Balbharti Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 9.1 वाचनाचे वेड Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 9.1 वाचनाचे वेड
Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 9.1 वाचनाचे वेड Textbook Questions and Answers
1. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते?
उत्तर:
सोनालीने आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान दोन पाने अवांतर वाचावीत, असे आईला वाटत होते.
प्रश्न 2.
सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल का वाटत होते?
उत्तर:
वाचनाची बिलकूल आवड नसलेली सोनाली पुस्तक वाचनात रस घेत असल्याचे पाहून घरातील सर्वांना नवल वाटत होते.
प्रश्न 3.
सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी काय केले?
उत्तरः
सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी तिच्या वाढदिवसाला एक छानसे पुस्तक तिला भेट दिले.
2. खालील घटनांमागील कारणे लिहा.
प्रश्न 1.
आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले.
उत्तर:
सोनालीच्या आईला शाळेत पाहुणी म्हणून जायचे होते. तिथल्या मुलांना एक गोष्ट सांगायची होती. गोष्टीच्या पुस्तकातील एक गोष्ट सांगावी असे आईला वाटत होते. पण नक्की कोणती गोष्ट सांगावी ते समजत नव्हते. सोनालीने त्या पुस्तकातून छानशी गोष्ट निवडून दयावी असे आईला वाटले, म्हणून आईने सोनालीच्या हातात गोष्टीचे पुस्तक दिले.
प्रश्न 2.
आईने सोनालीला कथेचा सारांश’ लिहायला सांगितला.
उत्तरः
आईने दिलेल्या गोष्टीच्या पुस्तकातील सगळ्याच कथा सोनालीला आवडल्या. मात्र त्यातली कोणती कथा निवडावी ते तिला समजत नव्हते. सोनालीची ही समस्या समजताच आईने तिला कथेत नेमके काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक कथेचा सारांश लिहायला सांगितला.
प्रश्न 3.
सोनालीला आता ‘पुस्तके वाचत जा’, असे सांगण्याची गरज उरली नाही.
उत्तरः
सोनालीला अवांतर वाचनाची बिलकूल आवड नव्हती. आईला कथा निवडीत मदत करण्याच्या निमित्ताने गोष्टीचे पुस्तक वाचताना तिला त्यात रस वाटू लागला. कथेचा सारांश लिहिण्याच्या निमित्ताने तिने त्या पुन्हा पुन्हा वाचल्या. केवळ आईनेच नव्हे तर शाळेतल्या बाईंनीही यासाठी अभिनंदन करून शाबासकी दिली. सोनालीला फार आनंद झाला. प्रोत्साहन म्हणून बाबांनीही वाढदिवसाला पुस्तक भेट दिले. एकंदरीतच तिच्या वाचनाची आवड वाढल्यामुळे तिला आता ‘पुस्तके वाचत जा’, असे सांगण्याची गरज उरली नाही.
3. खालील आकृती पूर्ण करा.
प्रश्न 1.
खालील आकृती पूर्ण करा.
उत्तरः
4. अभ्यासाबरोबरच तुम्हांला इतर कोणत्या गोष्टी करायला आवडतात? का ते लिहा.
प्रश्न 1.
अभ्यासाबरोबरच तुम्हांला इतर कोणत्या गोष्टी करायला आवडतात? का ते लिहा.
उत्तरः
अभ्यासाबरोबरच इतर अनेक गोष्टींचा छंद जोपासण्याची आवड मला घरच्यांमुळे लागली. मला मैदानी खेळ खेळण्यास खूप आवडतात. त्यामुळे शरीर सुदृढ रहाते. अवांतर वाचनामुळे समृद्ध जीवनाचा अनुभव मिळतो. मी फावल्या वेळात टीव्ही देखील पहाते. त्यामुळे बाहेरील जगातील घडामोडींचा अंदाज येतो. अभ्यासाबरोबरीने मी नृत्याची आवडही जोपासली आहे. त्यामुळे मन प्रसन्न वाटते. अभ्यासाबरोबरच इतर गोष्टींमध्येही रस घेतल्याने अभ्यासालाही प्रेरणा मिळते.
खेळू्र शबदराशी.
अ. खालील वाक्प्रचारांच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.
प्रश्न अ.
सफल होणे –
1. यशासाठी झटणे
2. यशस्वी होणे
3. अपयश येणे.
