Std 5 Hindi Lesson 22 वाचूया लिहूया Question Answer Maharashtra Board
Balbharti Maharashtra State Board Class 5 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 22 वाचूया लिहूया Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
5th Std Hindi Poem Vachuya Lihuya Question Answer
5th Standard Marathi Digest Chapter 22 वाचूया लिहूया Textbook Questions and Answers
प्रश्न 1.
चित्र पाहा व त्याविषयी माहिती लिहा.
उत्तर:
1. गुलाबाला ‘फुलांचा राजा’ म्हणतात. गुलाब अनेक रंगांचे असतात. गुलाबाच्या फुलांना मोहक सुगंध असतो. गुलाब फुलाचा उपयोग गुलाबपाणी, वेगवेगळ्या प्रकारची सुगंधी द्रव्ये, गुलकंद बनवण्यासाठी होतो. गुलाबाशी संबंधित व्यवसाय म्हणजे गुलाबपाणी तयार करणे, गुलकंद तयार करणे, गुलाबापासून सुगंधी द्रव्ये तयार करणे इ. होत.
2. मला मोर खूप आवडतो. तो खूप सुंदर दिसतो. त्याचा रंगीबेरंगी पिसारा पाहत राहवेसे वाटते. मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे. मोराचा निळा रंग एवढा वेगळा आहे की त्याला इंग्लिशमध्ये ‘peacock blue’ व मराठीत ‘मोरपिशी रंग’ असे म्हंटले जाते. भारतात गुजरात व राजस्थान राज्यात मोरांची संख्या लक्षणिय आहे. मोराच्या मादीला मराठीत लांडोर असे म्हणतात. मोराला पावसाळा फार आवडतो. आकाशात काळे ढग जमले की तो ‘म्याओ म्याओ’ ओरडतो आणि आपला सुंदर पिसारा फुलवून थुई, थुई नाचू लागतो. मोराला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात, कारण तो शेतातील किटक व साप खातो, तसेच तो दाणेही खातो.
3. दिवाळी हा संपूर्ण भारतात साजरा होणारा सण आहे. दिव्यांचा सण म्हणून याला ‘दिवाळी’ किंवा ‘दीपावली’ असे म्हणतात. दिवाळीत दारात कंदील लावले जातात, रांगोळी काढली जाते. सगळीकडे लाल दिव्यांची रोषणाई असते. वेगवेगळ्या आकाराची, प्रकारची मिठाई, आकर्षक कपडे व फटाके हे दिवाळी सणाचे विशेष आहे. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज आणि पाडवा असे चार दिवस दिवाळी सण साजरा केला जातो.
4. बागा अथवा उदयाने ही मुलांसाठी व वृद्धांसाठी विरंगुळ्याची स्थाने आहेत. उदयानात मुलांसाठी खेळायला घसरगुंडी, सी-सॉ, झोपाळा यांसारखी खेळण्याची साधने असतात. वृद्धांना आरामात बसण्यासाठी बाके असतात. बागेत सगळीकडेच हिरवळ तसेच झाडेच झाडे असल्यामुळे येथील हवा शुद्ध असते. बागेतील संपूर्ण परिसर शांत, डोळ्यांना सुखावणारा असतो. लहान मुलांची तर जणू येथे मौजच असते. उदयानांना ‘शहरी फुफ्फुसं’ (Lungs) असे म्हटले जाते.
5. कुत्रा हा इमानदार प्राणी आहे तो पाळीव प्राणी आहे. याच्या अनेक जाती-प्रजाती आहेत. कुत्रा हा खरंतर मांसाहारी प्राणी पण तो शाकाहारी आवडीने खातो. कुत्रा आपल्या मालमत्तेचे व आपले रक्षण करतो. कुत्र्यांच्या इमानदारीचा उपयोग मोठमोठे गुन्हेगार शोधण्यासाठीही केला जातो. कुत्रा हा मानवप्रिय प्राणी आहे.
6. जत्रा म्हणजे एखादया उत्सवप्रसंगी भरवण्यात आलेला मेळा. या मेळ्यात अनेक माणसे, फेरीवाले, काम करणारे, व्यापारी इ. असतात. रात्री जत्रेत आणखी मजा येते. विद्युत रोषणाईने भरलेले चक्र, पाळणे, चक्राकार फिरणारे पाळणे (Jaint wheel, mery-go round) पाहण्यासारखे असते. दूरदूरची माणसे इथे येऊन फळे, वस्त्रे, दागिने, गृहोपयोगी वस्तू, इतर काही विशेष वस्तूंची व खाण्याच्या पदार्थांची खरेदी करतात. जत्रेचा लहान मुले मनमुराद आनंद लुटत असतात. पारंपारिक जत्रा जरी वर्षातून एकदाच भरत असली तरी (fun-fair) मात्र नियमितपणे सर्वत्र भरत असतात.
Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 22 वाचूया लिहूया Additional Important Questions and Answers
प्रश्न 1.
एक-दोन शब्दांत उत्तरे लिहा.
