Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 19 अनुभव-२

albharti Maharashtra State Board Class 5 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 19 अनुभव-२ Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 19 अनुभव-२

5th Standard Marathi Digest Chapter 19 अनुभव-२ Textbook Questions and Answers

1. थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न (अ)
आईला पाहताच मुलगा धावत का गेला?
उत्तर:
मुलाला आईच्या हातात दोन मोठ्या पिशव्या दिसल्या. त्या जड असाव्यात असे त्याला वाटले. आईला मदत करावी या विचाराने आईला पाहताच मुलगा धावत गेला.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 19 अनुभव-२

प्रश्न (आ)
आईचे हात कशामुळे लालेलाल झाले होते?
उत्तर:
आईच्या हातात दोन वजनदार पिशव्या होत्या. बराच वेळ त्या हातात धरल्याने ओझ्यामुळे आईचे हात लालेलाल झाले होते.

प्रश्न (इ)
आईला बरे का वाटले?
उत्तर:
आई दोन हातात वजनदार पिशव्या घेऊन एकटीच आली. तिचे हात त्या ओझ्यामुळे लालेलाल झाले होते. बराच वेळ ती स्वत:चे हात दाबत होती. आईच्या हातातील एक पिशवी मुलाने घेतल्यामुळे तिचे ओझे कमी झाले म्हणून तिला बरे वाटले.

प्रश्न (ई)
मुलाने किराणा सामान केव्हा आणायचे ठरवले? का?
उत्तर:
ज्या दिवशी शाळेला सुट्टी असेल तेव्हा किराणा सामान आणायला जायचे, असे मुलाने ठरवले. ज्यामुळे आईला पिशव्या उचलाव्या लागणार नाहीत.

2. खालील शब्दांत शरीराचे भाग असणारे शब्द शोधा.

प्रश्न 1.
खालील शब्दांत शरीराचे भाग असणारे शब्द शोधा.
उत्तर:

  1. पाठवणी
  2. यजमान
  3. आगबोट
  4. तोंडपाठ
  5. पोटपूजा
  6. पायपुसणी
  7. गालबोट
  8. नाकतोडा

3. खालील शब्द वाचा व तसेच लिहा.

प्रश्न 1.
खालील शब्द वाचा व तसेच लिहा.
सुट्टी, हुश्श, चक्कर, लख्ख, बग्गी, गच्च, सज्जन, लठ्ठ, उड्डाण, अण्णा, पत्ता, कथ्थक, जिद्द, घट्ट, अन्न, गप्पा, झिम्मा, अय्या, गल्ली, सव्वा.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 19 अनुभव-२

4. विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

प्रश्न 1.
विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.
(अ) मोठे ×
(आ) हसणे ×
(इ) जड ×
(ई) खाली ×
(उ) जाणे ×
(ऊ) सांडणे ×

5. खालील शब्दात लपलेले शब्द शोधा.

प्रश्न 1.
खालील शब्दात लपलेले शब्द शोधा.
उत्तर:
(अ) सामानाला – माना, नाला, नामा, मासा, माला
(आ) बाजारात – बात, रात, बाजा, राबा, राजा
(इ) चाललीस – चाल, लली, लस, सल
(ई) मनापासून – सून, मन, पाना, पान

6. तुम्ही आईला कोणकोणत्या कामात मदत करता?

प्रश्न 1.
तुम्ही आईला कोणकोणत्या कामात मदत करता?
उत्तर:
आम्ही आईला अनेक कामात मदत करतो.
घरकाम –
1. कपड्यांच्या घड्या करणे.
2. पुस्तके कप्प्यात ठेवणे
3. आपल्या चप्पल/बूट व्यवस्थित ठिकाणी ठेवणे.

बाहेरील काम –
1. इस्त्रीचे लहान कपडे आणणे
2. बँकेत चेक टाकणे
3. वाण्याकडे यादी देणे इत्यादी
4. दळण टाकणे/आणणे.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 19 अनुभव-२

7. तुमच्या घराजवळील किराणामालाच्या दुकानात जा. तेथील वस्तूंची यादी करा व ती पुढील रकान्यात लिहा.

प्रश्न 1.
तुमच्या घराजवळील किराणामालाच्या दुकानात जा. तेथील वस्तूंची यादी करा व ती पुढील रकान्यात लिहा.
उत्तर:

सामान नग / किलो
तांदूळ 5 किलो
गहू 10 किलो
गूळ 1 किलो
साखर 2 किलो
सामान नग / किलो
चहा पावडर ½ किलो
Toilet Soap 3 नग
आगपेट्या 1 बॉक्स
Lizol (मोठी बाटली)

8. जोड्या लावा.