उत्तर:
1. यशस्वी होणे
प्रश्न आ.
नोंदी करणे
1. लिहून ठेवणे
2. नोंदवही लिहिणे
3. लक्षात ठेवणे.
उत्तर:
2. लिहून ठेवणे
प्रश्न इ.
आनंद गगनात न मावणे –
1. आनंद वाहून जाणे
2. दु:खी होणे
3. खूप आनंद होणे.
उत्तर:
3. खूप आनंद होणे
प्रश्न ई.
नवल वाटणे –
1. आश्चर्य वाटणे
2. खूप आनंद होणे
3. नाराज होणे.
उत्तर:
1. आश्चर्य वाटणे
आ. खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा.
प्रश्न अ.
आमूलाग्र
उत्तर:
जमिनीवर नवनवीन प्रयोग केल्यामुळे शेतीत आमूलाग्र बदल दिसून आला.
प्रश्न आ.
शाबासकी
उत्तर:
शाबासकीची एक थाप विदयार्थ्यांसाठी प्रोत्साहन ठरते.
प्रश्न इ.
अवांतर
उत्तर:
अवांतर गोष्टींच्या अतिरिक्त वापरामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे आजकालच्या मुलांमध्ये आढळून येते.
इ. खालील शब्दांचे समानार्थी शब्द चौकटीतून शोधून लिहा.
प्रश्न 1.
अ. बक्षीस
आ. यश
इ. गोष्ट
ई. मदत
उ. आवड.
उत्तर:
पारितोषिक
विजय
कथा
साहाय्य
रस.
ई. हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्द वाचा व त्यांचे अर्थ समजून घ्या.
प्रश्न 1.
उत्तर:
- हस्तकला: हातांनी कागदापासून साकारलेली कला.
- हस्ताक्षर’: हातांनी लिहिलेले लेखन, अक्षर.
- हस्तांदोलन: दोन व्यक्तींनी एकमेकांशी हात मिळवण्याची कला.
- हातकंकण: हातात घालायचा दागिना, बांगडी.
- हातखंडा: एखाद्या गोष्टीत तरबेज असणे.
- हातमोजे: हातात घालायचे मोजे.
- हस्तक्षेप: एखादया गोष्टीत अनावश्यक दखल देणे, लुडबुड करणे.
- हातोहात: अगदी सहज.
- हातभार: मदत.
- हातभर: हाताच्या उंचीएवढे.
- हस्तरेषा: हातावरील रेषा.
उपक्रम:
तुम्हांला आवडणाऱ्या विषयांची पुस्तके वाचा. वाचलेल्या प्रत्येक पुस्तकाचा थोडक्यात सारांश आपल्या वहीत लिहा.
आपण समजून घेऊया.
प्रश्न 1.
खालील वाक्ये वाचा.
(अ) अजय आणि विजय शाळेत पोहोचले अन् पावसाची रिपरिप सुरू झाली.
(आ) मला पाऊस खूप आवडतो, कारण मला पावसात भिजायला आवडते.
(इ) रमेश व रत्ना मावशीकडे पुण्याला गेले.
(ई) आम्ही खूप प्रयत्न केले म्हणून आम्ही जिंकलो.
(उ) बाबा रिक्षा किंवा बसने प्रवास करतात.
वरील वाक्यांतील अधोरेखित शब्द उभयान्वयी अव्यये आहेत. शिवाय, की, परंतु, म्हणजे, तरी, नि, अन् हे सर्व शब्द दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडण्याचे काम करतात, म्हणून हे शब्द उभयान्वयी अव्यये आहेत.
लक्षात ठेवा:
उभय म्हणजे दोन व अन्वय या शब्दाचा अर्थ संबंध असा आहे. वाक्यातील दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांचा संबंध जोडणे, हे उभयान्वयी अव्ययाचे कार्य आहे.
प्रश्न 2.
खालील संवादातील उभयान्वयी अव्यये अधोरेखित करा.
आई: आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, म्हणून आपण पुरणपोळी करूया.
अंकुश: आई, तू बटाट्याची भाजी अन् पुऱ्या कर म्हणजे मी तुला मदत करू शकेन, शिवाय स्वयंपाकही लवकर होईल. जर पाहुणे लवकर आले, तर त्यांना वेळेवर जेवायला मिळेल; पण पाहुण्यांना आवडेल ना आपण केलेला स्वयंपाक?