- मला फळांचा राजा म्हणतात.
- आंब्याच्या रसाला काय म्हणतात?
- आब्यांच्या झाडांच्या बागेला कायं म्हणतात?
- ख्रिश्चन बांधव प्रभू येशूच्या जन्मदिवसाला काय म्हणतात?
- ख्रिसमस च्या शुभेच्छा देताना ख्रिश्चन बांधव काय म्हणतात?
- मुलांच्या मनातील इच्छा कोण पूर्ण करतो?
- मी आहे एक दुचाकी, जिला लागत नाही कोणते इंधन ओळखा पाहू मी कोण?
- मी केवळ पाण्यातच राहू शकतो, म्हणून मला जलचर म्हणतात, सांगा पाहू मी कोण?
- मासा पोहताना कशाचा वापर करतो?
- मासा कोणाचे अन्न आहे?
- डोक्यावर तुरा अनंगीत पिसारा, ओळखा पाहू मी कोण?
- माझ्यापासून बनतो गुलकंद, सांगा मी कोण?
उत्तरः
- आंबा
- आमरस
- आमराई
- नाताळ
- मेरी ख्रिसमस
- सांताक्लॉज
- सायकल
- मासा
- शेपूट, पर
- मानवाचे
- मोर
- गुलाब
एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
आंबा पिकला की काय होते?
उत्तर:
आंबा पिकला की आंब्याचा रंग बदलून त्याला छान वास येतो व तो चवीला गोड लागतो.
प्रश्न 2.
आंब्याच्या वेगवेगळ्या जातींची नावे लिहा?
उत्तर:
हापूस, पायरी, केशर, खोक्या, गोटी, चिक्कूळ्या इत्यादी.
प्रश्न 3.
ख्रिसमस या सणाच्या दिवशी कोणते गोडधोड पदार्थ बनवले जातात?
उत्तर:
ख्रिसमस या सणाच्या दिवशी डोनट, केक यांसारखे गोडधोड पदार्थ बनवले जातात.
प्रश्न 4.
सायकल वापरण्याचे फायदे कोणते?
उत्तर:
सायकल वापरल्यामुळे इंधन बचत होते व शरीराचा चांगला व्यायाम होतो.
प्रश्न 5.
माशाला जलचर का म्हणतात?
उत्तर:
मासा समुद्र, नदी, तलावांच्या पाण्यात राहतो, म्हणून माशाला जलचर म्हणतात.
प्रश्न 6.
माशाचे अन्न कोणते?
उत्तर:
पाण्यातले कीटक, लहान मासे व पाणवनस्पती हे माशाचे अन्न आहे.
थोडा विचार करा, अन् सांगा पाहू.
प्रश्न 1.
थोडा विचार करा, अन् सांगा पाहू.
- आंब्याचा आमरस तसे केळ्याचे काय?
- कच्या कैरीपासून काय काय तयार होते?
- मला आहे राष्ट्रीय पक्ष्याचा मान, सांगा पाहू मी कोण?
- सण हा मौजेचा, दिव्यांच्या रोषणाईचा लाडू, चकली, करंजी खाण्याचा?
उत्तर:
- शिकरण
- पन्हं, मुरांबा, लोणचं
- मोर
- दिवाळी
वाचूया लिहूया Summary in Marathi
पदयपरिचय:
चित्रांशी संबंधित दिलेल्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये कशी लिहावीत हे विदयार्थ्यांना या पाठातून दाखविले आहे.
शब्दार्थ:
- आंबा – (mango)
- वास-गंध – (smell)
- रस – (pulp)
- सण – उत्सव (festival)
- येशू – (Jesas) (ख्रिश्चन धर्मियांचा देव)
- चर्च – ख्रिश्चनांचे प्रार्थनास्थळ
- शुभेच्छा – (wishes)
- गोडधोड – गोड चवीचे (sweets)
- शिकवणूक – शिकवण (teachings)
- सायकल – दुचाकी. (bycycle)
- इंधन – (fuel)
- तलाव – तळे (lake)
- शेपूट – (tail),
- पर-पंख – (wings)
- मानव – (human)
5th Standard Marathi Digest Pdf
- नदीचे गाणे Class 5 Marathi Questions and Answers
- मी नदी बोलते Class 5 Marathi Questions and Answers
- आमची सहल Class 5 Marathi Questions and Answers
- पैशांचे व्यवहार Class 5 Marathi Questions and Answers
- अनुभव-२ Class 5 Marathi Questions and Answers
- गमतीदार पत्र Class 5 Marathi Questions and Answers
- छोटेसे बहीणभाऊ Class 5 Marathi Questions and Answers
- वाचूया लिहूया Class 5 Marathi Questions and Answers
- ऐका पहा करा Class 5 Marathi Questions and Answers
- मालतीची चतुराई Class 5 Marathi Questions and Answers
- पतंग Class 5 Marathi Questions and Answers
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे Class 5 Marathi Questions and Answers
- फुलपाखरू आणि मधमाशी Class 5 Marathi Questions and Answers