस असतो आणि जो फक्त स्वत:साठी राखून ठेवतो तो राक्षस असतो. आईचे हे बोल ऐकल्यावर रघूची नाराजी निघून गेली. तो आज नवा धडा शिकला होता. संस्कारांचा मोठा वाटा आणि आता आईने दिलेल्या गऱ्यांचा सगळ्यांत मोठा वाटा रघुच्या समोर होता. खुदकन हसत गोड रघूने गोड मधुर गरा अलगद तोंडात टाकला.
तात्पर्यः स्वतःचा विचार करण्यापूर्वी नेहमी इतरांचा विचार करावा.
[टीपः विदयार्थ्यांनी कोणत्याही दोन कृती सोडवणे अपेक्षित आहे.]

(इ)
1. प्रसंगलेखन
माझा पहिला उपवास
इयत्ता चौथीची गोष्ट. आईसोबत प्रथमच हरतालिकेचा उपवास करायचा, असा मी मनाशी निश्चय केला. झाले! त्यादिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ केली. नवीन कपडे घातले. भूक लागली होती. मग आईसोबत ग्लासभर दूध प्यायले. पुन्हा थोड्या वेळाने पोटात कावकाव सुरू झाली. मग आईने बजावले असतानाही सफरचंद, एक पेरू, एक सीताफळ खाल्लेच. मग आम्ही दोघी मंदिरात गेलो, आईने हरतालिकेची माहिती सांगितली. पानं खाऊन राहणाऱ्या पार्वतीची कथा सांगितली. उपवासाचे छान छान पदार्थ चाखायला मिळतील म्हणून किंवा काय असतो वरं हा उपवास? ते जाणण्यासाठी मी उपवास पकडला खरा; पण आता उपवासाच्या अनुभवाने मला खाखा सुटली होती. बाजारात आईने घेतलेले शहाळे, उसाचा रस पिऊन घरी आले आणि आल्याआल्या काल आईने विरजण घातलेले दही चाटून पुसून खाल्ले. पाणीही न पिता किंवा काहीही न खाता उपवास करणाऱ्यांविषयी मला त्यादिवशी मनोमन आदर वाटला आणि ‘एकादशी दुप्पट खाशी’ असे का म्हणत असावेत त्याचा अनुभव आला.

संध्याकाळ झाली. आई घरातील इतरांसाठी स्वयंपाक करत होती. त्या वासाने माझा जीव नुसता वर खाली होत होता. इवलेसे तोंड करून मी पुन्हा माझ्या जागी जाऊन वसले. उपवास करून मीच माझ्या पायावर… नव्हे पोटावर धोंडा मारून घेतला होता! पण आईचे भारी कौतुक वाटले, की स्वतःचा उपवास असून इतरांसाठी एवढे खमंग पदार्थ स्वत: च्या हाताने बनवताना हिच्या तोंडाला पाणी का बरे सुटत नाही!

तेवढ्यात आई आली, ताटलीत उकडलेला बटाटा होता. माझ्या हातात ती ताटली ठेवून म्हणाली, “चिनू, उपवास म्हणजे संयम. मनावर, तोंडावर नियंत्रण मिळवणे. उप + वास म्हणजे ‘एखादयाच्या म्हणजे परमेश्वराच्या, चांगल्या विचारांच्या सतत सहवासात राहिले पाहिजे.’ आपल्या भरकटणाऱ्या मनाला एका जागी बसवण्यासाठी, ज्याने आपल्याला हे सुंदर जीवन दिले, त्याला थँक्यू म्हणण्यासाठी चांगल्या कृती करण्यासाठी हा दिवस असतो. यात इतके तल्लीन व्हायला हवे, की तहानभूक विसरता यायला हवी. हे खाऊन घे, बरं.” आई निघून गेली; पण बराच वेळ तिचा आवाज माझ्या कानात घुमत राहिला. आज लोक कॅलरीज वाढू नयेत, म्हणून उपवास करतात व स्वत:ला आधुनिक समजतात किंवा उपवास केल्याने देव प्रसन्न होईल, काहीतरी देईल या समजुतीने उपवासाचा बाजार करतात; पण माझ्या आईने मला सांगितलेला उपवासाचा अर्थ काहीतरी भन्नाट होता. त्यानिमित्ताने उपवासाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला होता. माझा हा पहिला उपवास असा अविस्मरणीय ठरला.