उत्तर:
“आपण सर्वांना मदत केली पाहिजे. या मदतीची सुरुवात घरापासून करा. मदत करण्याने आपल्याला तर आनंद होतोच; पण दुसऱ्याचा आनंद हा आपल्याला समाधान देऊन जातो. तुम्ही घरी किंवा इतर ठिकाणी कोणकोणती मदत करता, त्याची नोंद ठेवा आणि ती दर शनिवारी दाखवा.”
शिक्षकांसाठी:
विदयार्थ्यांना उभयान्वयी अव्ययांची विविध उदाहरणे देऊन अधिक सराव करून घ्यावा.
Class 7 Marathi Chapter 9.1 वाचनाचे वेड Additional Important Questions and Answers
खाली दिलेल्या वाक्यांतील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य लिहा.
- आजकालच्या मुलांना ……………. म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते.
- ‘आपण सर्वांना मदत केली पाहिजे. या मदतीची सुरुवात ……………… करा.’
- आईने तिला प्रत्येक कथेचा थोडक्यात ……………… एका पानावर लिहिण्यास सांगितले.
- तिने आजपर्यंत कधीच ……………… वाचन केले नव्हते.
उत्तरे:
- वाचन
- घरापासून
- सारांश
- अवांतर.
खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
सोनालीच्या घरात वाचनाची आवड कोणाकोणाला होती?
उत्तर:
सोनालीच्या घरात तिच्या आईला व मोठ्या भावाला वाचनाची आवड होती.
प्रश्न 2.
सोनालीने आईच्या कथा निवडीला मदत करण्याचा निर्णय का घेतला?
उत्तर:
शाळेतील बाईंनी सांगितल्याप्रमाणे सर्वांना मदत करण्याची व केलेल्या मदतीची नोंद ठेवण्याची सोनालीने सुरुवात केली होती. या नोंदीत आईला केलेल्या मदतीची नवीन नोंद होईल व बाई सगळ्यांसमोर आपले कौतुक करतील, शाबासकी देतील या विचाराने सोनालीने आईच्या कथा निवडीला मदत करण्याचा निर्णय घेतला.
खालील घटनांमागील कारणे लिहा.
प्रश्न 1.
सोनालीने नाईलाजाने दहा कथा वाचल्या.
उत्तर:
सोनालीच्या आईने तिला गोष्टीच्या पुस्तकातून एक कथा निवडण्यास सांगितले होते. त्या पुस्तकात छोट्या छोट्या कथा होत्या. नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी हे सोनालीला कळत नव्हते. म्हणून तिने शेवटी नाईलाजाने दहा कथा वाचल्या.
प्रश्न 2.
शाळेतील बाईंनी सोनालीच्या पाठीवर शाबासकी दिली.
उत्तर:
शाळेत गेल्यावर सोनालीने आपल्या आईला काय व कशी मदत केली हे सांगितले व एक कथाही ऐकवली. अवांतर वाचन केल्याचा तिच्यातील बदल सगळ्यांनाच आनंद देणारा होता. अशा प्रकारे आईला मदत केली म्हणून सोनालीचे बाईंनी अभिनंदन केले आणि वर्गात छान गोष्ट सांगितल्या बद्दल सोनालीच्या पाठीवर शाबासकी दिली.
खालील आकृती पूर्ण करा.
प्रश्न 1.
खालील आकृती पूर्ण करा.
उत्तर:
पुढील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.
कृती 1: आकलन कृती
प्रश्न 1.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
प्रश्न 2.
रिकाम्या जागा भरा.
1. ………… तर सगळ्याच आवडल्या, त्यांतली कोणती निवडावी ते समजेना. (गोष्टी, कथा, वस्तू)
2. आईला ते सारे पाहून तिचे खूप ……………. वाटले. (कौतूक, अग्रुप, वाईट)
उत्तर:
1. कथा
2. कौतुक
उतारा – पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 31, 32
कथा तर सगळ्याच आवडल्या ………………….
………………………….. गगनात मावत नव्हता.
कृती 2: आकलन कृती
प्रश्न 1.
चौकट पूर्ण करा.
