SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2019 with Answers

Maharashtra Board SSC Class 10 Marathi Question Paper 2019 with Answers Solutions Pdf Download.

SSC Marathi Question Paper 2019 with Answers Pdf Download Maharashtra Board

वेळ – ३ तास
एकूण गुण- १००

कृतिपत्रिकेसाठी सूचना
(१) सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
(२) आकृत्या पेननेच काढाव्यात.
(३) उपयोजित लेखनातील कृतींसाठी (सूचना निवेदन) आकृतीची आवश्यकता नाही. तसेच या कृती लिहून घेऊ नयेत.
(४) विभाग- ५ उपयोजित लेखन प्र. ५ (अ) (२) सारांशलेखन या घटकासाठी गदय विभागातील प्र. १ (इ) अपठित उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहावयाचा आहे.
(५) स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे.

विभाग १ : गदय २४ गुण

पठित गद

प्रश्न 1.
(अ) उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.
1. कोण ते लिहा. (02)
(i) दारिद्र्याशी संघर्ष करणारी – ………………
(ii) मनाने श्रीमंत असणारे – ………………
(iii) अनवाणी शाळेत जाणारे – ………………
(iv) लेखकाच्या कुटुंबाला मदत करणारे – ………………

शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला, की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीनं संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहेत.

आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये ‘मालती निवासा’ तील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहात होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली दारिद्र्याशी संघर्ष करणारी. माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला; पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने ‘शाळेत कसा जाऊ?’ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे अस होत।

पण माझ्या आईनं धीर सोडला नाही. ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती बेताचीच होती; पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं.

2. योग्य जोड्या लावा: (02)

‘अ’ गट ‘ब’ गट
(i) युनियन हायस्कूल (i) देशमुख गल्ली
(ii) दक्षिण गोवा (ii) महापालिकेची प्राथमिक शाळा
(iii) ‘मालती निवास’ (iii) गिरगाव
(iv) खेतवाडी (iv) माशेल

3. व्याकरण : (01)
खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांची जात ओळखून लिहा
(i) ती खचली नाही.
(ii) आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली.
4. स्वमत (02)
“आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते,’ हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.

SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2019 with Answers

(आ) उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.
1. वैशिष्ट्ये लिहा (02)
(i) कृष्णा नदीचा प्रवाह → ………………
(ii) टोपलीत ठेवलेले मूल → ………………
(iii) लेखकाने सुटकेसमधून काढलेली शाल → ………………
(iv) कविवर्य नारायण सुर्वे यांचे कार्यक्रम → ………………

पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उदयोगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील ‘पुलकित’ शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, “त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस.” या घटनेची ऊब| पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती.

कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, “या शाली घेऊन मी आता ‘शालीन’ बनू लागलो आहे.”
2. प्रत्येकी एका वाक्यांत उत्तरे लिहा. (02)
(i) सन्मानाची प्रतीके लिहा
(ii) पाचपन्नास रुपयांच्या नोटा लेखकाने मासे पकडणाऱ्या बाईला का दिल्या असाव्यात?
3. व्याकरण : (02)
(i) गटात न बसणारा शब्द ओळखून लिहा: (01)
(अ) ठेवणे, गुंडाळणे, शहाणे, गाजणे
(ब) शाल, कृष्णा, पर्वत, नदी
(ii) अनेकवचन लिहा: (01)
(अ) टोपली – ………………
(ब) मासा – ………………
4. स्वमत (02)
लेखक – रा. ग. जाधव यांची संवेदनशीलता जाणवणारे कोणतेही एक उदाहरण पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

अपठित गद्य

(इ) उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.
1. आकृती पूर्ण करा. (02)

SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2019 with Answers 1
आनंदवनामध्ये बाबांनी कुष्ठरोग्यांना स्वाभिमानाने जगायला शिकवले, राहण्यासाठी झोपड्या बांधणे. अन्नधान्यासाठी शेती करणे यापासून अनेक पूरक उद्योग त्यांनी सुरू केले. अर्थात् ही प्रक्रिया सोपी नव्हती अनेक अडचणी होत्या. पण त्यावर मात करत बाबांनी भंगलेल्या शरीरांना, खचलेल्या मनांना जगण्याची उभारी दिली. ताठ मनाने जगण्याची प्रेरणा | दिली. आनंदवनात बाबांनी कुष्ठरोग्यांवर उपचार केले, त्यांना निवास उपलब्ध करून दिला. शिवाय त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी साधने उपलब्ध करून दिली त्यामुळे त्यांना कष्टाची भाकरी मिळवता आली. त्यांच्या कलागुणांना वाव दिला त्यामुळे दैवाने मोडतोड केलेल्या चेहऱ्यांवर हास्य उमलले. हे हास्य समाधानाचे, आत्मविश्वासाचे होते.

बोटं झडलेल्या थिट्या हातांना कामाची सवय लागावी आणि स्वाभिमानाचा ताठ कणा लाभावा यासाठी ‘आनंदवनाची धडपड असते.