किंवा

2. आत्मकथन
मी फळा बोलतोय….
“अरे वा! किती सुंदर सजवलंयस तू मला! अगं, ओळखलं नाहीस ? मी तुमचा फळा बोलतोय. आज चित्रकलेच्या तासाला तू माझ्यावर हे छानसं निसर्गचित्र काढलंस. त्यामुळे, मला किती शोभा आली! खूप आनंद वाटला.

माझा वापर बाई गणिते लिहिण्यासाठी, कठीण शब्द, प्रश्न-उत्तरे लिहून दाखवण्यासाठी, चित्रे काढण्यासाठी करतात. तुम्ही मुलेही रोज शाळेत आल्यावर आळीपाळीने माझ्यावर दिनांक, बार, सुविचार, विषय, हजर-गैरहजर लिहून मला सजवता, तेव्हा कोण आनंद होतो म्हणून सांगू ! मी रंगाने जरी काळा किंवा हिरवा असलो तरी माझ्यावर उमटणाऱ्या मोत्यासारख्या सुंदर टपोऱ्या अक्षरांनी माझी शोभा वाढते. मधल्या सुट्टीत तुम्ही मुले खाली पडलेल्या खडूच्या तुकड्यांनी माझ्यावर चित्र काढता, नक्षी काढता तेव्हा मला खूप छान वाटते; मात्र वर्ग प्रतिनिधी दंगा करणाऱ्या मुलांची नावे माझ्यावर लिहितात तेव्हा वाईट वाटते मला.

आज जसजशी तंत्रज्ञानात प्रगती होत आहे तसतसे माझे स्वरूपही बदलत चालले आहे हे खरे. माझी जागा सध्या पांढऱ्या फळ्याने घेतली आहे, ज्यावर मार्करने लिहिले जाते. हल्ली शिक्षक ऑडिओ-व्हिज्युअल तंत्राचा वापर करून पांढऱ्या पडदयावर ध्वनिचित्रफितीद्वारे शिकवतात किंवा प्रोजेक्टर वापरतात; पण विदयार्थ्यांमध्ये माझी लोकप्रियता अजूनही टिकून आहे. माझी निर्मिती करणाऱ्या, मला काळजीपूर्वक वापरणाऱ्या, मला सजवणाऱ्या, मला डस्टरने स्वच्छ करणाऱ्या प्रत्येकाविषयी मला खूप आदर आहे. तुमच्या असण्याने माझ्या असण्याला अर्थ आहे. ज्ञानदानाच्या या महान कार्यात माझा वापर होतो, याचा मला निश्चितच खूप आनंद आहे.
पण… एक सांगू? कधी कधी तुम्ही माझी योग्य ती काळजी घेत नाही. माझ्यावर खड्डू, पट्टी, पेन्सिल फेकून मारता, कधी कधी तर माझ्यावर धूळ आहे, मी अस्वच्छ आहे, याकडे दुर्लक्ष करता. काहीजण उगीचच माझ्यावर रेघोट्या ओढतात, मला खडूने ओरखडतात. तेव्हा मलाही दु:ख होते रे… माझं अस्तित्व तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी आहे, तेव्हा माझी काळजी घ्या. पाढे, कविता, गाणी, म्हणी, वाक्प्रचार, सुविचार, चित्रं यांनी मला सजवा आणि स्वतःचे ज्ञान वाढवा. चला, तुला आता घरी जायला हवं. मी सांगितलं ते मात्र नीट लक्षात ठेव. अच्छा!”
किंवा

3. वैचारिक लेखन
झाडे लावा झाडे जगवा
‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे!’ खरेच, निसर्गाचा अविभाज्य घटक असलेली ही झाडे आपले सगेसोयरेच असतात; कारण झाडांमुळे पाऊस वेळेवर व मुबलक प्रमाणात पडतो. चांगला पाऊस पडला, की शेतीभाती पिकते. परिणामी, पृथ्वीवरील सर्व सजीवांना अन्न, पाणी उपलब्ध होते. झाडांची मुळे जमिनीची धूप होऊ देत नाहीत. ती माती घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता (भूजल पातळी) वाढते. जलचक्र सुरळीत चालते. झुडूप, वेली, रोपटी वृक्ष इत्यादी झाडांच्या विविध प्रकारांमुळे निसर्गात जैवविविधता जपली जाते. हिरव्यागार झाडांमुळे जणू सृष्टीने हिरवा शालू नेसला आहे असे वाटते. वातावरण प्रफुल्लित होते.