1. आईने पानावर काय लिहिण्यास सांगितले? [ ]
2. सारांश लिहिण्यासाठी सोनालीने काय घेतले? [ ]
उत्तर:
1. सारांश
2. पान
खालील प्रश्नांची एका वाक्यांत उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
सोनालीला काय समजत नव्हते?
उत्तर:
सगळ्याच कथा आवडल्यामुळे त्यातली कोणती निवडावी हे सोनालीला समजत नव्हते.
प्रश्न 2.
सोनालीचा आनंद गगनात का मावत नव्हता?
उत्तर:
आईने घरातल्या साऱ्यांपुढे तिचे कौतुक केल्यामुळे सोनालीचा आनंद गगनात मावत नव्हता.
कृती 3: व्याकरण कृती
प्रश्न 1.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
1. आनंद गगनात न मावणे – अतिशय आनंद होणे.
विवेकला सर्वोत्कृष्ट विदयार्थ्याचे बक्षीस जाहिर होताच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.
2. नवल वाटणे – आश्चर्य वाटणे
सकाळी लवकर न उठणारा मिहिर सकाळी 6 वाजता उठलेला पाहताच आई-वडिलांना नवल वाटले.
प्रश्न 2.
खालील वाक्यांतील उभयान्वयी अव्यये शोधा.
1. ती आईकडे गेली व आपल्या समोरील समस्या सांगितली.
2. त्या पानावर कथेचे नाव अन् त्या कथेत काय सांगितले आहे ते थोडक्यात लिहिले.
उत्तर:
1. व
2. अन्
कृती 4: स्वमत
प्रश्न 1.
तुमच्यावर झालेल्या कौतुकाचा एखादा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
मागच्या वर्षी आई-बाबांनी आजोबांच्या पंचाहत्तरी निमित्त फार मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. अनेक नातेवाईक जमले होते. त्यात 4-5 लहान मुलेही होती. त्यातील 2 तर अगदीच वर्षा-दोन वर्षांची होती. कार्यक्रम रंगत आलेला असतानाच त्या लहान मुलांनी रडारड सुरू केली. कार्यक्रमाची रंगत कमी व्हायला नको म्हणून मी सर्व मुलांना घेऊन माझ्या खोलीत गेले व पुढील 2 तास मी त्यांना छानरित्या सांभाळले. माझ्याच आई-वडिलांनी नाही तर सर्व नातेवाईकांनी माझी वाहवा केली. माझे कौतुक केले.
खालील वाक्प्रचारांच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.
प्रश्न 1.
मन वळवणे –
1. दुसरीकडे नेणे
2. तयार करणे
3. नकार देणे.
उत्तर:
2. तयार करणे.
खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा.
प्रश्न 4.
नवल
उत्तर:
सरकारी कार्यालयात कर्मचारी वेळेवर आलेले पाहून रामरावांना नवलच वाटले.
प्रश्न 5.
टीव्ही
उत्तर:
‘टीव्ही’ शाप की वरदान याचे उत्तर त्याचा वापर करणाऱ्या व्यक्तिगणिक बदलू शकते.
उभयान्वयी अव्यये:
व्याख्या: वाक्यातील दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडण्याऱ्या शब्दांना ‘उभयान्वयी अव्यये’ म्हणतात.
उदा:
- रमेश व रत्ना मावशीकडे पुण्याला गेले.
- मला पाऊस खूप आवडतो, कारण मला पावसात भिजायला आवडते.
- आम्ही खूप प्रयत्न केले म्हणून आम्ही जिंकलो.
अपसरणचिन्ह:
व्याख्या: स्पष्टीकरण द्यायचे असल्यास किंवा बोलताबोलता विचारमालिका तुटल्यास ‘-‘ हे चिन्ह वापरतात. त्या चिन्हास ‘अपसरणचिन्ह’ म्हणतात. अपसरणचिन्हाची लांबी संयोगचिन्हा पेक्षा जास्त असते.
उदा:
- असे स्थळ – जे निसर्गरम्य आहे.
- आभाळ भरून आले, पण –
प्रश्न 6.
खालील वाक्यांत अपसरणचिन्ह वापरून वाक्ये पुन्हा लिहा.
1. छोट्या समीरला रडताना बघून आशाताई धावत आल्या आणि
2. रूपेरी पडदा ज्याची माया भल्याभल्याला मोहात पाडते.