आनंदवन उभारताना बाबांनी आतोनात कष्ट घेतले त्यामुळेच गेली सहा दशके तिथे महारोगाने, अंधत्वाने अपंगत्वाने झाकोळून गेलेली जीवने उजळून निघाली. जन्माला येतानाच उपेक्षा घेऊन आलेल्या जिवांमध्ये ‘सुंदर मी होणार’ यासोबत ‘सुंदर मी करणार’ हा मंत्र आनंदवनने जोपासला.
2. योग्य जोड्या लावा: (02)

‘अ’ गट ‘ब’ गट
(i) भंगलेली (i) भाकर
(ii) खचलेली (ii) जीवने
(iii) कष्टाने मिळवलेली (iii) मने
(iv) झाकोळलेल (iv) शरीरे

3. व्याकरण-
(i) खालील वाक्यांतील विशेषणे शोधून लिहा (०1)
(अ) त्यांना ताठ मनाने जगण्याची प्रेरणा मिळाली.
(ब) त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले
(ii) खालील सर्वनामांचा वाक्यात उपयोग करा: (01)
(अ) तू
(ब) तूझा
4. स्वमत (02)
‘सुंदर मी करणार’ या आनंदवनाने जोपासलेल्या मंत्राचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर:
(अ) 1. (i) लेखकाची अल्पशिक्षित आई
(ii) महापालिकेच्या शाळेतील शिक्षक
(iii) लेखक (माशेलकर)
(iv) लेखकाचे मामा

2. (i) युनियन हायस्कूल – गिरगाव
(ii) दक्षिण गोवा – माशेल
(iii) मालती निवास देशमुख गल्ली
(iv) खेतवाडी- महापालिकेची प्राथमिक शाळा

3. (i) ती सर्वनाम, नाही क्रियापद
(ii) आर्थिक विशेषण, पूर्णपणे क्रियापद

4. स्वमत: आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते जगातील इतर व्यक्तींपेक्षा आई ही प्रत्येक मुलाला जास्त जवळची असते कारण मुलाचा जन्मच आईच्या उदरातून होत असतो. गर्भात असल्यापासूनच ती आपल्या बाळावर संस्कार करीत असते. जन्माला आल्यावर सुद्धा जगाची ओळख आईच करून देते. अबोळ भाषा समजून घेऊन बाळावर विविध संस्कार करण्याचे कार्य प्रथम आईच करत असते शब्दांचे उच्चारापासून ने प्रथम पाऊल टाकण्याच्या कामातसुद्धा आईच त्यांची शिक्षक असते, आईच्या वागण्या-बोलण्यातून, तिच्या आवडीनिवडीतून बाळावर संस्कार घडत असतात, आयुष्यात चांगळे-वाईट यातील फरक समजून घेण्यास ती बालला मार्गदर्शन करत असते. म्हणून आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते हे विधान खरोखरच यथार्थ आहे.

SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2019 with Answers

(आ) 1. वैशिष्ट्ये लिहा.
(i) कृष्णा नदीचा प्रवाह – चिंचोळा
(ii) टोपलीत ठेवलेले मूल छोटे मूल
(iii) लेखकाने सुटकेसमधून काढलेली शाल – पुलकित
(iv) कविवर्य नारायण सुर्वे यांचे कार्यक्रम सभा व संमेलने

2. (i) शाल व श्रीफळ ही सन्मानाची प्रतीके आहेत.
(ii) कारण ती बाई गरीब होती व तिच्या बाळासाठी दूध व खाऊ घ्यावा या उद्देशाने पाचपन्नास रुपयाच्या नोटा लेखकाने मासे पकडणाऱ्या बाईला दिल्या.

3. (i) (अ) शहाणे
(ब) पर्वत
(ii) (अ) टोपली टोपल्या
(ब) मासा मासे

4. लेखकाला ओंकारेश्वर मंदिराच्या मुलावर फिरायला जाण्याची सवय होती. असेच एकदा कडक थंडीच्या दिवसात लेखक फिरायला गेले होते तेव्हा त्यांना तेथे एक अशक्त म्हातारा भिक्षेकरी दिसला त्यााकडे नीट अंधरूण पांघरूण नाही असे लेखकाला दिसले. लेखकाने दुसरे दिवशी दोन शाली त्या म्हाता या भिक्षेकरी माणसास दिल्या. लेखकाला वाटेल आपल्याकडे अशा शाली पडून आहेत. त्या भिक्षेकरी माणसास त्याचा चांगला उपयोग होईल. त्याचे थंडीपासून रक्षण होईल. यातून लेखकाची संवेदनशीलवृत्ती दिसून येते.

(इ) 1. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी केलेले कार्य :
(i) कुष्ठरोग्यांना स्वाभिमानाने जगायला शिकविले.
(ii) कुष्ठरोग्यांवर उपचार केले.
(iii) त्यांना निवास उपलब्ध करून दिला.
(iv) स्वत:च्या पायावर उभे राहण्यांसाठी साधने उपलब्ध करून दिली.

2. (i) शरीरे, (ii) मने, (iii) भाकर, (iv) जीवने.

3. (i) ताठ,
(ii) स्वत:च्या.
(iii) (अ) तू आई मधुराला, म्हणाली तू लवकर घरी ये.
(ब) तुझा – सदाशिव शिवरायाला म्हणाला तुझा मुलगा खूप हुशार आहे.

4. आनंदवनाची स्थापना बाबा आमटे यांनी केली. कुष्ठरोग्यांना समाजाने वाळीत टाकले त्यांची उपेक्षा केली. अशा या माणसांना माणसात आणण्याचे त्यांच्या मनात जगण्याची जिद्द निर्माण करण्याचे महान कार्य बाबा आमटे यांनी केले.