प्रश्न 1.
पुढील जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. लालेलाल (अ) केस
2. काळेकुट्ट (ब) दही
3. पांढरेशुभ्र (क) कुंकू
4. पिवळेधमक (ड) जांभूळ
5. जांभळट (इ) लिंबू
6. निळसर (ई) गवत
7. हिरवेगार (फ) आकाश

उत्तर:

‘अ’ गट ‘ब’ गट
1. लालेलाल (क) कुंकू
2. काळेकुट्ट (अ) केस
3. पांढरेशुभ्र (ब) दही
4. पिवळेधमक (इ) लिंबू
5. जांभळट (ड) जांभूळ
6. निळसर (फ) आकाश
7. हिरवेगार (ई) गवत

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 19 अनुभव-२

9. कंसातील योग्य शब्द निवडून खालील वाक्ये पूर्ण करा.

प्रश्न 1.
कंसातील योग्य शब्द निवडून खालील वाक्ये पूर्ण करा.
(असतो, हळूहळू, शाळा, लवकर, पडली)
(अ) संजू ………………….” उठतो.
(आ) गोगलगाय …………… चालते.
(इ) हा बंगला नेहमी बंद ………………..
(ई) ………………….. वेळेवर भरते.
(उ) यावर्षी खूप थंडी ………………. .

उपक्रम:

प्रश्न 1.
आईविषयी एखादी कविता मिळवा. पाठ करा व वर्गात म्हणून दाखवा.

Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 19 अनुभव-२ Additional Important Questions and Answers

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
आईकडे बघून मुलाला काय जाणवले?
उत्तर:
आईकडे बघून मुलाला जाणवले, की तिच्या हातातील पिशव्या खूप जड असाव्यात.

प्रश्न 2.
आईच्या हातातील पिशव्यांमध्ये काय होते?
उत्तर:
आईच्या हातातील पिशव्यांमध्ये महिन्याभराचं किराणा सामान होते.

प्रश्न 3.
मुलाने काळजीने आईला काय विचारले?
उत्तर:
“आई तू दर महिन्याला एवढं ओझं एकटीच घेऊन येतेस?”

प्रश्न 4.
पुढच्यावेळी आईबरोबर सामान आणायला कोण जाणार होते?
उत्तरः
पुढच्या वेळी आईबरोबर सामान आणायला मुलगा जाणार होता.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 19 अनुभव-२

एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
1. मुलगा कुठे निघाला होता?
2. आईच्या पिशवीत काय होते?
3. आईचे हात कसे झाले होते?
उत्तरः
1. घरी
2. किराणा सामान
3. लालेलाल

थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
आईबरोबर सामान आणायला गेल्याने मुलाला काय फायदा होणार होता?
उत्तर:
आईबरोबर सामान आणायला गेल्याने आईला तिच्या कामात मदत होणार होती व मुलाचे व्यवहारज्ञानही वाढणार होते.

प्रश्न 2.
तुम्ही आईला आणखी कोणत्या कामात मदत करू शकाल? ती कशी?
उत्तर:
सणावाराला किंवा घरात कुठला कार्यक्रम असेल तेव्हा घर स्वच्छ करण्यासाठी, सजवण्यासाठी आम्ही आईला मदत करू, तिच्या बरोबर बाजारात जाऊन भाजी घेण्यास, भाजी निवडण्यास आम्ही आईला मदत करू.

व्याकरण व भाषाभ्यास:

1. वाक्प्रचाराचा अर्थ सांगा व वाक्यात उपयोग करा.

प्रश्न 1.
गाठणे – एखादयाजवळ पोहोचणे
उत्तर:
पोलिसांनी चोराला गाठले.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 19 अनुभव-२

प्रश्न 2.
भाव गगनाला भिडणे – खूप महागाई होणे.
उत्तर:
सोन्याचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत.

प्रश्न 3.
हुश्श करणे – मोकळा श्वास घेणे.
उत्तर:
वर्षभराची कामे पूर्ण झाल्यावर शिक्षकांनी हुश्श केले.

प्रश्न 4.
खालील शब्दात लपलेले शब्द शोधा.
उत्तर:

  1. वारसदार – दार, वारस, वार, वास, रस, सर
  2. हिरवागार -हिरवा, गार, वार, रवा
  3. समाहार – हार, मार, सहा, रस
  4. व्यवहारज्ञान – वन, ज्ञान, व्यवहार, वर

अनुभव-२ Summary in Marathi

पदयपरिचय:

आईबद्दलची काळजी आणि मुलाचा समजुतदारपणा या पाठात सांगितला आहे.

Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 19 अनुभव-२

शब्दार्थ:

  1. शाळा – विदयालय (school)
  2. घर – राहण्याचे ठिकाण (house)
  3. पिशव्या – (bags)
  4. सामान – माल (goods)
  5. किराणा सामान – वाण्याकडून घेतलेले सामान (grocery)
  6. दुकान – (a shop)
  7. दमणे – थकणे – (to tired)
  8. बाजार-हाट – (market)
  9. ओझं – (burden)
  10. काळजी – चिंता – (worry)
  11. व्यवहारज्ञान – (practical knowledge)
  12. जड – वजनदार – (heavy)

Leave a Comment