मानवी जीवनातही झाडांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. झाडाच्या प्रत्येक अवयवाचा वापर करून मानव रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तू बनवतो. शेंड्यापासून मुळापर्यंत झाडांचे सर्व भाग मानवाच्या उपयोगी पडतात. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा झाडांमुळेच भागवल्या जातात. झाडांपासून कागदनिर्मिती घडते. झाडे मानवाला जीवनदर्शन घडवतात. त्यांना तोडणाऱ्यांनाही ती फळेच देतात. त्यांची परोपकारी वृत्ती, दानीपणा, कठीण प्रसंगातही खंबीर राहण्याची अचल वृत्ती आपण जीवनात कसे जगावे याचे ज्ञान ही झाडेच देतात. झाडांचे अस्तित्व मानवात उत्साह भरते, हिरवाई चैतन्य निर्माण करते. झाडे असतील, तर तेथे पशुपक्षी राहतात. या पक्ष्यांच्या किलबिलाटाने प्राण्यांच्या अस्तित्वाने वातावरण प्रसन्न होते. झाडांच्या सावलीत थकलाभागला वाटसरू विश्रांती घेत असतो. कडक उन्हाच्या झळा कमी करून वातावरणात गारवा टिकवण्याचे काम झाडे करतात.

परंतु, आज मानवाच्या हव्यासापायी निसर्गाचे पावलोपावली शोषण घडत आहे. शहरीकरणाच्या, प्रगतीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. लागवडीखालची जमीन, वनराया नष्ट करून तेथे इमारती, गृहप्रकल्प उभारले जात आहेत. परिणामी, नैसर्गिक संपत्तीचा, पर्यावरणाचा अतोनात ऱ्हास होत चालला आहे. त्यातून अवकाळी पाऊस, जागतिक तापमानवाढ, हिमनग वितळणे, त्सुनामी, भूकंप, भूस्खलन अशा नैसर्गिक समस्या वाढत चालल्या आहेत.

हा नाश जर थांबला नाही, तर तो संपूर्ण सृष्टीच्या विनाशाला आमंत्रण देईल. झाडे नसतील, तर डोंगर उघडेवोडके पडतील. वातावरण भकास होईल. जमिनीची धूप वाढेल. दुष्काळ, पूर,

अतिवृष्टी असे बदल निसर्गात घडू लागतील. प्राणीपक्ष्यांची आश्रयस्थाने नष्ट होतील. त्यामुळे, त्यांची संख्या घटेल. हिंस्त्र, जंगली प्राणी मनुष्यवस्तीत शिरून मानवांचा फडशा पाडतील. सर्वत्र हाहाकार माजेल.

हा सर्व ऱ्हास थांबवण्यासाठी ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा मूलमंत्र ‘जीवनमंत्र’ बनवणे गरजेचे आहे. वृक्षदिंडी काढून, नारे देऊन हा प्रश्न सुटणार नाही. याउलट, प्रत्येक मानवाने पर्यावरणपूरक, पर्यावरणस्नेही उत्पादने वापरण्यावर भर दिला पाहिजे. दरमाणशी किमान एक तरी झाड लावले गेले पाहिजे व लावलेल्या झाडाचे आजन्म संगोपन केले पाहिजे.

परिवारातील एका सदस्याप्रमाणे स्वतः लावलेल्या झाडाची जबाबदारी आपण काळजीपूर्वक घेतली पाहिजे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. आरक्षित वनक्षेत्रे, वनराया यांच्या संवर्धनासाठीचे सुधारित कायदे, नियम अंमलात आणले गेले पाहिजेत.

‘एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या मंत्राने सर्वांनी एकत्र येऊन वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन व वृक्षसंगोपनाची मोहीम राबवली तरच ही सृष्टी नंदनवन बनेल.
चला तर मग, प्रतिज्ञा करू,
‘जगवू झाडे, लावू झाडे मंत्र जपू सारे।
नव्या मनूतील गर्द राईचे बाळकडू प्या रे।’

SSC Maharashtra Board Marathi Question Paper with Answers

Leave a Comment