या माणसांना परावलंबी जिणे जगू द्यायचे नाहीं दुसऱ्याच्या मदतीने नाही तर स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ निर्माण केले. आम्हीही काही करू शकतो, आम्ही सुंदर जीवन जगू शकतो अशी जिद्द निर्माण केली. अपंगत्व, अंधत्व, महारोगाने झाकोळून गेलेले जीवन उजळून टाकण्याचे कार्य बाबा आमटे करू शकले त्यांच्यात सुंदर मी करणार हा मंत्र बिंबवला.

विभाग २: पद्य (२० गुण)

प्रश्न 2.
(अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. (02)
1. खालील कृती केव्हा घडतात, ते लिहा :
(i) माता धावून जाते ………………
(ii) धरणीवर पक्षिणी झेपावते ………………
(iii) गाय हंबरत धावते ………………
(iv) हरिणी चिंतित होते ………………
अग्निमाज पडे बाळू।
माता धांवें कनवाळू॥ १ ॥

तैसा धांवें माझिया काजा।
अंकिला मी दास तुझा॥ २ ॥

सर्वोचि पावें पक्षिणी।
पिलीं पडतांचि धरणीं॥ ३ ॥

भुकेलें वत्सरावें।
धेनु हुंबरत धांवे॥ ४ ॥

वणवा लागलासे वर्नी।
पाडस चिंतीत हरणी॥ ५ ॥

नामा म्हणे मेघा जैसा।
विनवितो चातक तैसा॥ ६ ॥
2. कोण ते लिहा.
(i) परमे वर कृपेची याचना करणारे – ………………
(ii) मेघाची विनवणी करणारा – ………………
(iii) भुकेलेले – ………………
(iv) भक्ताच्या हाकेला धावून येणारा – ………………
3. आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. (02)
4. तैसा धांवें माझिया काजा । अंकिला मी दास तुझा ॥ या ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.’ (02)

SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2019 with Answers

(आ) खालील मुददयांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा:
‘औक्षण किंवा हिरवंगार झाडासारखे’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री – (01)
(2) कवितेचा रचनाप्रकार – (01)
(3) कवितेचा काव्यसंग्रह – (01)
(4) कवितेचा विषय – (01)
(5) कवितेतील आवडलेली ओळ – (02)
(6) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे – (02)

(इ) खालील ओळींचे रसग्रहण करा. (04)
दुनियेचा विचार हरघडी केला,
अगा जगमय झालो.
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे,
याच शाळेत शिकलो.
उत्तर:
1. (i) बाळ आगीच्या तडाख्यात सापडते तेव्हा.
(ii) आपली पिले धरणीवर कोसळताच
(iii) भुकेल्या वासराच्या आवाजाने.
(iv) जंगलात वणवा लागताच आपल्या पाडसाच्या काळजीने.

2. (i) नामदेव महाराज
(ii) चातक
(iii) वासरू
(iv) परमेश्वर

3. ‘धार उडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी’ या उक्तीप्रमाणे मानव, प्राणी किंवा पक्षी या प्रत्येकाचेच आपापल्या अपत्याच्या संरक्षणाकडे विशेषकरून लक्ष असते. चराचर सृष्टीतील ही वास्तविकता नामदेव महाराजांनी आपल्या अंकिला मी दास तुझा’ या अभंगात वर्णन केली आहे. ममता किंवा मातृत्व ही कल्पना मानव व मानवेतर प्राणी या सर्वांमध्येच दिसून येते. स्त्री ही चाहाल्यांसाठी प्रसिद्ध आहे. कोणत्याही मातेचे बाळ अग्रीमध्ये म्हणजेच संकटांत सापडणे ही कल्पनासुद्धा ती सहन करू सकत नाही. अशी ही दयाळू आई खरोखरच जर बाळ ‘अग्नीमध्ये’ सापडले तर आगीत उडी ध्यायलासुद्धा तयार असते आणि अशीच ममता मानवेतर प्राण्यांमध्येसुद्धा दिसून येते. वासराच्या केवळ हंबरण्याच्या आवाजाने गाय वासराजवळ जाऊन त्याची भूक भागविते याप्रमाणेच पक्षिणीसुद्धा तिचे मातृप्रेम दाखवून देते. पिळू जमिनीवर पडताक्षणीच पक्षिणी त्याच्याकडे झेपावते या वरून मातृप्रेमाची भावना / मानव व मानवेतर प्राणी सर्वांकडे सारखीच असल्याचे दिसून येते.

4. “तैसा धांवें माझिया काजा। अंकिला मी दास तुझा॥”
ही काव्यपंक्ती नामदेव महाराजांनी लिहिलेल्या ‘अंकिला मी दास तुझा या अभंगातील असून यात परमेश्वराचे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी नामदेव महाराज मनापासून प्रार्थना करतात. आगीत सापडलेल्या बालकाची स्वतःमध्ये भूमिका स्वतःमध्ये पाहत ते परमेश्वराला म्हणतात की संकटात सापडलेल्या बालकाकडे म्हणजे भक्ताकडे धावत येतो हे तुझे कर्तव्य आहे कारण मी तुझा अंगीकारलेला दास आहे आणि हे परमेश्वरा तू माझा स्वामी आहेस, माझे संकट हे तुझे संकट आहे असे समजून मायेच्या ममतेने तू या बालकाकडे नक्कीच धावत येशील.’