उत्तर:
1. छोट्या समीरला रडताना बघून आशाताई धावत आल्या आणि
2. रुपेरी पडदा – ज्याची माया भल्याभल्याला मोहात पाडते.
प्रश्न 7.
खालील शब्दांचे लिंग ओळखा.
- पुस्तक
- कॉम्प्युटर
- गोष्ट
- वही
- प्रसंग
- पान
उत्तरः
- नपुसकलिंग
- पुल्लिंग
- स्त्रीलिंग
- स्त्रीलिंग
- पुल्लिंग
- नपुसकलिंग.
प्रश्न 8.
खालील शब्दांचे वचन बदला.
- गेम
- पुस्तके
- गोष्ट
- कथा
- ओळ
- पाहुणी
- प्रसंग
- वही.
उत्तरः
- गेम्स
- पुस्तक
- गोष्टी
- कथा
- ओळी
- पाहुण्या
- प्रसंग
- वह्या.
प्रश्न 9.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द सांगा.
- आवड
- किमान
- छान
- समाधान
- नवीन
- कौतुक
- समस्या
- सोपे
उत्तरः
- नावड
- कमाल
- वाईट
- असमाधान
- जुने
- निंदा
- उपाय
- कठीण
खालील वाक्यांत विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा.
प्रश्न 1.
टीव्ही व्हिडिओ गेम्स कॉम्प्युटर मोबाईल या सर्वांशी त्यांची मैत्री पक्की झाली आहे.
उत्तरः
टीव्ही, व्हिडिओ गेम्स, कॉम्प्युटर, मोबाईल या सर्वांशी त्यांची मैत्री पक्की झाली आहे.
प्रश्न 2.
तिने आईला मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते म्हणून सांगितले.
उत्तरः
तिने आईला ‘मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते’ म्हणून सांगितले.
प्रश्न 3.
मला खूप काही गोष्टी माहीत आहेत पण कोणती गोष्ट सांगू ते समजेना.
उत्तरः
मला खूप काही गोष्टी माहीत आहेत; पण कोणती गोष्ट सांगू ते समजेना.
वाचनाचे वेड Summary in Marathi
पाठ परिचय:
वाचनामुळे आपल्याला खूप फायदे होतात. वाचनासारखा दुसरा छंद नाही. म्हणूनच म्हटले आहे ‘वाचाल तर वाचाल’. या वाचनाचे महत्त्व सोनालीच्या आईला चांगले ठाऊक होते. आपल्या मुलीनेही असे अवांतर वाचन करावे, असे सोनालीच्या आईला वाटते. त्यासाठी सोनालीची आई एक युक्ती करते. ती युक्ती कशी सफल होते ते आपल्याला ‘वाचनाचे वेड’ या पाठात लेखिका आशा पाटील यांनी दाखवून दिले आहे.
Reading has a lot of advantages. There is no other hobby like reading. It has been said ‘if you read, you will survive’. Sonali’s mother knew the importance of reading. She feels her daughter should also read books other than studies. To inculcate this habit, Sonali’s mother uses a trick. The success of that trick has been narrated in this write up by the writer Asha Patil.
शब्दार्थ:
- अवांतर – इतर, ज्यादा – additional, extra
- मैत्री – दोस्ती – friendship
- नोंद – टाचण – a record
- उत्सुकता – कुतूहल, आतुरता – curiosity
- समस्या – अडचण – a problem
- अभिनंदन – प्रशंसा, वाहवा – congratulation
- प्रसंग – घटना – an incident
- प्रोत्साहन – उत्तेजन – encouragement
- आनंद गगनात न मावणे – खूप आनंद होणे
- नोंदी करणे – टाचण लिहून ठेवणे
- नवल वाटणे – आश्चर्य वाटणे
- मन वळवणे – तयार करणे
- प्रवृत्त करणे – च्यासाठी तयार करणे
- आमुलाग्र बदल होणे – संपूर्ण बदल होणे
- प्रोत्साहन देणे – प्रेरणा देणे
- सारांश – संक्षेप (summary)
- सदस्य – सभासद (member)
- हस्ताक्षर – (Handwriting)
- हस्तक्षेप – अनावश्यक दखल, लुडबुड (Interdict)
- मदत – सहाय्य(help)