(आ) 1 (i) कवयित्री इंदिरा संत
(ii) कृतज्ञता भाव व्यक्त करणारी कविता
(iii) गर्भरेशीम : इंदिरा संत यांची समग्र कविता
(iv) लढण्यासाठी सुसज्ज होऊन सीमेवर जाणाऱ्या सैनिकाला निरोप देण्याआधी केले जाणारे औक्षण व ते करताना मनात ठेचबळणाऱ्या भावनांचे वर्णन.
(v) जीव ओवाळावा तरी, जीवन किती हा लहान
तुझ्या शौर्यगाथेपुढे, त्यांची केवढीशी शान
(vi) ही कविता मला खूप आवडते कारण ज्या सैनिकांमुळे आपण आपले जीवन निश्चिंतपणे जगू शकतो. त्यांच्या कार्याची कृतज्ञतेने दखल ना कवितेत घेतली आहे.

2. (i) कखी जॉर्ज लोपीस
(ii) रचना प्रकार- मुक्तछंद
(iii) काव्य संग्रह – ‘पूर्ण झाले आहे’
(iv) विषय झाडासारखे सहनशीलता, परोपकारी वृत्ती, दातृत्व हे गुण मानवाने ही अंगी करावेत असा संदेश.
(v) आवडलेली ओळ झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते भरगळ
(vi) ही कविता अतिशय सुंदर आहे कारण यातून झाडाचे मानवी जीवनातील स्थान सांगितले आहे आणि मानवाने कशाप्रकारे आपले जीवन जगावे हे झाडाच्या उदाहरणाने अतिशय समर्पकरीत्या सांगितले आहे.

(इ) ‘ऐसा गा मी ब्रह्म’ या काव्यसंग्रहातील ‘दोन दिवस’ ही कविता नारायण सुर्वे यांनी लिहिली आहे या कवितेत कवीने कामगारांच्या जीवनातील वास्तव परिस्थितीचे वर्णन केले आहे. रोजच्या पोटापाण्याच्या चिंतेत असणाऱ्या व अतोनात कष्ट करताना दुःखाशी सामना करत आपले जीवन जगणाऱ्या कामगारांची व्यथा या कवितेत वर्णिली आहे.

कवी नारायण सुर्वे कष्टकऱ्यांच्या दुःखाचे वर्णन करताना असे सांगतात की आयुष्य हे दुःखाने भरलेले आहे पण हे विचार मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळते हे स्पष्ट करताना म्हणतात दुःख पचवून उमेदीने जगण्याचे शिक्षणही येथेच मिळते.

या कष्टकऱ्यांप्रमाणेच आपणही आपल्या जीवनात येणारे दुःख, अडचणी, संकटे यावर मात करून त्यातून वाट काढत आयुष्य नव्याने जगायला हवे असा संदेश या कवितेत दिला आहे.

विभाग ३ : स्थूलवाचन (६ गुण)

प्रश्न 3.
खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. (06)
1. टीप लिहा :
बार्क
2. तुम्हांला समजलेली ‘जाता अस्ताला ‘ या कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
3. निसर्ग हा मोठा जादूगार आहे’, हे विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात कसे लागू पडते, ते पाठाच्या आधारे सविस्तर लिहा.
उत्तर:
1. ‘जाता अस्ताला’ या कवितेत सूर्याची भूमिका ही कुटुंबप्रमुखासारखी आहे, तो जसा त्याच्या नंतर कुटुंबाची गैरमोय होऊ नये म्हणून योग्य जी सोय करून ठेवतो, तसेच सूर्य देखील पृथ्वीवर सूर्यास्तानंतर कुणाची गैरसोय होऊ नये म्हणून त्याची आधिच तरतूद करून ठेवतो. पण त्याची चिंता त्याला सतावते. व अशाच विचारात तो आकंठ बुडालेला असतो. त्याचवेळी छोटीशी पणती पुढे येऊन त्याला आत्मविश्वासक पूर्ण वचन देने की पृथ्वी अस्तानंतर अंधारात बुडणार नाही.

3. ‘निसर्ग हा मोठा जादूगार आहे’
पाण्याशिवाय वनस्पती व प्राणी जगू शकत नाहीत हे विधान अगदी सत्य आहे. पण वाळवंटी प्रदेशात तसे दिसत नाही. वाळवंट म्हणजे अगदी कोरडेपणा, पाण्याचे दुर्भिक्ष आणि रेताड जमीन. तरीही यशाचा नैसर्गिक परिस्थितीतही निसर्गाने या ठिकाणी तग धरून राहतील अशा वनस्पती व प्राणी निर्माण केले आहेत.

वाळवंटी प्रदेशात पाऊस क्वचितच पडतो. कधी-कधी तर दोन-तीन वर्षांनी पाऊस पडतो. अशावेळी येथील झाडे निष्पर्ण होतात, आणि पाऊस पडल्यावर जमिनीत सुप्तावस्थेत पडलेल्या बियांमधून अचानक जादू झालयाप्रमाणे रोपे उगवतात. निष्पर्ण झालेल्या झाडांना असलेल्या हा प्रदेश विविधरंगी पानाफुलांनी सजतो. यातूनच निसर्ग हा मोठा जादूगार असल्याची प्रचिती आपणास येते.

विभाग ४ : भाषाभ्यास (२० गुण)

प्रश्न 4.
(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती.
1. समास: (02)
पुढील विग्रहावरून सामासिक शब्द व समास ओळखा:

विग्रह सामासिक शब्द समासाचे नाव
(i) नफा किंवा तोटा
(ii) प्रत्येक घरी

2. अलंकार:
(i) खालील ओळीतील अलंकार ओळखा: (01)
आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे।
(ii) खाली दिलेल्या लक्षणांवरून अलंकार ओळखा. (01)
उपमेय हे जणू उपमानच असते
3. वाक्यरूपांतर: (02)
पुढील वाक्यात कंसातील सूचनेनुसार बदल करा:
(i) दररोज अभ्यास करावा (आज्ञार्थी करा)
(ii) मला हे चित्र नापसंत नाही (होकारार्थी करा)
4. सामान्यरूप: (02)
तक्ता पूर्ण करा.

मूळ शब्द सामान्य रूप विभक्ती प्रत्यय
(i) मावशीने
(ii) पायाला

4. वाक्प्रचार:
कंसातील वाक्प्रचारांचा खालील वाक्यांत योग्य उपयोग करा:
(आर्जव करणे, तथ्य असणे, उत्साहाला उधाण येणे)
(i) ताईचे लग्न ठरल्यावर सगळ्यांना खूप आनंद झाला.
(ii) विज्ञानाच्या नियमांत सत्यता असते.

SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2019 with Answers

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:
1. शब्दसंपत्ती
(i) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. (01)
(अ) मित्र =
(ब) चंद्र =
(ii) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. (01)
(अ) सावध
(ब) स्तुती
(iii) खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा: (01)
(अ) मत देणारा
(ब) भाषण ऐकणारा –
(iv) खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द बनवा. (01)
वाचनालय – ____________  ____________
2. लेखननियमांनुसार लेखन:
(i) अचूक शब्द ओळखा: (01)
(अ) कवयत्री / कवयीत्रि/कवयत्री/कवयित्री
(ब) क्रिडांगण / क्रीडांगण /क्रिडंगण/क्रीडागण
(ii) खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा: (01)
आपण लिहीलेला मजकुर वाचणाऱ्याला लगेच समजायला हवा.
3. विरामचिन्हे:
(i) खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा: (01)
(अ) आनंदी खेळकर मुले सर्वांना आवडतात
(ब) तू केव्हा, आलीस
(ii) खालील चिन्हांची नावे लिहा: (01)
SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2019 with Answers 2
4. पारिभाषिक शब्द:
खालील पारिभाषिक शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा:
(अ) Workshop – ____________
(ब) Programme – ____________
5. भाषिक खेळ:
‘दार’ हा प्रत्यय लावून दोन शब्द लिहा:
SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2019 with Answers 3
उत्तर:
(अ) 1.

विग्रह सामासिक शब्द समासाचे नाव
(i) नफा किंवा तोटा नफातोटा वैकल्पिक दंड
(ii) प्रत्येक घरी घरोघरी अव्ययीभाव

2. (i) आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे – उपमा
(ii) उपमेय हे जणू उपमानच असते- उत्प्रेक्षा

3. (i) आज्ञार्थी करा – उत्तर. दररोज अभ्यास करा.
(ii) होकारार्थी करा – उत्तर मला हे चित्र पसंत आहे.

4.

मूळ शब्द सामान्य रूप विभक्ती प्रत्यय
(i) मावशीने मावशी ने
(ii) पायाला पाया ला

5. (i) ताईचे लग्न ठरल्यावर सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आले.
(ii) विज्ञानाच्या नियमांत तथ्य असते.

(आ) 1. (i) (अ) मित्र – सखा
(ब) चंद्र – शशी
(ii) (अ) सावध × बेसावध
(ब) स्तुती × निंदा
(iii) (अ) मतदार
(ब) श्रोता
(iv) (अ) लय
(ब) नाच

2. (i) (अ) कवयित्री
(ब) क्रीडांगण
(ii) आपण लिहिलेला मजकूर वाचणाऱ्याला लगेच समजायला हवा.

3. (i) (अ) आनंदी, खेळकर मुले सर्वांना आवडतात.
(ब) तू केव्हा आलीस ?
(ii) (अ) ! – उद्गारवाचक चिन्ह
(ब) ‘……….’ एकेरी अवतरण चिन्ह

4. (i) Workshop – कार्यशाळा
(ii) Programme – कार्यक्रम

5. (i) जबाबदार
(ii) धारदार

विभाग 5: उपयोजित लेखन (३० गुण)

प्रश्न 5.
(अ) खालील कृती सोडवा.
1. पत्रलेखन: (05)
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2019 with Answers 4
SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2019 with Answers 5

2. सारांशलेखन : (05)
खालील उतारा वाचा व त्याचा एक तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
आनंदवनामध्ये बाबांनी कुष्ठरोग्यांना स्वाभिमानाने जगायला शिकवले, राहण्यासाठी झोपड्या बांधणे. अन्नधान्यासाठी शेती करणे यापासून अनेक पूरक उद्योग त्यांनी सुरू केले. अर्थात् ही प्रक्रिया सोपी नव्हती अनेक अडचणी होत्या. पण त्यावर मात करत बाबांनी भंगलेल्या शरीरांना, खचलेल्या मनांना जगण्याची उभारी दिली. ताठ मनाने जगण्याची प्रेरणा | दिली. आनंदवनात बाबांनी कुष्ठरोग्यांवर उपचार केले, त्यांना निवास उपलब्ध करून दिला. शिवाय त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी साधने उपलब्ध करून दिली त्यामुळे त्यांना कष्टाची भाकरी मिळवता आली. त्यांच्या कलागुणांना वाव दिला त्यामुळे दैवाने मोडतोड केलेल्या चेहऱ्यांवर हास्य उमलले हे हास्य समाधानाचे, आत्मविश्वासाचे होते.

बोटं झङ्गलेल्या थिट्या हातांना कामाची सवय लागावी आणि स्वाभिमानाचा ताठ कणा लाभावा यासाठी ‘आनंदवनाची’ धडपड असते.

आनंदवन उभारताना बाबांनी आतोनात कष्ट घेतले त्यामुळेच गेली सहा दशके तिथे महारोगाने अंधत्वाने अपंगत्वाने | झाकोळून गेलेली जीवने उजळून निघाली. जन्माला येतानाच उपेक्षा घेऊन आलेल्या जिवांमध्ये ‘सुंदर मी होणार’ यासोबत ‘सुंदर मी करणार’ हा मंत्र आनंदवनने जोपासला.

(आ) खालील कृती सोडवा. (06)
1. बातमीलेखन
SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2019 with Answers 6
वृद्ध दिनानिमित्त संपन्न झालेल्या वरील कार्यक्रमाची बातमी तयार करून लिहा.

2. कथालेखन: (06)
खालील मुद्द्यांवरून गोष्ट तयार करा.
मुद्दे –
शाळेत जाणारा कष्टाळू – प्रामाणिक मुलगा – वाईट मित्रांची संगत – शिक्षकांना काळजी – मुलाला घेऊन बाजारात फेरफटका – उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी – एक खराब झालेला आंबा – दोन दिवसांनी पाहणी – नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब – संदेश –

(इ) लेखनकौशल्य
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. (08)
1. प्रसंगलेखन
SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2019 with Answers 7
वरील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.
2. आत्मवृत्त:
SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2019 with Answers 8
वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.
उत्तर:
(अ) 1. अभिनंदन पत्र
दिनांक : 2 मार्च, 2024.
प्रति,
मुख्याध्यापक
आदर्श विद्यालय
बोपर्डी, ता. वाई जि. सातारा.
विषय: तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धाबाबत

महोदय,
आपण आयोजित केलेल्या तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धेमध्ये तालुक्यातील जवळपास सर्वाधिक शाळांनी सहभाग घेतलेला दिसून येत होता. आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पण या स्पर्धेत भाग घेवून चांगलेच यश मिळवले. शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि सेवक वर्ग हे आपल्या घरातीलच एक कार्यक्रम आहे असे समजून काम करत होते. सर्वोच्यात आपलेपणा व आपुलकी दिसून येत होती. हे सर्व आपल्या प्रेमळ व आगत्यपूर्ण वागण्यामुळे झाले.

आपले उत्कृष्ट नियोजन उत्तम व्यवस्थापन व कामाची सचोटी यामुळेच हा स्पर्धा कार्यक्रम उत्तमप्रकारे पार पडला याबद्दल मी संचित वाघमारे विद्यार्थी प्रमुख या नात्याने आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो.

असेच विविध क्षेत्रातील कार्यक्रम आपल्या मार्गदर्शनाखाली आयोजित करून शाळेचा नावलौकिक जिल्हयामध्ये व्हावा ही
अपेक्षा.
कळावे.
आपला नम्र,
सचिन वाघमारे,
विद्यार्थी प्रतिनिधी,
आदर्श विद्यालय, बोपर्डी.

किंवा

दिनांक : 2 मार्च 2019.
प्रति,
मुख्याध्यापक, आदर्श विद्यालय,
बोपर्डी, ता. वाई जि. सातारा
विषय: तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धेमध्ये प्रवेशाबाबत

महोदय,
आपण आपल्या शाळेमध्ये तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. त्याबद्दल मी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपले प्रथम आभार मानतो तसेच विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपले प्रथम आभार मानतो. तसेच विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने या स्पर्धेत इ. १०वी अ या वर्गातील वीस विद्यार्थी सहभाग घेऊ इच्छितात.

हे विद्यार्थी अभ्यासामध्ये खूप हुशार आहेत तसेच त्यांची चित्रकला पण खूप चांगली आहे. अभ्यास सांभाळून ते या कलेकडे लक्ष देतात. तेव्हा या विद्यार्थ्यांना आपण आयोजित केलेल्या चित्रकलास्पर्धेमध्ये प्रवेश मिळाल्यास स्पर्धेमुळे त्यांच्यातील कलेच्या ज्ञानामध्ये भर पडेल व पुढील जीवनात हे ज्ञान उपयोगी पडेल.

तरी मी सचित वाघमारे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास विनंती करतो की. या विद्यार्थ्यांना आपल्या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतलेस तर होईल.
सोबत विद्यार्थ्यांच्या नांवाची यादी जोडली आहे.
कळावे,
आपला नम्र,
सचिन वाघमारे,
(विदयार्थी प्रतिनिधी)
आदर्श विद्यालय, बोपर्डी.

2. सारांश लेखन आनंदवनमध्ये बाबांनी कुष्ठरोग्यांना जगण्यासाठी अन्न, वस्त्र व निवारा यांची सोय केली. यासाठी त्यांना अनेक कष्ट करावे लागले. आनंदवनात कुष्ठरोग्यावर उपचार करून भंगलेले शरीर व खचलेले मन यांना उभारी देऊन स्वत:च्या पायावर उभे राहून ताठ मनाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यामुळे त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळून त्यांना कष्टाची भाकरी मिळवता आली. त्यांच्या जीवनात आत्मविश्वासाने आनंद निर्माण व्हावा. यासाठी आनंदवनची धडपड शुरू असते. यासाठी बाबांनी ५० वर्षे अफाट कष्ट घेवून अंध, अपंग व महारोगी यांना सुंदर मी होणार यासोबत सुंदर मी करणार हा मंत्र दिला.

SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2019 with Answers

(आ) 1. बातमी लेखन
दै लोकसेवा पत्र
जागतिक वृद्ध दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम
आधारवड वृंद्धनिवास तर्फे जागतिक वृद्ध दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाच आयोजन संपन्न.

ता. 2 मार्च, 2019.
आमच्या प्रतिनिधीकडून,
जागतिक वृद्धदिनानिमित्त ता. 1 रोजी आधारवड वृद्धनिवास निर्मलनगर, पुणे येथील संस्थेने सायं ५वा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये गायन-वादन कथाकथन अश्या विविध कलांचा समावेश करण्यात आला होता. रसिक मित्रमंडळ, पुणे यांनी विविध गुणांनी कार्यक्रमात बहार आणून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. मोफत प्रवेश आणि सस्नेह निमंत्रण यामुळे प्रचंड प्रेक्षक वर्ग उपस्थित होता.

या कार्यक्रमामुळे वृद्धांच्या जीवनातील मरगळ जाऊन मन आनंदाने नाचत होते हे दिसून आले. सर्व ठिकाणी आधारवडमधील वृद्ध आपुलकीने व उत्साहाने कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले दिसून येत होते. अश्या आनंद सागरात हा सोहळा सम्पन्न झाला.

2. कथा लेखन-
संगतीचा परिणाम
आमच्या घराजवळच आदर्श विद्यामंदिर नांवाची शाळा होती. शाळेतील बरीच मुल आमच्या जगदीशच्या ‘संगतीने घरी येत होती. त्यातच एक राजू नांवाचा विद्यार्थी त्याचा मित्र होता. हा राजू खूप कष्टाळू आणि प्रामाणिक होता. घरची गरीबी त्यामुळे शिक्षणाला पुरेसे पैसे मिळत नव्हते. म्हणून तो सकाळी पेपर टाकणे, सुट्टीच्या दिवशी काही कामधंदा करून चार पैसे मिळत होता आणि उरलेल्या वेळेत खूप अभ्यास करत होता. त्याची स्मरणशक्ती खूप चांगली असलेली शाळेत त्याने कधी पहिला नंबर सोडला नाही त्यामुळे तो सर्व शिक्षकांचाही खूप आवडता होता.

राजूला कामाची चांगली सवय झालेमुळे भरपूर पैसे मिळू लागले. यातूनच त्याला पैसे बचतीची सवय लागली. सर्व मित्रामध्ये तो आवडता होता. काही वेळा तो मित्रांना आपल्या पैशातून गोडघोड पदार्थ देत होता. असे होता होता त्याचा मित्र परिवार वाढत गेला आणि काही वाईट मित्रांची त्याला संगत लागली. त्यांच्याबरोबर तो अफाट पैसे उधळू लागला. त्याचे अभ्यासा वरचे लक्ष उडून गेले. सहामाही परीक्षेत खूपच कमी मार्क मिळाले. यामुळे सर्वांना त्याच्याबद्दल काळजी वाटू लागली. शिक्षक देखील काळजी करू लागले.

एकेदिवशी शाळेतील जमदाडे सर बाजारातून फेरफटका मारत असताना त्यांना राजू दिसला. त्याला पाहिल्यावर त्यांना एक कल्पना सुचली. त्यांनी राजूला बरोबर घेवून आवा मार्केटमध्ये जावून आंब्याची छोटी पेटी घेतली. आंबे खूपच चांगल्या प्रतीचे होते. घरी आल्यावर त्यांनी राजूला आंबे मोजून पाहण्यास सांगितले. त्यांने ते मोजताना एक आंबा खराब दिसला. त्यांनी ते तसेच ठेवले आणि दोन दिवसांनी राजूस येण्यास सांगितले. दोन दिवसांनी घेऊन राजूने ही पेटी उघडली आणि पाहतो तर त्यातील आंबे खराब झालेले होते. राजूला खूप वाईट वाटले. तेव्हा जमदाडे सर म्हणाले, राजू हे आंबे त्या एका आंब्याने खराब झाले आहेत त्यामुळे या सर्व आंब्याची आज किंमत शून्य आहे. तेव्हा आपली पण किंमत शून्य होऊ नये म्हणून आपल्या जवळ पण संगतीमध्ये खराब मित्र – असू नये.

1. प्रसंग लेखन
मी त्यावेळी अमरावती येथील ज्ञानसंवर्धन विद्यालयात शिकत होतो. 5 वी पासूनच या विद्यालयात असले ते शाळेतील सर्व शिक्षक इतर विद्यार्थी कर्मचारी संख्याबद्दल खूप आपुलकी वाटत होती. दरवर्षी जून महिन्यात नवे ड्रेस, नवी पुस्तकें मिळत होती.. त्यामुळे उत्साह वाढत होता असे होता होता कधी १०वीचे वर्ष आले हे कळलेच नाही. १०वीत आलेवर मे महिन्यापासून जादा तास सुरू होऊन अभ्यासास सुरुवात झाली होती. त्यावर्षी फक्त अभ्यास हे एकच काम असे ध्येय होते.

आम्ही सर्व विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यासामध्ये गढून गेलो होतो. कोणते सण आले गेले याकडे लक्षच नव्हते. आता मला आठवतच त्यावेळी फेब्रुवारी महिना होता. परीक्षा एक महिन्यावर येऊन ठेवलेली होती आमचा परीक्षा सराव वर्गामध्ये सुरू होता आणि अचानक दारावर टिक टिक ऐकू आली म्हणून पाहिले तर दारात रघु दादा नोटीस घेवून उभे होते. शिक्षकांनी ती नोटीस वाचून सांगितलेली २० फेब्रुवारी ला दुपारी ४ वाजता निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम आम्हाला नवीनच होता, तेव्हा त्यावेळी त्यावर चर्चा शुरू झाल्या. अनेकांनी आपली अनेक मते मांडत शेवटी २० फेब्रुवारी हा दिवस आला. त्यादिवशी आम्ही १०वी चे सर्व विद्यार्थी कांही वेगळ्याच आणि विचित्र मन:स्थितीत होतो. एकीकडे आनंद होता. एकीकडे नैराश्य होते. नवीन ध्येयनिष्ठ जीवनाची सुरुवात म्हणून आनंद आणि एवढी चांगली शाळा सोडण्याचे दुःख होते.

दुपारचे चार वाजले होते. कार्यक्रमाला सुरुवात होऊन शिक्षकांनी आपली मनोगते सांगण्यास सुरुवात केली. कांही विद्यार्थ्यांनीं कसा अभ्यास केला. सुरुवातीला अभ्यासात ‘ढ’ असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कशी प्रगती केली ५ वी पासूनच्या विविध आठवणी आमच्या समोर सांगू आमच्या मनाला हळहळ वाटू लागली त्यानंतर कांही विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते सादर केली.

मी ही माझे मनोगत सांगताना माझ्या 5 वी पासूनच्या प्रवासातील आठवणी आणि प्रगती सांगू लागलो. त्यावेळी कांही वेळा हसण्याचा आवाज पाहायचा जर कांही वाईट वाटण्याचा चकचक आवाज होता. स्टेजवरून खाली आल्यावर बरेच विद्यार्थी रुमालाने डोळे पुसत असलेले दिसले तेव्हा मुख्याध्यापकांनी कणखर आवाजात सांगितले की आता रडत बसू नका आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत.

SSC Maharashtra Board Marathi Question Paper 2019 with Answers

2. आत्मवृत्त
पुस्तकाचे आत्मवृत्त
एकदा सकाळी उठण्यास फारच वेळ झाळा. मन आळसावले होते. अभ्यासाचा खोलीत जाऊन नुसताच टेबला जवळील खुर्चीवर बसलो होतो. टेबलावर पुस्तके अस्ताविस्तपणे पडली होती. मी मनामध्ये कांही विचारकरीत होतो. तोच माझ्या कानांवर कांही शब्द पहले अरे नुसताच काय बसतोस या पुस्तकांच्याकडे बघता हल्ली बरीच पुस्तके तु हातात घेतोस आणि ठेवून देतोस. मलाही तसेच करतोस. आमचा तुला कंटाळा आला आहे काय? या शब्दानी मी भानावर आलो. पाहतो तर इतिहासचे पुस्तक माझ्याशी चक्क बोलत होते. ते सांगत होते कि माझा जन्म एका नामवंत इतिहास संशोधकांच्या घरी झाला. त्यामुळे माझी किंमत वाढलेली होती. त्यामुळे मला खूप मागणी होती. मी अनेकांच्या घरी होते. माझी ज्ञानी माणसांबरोबर मैत्री झाली. मी सर्वांना खूप आवडत होते. माझा या सर्व लोकांना खूप उपयोग होत होता. त्यांच्या ज्ञानामध्ये खूप मोठी भर पडत होती माझ्यामध्ये खूप संशोधनाची माहिती असलेले सर्वजण माझा वारंवार उपयोग करून घेत होते. इतर पुस्तकापेक्षा मला जरा जास्त मान मिळत होता.

आता पुस्तकांचे स्वरूप बदलत चालले आहे. नवीन डिजीटल तंत्रज्ञानामुळे संगणकावरच बरीच पुस्तके उपलब्ध होतात. त्यामुळे पुस्तकांचा वापर कमी होत चालला आहे. हा वापर कमी झाल्यामुळे बरे वाटते कारण आम्हाला वाचण्यासाठी सारखे हातात घेवून घेवून आम्हाला फाडून टाकले जाते. आमच्याकडे कोणी लक्षपण फारसे देत नाही. त्यामुळे आम्हाला आता थोडा आराम मिळतो. याचा आनंद आहे अरे पण हा आनंद जास्त काळ टिकणार नाही. कारण जर सर्व पुस्तके संगणकावर उपलब्ध झाली तर पुस्तकाला मागणी कमी होणार त्यांची छपाईकमी होणार. बाजारात पुस्तके मिळणार नाहीत. मग गरीबाती काय करावयाचे? त्यांना संगणक घेणे परवडणार नाही आणि ते चांगल्या ज्ञानापासून वंचित राहतील याची खंत वाटते. दारावरील टकटकीने मी भानावर आलारे. दारात आई चहाचा कप घेवून उभी होती. मी चहा घेवून पुस्तकाचा विचार करत असता पुस्तकाचे म्हणणे बरोबर आहे. याचा आपण विचार केला पाहिजे असे वाटले.

SSC Maharashtra Board Marathi Question Paper with Answers

Leave a Comment